Home

  • Tammy Bartaia -Actress whose versatility and dedication to her craft catches your attention

    Batamiwala News correspondent talk with this fabulous actress about her new upcoming projects….

    Tammy, what does acting mean to you?

    -Acting is storytelling. It’s the opportunity to embody someone else’s life to tell a story. Acting is living authentically under fictional circumstances. For me acting is a lifestyle not a job. With every new role I grow as a person. I’m happy that I have a chance to express myself.

    -Please tell us about your upcoming film.

    – “The Legend of Peacock” is a spiritual thriller directed by Atul Garg. The film covers the topics of spirituality, awaking, enlightenment. It explodes philosophically empowering messages. My character’s name is Rita. She arrives from the USA to India to study Indian mythology at the university. Rita faces many challenges and obstacles that will shape her life. She reaches her self -realization in India. The film shootings took place in Banaras, Kashmir, Dehradun. I think after watching “The Legend of Peacock” film audience will look at the world from a different perspective.

    Tammy, why do people love watching movies so much?

    – We are living in a time when political and social change bring a lot of doubts to our lives. Actors help people to connect to the new world and give them certainty, the sense that something feels right. Some movies are so good they occupy your brain and permanently become part of you.  Audience laughs at character’s jokes, shares their happiness, cries at their tragedies, and even bites nails when they see emotional scenes in the movie. Sometimes people enjoy watching a move multiple times because of a way it makes them feel.



    -What are you passionate about besides acting? 

    -In addition to my acting pursuits I have always harboured a love for writing. I’m the author of the book- “The Young Woman With An Old Soul” and “A Pink House On Wheels”. I always loved to write. It allows me to create something special, something out of the ordinary. I never chase ideas they come naturally to me. Even when there is no pen in my hand I always write in my head. When I was ten years old I got pneumonia. My only companions were books. I found great comfort in reading. I was so grateful for the books that took my mind away from the real world. I thought to myself- one day I will write a book and help other kids escape their troubles.

    What makes you attracted to Indian culture?

    – I feel like I’m spiritually connected to India. For me joy and happiness started from the moment I set foot in India. I think India is seductively beautiful, magical. The ancient and modern side by side. It really has to be experienced to be understood. The steps to the temples take you towards tranquillity. So much to admire: The cultural art forms, the monuments, music, Hindi films. Watching Bollywood films can give you a glimpse into the customs, traditions and beliefs of India and help you appreciate its rich history. I love everything about Hindi cinema- catchy songs, dance, drama, colours. I learnt Hindi at Sydney University. It helps me to connect with locals on a deeper level.

    What is your motto in life?

    -You can’t change the beginning but you can start from where you are and change the ending.

  • नामवंतांकडून होतेय ‘अमलताश’चे कौतुकदिग्दर्शक रवी जाधव, निखिल महाजन, अमेय वाघ केले कौतुक

    मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित ‘अमलताश’ ( Amaltash Marathi movie) चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. आयुष्यातील विविध सुरांचे भावपूर्ण सादरीकरण करणारा हा चित्रपट अनेकांना भावतोय. प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा चित्रपट असून या चित्रपटाचे कौतुक केवळ प्रेक्षक, समीक्षकच नाही तर अनेक नामवंतही करत आहे. कलेची उत्तम जाण असणारा प्रत्येक व्यक्ती का कलाकृतीचे कौतुक करत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर ‘अमलताश’चे भरभरून कौतुक केले आहे. दिग्दर्शक रवी जाधव, निखिल महाजन, प्रकाश कुंटे, अमेय वाघ यांच्यासह अनेकांनी या चित्रपटाचे  कौतुक केले आहे.

    दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, ” हा एक असा सुंदर मराठी चित्रपट आहे, ज्याला सौम्य सिनेमॅटिक टच आहे. यातील साधेपणा प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक पात्रात आपण नकळत गुंततो. या कथानकातील विशेष आकर्षण म्हणजे सुमधुर संगीत. प्रत्येकाने आवर्जून पाहावा.असा हा चित्रपट आहे.” तर दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ” एक सुंदर संगीत चित्रपट आहे जो खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. प्रेम, मैत्री आणि एका शहराचे मर्म इतक्या प्रभावीपणे   पडद्यावर मांडण्यात चित्रपटाची संपूर्ण टीम यशस्वी झाली आहे. तर प्रकाश कुंटे ‘अमलताश’चे कौतुक करताना म्हणतात, ” चैत्राच्या आगमनाची चाहूल देऊन नावाप्रमाणेच छान फुललाय. प्रेम आणि संगीताविषयी फुललेली ही उत्कृष्ट कलाकृती चुकवू नका.” तर अभिनेता अमेय वाघ म्हणतो, ” हा चित्रपट म्हणेज  भावपूर्ण सांगीतिक अनुभव आहे, जो प्रत्येकाने जरूर अनुभवावा.”

    सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.

  • अंकुश चौधरी बनला’बैदा’ नाटकाचा प्रस्तुतकर्ता



    अंकुश चौधरी… मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. स्टाईल आयकॉन म्हणूनही अंकुशकडे पाहिले जाते. यापूर्वी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अंकुश एका नवीन भूमिकेतून आपल्या समोर येत आहे. संदीप पोपट दंडवते लिखित, दिग्दर्शित  ‘बैदा’ नाटकाचा प्रस्तुतकर्ता असून येत्या १६ मार्चपासून हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नाट्य मल्हार निर्मित या दोन अंकी नाटकात उन्नती कांबळे, अक्षय काळकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वतःसाठी कुटुंबासाठीची लढा… अशी टॅगलाईन असलेले हे नाटक कौटुंबिक आहे.

    आपल्या या नवीन भूमिकेबद्दल अंकुश चौधरी म्हणतात, ” बऱ्याच दिवसापासून एखादे चांगले नाटक प्रस्तुत करावे अशी इच्छा होती. याचदरम्यान संदीप दंडवते लिखित, दिग्दर्शित ‘बैदा’  हे नाटक पाहाण्यात आले. उत्तम सादरीकरण, अतिशय चांगला विषय आहे. त्यामुळे हे जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, असे मला मनापासून वाटले. म्हणून मी या नाटकाचा भाग झालो. या नाटकाच्या माध्यमातून मी प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.”

  • स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ येतोय ३ मे रोजी

    “कासरा” चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न

    अभिनेत्री स्मिता तांबेनं ( Smita Tambe) आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी “कासरा” या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.     

    रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं “कासरा” चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केले असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे तर अविनाश सातोसकर यांनी छायांकन केले आहे. प्रशांत नाकती यांनी लिहिलेल्या गीतांना प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन केले असून ही गाणी गायक जावेद अली, आदर्श शिंदे  गायिका आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रिषभ साठे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.  

    या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह अभिनेते गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बाल कलाकार साई नागपूरे यांच्या मध्यवर्ती भूमिका असून जनमेजय तेलंग, तन्वी सावंत हे कलाकार या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. विष्णू खापरे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.            

    स्मिता तांबेनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीत आता “कासरा” चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीप्रधान विषयावरील “कासरा” हा चित्रपट अन्नदात्या शेतकऱ्याला वेगळा दृष्टिकोन देणारा आहे. शेतीतील प्रश्न मांडतानाच त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न हा चित्रपट करतो. त्यामुळे स्मिता तांबेसारख्या दमदार अभिनेत्रीच्या अभिनयानं या चित्रपटाचं कथानक वेगळ्या उंचीवर गेलं आहे. कासरा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना ३ मे पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.! Smita Tambe starrer Marathi Movie ‘Kasara’ is releasing on May 3

  • अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

    संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ ( Ready Mix Marathi movie) आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ ( Jai swachhmay jayate bola Marathi movie) या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. Ultra Zakas movie talkies

    आपल्या मोठ्या बहिणीला प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी नूपुरने आखलेली योजना यशस्वी होईल का, हे रेडीमिक्स चित्रपटात तर गोगलगावातील लोकांना घाणीतून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी अनासपूरेंची योजना यशस्वी होईल का, हे जय स्वच्छमेव जयते बोला या चित्रपटात बघता येणार आहे. ‘रेडीमिक्स’ चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांचा जबरदस्त अभिनय पहायला मिळणार असून मकरंद अनासपूरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते  बोला’ चित्रपटात आपल्या विनोदी ढंगाने समाजासाठी एक गंभीर संदेश दिला आहे.

