Home

  • म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिनेदिग्दर्शक श्री राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न

    मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूझिक मंत्रने गप्पा गोष्टी आणि राजदत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा घेत, एका आगळया वेगळया पद्धतीने त्यांचा जन्मदिवस राजदत्त यांच्या नातेवाईक व मित्र परिवारा सोबत साजरा केला.

    या कार्यक्रमात म्यूझिक मंत्रच्या संचालिका डॉ. स्मिता डोंगरे यांनी राजदत्त यांची मुलाखत घेताना राजदत्त यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना सांगीतले. एवढ्या थोर व्यक्तिची साथ आणि आशिर्वाद म्यूझिक मंत्र या आमच्या संस्थेला लाभला, आम्ही धन्य झालो, अशी प्रतिक्रिया म्यूझिक मंत्रचे संचालक डॉ. स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी यांनी व्यक्त केली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी राजदत्त यांची कन्या प्रसिद्ध चित्रपट संकलक भक्ति मायाळू यांनी म्यूझिक मंत्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. म्यूझिक मंत्राच्या संचाने मला खूप भावनिक केले. तुमच्या प्रेमाने मी विरघळून गेलो हा कार्यक्रम मी कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.

    डॉ. स्मिता डोंगरे यांच्या सुश्राव्य सूत्रसंचालनात ज्येष्ठ दिग्गज राजदत्त यांचा जीवनप्रवास उलगडला*

    या निमित्त सादर झालेल्या संगीत संध्येमधे म्यूझिक मंत्राच्या गायक गायिकानी बहारदार गाणी सादर केली. त्यात सुनिल खोबरेकर, विजयानंद तांबे, श्रुतिका तांबे, विश्वास सावंत,ललिता शेट्टी, संजय मांगवे, प्रमिला धनु, प्रगति वैद्य, अनिता कांबळे, नूतन सैल, कैलाश माहुर, लीना भगत, शिल्पा शेलार , अर्चना सावंत, रमेश पूजारी आणि डॉ. स्मिता डोंगरे यांनीही गीतांचे सादरीकरण केले. शोभा पूजारी, दशरथ नाईक, नरेन, वत्सला, यांचे सहकार्य लाभले. क्षितिज पटाडे,मिहिर गायकवाड,
    सुनिल खोबरेकर,विजू तांबे,दिलीप कोळी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. या सोहळ्यास मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटीचे संचालक संतोष परब व दिपमाला लादे यांचे सहकार्य लाभले.

    Thank you

  • एक्टर रणदीप हूडा के निर्देशन की पहली फिल्म ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ 22 मार्च को हिंदी और मराठी भाषाओं में होगी रिलीज !

    भारत के स्वतंत्रता सेनानी की अनसुनी गाथा और रणदीप हूडा के निर्देशन में बनी पहली फिल्म, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ के दिये गए बलिदानों की अमर गाथा अब देखेगा पूरा जहान। फ़िल्म 22 मार्च 2024 को हिंदी और मराठी में सिनेमाघरों में प्रदर्शित की जाएगीं ।


    जी हां,अभिनेता रणदीप हूडा द्वारा निर्देशित पहली फिल्म, “स्वातंत्र्य वीर सावरकर”, एक नायक के पुनरुत्थान की शुरुआत करती है, जो भारत की स्वतंत्रता की लड़ाई में एक अदम्य व्यक्ति के रूप में आज भी याद किए जाते हैं। भारत की स्वतंत्रता की लड़ाई में एक दूरदर्शिता रखनेवाले ,ज्वाला की तरह दहकते और रगों में देशभक्ति के भाव का चोला पहने स्वतंत्रता सेनानी श्री वीर सावरकर की उपेक्षित कहानी को इस फिल्म के द्वारा बहुत ही खूबसूरती से दर्शाया गया है।

    रणदीप हूडा ने अपने उम्दा निर्देशन के माध्यम से इस प्रतिष्ठित स्वतंत्रता सेनानी के सार और उत्साह को दर्शाने में अपनी बहुमुखी प्रतिभा और समर्पण का एक प्रमाण प्रस्तुत किया है। अपने हर किरदारों के लिए समर्पित रहनेवाले रणदीप हूडा ”स्वातंत्र्य वीर सावरकर” के रूप में ना सिर्फ दर्शकों को मंत्रमुग्ध करते हैं बल्कि एक विचारोत्तेजक कहानी के माध्यम से इतिहास के पन्नो में खो गए एक महान व्यक्तित्व के धैर्य, जुनून और जटिलता को भी बड़े पर्दे पर उतारने की कोशिश किये हैं।

