
-
पुरस्कार नामांकनात ‘बापल्योक’ चित्रपटाची बाजी

चित्रभाषेच्या जाणिवा समृद्ध करणं हे चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्टय असते. या उद्देशानेच आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल १७ आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात ३ नामांकने मिळवत ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली छाप पाडली आहे.
मकरंद माने दिग्दर्शित ‘बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. आता झी चित्र गौरव पुरस्कार नामांकनामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, छायांकन ,संगीत गीतकार, गायक, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, कलादिग्दर्शन, संकलन, अभिनेता सहाय्यक अभिनेता, साऊंड डिझायनर अशा १७ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत तर मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, गीतकार, संगीत दिग्दर्शन या तीन विभागासाठी नामांकने आहेत.
‘बापल्योक’ चित्रपट आपले वेगळेपण सिद्ध करणार याबद्दल खात्री होती. सशक्त आशयाचा हा चित्रपट आणणे आव्हानात्मक होते. आमच्या या प्रयत्नांची मोठय़ा पातळीवर दखल घेतली गेल्याचे समाधान चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे यांनी व्यक्त केले. आपल्या चित्रपटासाठी झी आणि मटा सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे नामांकन मिळणे ही फारच आनंदाची गोष्ट असल्याचे अभिनेता शशांक शेंडे यांनी सांगितले.
वडिल मुलाच्या नात्याचे मर्म सांगणारा आणि ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘बापल्योक’ चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा संवादरूपी ‘कलासेतू

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात (दादासाहेब फाळके चित्रनगरी ) यांच्या वतीने गुरुवारी ‘कलासेतू’ या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.
सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विशेष परिसंवादाचे आयोजन पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ तंत्रज्ञ उज्वल निरगुडकर , वितरक समीर दिक्षित, लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे, कामगार नेते विजय हरगुडे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला या मान्यवरांना मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी बोलतं केलं. या परिसवांदाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी काय करता येईल याचा परामर्श घेण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील नवी आव्हाने’ या पहिल्या परिसंवादात ‘ १५०० हुन अधिक चित्रपट तयार होतात. त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती निर्मात्यांना देणे, सबटायटल बाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
‘शासकीय धोरण आणि वेबपोर्टल’ या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष पाटील योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी झाले होते. मराठीला चित्रनगरीत ५० % सवलत देणे SGST बंद करणे, करपती योजना चालू करणे , अनुदान बंद करणे , निर्माता होण्याकरिता नियमावली तयार करणे , आंतरराष्टीय चित्रपटासाठी पॅनल निर्माण करणे , निर्मात्यांसाठी व्यासपीठ निर्माण करणे , सिंगल स्क्रीनचे कर माफ करणे आदि मुद्द्यांचा उहापोह करण्यात आला.
तिसऱ्या परिसंवाद चित्रपट निर्माते ‘वितरण, विपणन याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे, दीपक देऊळकर , अभिनेत्री किशोरी शहाणे , चैतन्य चिंचलीकर , विकास खारगे या मान्यवरांनी सहभाग घेतला. नवीन निर्मात्यांना मार्गदर्शन करणे , मल्टिप्लेक्स दर कमी करणे, मराठीसाठी २०० हुन अधिक चित्रपटगृह बांधणे, एसटी स्टॅडजवळ मल्टीप्लेक्स उभारणे, वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आदी अनेक उपायांचा अंतर्भाव यात करण्यात आला.
भविष्यातील बदलाची पावले ओळखून आणि येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाचा विचार करून मराठी चित्रपटसृष्टीने सर्वांगाने वेगळा विचार करण्याचा सूर कलासेतू च्या परिसंवादात उमटले. आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपटांचा सहभाग, मराठी चित्रपट महामंडळाचे योगदान, चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा देणे, इतर भाषिक लोकांचे रजिस्ट्रेशन, ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करणे, फिल्मसिटीमध्ये AUGMC त्यात करणे, चित्रपटगृह, नाट्यगृह उभारणे आदी सुविधा प्रामुख्याने होणे गरजेचं असल्याचं मत सर्वांनीच मांडलं.