    “समाजात मनोरंजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर समाजाचं प्रबोधनही तेवढंच महत्वाचं आहे. मनोरंजातून प्रबोधन करणारे रेडीमिक्स आणि जय स्वच्छमेव जयते बोला हे चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना मनात एक उत्स्फूर्त भावना आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.

  • Manoj Bajpayee starrer Bhaiyya Ji – first look out

    The makers of ‘Sirf Ek Bandaa Kaafi Hai’ are back with yet another exciting film, Bhaiyya Ji. Today, they released the first look of Desi Superstar Manoj Bajpayee from the film, and truly the actor appears fierce and ready to take the world down! The film is directed by Apoorv Singh Karki and written by Deepak Kingrani.

    Bhaiyya Ji presented by Manoj Bajpayee, Bhanushali Studios Limited and SSO Productions in association with Aurega Studios is produced by Vinod Bhanushali, Kamlesh Bhanushali, Samiksha Oswal, Shael Oswal, Shabana Raza Bajpayee, and Vikram Khakhar.

    Bhaiyya Ji is set to have its worldwide release on 24th May 2024.

  • Ab Chhota Bheem ka Mazza Bade Screen Par

    Bheem and the gang is back to save Dholakpur! The intriguing teaser of Chhota Bheem and The Curse of Damyaan Out Now!

    Ab Chhota Bheem ka Mazza Bade Screen Par!

    Link: https://youtu.be/nRpiFn0tkE0?si=ZQyezsXNglUVHaqU

    Get ready to dive into an exciting adventure with Chhota Bheem and his gang as they take you on a thrilling ride in Chhota Bheem and The Curse of Damyaan, a live-action film that will surely keep audiences, especially kids, entertained at all times.

    One cannot mention Dholakpur without Chhota Bheem and his gang. The recent teaser reveals how Bheem’s beloved city is in trouble and depicts the gang coming together to save the people and the city from the curse of Damyaan. But will they be successful? Wait until the 24th of May 2024 to witness the face-off between Bheem and Damyaan.

    Directed by Rajiv Chilaka and produced by Rajiv Chilaka and Megha Chilaka, Chhota Bheem and The Curse of Damyaan is written by Niraj Vikram and co-produced by Srinivas Chilakalapudi along with Bharath Laxmipati. The film is all set to hit theaters on May 24, 2024.

  • मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

    स्मरणरंजनाचा हृद्य सोहळा रंगणार

    नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर ( Madhusudan Kalelkar) यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी नाट्य मंदिर, नाट्यगृह येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या विशेष पुढाकाराने हा महोत्सव संपन्न होणार आहे.

    या महोत्सवाअंतर्गत १९ मार्च ते २१मार्च अशा तीन दिवसीय विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफिलीचा विशेष सोहळा ज्येष्ठ  दिग्दर्शक-अभिनेते राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार २२ मार्चला सायंकाळी ७.०० वा. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. नाटयमहोत्सव आणि सांगीतिक मैफिल सोहळा रसिकांसाठी विनामूल्य आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे सुपुत्र अनिल कालेलकर यांनी हा महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याच्या  भावना व्यक्त केल्या.

    या महोत्सवात श्री. मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात’(१९ मार्च), ‘डार्लिंग डार्लिंग’ (२० मार्च),  ‘नाथ हा माझा’ (२१ मार्च)  या नाटकाचे सादरीकरण होईल. या नाटकांच्या सादरीकरणात एक अभिनव प्रयोग करण्यात येणार आहे . ‘दिवा जळू दे सारी रात’ तसेच ‘डार्लिंग डार्लिंग’या नाटकाचे तीन अंक तीन वेगळ्या नाट्यसंस्था सादर करणार आहेत. ‘डार्लिंग ‘डार्लिंग’ या नाटकाचा पहिला अंक पार्थ थिएटर्स, मुंबई यांच्या विद्यमाने दिग्दर्शक मंगेश सातपुते, दुसरा अंक श्री कलाधारिणी प्रॉडक्शन्स मुंबई दिग्दर्शक गणेश पंडीत, तिसरा अंक अनामय, मुंबई दिग्दर्शक देवेंद्र पेम सादर करणार आहेत.  ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाचा पहिला अंक अभिनय, कल्याण यांच्या वतीने दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, दुसरा अंक व्हिजन व्हॉईस एनऍक्ट, मुंबई दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर तिसरा अंक माणूस फाऊंडेशन मुंबई दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर सादर करणार आहेत.

