Home

  • Main ATAL Hoon Receives Standing Ovation at Maharashtra Vidhan Bhavan Special Screening

    From reciting his poems to emulating Shri Atal Bihari Vajpayee in both appearance and speech, Pankaj Tripathi has portrayed the character flawlessly. Today, the producer – director duo, Vinod Bhanushali and Ravi Jadhav, reached Vidhan Bhavan for a special screening.

    Rahul Narwekar (Speaker of the Maharashtra Legislative Assembly) and Chhagan Bhujbal (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection Maharashtra), among others, greatly appreciated the film. There was a sense of nostalgia among the present members, who praised the film’s writing and how beautifully Rishi Virmani and Ravi Jadhav captured the life story of India’s beloved leader, Shri Atal Bihari Vajpayee. At the end of the screening, the audience, moved by the film, gave a standing ovation.

    Vinod Bhanushali presents “Main ATAL Hoon”, directed by Ravi Jadhav, and written by Rishi Virmani and Ravi Jadhav, a Bhanushali Studios Limited and Legend Studios production, is produced by Vinod Bhanushali, Sandeep Singh, and Kamlesh Bhanushali. The film is currently running in theatres near you.

  • टिप्स फिल्म्स आणि कुमार तौरानी ह्यांच्या “श्रीदेवी प्रसन्न” मराठी चित्रपटाचं गाणं “दिल में बजी गिटार” प्रदर्शित

    टिप्स फ़िल्म मराठी हे मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठे नाव! “श्रीदेवी प्रसन्न” या सिनेमातून त्यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत.

    ‘देखा जो तुझे यार’, हे टिप्स चंच गाणं वेगळ्या ढंगात पेश केलं गेलं आहे आणि त्याचा लाँच इव्हेंट तितक्याच शानदार
    पद्धतीने पार पडला आहे.

    “श्रीदेवी प्रसन्न” मधून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलर ला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ ह्यांच्या फिल्म साठी लोक किती उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

    “श्रीदेवी प्रसन्न, या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे.
    सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी हाच ह्या चित्रपटामागचा थॉट आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट नव्या अप्रोच ने प्रेक्षकांसमोर आणण्यात क्रीएटिव्ह प्रोड्युसर्स नेहा शिंदे आणि अविनाश चाटे ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.


    सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा ह्यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
    कुमार तौरानी,व टिप्स फिल्मस लि. हे मराठी चित्रपट सृष्टीतल्या आपल्या एंट्री बद्दल होपफ़ुल आहेत. श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून फील गुड, एन्टरटेनिंग, रोमँटिक कॉमेडी ते पडद्यावर आणत आहेत. ह्या सिनेमाच्या निमित्ताने सुरु झालेला टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही सुरु राहील ह्याची त्यांना आशा आहे.

  • मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर!

    मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे “संघर्षयोद्धा” – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

    महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी “एक मराठा, लाख मराठा” म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील… आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे, ह्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांन मध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे , त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.

  • प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

    स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

    आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’

  • अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा ‘गाफील’, खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

    आदित्य या तरूणाच्या आयुष्यात होणाऱ्या गंभीर घटनांवर भाष्य करणाऱ्या ‘गाफील’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी आलेल्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतानाच आता या ट्रेलरची एंट्री झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशय-विषयाला धरून चित्रपट येत आहेत, ‘गाफील’ हा चित्रपटही त्यापैकीच एक असल्याचे ट्रेलरवरून जाणवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ. नवनीत रवी राणा उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

    आजूबाजूच्या लोकांमध्ये संशयास्पद वर्तणूक असलेला आदित्य, सतत मुलींसोबत राहायची सवय, मुलींना फसविण्याचा स्वभाव आणि मुलींचा फायदा घेण्यासाठी असुसलेला आदित्य… त्याच्या आयुष्याभोवती फिरणारा ‘गाफील’ हा चित्रपट. पण कालांतराने असं काही घडतं ज्यामुळे त्याचं आयुष्य संपूर्णतः बदलून जातं. नक्की काय घडतं हे ट्रेलरमध्येच पाहा. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री वैष्णवी बरडे या दोघांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. मात्र, त्यांचं नक्की नातं काय हा प्रश्न औत्सुक्याचा ठरतो.