या सगळ्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. शासनातर्फे अनेक नव्या योजना, प्रस्ताव लागू करण्याचा मानसही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलून दाखविला. कलासेतू च्या माध्यमातून संवादाचा निर्माण झालेला हा पूल मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा राजमार्ग ठरेल असा विश्वास सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक , कलाकार तंत्रज्ञ आणि वाहिन्याचे प्रमुख उपस्थित होते. -
श्री प्रफुल पटेलांच्या हस्ते ‘धर्मरावबाबा आत्राम’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री.धर्मरावबाबा आत्राम यांची जीवन कथा लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून दर्शकांसमोर आणण्यात येत आहे. ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ हा चित्रपट एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित झाला आहे आणि या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झाला. अतिशय उत्सवात राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल उपस्थित होते. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी आणि निर्माती नीतू जोशी. चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांच्या तरुण वयातील पात्र अभिनेता जितेश मोरे यांनी केला आहे.
या भव्य कार्यक्रमात, अनेक विशेष लोकांची उपस्थित होती, ज्यात, मंत्री अनिल पाटिल, मंत्री अदिति सुनील तटकरे,आमदार संदीप धुर्वे,दिनेश वाघमारे, अभिमन्यु, आणि निशा जामवाल यांचे समावेश होता. नीतू जोशी यांनी सर्व अतिथींना पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. सर्वांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला.
श्री प्रफुल पटेल म्हणाले, “मला माहित नव्हतं की बाबा अभिनय करू शकतात. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या देशाचं आणि ह्या राज्याचा हीरा लोकांना परियंत पोहोचायचं काम होतंय ह्याचा मनस्वी आनंद आहे. बाबा जी अहेरीचे राजा आहेत. अहेरी हे एक आदिवासी क्षेत्र आहे आणि ते त्याच्या राज कुटुंबातून आहेत. त्यांच वय अगदी १४ वर्ष असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला त्या नंतर खरा खडतर प्रवास हा बाबांचा सुरु झाला,आज ह्या स्थरापर्यंत येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलाय बाबांना. त्यांच्या जीवनातील विविध घटना या चित्रपटात दाखवला गेलाय.मी आज ट्रेलर बघुन खुप खुश आहे, पण चित्रपट अजून बाकी आहे. आम्ही सर्व काही त्याग करुन आज इथं परियंत आलोय आणि तपस्या केल्याशिवाय काही मिळाऊ शकत नाही. बाबा राज्याच्या मागासलेला व दुर्गम भागातुन आहेत, परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासींच्या जीवनात किती मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलं आहे ये तेथील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. त्यांनी लाखों माणसांचे जीवन बदलले आहे. मी नितू जोशी यांना शुभेच्छा देतो.”
निर्माती नीतू जोशी यांनी म्हणाले, “या चित्रपटाचे तयार होण्याच्या काळात, मी बाबांना जवळुन ओळखलं, त्यांच्या संघर्षांना समजता आलं, त्यांच्या समाजातील दायित्वाचं आणि योगदान अनुभवलं. या चित्रपटातून मी नव्या पिढिला चांगले संदेश देण आणि त्यांना जीवनात उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते. बाबांच्या बाबतीतून काही सांगायला झाल तर.
मी नक्षलग्रस्त भागात गेले
आणि बाबांबद्दल तेथील थरार सांगायला मिळाला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र १४ वर्षांच्या बाबांचा त्यांच्या संघर्ष आणि कामाचा आढावा ऐकून मी या चित्रपट बनवण्यासाठी निर्णय घेतला. या चित्रपटात, आदिवासी भागातून राज्य मंत्री बनण्याचं बाबांचं प्रवास दाखवलं आहे.”