    ख्यातनाम नाटककार, गीतकार, हिंदी- मराठी चित्रपट लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. मार्च २०२३-२०२४ हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मधुसूदन कालेलकरांना त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमासाठी  १९६१ सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता .

    मधुसूदन कालेलकर यांच्या  बहुविध प्रतिभेचे पैलू उलगडत त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा महोत्सव रसिकांसाठी स्मरणरंजनाचा हृद्य अनुभव असणार आहे. (Madhusudan Kalelkar’s birth centenary year organized a special theater festival )

  • वानरलिंगी- एका आव्हानात्मक प्रस्तारारोहणाचे दस्तऐवजीकरण

    १९८३ साली केल्या गेलेल्या एका अल्पत कठीण व जोखमीच्या बढाईसंबंधी एक माहितीपट आम्ही म्हणा प्रस्तरारोहणाच्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या मंडळींनी तयार केला आहे त्याच्या प्रिमियरची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वानरलिंगी (किंवा खडा पारशी) हा सह्याद्रीतील एक प्रसिद्ध सुळका आहे तो सुळका सर करण्याच्या मोहिमेचे हे एक उत्कंठावर्धक चित्रण आहे. या मोहिमेत जी तंत्रे वापरली गेली त्यांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अन्यही ठिकाणच्या प्रस्तरारोहींना, तोपर्यंत अजिंक्य समजल्या गेलेली शिखरे शक्यतेच्या टप्यात आणली. हा माहितीपट प्रा. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेची सविस्तर माहिती देतो, ज्यासाठी लढवलेल्या कल्पना, त्या प्रत्यक्षात उत्तरवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत पात चित्रित करण्यात आली आहे. धातुशास्त्र, प्रकल्प व्यवस्थापन, उत्पादनाचे तंत्रज्ञान या सगळ्याचा या मोहिमेच्या यशासाठी उपयोग करून घेण्यात आला. हे विशेष.

    Vaanartingi-documenting an iconic rock-climbing venture

    एक अशी वस्तू या मोहिमेत वापरली गेली, जी भारतात उपलब्ध नव्हती. एवढेच नव्हे तर त्याच्या परदेशातील वापराविषयीही माहिती मिळवणं कठीण गेलं, त्यामुळे त्याचा नमूना मिळवणे, कोणता धातू त्यासाठी वापरता आहे ते शोधणे, त्याचा उपलब्ध पर्याय शोधणे, उत्पादनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया अजमावणे, त्याच्या चाचण्या घेणे, हे सारेच आव्हानात्मक होते. अशा चाचण्या प्रमाणित करण्यासाठी त्या काळी प्रयोगशाळाही नव्हत्या (आजही नाहीत), त्यामुळे आरोहणाच्या आधारभूत गोष्टी लक्षात घेऊन तपासण्या करायच्या आणि प्रत्यक्ष चढाईत वापरण्यासंबंधी उत्पादित केलेल्या वस्तूंची गुणवत्ता पारखायची, हे अत्यंत जोखमीचे काम होते चुकीचा निर्णय आरोहीच्या जिवावर बेतण्पाची शक्यता होती. अनेक दिवसांची चढ़ाई, रात्रीच्या अंधारात केलेले आरोहण, आणि जेमतेम पाऊल मावेल एवढ्या जागेवर उभ्या कड्यावर रात्र काढणे अशा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी या पहिल्यांदाच घडल्या, व्यवस्थापन, नेतृत्व आणि कार्यवाही या सगळ्याच दृष्टीने ती एक अनुकरणीय मोहीम होती. सृजनशीलता, अनिश्चिततेचा सामना, निर्णयक्षमता यांची कसोटी त्यात लागली. या पयशानंतर आपला अनुभव आपि यशस्वी ठरलेलं तंत्रज्ञान मोकळेपणाने इतरांसोबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेअर करताना या मंडळींनी हात आखडता घेतला नाही.