    २ फेब्रुवारीला गाफील होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित

    अमरावतीच्या खा. नवनीत राणा या पूर्वी कलाकार असल्याने आणि त्यांना कलेची जाण असल्याने, त्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. मराठी माणसानेच मराठी चित्रपट डोक्यावर घेतला पाहिजे. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केल्याने मला तिकडच्या प्रेक्षकांचा अनुभव आहे. ते लोक त्यांच्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. तसाच आपण मराठी लोकांनीही दिला पाहिजे. आपल्या मातृभाषेतील कलाकृतींना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे, आणि जसे इतर भाषांतील चित्रपट जागतिक स्तरावर पुरस्कार मिळवतात, तसेच मराठी चित्रपटानेही त्या उंचीवर पोहोचले पाहिले आणि त्यासाठी मराठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत. खा. राणा यांनी व्यक्त केले.

    धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. 2 फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

  • काला घोडा फेस्टिवल” महोत्सवात पहिल्याच दिवशी मराठीचा जागर होणार!

    नाटक नृत्य संगीत याच्या माध्यमातून
    दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवल च्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी सात वाजता वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट इथे सादर होणार आहे.

    “मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार” असं म्हणणाऱ्यांपासून “मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते” असं सांगणाऱ्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा असा हा कार्यक्रम. ‘राजभवन‘, ‘गेटवे ऑफ इंडिया‘,‘महाराष्ट्र सदन‘, ‘रॉयल ऑपेरा हाऊस‘ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रयोग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काला घोडा फेस्टिवल मध्ये याचा प्रयोग होणे ही गौरवाची गोष्ट आहे.

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळावा याचं अचूक उत्तर देणारा आणि मराठी भाषेची श्रीमंती दर्शविणारा एक अनोखा कार्यक्रम!

    डॉक्टर समीरा गुजर लिखित मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शित “मधुरव बोरू ते ब्लॉग” या कार्यक्रमाचे संगीत श्रीनाथ म्हात्रे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे प्रकाशयोजना शितल तळपदे आणि नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून मधुरा वेलणकर साटम आकांक्षा गाडे आणि आशिष गाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गाजत असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हा कार्यक्रम बघायला विसरू नका. ज्या मराठीमध्ये आपली ओळख दडली आहे त्या मराठीची नव्याने ओळख करून घेण्यासाठी हा कार्यक्रम बघायला नक्की या आणि श्रीमंत व्हा!

  • ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

    मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीला मिळणार आहे.

    सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.

    दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’’

  • ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल` मध्ये `स्टोरीटेल`चीही `भूमिका`

    जगातील प्रगत देशांमध्ये ऑडिओबुक्स ही संकल्पना लोकप्रिय ठरली. तशी ती आता आपल्याकडेही चांगलीच रुजते आहे. त्याचीच साक्ष देणारी घडमोड आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आली आहे. ती म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता ओमी वैद्य घेऊन येत असलेल्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटामध्ये `स्टोरीटेल`लाही `भूमिका` मिळाली आहे. या चित्रपटाचा नायक मराठी गोष्ट ऐकण्यासाठी `स्टोरीटेल` वापरतो, असे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातून ऑडिओबुक्स दर्शनाचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरावा.

    याबाबत बोलताना, ओमी वैद्यने सांगितले, की मी या चित्रपटाचा नायक म्हणून भूमिका साकारत असताना `स्टोरीटेल`वर ` जस्ट फ्रेंडस्` ही गोष्ट ऐकताना दाखविण्यात आले आहे. मला ही कल्पना खूप आवडली. कारण, यातील नायक समर हा अमेरिकेतून आलेला आहे आणि त्याची मराठी खूप कच्ची आहे. ती सुधारण्यासाठी तो मराठीत गोष्टी ऐकतो, असा त्यातून संदेश देण्यात आला आहे. वास्तविक, मी स्वतः पुस्तके वाचणारा तसेच ऐकणारा आहे. मला पु. ल. देशपांडे यांचे साहित्य खूप आवडते. `स्टोरीटेल` वर पुलंच्या लेखनाचा आस्वाद घेता येतो, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