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “मला नवीन जीवन मिळालं. नक्सलवादींच्या छापांपासून बाहेर पडलो, नदी नाल्यातून पाणी प्यायचो,माहित नव्हतं की जंगला बाहेर निघणारा की नाही. ह्या सर्व प्रवासाचं आणि संघर्षाची घटना चित्रपटातून दाखवला आहे.”
दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी म्हणाले, “आजही बाबा ह्या वयात प्रचंड उत्साहात असतात, आणि त्यांच्या उत्साह बघुन माझ्यावर असलेला प्रेशर हा थोडा कमी झाला. चित्रपटात जितेश मोरे यांनी तरुण बाबांचा पात्र केलंय जितेश हा अतिशय अभ्यासु अभिनेता आहे त्यानी बाबांच आयुष्य खुप सुंदर रेखाटलय आपल्या अभिनयातुन . ह्या चित्रपटाचं निर्माण होन माझं स्वप्न होतं.”
अभिनेता जितेश मोरे म्हणाले, “मला हे पात्र साकारायला मिळणं हे खरं तर माझ्यासाठी भाग्यचं म्हणाव लागेल कारण खुप संभाळून आणि अभ्यासपूर्व ह्यात मला काम कराव लागलं
. मला शुटींग दरम्यान अनेक लोकांनी बाबांचा तरुण पानाचा संदर्भ दिला. तर ते रेखाटण्याचं दबाव वेगळा होता माझ्यासाठी, आणि दिग्दर्शकाने माझं काम खुप सोपं केलं.” या प्रसंगात, जितेश मोरे चित्रपटातील एका वाक्याचं उल्लेख केला,जे बाबांचं घोष वाक्य आहे, “जल,जंगल,जमीन हमारा है और ये जमीन मालीकाना हक़ हमारा अधिकार है.”
ही जीवन कथा ह्या नव्या पिढीला एक नवीन दिशा व ऊर्जा नक्कीच देईल अशी आशा आहे. -
टाळ्या, शिट्यांच्या जल्लोषात ‘कन्नी’चा ट्रेलर प्रदर्शित

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॅाटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांनी चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केले. या सोहळ्यात अधिक रंगत आणली ती गाण्यांच्या लाईव्ह परफॅार्मन्सने. एकंदरच टाळ्या, शिट्या, धमाल असे उत्साही वातावरण होते. कलाकारांनी यावेळी काही मजेदार किस्सेही शेअर केले. या सोहळ्याला चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अनेकांची उपस्थित होती.
समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे. चित्रपटाची खासियत म्हणजे अमित भरगड, गगन मेश्राम आणि सनी राजानी यांचा बऱ्याच बॅालिवूड चित्रपटांमध्ये सहभाग आहे आणि त्यांचे सहकार्य ‘कन्नी’ला लाभले आहे.
मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना एकत्र बांधून ठेवणारा चित्रपट म्हणजे ‘कन्नी’. प्रेक्षक ‘कन्नी’ची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता ‘कन्नी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये ऋताचे परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न आहे, मात्र यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आता या अडचणीतून ऋता कशी बाहेर पडणार, तिला तिचा नवरोबा मिळणार आणि यात तिला तिचे मित्र साथ देणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक म्हणतात, ‘’ नाते हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे आहे. मग ते मैत्रीचे असो वा प्रेमाचे. ही नातीच आपल्यासोबत शेवटपर्यंत असतात. ‘कन्नी’मध्ये हेच पाहायला मिळणार आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील ‘कन्नी’ची टीम कमाल आहेच. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी यांचे सहकार्य लाभल्यामुळे आज ही कलाकृती आपल्या भेटीला येत आहे. मला खात्री आहे, मैत्री, प्रेम आणि स्वप्नांचा मागोवा घेणारी ‘कन्नी’ प्रेक्षकांना आवडेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो कुटुंबासोबत एन्जॅाय करावा.’’ -
अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक वाढवतेय. आता यामागचे गुपित मात्र चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे. यात मु्क्ता बर्वे, सुबोध भावे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून या सगळ्या मातब्बर कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे, तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” या चाळीशीतील चोरांनी केलेला गुन्हा जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल. मात्र या गुन्ह्याची उकल चित्रपट आल्यावरच होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात विनोद, धमाल, गोंधळ आणि मजा आहे.’’ -
झी गौरव २०२४ पुरस्कारांसाठी नामांकन जाहीर

मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ पुरस्काराची नामांकनं जाहीर.