    “स्वातंत्र्य वीर सावरकर” फ़िल्म एक ऐतिहासिक व्यक्ति के जीवन से कहीं अधिक फ़िल्म है। यह फिल्म स्थिति को चुनौती देते हुए एक महत्वपूर्ण कितु अक्सर नजरअंदाज कर दी गई चमकदार शख्सियत के पुनर्मूल्यांकन का संकेत देती है। साथ ही रणदीप हूडा का निर्देशन इसे और ख़ास बनाता है। अपने निर्देशन में बनी पहली फिल्म की रिलीज़ डेट की घोषणा करते हुए रणदीप हूडा ने कहा,
    “श्री सावरकर के साथ कालापानी में लगभग दो साल बिताने के बाद, अब उनके लिए आज़ादी की ओर कदम बढ़ाने का समय आ गया है। यह यात्रा कठिन रही, लेकिन इसने मुझे एक अभिनेता के रूप में खुद से आगे बढ़कर एक फिल्म निर्देशक बनने और बहुत कुछ करने के लिए प्रेरित किया है। अब समय आ गया है कि देश को हमारे स्वतंत्रता संग्राम की लड़ाई में बलिदान दे चुके सशस्त्र क्रांति श्री वीर सावरकर के योगदान के बारे में पता चले ।”

    रणदीप हूडा द्वारा निर्देशित और ज़ी स्टूडियोज़, आनंद पंडित, रणदीप हूडा, संदीप सिंह और योगेश राहर द्वारा निर्मित। रूपा पंडित,सैम खान,अनवर अली, पांचाली चक्रवर्ती द्वारा सह-निर्मित। रणदीप हूडा, अंकिता लोखंडे और अमित सियाल द्वारा अभिनीत यह फिल्म 22 मार्च 2024 को दो भाषाओं – हिंदी और मराठी में सिनेमाघरों में रिलीज़ होगी।

  • ‘तुझ्याविना’ व्यक्त करणार मनातील प्रेमभावना

    अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझ्याविना’ असे ह्या गाण्याचे बोल असून, तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या ह्या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आपल्याला येत्या २ फेब्रुवारीला समजणार आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.

    या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी प्रेम होते. कोणाचे प्रेम शेवटपर्यंत टिकते तर कोणाची साथ अर्ध्या वाटेतच सुटते. या माझ्या मित्रमैत्रिणींच्या तुटलेल्या हृदयातील भावना मी या गाण्यातून मांडल्या आहेत. या गाण्यातील कथा, भावना मनात खोलवर भिडणाऱ्या आहेत. जसे प्रेम संगीतप्रेमींनी ‘विश्वामित्रा’च्या पहिल्या गाण्याला दिले, प्रेक्षकांची तीच पसंती या गाण्यालाही मिळेल.’’

  • Vidyut Jammwal and MC Square brings the first-ever pure Gujjar song to Bollywood in Crakk

    Get ready for a cinematic musical delight as Vidyut Jammwal and MC Square join forces to reimagine the viral sensation, Rom Rom, for the upcoming film, Crakk: Jeetega Toh Jiyegaa. With the beats crafted by the iconic choreographer Ganesh Acharya, this collaboration promises to be an electrifying fusion of talent and creativity.

    The synergy between Vidyut and MC Square’s sensational rap will surely set the stage for an unforgettable experience. Audiences are anticipating a musically thrilling journey as they witness their favourite stars create magic on the big screen.

    Produced by Vidyut Jammwal and Action Hero Films, written and directed by Aditya Datt, Crakk: Jeetega Toh Jiyegaa is all set to hit theaters on February 23, 2024.

  • Seerat Kapoor Announces Her New Psychological Thriller Film

    In a surprising turn of events, the talented actress Seerat Kapoor recently took to her social media platforms to make a groundbreaking announcement, leaving fans eager and intrigued. Known for her versatile acting skills, Seerat Kapoor has previously delivered memorable performances, and her involvement in this new project promises to be an engaging cinematic experience. The actress shared a stunning and sizzling picture of herself from the set of her upcoming project, announcing her next big venture officially. The post not only showcased Seerat’s glamorous side but also hinted at the intensity and suspense awaiting her fans in this new venture.

    Sharing a stunning picture of herself in a tube top, messy curly looks, and minimal makeup with glossy lips, Seerat looked stunning as always but what grabbed our attention was the announcement that the actress shared with all her loved ones. Accompanying the captivating image, Seerat Kapoor wrote, “Spilling a few beans on my latest venture – A psychological thriller. Brace yourselves, we’re hopping onto an intense ride! 💥#Collaboration #Thriller #ComingSoon”. This cryptic message from Seerat has left fans buzzing with excitement, eagerly anticipating the unraveling of this mysterious project.

