Home

  • ही अनोखी गाठ’मधील ‘सखी माझे देहभान’ गाणे प्रदर्शित

    झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले असून यानिमित्ताने गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वैभव जोशी यांचे भावपूर्ण बोल लाभलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. सलमान अली आणि हितेश मोडक यांच्या गायकीने गाण्याला एक वेगळेच स्वरूप आले आहे.

    या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत. येत्या १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.

    या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, “अर्थपूर्ण बोल लाभलेल्या गाण्याला संगीतही त्याच ताकदीचे लाभले आहे. या गाण्यात अनेक भावना दडल्या आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिच्या हावभावातून अनेक गोष्टी व्यक्त होतात. या गाण्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे चित्रपटाचा आत्मा असतो, त्यामुळे चित्रपटाच्या कथेइतकेच महत्व गाण्यांनाही आहे आणि ही जबाबदारी वैभव जोशी आणि हितेश मोडक यांनी लीलया पार पाडली आहे. संगीतप्रेमींना ही गाणेही आवडेल, यात शंका नाही.”

    झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून ही दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. वेगळ्या धाटणीची आहेत. या गाण्यातही प्रेम, विरह अशा विविध भावना आहेत. त्यात या गाण्याला मोहक नृत्य अदाकारी लाभली आहे. थेट मनाला स्पर्श करणारे हे गाणे आहे.”

  • Happu Ki Ultan Paltan’s Geetanjali Mishra donates her 10-year savings to help the poor

    In a world where individual pursuits and personal ambitions are often counted as top priorities, Geetanjali Mishra, currently portraying Rajesh in &TV’s Happu Ki Ultan Paltan, stands out as a shining example of selflessness. Hailing from a background of modest means, Geetanjali Mishra has not only achieved success as an actor but has also chosen to utilize her prosperity for a greater purpose by donating her savings of ten years to help people in need.

    Talking about her commitment to social responsibility, Geetanjali Mishra shares, “I believe there is inherent beauty in the act of contributing to the well-being of society. Being responsible towards society prompts me to ponder what I can achieve individually and how my actions can ripple through the community, sparking positive change. During the peak of the covid crisis, my domestic helper approached me for assistance, expressing her struggle to make ends meet. In response, I stepped up and provided her with essential supplies for the next few months as ‘charity begins at home’. Through her, I discovered that many families in her community were also grappling with daily sustenance challenges. Motivated by this realization, I committed to supporting these families by supplying comprehensive ration kits, including staples like rice, dal, pulses, salt, sugar, and biscuits, along with hygiene items such as soap, sanitizers, masks, and more. I made sure to adhere to all safety protocols and measures to ensure the well-being of everyone involved. Despite the challenging circumstances, I remained determined to do whatever was within my means to aid those in need, irrespective of their location. It was a demanding period, but the opportunity to make a positive impact on people’s lives was a driving force that kept me going. She further adds, “My focus was on meeting people’s essential needs rather than providing financial assistance. In different states, I utilized various online platforms to collaborate in delivering ration kits, investing nearly 25 lakhs from my hard-earned savings of a decade. Throughout this philanthropic journey, I have always remembered ‘zameen pe rehke kamaya hai, aaj logo ki zaroorat hai, paise vapas jama karlenge aur Uparwale ke CCTV mai sab capture hota hai’. This sentiment guided my approach as I channeled my resources towards fulfilling immediate necessities rather than just offering financial support.”

    Watch Geetanjali Mishra as Rajesh in Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, airing every Monday to Friday only on &TV!