चित्रपटांसाठी ह्या वर्षी परीक्षक म्हणून यांनी काम पहिले, ते संजय जाधव, नीना कुलकर्णी आणि निरंजन अय्यंगर यांनी. तर प्रायोगिक नाटकांसाठी विवेक आपटे, अद्वैत दादरकर आणि व्यावसायिक नाटकांसाठी संजय मोने, अतुल परचुरे यांनी काम पाहिले.
चित्रपट विभाग नामांकने –
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
1. श्यामची आई – महेश बराटे
2. बापल्योक – संतोष डोंगरे
3. महाराष्ट्र शाहीर – जगदीश येरे
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
1. उनाड – कल्याणी गुगळे
2. बापल्योक – अनुत्तमा नायकवडी
3. श्यामची आई – नामदेव वाघमारे
4. महाराष्ट्र शाहीर – युगेशा ओमकार
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
1. महाराष्ट्र शाहीर – कृती महेश
2. बाईपण भारी देवा – सुभाष नकाशे
सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण
1. आत्मपॅम्फ्लेट – शिशिर चौसाळकर
2. श्यामची आई – कुणाल लोळसुरे
3. बापल्योक – ईशान देवस्थळी
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
1. आत्मपॅम्फ्लेट – संकेत कानेटकर
2. श्यामची आई – संकेत कानेटकर / आभा सौमित्र
3. वाळवी – मंगेश धाकडे
4. झिम्मा २ – आदित्य बेडेकर
5. महाराष्ट्र शाहीर – अजय अतुल
6. बापल्योक – विजय गावंडे
सर्वोत्कृष्ट गीतकार
1. बाईपण भारी देवा – वलय मुळगुंद
2. झिम्मा २ – क्षितिज पटवर्धन
3. महाराष्ट्र शाहीर – गुरु ठाकूर
4. बापल्योक – गुरु ठाकूर
5. उनाड – गुरु ठाकूर / क्षितिज पटवर्धन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
1. बाईपण भारी देवा – सावनी रवींद्र
2. झिम्मा २ – वैशाली सामंत
3. महाराष्ट शाहीर – श्रेया घोषाल
4. उनाड – नंदिनी श्रीकर
सर्वोत्कृष्ट गायक
1. बापल्योक – अजय गोगावले
2. महाराष्ट्र शाहीर – अजय गोगावले
3. महाराष्ट्र शाहीर – जयेश खरे
4. झिम्मा २ – आदर्श शिंदे
5. श्यामची आई – महेश काळे
सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शन
1. महाराष्ट्र शाहीर – अजय अतुल
2. बापल्योक – विजय नारायण गावंडे
3. झिम्मा २ – अमितराज
4. बाईपण भारी देवा – साई-पियुष
5. गुलराज सिंग (उनाड)
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
1. श्यामची आई – अमेय भालेराव
2. आत्मपॅम्फ्लेट – बबन अडगळे
3. उनाड – महेश कुडाळकर
4. बापल्योक – महेश कोरे
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
1. बापल्योक – योगेश कोळी
2. नाळ २ – सुधाकर रेड्डी यकंट्टी
3. श्यामची आई – विजय मिश्रा
4. उनाड – लॉरेन्स डिकुन्हा
5. आत्मपॅम्फ्लेट – सत्यजीत शोभा श्रीराम
सर्वोत्कृष्ट संकलन
1. वाळवी – अभिजीत देशपांडे / सौरभ देसाई
2. आत्मपॅम्फ्लेट – फैजल महाडिक – इम्रान महाडिक
3. बापल्योक – आशय गटाडे
सर्वोत्कृष्ट कथा
1. वाळवी – मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी
2. आत्मपॅम्फ्लेट – आशिष अविनाश बेंडे
3. बापल्योक – विठ्ठल नागनाथ काळे
4. बाईपण भारी देवा – वैशाली नाईक
सर्वोत्कृष्ट पटकथा
1. आत्मपॅम्फ्लेट – परेश मोकाशी
2. वाळवी – मधुगंधा कुलकर्णी / परेश मोकाशी