    According to a reliable source close to the film’s production team, Seerat will be seen as a lead character in the film alongside JD Chakravarthy and Agastya. Seerat Kapoor has been roped in as the lead character, and the entire narrative and mystery revolve around her enigmatic role.” The source also added, “She has a crucial part to perform and has a very distinct persona. Seerat will be starting the filming of her second schedule in the coming week. The movie is a full-fledged psychological thriller that will keep you riveted to your seat with its captivating storyline and several plot twists. Seerat’s persona will offer a great deal of drama and unexpected events.”

    This revelation has sparked curiosity among fans about the nature of Seerat’s character and the twists that the plot may take. The yet-to-be-titled Telugu film also features Naresh Agastya and JD Chakravarthy in lead roles, adding to the anticipation surrounding the project. The trio’s collaboration hints at a potent mix of talent, promising an enthralling cinematic experience for the audience.

    While further details about the film remain under wraps, the confirmation of Seerat Kapoor’s involvement and the intriguing snippet shared by the actress on social media have set the stage for a thrilling cinematic journey. Apart from that Seerat Kapoor will be seen in Bhamakalapam 2. The prequel, Bhamakalapam. Seerat Kapoor will also be seen playing a very pivotal role in Dil Raju’s Aakasam Dati Vasthava film. And also in Mahi V Raghav’s Save The Tigers 2 web series. She also has 2 music videos coming up which the official announcement will be done soon

  • हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला

    मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

    मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

    दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.”

  • प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय बळीराजाचा ‘नवरदेव Bsc Agri.’

    शेतीवर प्रेम करणाऱ्या आणि अन्नदात्याचा मनापासून सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी असा ‘नवरदेव Bsc Agri.’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, आणि काही कालावधीतच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी असलेले आणि शेतीचा काहीही संबंध नसलेले असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने बघायला जात आहेत, आणि चित्रपट पसंतीस पडल्याने भरभरून प्रतिसादही देत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत.

    शेती करत असलेल्या Bsc Agri मुलाला लग्न जमविण्यासाठी काय उठाठेव करावी लागते, याची साधी, सरळ, सोपी गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. लेखक-दिग्दर्शक राम खाटमोडे आणि सहलेखक विनोद वणवे यांनी शेतकऱ्याच्या भावना अगदी योग्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. अभिनेता क्षितीश दाते आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या ग्रामीण भूमिकांचं कौतुक होतंय, तर मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला वडिलांच्या भूमिकेतील सच्चा शेतकरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. क्षितीश, प्रियदर्शिनी यांच्यासोबतच प्रविण तरडेंचा तडका, मकरंद अनासपुरेंचा हशा, गार्गी फुलेंची प्रेमळ आई, रमेश परदेशींसारखा रांगडा भाऊ, हार्दिक जोशींसारखा तगडा पोलिस, नेहा शितोळेंनी साकारलेली मायाळू वहिनी, संदीप पाठकांची खास भूमिका, तानाजी गळगुंडे आणि विनोद वणवेंनी साकारलेले हवेहवेसे मित्र या सर्वच भूमिका चित्रपटात भाव खाऊन जातात.

    राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी लिहिलेल्या संवादांचंही विशेष कौतुक होतंय. या चित्रपटातील गाणी, सिनेमेटोग्राफी, पार्श्वसंगीत, कलाकारांची उत्तम कामं आणि तरल दिग्दर्शन या सगळ्याच पातळ्यांवर हा चित्रपट सुंदर पद्धतीत साकारला गेला आहे.

    चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील गाणी. या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. त्यापैकी रॉकसन या रॅपरने गायलेल्या ‘लाल चिखल’ या गाण्याला तरूणाईची विशेष पसंती मिळाली. यात शेतकऱ्याच्या वेदना परखडपणे मांडण्यात आल्या आहेत. तर, शेतकरी गौरव गीताच्या रूपात ‘लढं रे तू बळीराजा’ हे दिव्य कुमारने गायलेलं गाणंही प्रेक्षकांना आवडतंय. त्यासोबतच आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांच्या ‘भेटणार कधी नवरदेवा नवरी’ या गाण्याच्या धूनने प्रेक्षकांना भूरळ घातली. तर मनिष राजगीरे यांनी गायलेलं ‘नवरदेव आला’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय. या चित्रपटाचे संगीतकार कुणाल-करण यांना या गाण्यांचे विशेष श्रेय जाते.

    आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित ‘नवरदेव Bsc Agri.’ सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

  • ‘डिलिव्हरी बॉय’च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले ‘डोहाळे जेवण’

    सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी चित्रपटातील आठ गर्भवतींच्या ‘डोहाळे जेवणाचा’चा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. अतिशय पारंपरिक आणि राजेशाही थाटात या डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बाझमी, मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते.

    सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवून ठेवली होती त्यातच आता ‘डिलिव्हरी बॉय’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ट्रेलरमध्ये अंकिताला गावात एक फर्टिलिटी सेंटर काढायचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला इस्टेट एजंट असलेला प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मदत करताना दिसत आहेत. परंतु हे करताना त्यांना अनेक जुगाड करावे लागत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार की त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” सरोगसीबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमजुती आहेत, अनेक ठिकाणी आजही जुनीच विचारसरणी घेऊन लोक जगत आहेत आणि हीच विचारसरणी बदलण्याचा आम्ही या चित्रपटातून प्रयत्न केला आहे. खरंतर सरोगसी हा खूप नाजूक विषय आहे, मात्र त्याचे गांभीर्य जाऊ न देता मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही ‘डिलिव्हरी बॉय’मधून केला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने आम्ही हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. ही कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा.”

  • ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

    आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त  साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘ॲड. यशवंत जमादार’ असे या मराठी चित्रपटाचे नाव असून एस.के. प्रॉडक्शन च्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटांचे निर्माते संजय अग्रवाल असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी सांभाळत आहेत. 

    ‘ॲड. यशवंत जमादार’  चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी रमेशचंद्र अग्रवाल यांनी लाल रिबीन कापून उद्घाटन केले, चंद्रकांत ठक्कर यांनी दीप प्रज्वलन  तर संजीव अग्रवाल यांनी श्री गणपती आणि श्री राम भगवान यांची पूजा केली तसेच दर्शन ठक्कर यांनी नारळ फोडून पूजा संपन्न केली.यावेळी लेखक संजय नवगिरे, डिओपी आणि संकलक सिद्धेश मोरे, संगीतकार अजित परब, प्रोजेक्ट हेड अमर लष्कर,गीतकार मंदार चोळकर ,अभिनेते मकरंद देशपांडे उपस्थित होते. ‘ॲड. यशवंत जमादार’ या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे, ऋषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली संजीव, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर, प्राजक्ता हनमघर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

    या प्रसंगी बोलताना चंद्रकांत ठक्कर म्हणाले, ‘ॲड. यशवंत जमादार’ या मराठी चित्रपटात आज समाजात अत्यंत संवेदनशील असलेला विषय आम्ही हाताळला आहे. लग्न संस्था ही आपल्या भारतीय रूढी परंपरेमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र अलीकडे बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनशैलीचा परिणाम या संस्थेवर होताना दिसतोय. त्याच संबंधीचा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.  समाजाला एका संवेदनशील विषयाची जाणीव करून देण्याचे काम आम्ही ‘ॲड.यशवंत जमादार’  च्या माध्यमातून करणार आहोत.

  • ‘सृजन द क्रियेशन’च्या कलाकारांचं स्वप्न शिवाजी मंदिर येथे साकार होणार

    नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ ने एक मिशन सुरू केलं. ‘सृजन द क्रियेशन’ ही फक्त कार्यशाळा नसून एक संस्था आहे.आणि एक सृजनशील संवेदनशील माणसांचे एक जागतिक कुटुंब आहे. ‘आपली स्पर्धा स्वतःशीच करावी’ हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर बिंबवत आजवर वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून सृजन द क्रियेशनच्या कलाकारांनी अनेक स्पर्धांमध्ये जवळपास ३० च्या वर एकांकिका, अनेक दिर्घ अंक, ४० एक शॉर्टफिल्म केल्या आणि पुरस्कार पण मिळवले. त्यातल्याच विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकांचे प्रयोग श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत.

    प्रत्येक नवोदित कलाकाराचं श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग करायचं स्वप्न असतं. सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या सोमवारी ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाचा आणि मंगळवारी ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ‘मित्राची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. अर्थात हा सगळा घाट कलाकारांनी वर्गणी काढूनच घातला आहे. तेव्हा आपण सर्वांनी ह्या प्रयोगांना येऊन आशीर्वाद , प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती.

    तर अशी ही नवोदित कलाकारांना घडवण्याची चळवळ सभासदांच्या वर्गणी मधून जमा झालेल्या रक्कमेवर, सहभागी कलाकारांनी वर्गणी काढून तसेच सृजन द क्रियेशनचे सर्वेसर्वा अभिनेता – दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या प्रयत्नांनी सुरु आहे. या स्तुत्य प्रयत्नांना बळ देत नव्या उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक नाट्यरसिकांनी या प्रयोगांना उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश देशपांडे यांनी केले आहे.