  • जीवन एक संघर्ष आहे, कधी हरू नये आणि कधीही थांबू नये. बाबा रामदेवांची संग्राम सिंहला शिकवण

    संग्राम सिंह सध्या त्याचा नवा चित्रपट ‘उड़ान जिंदगी की’ मुळे चांगलाच चर्चेत आहे. एवढेच नव्हे तर जवळ जवळ सहा वर्षानंतर संग्राम सिंह एक पैलवान म्हणूनही पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरत आहे.  दुबई प्रो कुस्ती  चँपियनशिप २०२४ मध्ये संग्राम सिंह पाकिस्तानी मल्लाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. संग्राम सिंहला यामुळे संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

    संग्राम सिंह याने नुकतीच बाबा रामदेव यांची भेट घेतली आणि त्यांना त्याचा आगामी चित्रपट उड़ान जिंदगी की बाबत माहिती दिली. बाबा रामदेव यांनी त्याला चित्रपटाबाबत शुभेच्छा देतानाच दुबई प्रो कुस्ती चँपियनशिपमध्ये कुस्ती खेळण्यापूर्वी एक सल्लाही दिला.

    बाबा रामदेव यांनी संग्राम सिंहला म्हटले, “आपले जीवन एक संघर्ष आहे, हा संघर्ष करताना कधी हरायचे नाही आणि कधी थांबायचेही नाही. जीवनातील प्रत्येक कामामध्ये पारदर्शकपणा आणि संयमाची खूप गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याला काय करायचे आहे, कसला विचार करायचा आहे, काय पाहायचे, काय खायचे आणि कसे आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याने स्वतःकडे कधीही हीन भावनेने पाहू नये, तर त्याने स्वतःला नेहमी एक योद्धा म्हणून पाहिले पाहिजे. तरच तो युद्धात विजयी होऊ शकतो. असा सल्लाही बाबा रामदेव यांनी संग्राम सिंहला दिला.

    यावेळी संग्राम सिंहने  बाबा रामदेव यांना ते एक यशस्वी व्यावसायिक कसे बनले असा प्रश्न केला असता, बाबा रामदेव म्हणाले, “व्यवसाय करताना सुरुवातीलाच मोठा नफा कसा होईल याचा विचार न करता व्यवसाय केला पाहिजे. लोकांना आपण काही तरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कमाईची लालसा नसावी. तसेच आपल्या तत्वांशीही कधीही तडजोड़ करू नये. जे काही करू ते वेगळे आणि काही तरी नवे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संयम ठेवण्यास शिकले पाहिजे.”


    संग्राम सिंह लवकरच उड़ान जिंदगी की चित्रपटात दिसणार आहे. नायक म्हणून त्याचा हा पहिलाच व्यावसायिक चित्रपट असून यात तो एका 25 वर्षीय पैलवानाची भूमिका साकारीत आहे.  कुस्तीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात पिता-पुत्राची कथा सादर करण्यात आलेली आहे. हा चित्रपट आजच्या तरुणांना प्रेरित करणारा आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी रोज देशभर प्रदर्शित केला जाणार आहे.

  • वस्त्रहरण” नाटकाचा लवकरच ५२५५ प्रयोग

    वस्त्रहरण” नाटकाच्या ४४ वर्षाच्या निमित्ताने सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर होणार

    मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत  असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.

    १६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिंद्र कांबळी यांनी “वस्त्रहरण” या नाटकाचा पहिला प्रयोग केला.  व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या “वस्त्रहरण” या अजरामर कलाकृतीला आज १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच प्रयोग क्र. ५२५५ …. मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.

    Thank you

    Darshan Musale

    ( Media Planet)

  • जीवांच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण ‘अमलताश’चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित

    जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या ‘अमलताश’ या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.

    हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचे दिसतेय, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे ‘त्या’ कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ८ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणतात, ” चित्रपटाचे वेबसीरिज मध्ये रूपांतर होते. मात्र इथे उलट झाले आहे. व्हिडीओ ब्लॉग म्हणून सुरु झालेला हा आमचा प्रवास पडद्यावर चित्रपटरूपात झळकणार आहे. राहुलनेच हे सर्व सुरू केले आणि त्यामुळे आपोआपच ते संगीतमय चित्रपटरूपात प्रकट झाले. आम्ही निवडलेले सगळे कलाकार हे मुळात संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत. आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो, त्यामुळे शक्य होईल तितके संगीत व्यक्त करणे, हा चित्रपटामागचा विचार होता. आमच्याकडे चित्रपटाची कथा नव्हतीच. आम्ही संगीत आणि पात्रांच्या जीवनावर यात भाष्य केले आहे आणि हाच चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच भासतील. एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रे तुमच्याशी बोलतील. आमचे चित्रीकरण हे पुण्यात झाले आहे. खूप तरल विचार करून पुणे न्याहाळले तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखेच भासेल. अमलताश, बहावा, वर्षातून एकदाच फुलतो, आपले जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो, आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल.”

  • नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर

    द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे.

    संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    संजय पांडे या भव्य चित्रपटाचे निर्माते आहेत. यानिमित्ताने संजय पांडे म्हणाले की, ‘’ पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी.  त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे.
    पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही पर्वणी असेल.’’

    लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचे महत्त्व व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “काही गोष्टी ह्या सांगायलाच पाहिजे कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.’’

    नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,  ‘’ आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस..दहा वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला. नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथर ची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट! ‘’

  • दिग्दर्शक सिद्धार्थ जाजू यांनी अनुदान देण्याच्या उत्तराखंड चित्रपट विभागाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.

    उत्तराखंड सरकार चित्रपट निर्मात्यांना सबसिडी देते, त्यामुळे बॉलीवूडचे अनेक निर्माते दिग्दर्शक उत्तराखंडमध्ये शूटिंग करतात आणि त्यांना सबसिडी मिळेल अशी आशा आहे. याच आशेने दिग्दर्शक आणि नायक सिद्धार्थ जाजूने उत्तराखंडमध्ये आपला चित्रपट तू मेरा पहला प्यार शूट केला, तिथल्या कलाकारांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या आणि २०२२  मध्ये हा चित्रपट उत्तराखंडच्या चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित झाला, परंतु त्याला अद्याप अनुदान मिळालेले नाही.


    या संदर्भात आज सिद्धार्थ जाजू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही बाब प्रसारमाध्यमांसमोर ठेवली.
    तू मेरा पहला प्यार या हिंदी चित्रपटाची निर्माती अंजली असून लेखक, दिग्दर्शक आणि नायक सिद्धार्थ जाजू आहेत.
    चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ जाजू यांनी सांगितले की, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी तू मेरा पहला प्यार हा चित्रपट उत्तराखंडच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. उत्तराखंडमधील डेहराडून, मसुरी, डाकपठार, हरिद्वार, ऋषिकेश या सुंदर खोऱ्यांमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचे संगीत आणि गाणी अतिशय मधुर आणि मनाला आनंद देणारी आहेत.


    दिग्दर्शक आणि नायक सिद्धार्थ जाजू यांना उत्तराखंडच्या कलाकारांसाठी महत्त्वाची भूमिका मिळाली. अनुदान देण्याच्या उत्तराखंड चित्रपट विभागाच्या मनमानी कारभारावर सिद्धार्थ जाजू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तराखंड सरकारने दिलेल्या सर्व मानकांची पूर्तता या चित्रपटात केली आहे, मग सर्व कागदपत्रेही दिली आहेत.सबसिडी का मिळत नाही, असा सवाल सिद्धार्थ जाजूंचा आहे.

    **

  • व्हॅलेन्टाईन्स डे’ विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

    महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे बेमालूम मनोरंजन करीत आहेत.

    व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करीत आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.

    “प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते असं म्हणतात, अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मन हर्षित होत आहे. अशा प्रकारचे दर्जेदार चित्रपट ‘अल्ट्रा झकासवर’ संकलित करण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

  • श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’ ?

    ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.  या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, “नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्य्नाच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील.”

    श्रेयस तळपदे आपल्या ‘ही अनोखी गाठ’च्या अनुभवाबद्दल बोलतो, ” सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अशावेळी महेश दादांनी मला ‘ही अनोखी गाठ’ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीच मी ठरवले हा चित्रपट करायचाच.  मुळात महेश सर खूप निवडक सिनेमे करतात, त्यातही त्यांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. महेश दादा आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव मस्तच होता. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल.”


    झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच चांगला असतो. त्यांच्या कथेत प्रचंड पकड असते, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. नात्यांची हळवी बाजू अलगद प्रेक्षकांसमोर मांडण्याची त्यांची खासियत त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. ‘ही अनोखी गाठ’ ही सुद्धा नात्याची अशीच एक तरल भावना आहे, जी प्रेक्षकांना आवडेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो हसवेल, भावनिक करेल, नात्यांचे महत्वही अधोरेखित करेल.”

  • ओटीएम 2024 मध्ये गोवा टुरिझमचा अग्रगण्य ट्रॅव्हल ट्रेड शो मुंबई येथे आयोजित

    ओटीएममध्ये 60 देश आणि 30 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1600 हून अधिक प्रदर्शकांशी संबंधित 35,000 पेक्षा जास्त उद्योग व्यावसायिक आणि खरेदीदार आहेत. 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या तीन दिवसांत, ओटीएम एक विक्री कार्यक्रम म्हणून प्रदर्शित केला जातो, ज्यात दर्जेदार नेटवर्किंग आणि कनेक्शन वाढविण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला जातो. २,५०,००० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या दोन वेगवेगळ्या मजल्यांवर हे प्रदर्शन पसरले होते, ज्यात ३५ देशी प्रदर्शक सहभागी झाले होते.

    मुंबई येथील ओटीएम २०२४ मध्ये गोवा टुरिझमच्या वतीने जबाबदार पर्यटन पद्धतींना चालना देण्यावर भर देणाऱ्या राज्यांच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. पुनरुत्पादक पर्यटन तत्त्वांनुसार चिन्हांकित दृष्टिकोनाद्वारे शाश्वत विकासासाठी गोव्याचे समर्पण या सेटअपमध्ये दर्शविले गेले.

    एकादशी तीर्थ यात्रा, नवे होमस्टे धोरण, कारवां धोरण, वारसा संवर्धनाला चालना देणारे उपक्रम, सण-उत्सव साजरे करणे, पर्यटकांना समृद्ध स्थानिक संस्कृतीत रमविणे, रोमांचकारी साहसी संधी उपलब्ध करून देणे आणि गोव्यात जागतिक दर्जाच्या MICE  ( Meetings Incentives Conferences and Events) सुविधा उपलब्ध करून देणे ही या महोत्सवातील ठळक वैशिष्ट्ये होती.

    विद्यमान उपक्रमांवर प्रकाश टाकण्याव्यतिरिक्त, गोवा टुरिझमने विविध प्रवाशांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या नवीन पर्यटन सेवांच्या शुभारंभावर प्रकाश टाकला, ज्याचा उद्देश अभ्यागतांना शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देताना अद्वितीय आणि संस्मरणीय अनुभव प्रदान करणे आहे. प्रदर्शनादरम्यान जीटीडीसी हॉटेल्स आणि सेवांचा ही प्रचार केला जातो.

    गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका म्हणाले, “ओटीएम 2024 मधील आमचा सहभाग ही केवळ पुनरुत्पादक पर्यटनाबद्दलची आमची बांधिलकी दर्शविण्याची एक अपवादात्मक संधी नव्हती, तर आमच्याकडे असलेल्या रोमांचक नवीन उपक्रम आणि सेवा देखील दर्शविण्याची एक सुवर्ण संधी होती.
    ‘एकादशी तीर्थ अभियान आणि नवीन पर्यटन सेवा आणि धोरणे सुरू करण्यासारख्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून आम्ही शाश्वतता आणि अभ्यागतांच्या समाधानाला प्राधान्य देणारे एक प्रमुख ट्रॅव्हल डेस्टिनेशन म्हणून गोव्याचे स्थान अधिक मजबूत करीत आहोत.