3. बापल्योक – विठ्ठल नागनाथ काळे / मकरंद शशिमधू माने
4. उनाड – आदित्य सरपोतदार / सौरभ भावे
सर्वोत्कृष्ट संवाद
1. आत्मपॅम्फ्लेट – परेश मोकाशी
2. बापल्योक – विठ्ठल नागनाथ काळे / मकरंद शशिमधू माने
3. बाईपण भारी देवा – वैशाली नाईक
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
1. नाळ २ – त्रिशा ठोसर
2. आत्मपॅम्फ्लेट– ओम बेंडखळे
3. नाळ २ – श्रीनिवास पोकळे
4. नाळ २ – भार्गव जगताप
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा
1. झिम्मा २ – निर्मिती सावंत
2. घर बंदूक बिर्याणी – सयाजी शिंदे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
1. वाळवी – अनिता दाते
2. झिम्मा २ – सुहास जोशी
3. झिम्मा २ – शिवानी सुर्वे
4. उनाड – देविका दफ्तरदार
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
1. वाळवी – सुबोध भावे
2. महाराष्ट्र शाहीर – अक्षय टाक
3. झिम्मा २ – सिद्धार्थ चांदेकर
4. बापल्योक – विठ्ठल काळे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
1. बटरफ्लाय – मधुरा वेलणकर
2. श्यामची आई – गौरी देशपांडे
3. बाई पण भरी देवा – रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर
सर्वोत्कृष्ट अभिनेता
1. वाळवी – स्वप्नील जोशी
2. बापल्योक – शशांक शेंडे
4. उनाड – आशितोष गायकवाड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
1. आत्मपॅम्फ्लेट – आशिष अविनाश बेंडे
2. बापल्योक – विठ्ठल नागनाथ काळे / मकरंद शशिमधू माने
3. उनाड – आदित्य सरपोतदार
4. वाळवी – परेश मोकाशी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
1. आत्मपॅम्फ्लेट
2. बापल्योक
3. उनाड
4. वाळवी
5. बाईपण भारी देवा
व्यावसायिक नाट्यविभाग नामांकने –
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – व्यावसायिक नाटक
1. नीरजा पटवर्धन – चाणक्य
2. हर्षदा बोरकर ,शर्वरी कुळकर्णी बोरकर – जन्मवारी
3. मंगल केंकरे – गालिब
4. श्वेता बापट – जर तर ची गोष्ट
5. चैत्राली डोंगरे – अस्तित्व
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – व्यावसायिक नाटक
1. कमलेश बिचे – चाणक्य
2. सचिन जाधव – अस्तित्व
3. राजेश परब – गालिब
4. राजन वर्दम – डबल लाईफ
5. कमलेश बिचे – बोक्या सातबंडे
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – व्यावसायिक नाटक
1. मंदार देशपांडे – जन्मवारी
2. निनाद म्हैसाळकर – चाणक्य
3. राहुल रानडे – गालिब
4. आशुतोष वाघमारे – मर्डरवाले कुलकर्णी
5. अशोक पत्की – नियम व अटी लागू
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – व्यावसायिक नाटक
1. अमोघ फडके – जन्मवारी
2. शीतल तळपदे – २१७ पद्मिनी धाम
3. श्याम चव्हाण – अस्तित्व
4. राहुल जोगळेकर – चाणक्य
5. अमोघ फडके – जर तर ची गोष्ट
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – व्यावसायिक नाटक
1. सचिन गावकर – अस्तित्व
2. संदेश बेंद्रे – जर तर ची गोष्ट
3. संदेश बेंद्रे – चाणक्य
4. संदेश बेंद्रे – २१७ पद्मिनी धाम
5. प्रदीप मुळ्ये – गालिब
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – व्यावसायिक नाटक