    शनिवार, १६ मार्च २०२४ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता या प्रिमियरचे प्रदर्शन होईल. स्थानः महाराष्ट्र सेवा संघ, जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रथितयश दिग्दर्शक श्री. क्षितीज झारापकर यांनी केले आहे.

    पहिल्या प्रदर्शनानंतर हा लघुचित्रपट आमच्या पूट्यूब पहायला मिळेल. पा लघुचित्रपटाबद्दलची कल्पना येण्यासाठी एक छोटी चित्रफित आजही येथे उपलब्ध आहे.

    https://www.youtube.com/@hardknocksindia

  • येत्या 12 एप्रिलला रुद्राचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला…

    वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहिला आवडते अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या  “रुद्रा, या मराठी चित्रपटाचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १२ एप्रिलला येत आहे.

    एका क्रूरकर्मा “अण्णा पाटील, नावाच्या व्यक्तीच्या कारवायांमुळे त्रस्त झालेले गाव व पुढे सरकणारे आगळे वेगळे कथानक प्रेक्षकांना थरारक अनुभूती देणार आहे,  वाईटावर चांगल्याची मात, त्यातून वेळोवेळी कलाटणी देणारे कथानक त्यामुळे निर्माण होणारी स्थिती प्रेक्षकांना वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे.

    “माँ भवानी फिल्म” या बॅनर अंतर्गत बनलेला हा चित्रपट अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या “रुद्राच्या” आयुष्यावर आहे. भावाच्या मृत्यूनंतर दुखावल्या गेलेल्या बहिणीने घेतलेली रुद्राची मदत व दृष्ट अण्णा पाटील चा मृत्यू होत नाही तोपर्यंत “मी केस बांधणार नाही! अशी शपथ घेणारी बहीण, भक्कम असे व्यक्तिमत्व असणाऱ्या अण्णा पाटील समोर रुद्राचा निभाव लागेल का? भावाच्या मृत्यूनंतर दुखावलेली बहीण केस बांधेल? या सर्वच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना रुद्रा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत कित्येक दिवस असे थरारक चित्रपट मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळत नव्हते मात्र रुद्राच्या रूपाने एक वेगळीच पर्वणीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    भन्नाट थरारक “रुद्रा, या चित्रपटाची निर्मिती  अशोक कामले व दिपाली सय्यद यांची आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अशोक कामले व सुनील मोटवानी या दिग्गज दिग्दर्शकांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते प्रमोद कवडे व प्रमोद कामले आहेत. या चित्रपटात  रुद्राच्या भूमिकेत  नव्या दमाचा नायक सिद्धार्थ असून, सिद्धार्थ व अपूर्वा कवडे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडणार आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गजनी फेम प्रदीप रावत, दिपाली सय्यद,अनुप सिंग ठाकूर, निशिगंधा वाड ढोलकीच्या तालावर फेम माधुरी पवार,जानकी पाठक, विश्वेश्वर चव्हाण, विना जगताप वैष्णवी करमरकर,अशोक कानगुडे, अशोक कामले, भूपेंद्र सिंग, दिलीप वाघ,बाळासाहेब बोरकर, संपदा भोसले,हरी कोकरे, विशाल राठोड, लक्ष्मण सालवा, संदीप कामले, निर्मल शेट्टी हे कलाकार पाहायला मिळणार आहे तर  मिळणार आहेत.

    या चित्रपटाचे संगीत प्रवीण कुवर ,लहू महादेव बबली यांनी लयबद्ध केले असून, आघाडीच्या गायिका वैशाली माडे, सोनाली पटेल,संचिता मोरजकर,पौलमी  मजुमदार, अनन्या मुखर्जी अनुप सिंग ठाकूर अशोक कांबळे, धम्मरक्षित रणदिवे या गायकांनी आपल्या मधुर आवाजात  चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे डीओपी अरविंद सिंग पुवार, संजीवकुमार हिल्ली, हे असून, चित्रपटाचे एडिटर मनोज गोविंद संकला आहे हे आहेत, तर चित्रपटाची मार्केटिंग विक्रम रिक्रिएशनचे विक्रम धाकतोडे यांनी सांभाळली आहे.