    `आईच्या गावात मराठीत बोल` च्या लेखिका अमृता हर्डीकर यांच्या कल्पनेतून `स्टोरीटेल` या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आले आहे. त्याविषयी बोलताना, त्या म्हणतात, की मी स्वतः जुन्या पठडीतील वाचक आहे. पुस्तक हातात घेऊन वाचायची मला आवड आहे. मात्र, अमेरिकेत गेल्यानंतर, विशेषतः कोरोनाच्या काळात मी `स्टोरीटेल`च्या माध्यमातून ऑडिओबुक्सकडे वळले आणि त्यामुळे प्रभावितही झाले. कुठलीही दृश्य न दाखवता फक्त आवाजातून, पार्श्वसंगीतातून वेगवेगळी पात्रं, प्रसंग इतक्या प्रभावीपणे श्रोत्याच्या डोळ्यापुढे उभी करणं ही अत्यंत कठीण बाब आहे. `स्टोरीटेल` वरील बहुतांश ऑडिओबुक्समधून श्रोत्यांना ते अनुभवता येते, हे मला आवडले. म्हणूनच, चित्रपटासाठी लेखन करताना मला असं वाटलं, की अमेरिकेतून येणारा चित्रपटाचा नायक समर, जेव्हा मराठी शिकायला लागेल, तेव्हा हातात पुस्तक घेऊन वाचण्यासाठी गोष्टी, कथा, कविता ऐकून मराठी शिकणे त्याला अधिक सोयीचे ठरेल. म्हणून चित्रपटात नायिका अवंती, त्याला `स्टोरीटेल`ची ओळख करुन देते. चित्रपटात समर हा स्टोरीटेलवर जस्ट फ्रेंडस् हे पुस्तक ऐकताना दिसतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना माझे हे मत पटेल, की भारताबाहेर राहून आपली मूळ ओळख, आपली संस्कृती, आपली अस्मिता ही आपल्या मातृभाषेतूनच जोपासली जाऊ शकते. हे जेव्हा कोणाला समजते, तेव्हा त्याला जगभरात फिरुन आपला ठसा उमटवायला पाठबळ मिळतं. म्हणूनच, मला `स्टोरीटेल` हे त्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे, असे वाटते.

  • ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

    आपल्या मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक, संगीत, लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला. हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीनेही हातभार लावला आहे. नुकतेच प्लॅनेट मराठीवर ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) हे नाटक प्रदर्शित झाले आहे. बेसमेंट थिएटर शिकागो निर्मित या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना विद्या जोशी यांची असून याचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले आहे तर लेखन चिन्मय केळकर यांचे आहे. विजय केंकरे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या नाटकाचे संयोजक व व्यवस्थापक रवि जोशी आहेत. प्रियांका पारेख यांनी मुख्य नृत्य दिग्दर्शिका हि जबाबदारी लीलया सांभाळली. स्नेहा चाफळकर, मंदार पित्रे, संजय सवकूर, नितीन जोशी, सौरभ नेकलीकर, नितीन जोशी, मधुरा साने, कल्पना नेकलीकर, धनंजय काळे, संजय सवकूर, सुनील मुंडले, केतन राईलकर, जयदीप बुझरूक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कलाकृती प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे.

    याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” मराठी नाटकांवरचे मराठी माणसाचे प्रेम सर्वश्रुतच आहे. वेगवेगळ्या शैलीच्या नाटकांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच स्वीकारले आहे आणि प्रोत्साहनही दिले आहे. मग ते पारंपरिक असो की प्रयोगक्षम! रंगदेवता आणि रंगभूमी ही एकमेकांची परस्परविरोधी रूपं आहेत की एका नाण्याच्या दोन बाजू? की एक दुसरीचं नवं प्रगत रूप आहे? हे कोडं यात उलगडून दाखवलं आहे आणि त्यानिमित्ताने मराठी नाट्यभूमीच्या जडणघडणीचा रंजक आढावा ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ या नाटकातून घेण्यात आला आहे. आम्हाला आनंद आहे, ही इतकी दर्जेदार कलाकृती आमच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे.”

  • ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर प्रदर्शित

    ‘विश्वमित्र’ या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्या `विश्वमित्र’ या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे यांच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून दोघांची हळुवार सुरू होणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यांची ही प्रेमाची गोष्ट येत्या १९ जानेवरीला आपल्या भेटीला येणार आहे.

    एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. `विश्वमित्र`हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायले असून या गाण्याला संगीत आणि बोलही त्यांचेच लाभले आहेत.

    या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आमच्या अल्बममधील टायटल सॉंग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील राकड, रांगडे शब्द लोकांना भावणारे आणि आपलेसे करणारे आहे. गावाकडे सर्रास वापरले जाणारे हे बोलीभाषेतील शब्द गाण्यात एक गावरान तडका आणत आहेत. या गाण्यातून एक कथा उलगडत आहे.’’