1. पल्लवी अजय – जर तर ची गोष्ट
2. शर्वरी कुळकर्णी बोरकर – जन्मवारी
3. शुभांगी भुजबळ – जन्मवारी
4. कृष्णा राजशेखर – चाणक्य
5. शर्वरी कुळकर्णी बोरकर – डबल लाईफ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – व्यावसायिक नाटक
1. हार्दिक जाधव – अस्तित्व
2. ज्ञानेश वाडेकर – चाणक्य
3. प्रसाद बर्वे – नियम व अटी लागू
4. आशुतोष गोखले – जर तर ची गोष्ट
5. जयराज नायर – अस्तित्व
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – व्यावसायिक नाटक
1. अनिता दाते – माझ्या बायकोचा नवरा
2. भार्गवी चिरमुले – मर्डरवाले कुलकर्णी
3. सुकन्या काळण – मर्डरवाले कुलकर्णी
4. मोनिका जोशी – अमेरिकन अल्बम
5. दिप्ती भागवत – डबल लाईफ
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – व्यावसायिक नाटक
1. सागर देशमुख – माझ्या बायकोचा नवरा
2. विजय गोखले – डबल लाईफ
3. वैभव मांगले – मर्डरवाले कुलकर्णी
4. पुष्कराज चिरपुटकर – माझ्या बायकोचा नवरा
5. संकर्षण कऱ्हाडे – नियम व अटी लागू
सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक – व्यावसायिक नाटक
1. मर्डरवाले कुलकर्णी
2. मझ्या बायकोचा नवरा
3. डबल लाईफ
सर्वोत्कृष्ट लेखन – व्यावसायिक नाटक
1. संकर्षण कऱ्हाडे – नियम व अटी लागू
2. स्वप्नील जाधव – अस्तित्व
3. इरावती कर्णिक – जर तर ची गोष्ट
4. चिन्मय मांडलेकर – गालिब
5. हर्षदा बोरकर – जन्मवारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – व्यावसायिक नाटक
1. प्रिया बापट – जर तर ची गोष्ट
2. चिन्मयी सुमित – अस्तित्व
3. अमृता देशमुख – नियम व अटी लागू
4. गौतमी देशपांडे – गालिब
5. अमृता पवार पाटील – २१७ पद्मिनी धाम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – व्यावसायिक नाटक
1. उमेश कामत – जर तर ची गोष्ट
2. भरत जाधव – अस्तित्व
3. संकर्षण कऱ्हाडे – नियम व अटी लागू
4. शैलेश दातार – चाणक्य
5. विराजस कुलकर्णी – गालिब
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – व्यावसायिक नाटक
1. अद्वैत दादरकर / रणजित पाटील – जर तर ची गोष्ट
2. स्वप्नील जाधव – अस्तित्व
3. चंद्रकांत कुलकर्णी – नियम व अटी लागू
4. प्रणव जोशी – चाणक्य
5. चिन्मय मांडलेकर – गालिब
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक
1. जर तर ची गोष्ट
2. अस्तित्व
3. नियम व अटी लागू
4. चाणक्य
5. गालिब
तेव्हा पाहायला विसरू नका ‘झी गौरव पुरस्कार’ २०२४ लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर. -
मराठी माणसांचं मराठी रसिकांसाठी मराठी ॲप ‘तिकिटालय’

मराठी सिनेमा,नाटक,गाण्यांचे-कवितांचे, संगीताचे कार्यक्रम, विनोदी प्रहसन अश्या विविध मराठी कार्यक्रमांवर मराठी प्रेक्षक नेहमीच प्रेम करीत आले आहेत. मात्र या कार्यक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या पोहचतेच असं नाही. ही माहिती त्यांच्यापर्यंत सहजी पोहचावी आणि घर बसल्या त्यांच्या हक्काचं ‘तिकिट’ उपलब्ध व्हावं हा विचार करून नाटकं, चित्रपट, मैफिली, कॉमेडी शोज, सगळ्यांची तिकीट घेऊन मराठी मनोरंजनाचे ॲप ‘तिकिटालाय’ आलं आहे.

मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं, या जिद्दीने प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालाय’ॲप मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत सादर केलं आहे. मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या मनोरंजनात्मक तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला. प्रेक्षकांना या ॲपवर हव्या त्या मराठी कार्यक्रमाचं तिकीट घरबसल्या बुक करता येणार आहे.
थेट तिकीट काढणाऱ्या प्रेक्षकांना सिनेमा, नाटक व इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरून पुरवली तर त्याचा फायदानक्की होईल. या ॲपमुळे जगभरातील मराठी प्रेक्षक मोठया प्रमाणात जोडला जाईल. प्रेक्षक त्याच्या आवडीचं सहज शोधेल आणि अवघ्या ३ किल्कवर संपूर्ण माहिती घेऊन तिकीट बुक करू शकेल अशा रीतीने ‘तिकिटालाय’ ॲपची मांडणी केली आहे. संपूर्ण भारतात हा ॲप कोणीही डाऊनलोड करू शकतो.

मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत प्रशांत दामले यांनी केली नव्या ॲपची घोषणा ‘तिकिटालय’बद्दल प्रशांत दामले म्हणाले, ‘मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून माझ्या डोक्यात होती. त्यामुळे ‘तिकिटालय’ या ॲपची संकल्पना मला सुचली. मराठी निर्मात्यांना देखील हे ॲप खूप सोयीचं आहे. मराठी सिनेमा, नाटक याशिवाय या ॲपवर प्रेक्षकांना फक्त मराठी कलाकृती विषयकच माहिती मिळेल’ याचा फायदा जास्तीतजास्त निर्मात्यांनी घेण्याचे आवाहन ही प्रशांत दामले यांनी यावेळी केले.
‘मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. नवनव्या संकल्पना येणं खूप गरजेचं आहे.‘तिकिटालय’ ची संकल्पना नक्कीच स्तुत्य असून याचा फायदा करून घेणं महत्त्वाचं असल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितलं. ‘गरज शोधा आणि पुरावा’ असं मला नेहमी वाटते त्यानुसार प्रशांत दामले यांनी मनोरंजन क्षेत्राची आजची गरज ओळखून आणलेलं ‘तिकिटालय’ खरंच कौतुकास्पद असल्याची भावना महेश कोठारे यांनी व्यक्त केली. मराठी प्रेक्षकांसाठी हा उपक्रम, हे ॲप नक्कीच उपयुक्त ठरेल’, असं सांगत या नव्या ॲपला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
या शुभारंभ सोहळ्याला मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आवर्जून उपस्थित होते. -
Neck-to-Neck Battle on the Polo turf ends in Tie at Turf Games Arena Polo Cup: Panthers and Zulu Emerge as Joint Champions

Mumbai, 26th February: In a captivating demonstration of skill and teamwork, the esteemed Turf Games Arena Polo Cup culminated in an exhilarating finale, with both the teams playing out to a draw and sharing the prestigious title. The gripping showdown curated and sponsored by Turf Games Global Sports (TGGS) unfolded at the Mahalaxmi Racecourse in Mumbai, held in association with the Amateur Riders Club.
The Turf Games Arena Polo Cup celebrated sportsmanship, camaraderie, and competitive spirit. As the 2024 tournament concluded organizers and participants anticipate Polo’s continued success in India.
Dalip Tahil, Mandira Bedi, Suchitra Krishnamoorthi, Namrata Purohit, Vivek Jain, Asbahaah and Cyrus Ardeshir, Reena Khatau and Subal Anand and Lovina Israni were seen attending the exciting sporting event in the city.
The 2 teams play that played
1. Panthers (White)
2. Zulu (Red)
Each team was assigned a handicapped ranking based on their performances and skills. The rankings span from -2 to +10, reflecting a spectrum of abilities and expertise within the sport.
Team combinations –
In the team Panthers the polo players were, at 16 years of age and the youngest player on the ground Nikolai Kundanmal (-2), Qais Dalal (0), Shyam Mehta (0).
In the team Zulu the polo players were, Ziyad Madon (-2), Dinyar Madon (0), Mitesh Mehta (0).
The polo match commenced under the watchful eye of esteemed umpire Mr. Sunny Patel, a seasoned polo player boasting a +2 handicap.
Providing expert commentary was Ar. Riyhad Kundanmal, co-founder of Turf Games Global Sports with a wealth of experience in the sport.
In the first chukker, both teams played explosively and the fist goal was scored just thirty six seconds into the game. Shyam Mehta in white scored 5 goals with the help from his teammates. With Qais Dalal hammering along in the white and Dinyar Madon for the reds relentlessly defending and going for the goals. At the end of the first chukker the score was Panthers (5) and Zulu (4).
In the second chukker, Both teams fought hard for possession, 1 goal was scored by each team. At the end of that chukker the score was Panthers (6) and Zulu (5).
In the third chukker, Mitesh Mehta in red sprinted towards the goal mouth as the round commenced and scored the goal, following that he again scored a goal with a beautiful long shot from the middle of the arena. At the end of the chukker the score was Panthers (8) and Zulu (9).
Entering the decisive fourth chukker, Nikolai Kundanmal in white fired the opening salvo with a crucial goal, setting the stage for a dramatic finale., with Ziyad Madon coming back with a strong retort to in the last 30 seconds remaining on the clock as both teams fought hard for the goal but the match ended with an even score of 11 each side.
Riyhad Kundanmal, Co-Founder, Turf Games Global Sports, says “ As we conclude another remarkable polo season in Mumbai, we eagerly anticipate the journey ahead. In light of the current issues threatening the very existence of this location for the sport and the club at the Mahalaxmi race course, we hope for the sustained growth and triumphant revival of Polo in India.” -
तेरव” चित्रपटाचा ट्रेलर मा.श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!

येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला.
विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित होते.
विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि ‘कॉटन सॉईल तंत्र’ या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता आणि आता आगामी “तेरव” या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे. विदर्भातील प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तमपणे केलेले आहे. व्यावसायिक कमाई करू न देणाऱ्या चित्रपटाच्या मागे निर्माता म्हणून उभे राहण्याची संवेदनशीलता ‘अंजनी कृपा प्रोडक्शनच्या’ माध्यमातून निर्माता श्री, नरेंद्र जीचकर यांनी दाखवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघावा, असे आवाहन करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.
हा चित्रपट पूर्णतः विदर्भाच्या भाषेत आणि ९०%च्या वर वि दर्भीय कलावंत घेऊन करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी अत्यंत तळमळीने आणि आस्थेने केले, असे श्याम पेठकर म्हणाले.
हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर घेतलेला आहे आणि त्या संकटांना न घाबरता कसा लढा देतात हे या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धाताई तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे थीम सॉंग ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. आणखी दोन गाणी “तेरव” या नाटकात शाम पेठकर यांनी लिहिलेली चित्रपटात घेण्यात आलेली आहे.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.
Thanks & Regards
Darshan S.Musale
(Media Planet) -
आभाळमाया’ची लोकप्रिय जोडी अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचे मराठी रुपेरीपदड्यावर पदार्पण!

आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी ‘जन्मऋण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून ‘आभाळमाया’ या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी बाजी मारली आहे.
मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती, मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावे? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पहावे? बदलत्या काळानुसार त्याची पावलं कशी ओळखावी? याच विषयावर आधारित “जन्मऋण” हा त्यांचा चित्रपट आहे.
श्री गणेश फिल्म्स निर्मित आणि श्री अधिकारी ब्रदर्स प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका – चित्रपट अभिनेते महेश ठाकूर यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.
येत्या १५ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.
