
-
प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ ह्या मालिकेमध्ये सध्या अंजली प्रितमच्या लग्नाची तयारी सुरु आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून आपण अंजली प्रितमची घट्ट मैत्री बघत आलो आहोत. अखेर अंजलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार, प्रितमच्या स्वरूपात मिळणार आहे. एकेकाळी मैत्रीचे प्रतीक असलेले प्रितम आणि अंजली आता एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत. प्रितांजलीच्या मेहंदी, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नासाठी घरातले तर उत्सुक आहेतच त्याचबरोबर रमा-राघव, राज-कावेरी, आणि अर्जुन-सावी सुद्धा प्रितांजलीच्या मेहेंदी हळदी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. लवकरच अंजली आणि प्रितमचा पारंपरिक लग्न सोहळा पार पडणार आहे. हा लग्नसोहळा सर्वांसाठीच आनंदाचा असणार आहे. तरीही एकीकडे सुनंदा आणि आशु हे लग्न न व्हावं म्हणून प्रत्येक प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे विश्वजीत आणि श्रेष्ठाचं सत्य कळल्यावर काव्याला मोठा धक्का बसला आहे. तरीही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी ती सगळं दुःख बाजूला करून आनंदाने, उत्साहाने या लग्न सोहळ्यात सामील होणार आहे, कारण आजवर तिने अंजलीसाठी पाहिलेलं एकमेव स्वप्नं आता पूर्ण होणार आहे. पण ह्या स्वप्नाला कोणाची दृष्ट लागणार? की हे स्वप्नं पूर्ण होणार? हे पाहण्यासाठी, बघा काव्यांजली – सखी सावली, प्रितम-अंजलीचा लग्नसोहळा, २ तासाचा महारविवार, १० डिसेंबर, दु. १२.०० आणि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
-
5 Times when Tv Actor Sorab Bedi Proved That He Is Television’s Ranveer Singh With Vibrant Sartorial Choices

What!! TV Actor Sorab Bedi Brings Bollywood Dapper Ranveer Singh’s Uber Cool Style Vibes To The Television Industry, These 5 Looks Will Assure You- Check Proof*
Chand Jalne Laga actor Sorab Bedi is currently making waves in the industry with his character of Raunak and has emerged a place for himself in the hearts of the audience. Sorab Bedi is also known for his bold and vibrant fashion choices, and due to the actor has been turning heads and making waves in the industry, and is social media is proof to it.
Seeing the sartorial choices of Sorab, where he experiments with his look, style, and choice of colors, is something that no other television actor wishes to do and Sorab is one such actor who aces that all look like a pro and we can surely say that Sorab Bedi is the new Ranveer Singh of the television industry. The evidence? Well, it lies in the striking similarities of outfits donned by both of these charismatic personalities.
Take a look at these 5 top pictures of Sorab Bedi and Ranveer Singh’s replicant outfits
*The fluorescent pants and oversized striped jacket:*
Sorab Bedi donned a vibrant florescent green pants along with a black shirt and an oversized zipper with vibrant shoes. Ranveer has also donned a similar look with green pants and an oversized two-colored jacket. The duo is really setting some major fashion goals, and what sets Sorab apart is his unapologetic love for vibrant and coordinated outfits.
*The Black On Black*
Sorab wore black oversized pants along with a net see-through inside the blazer while keeping his hair in a messy wet look and accessorizing with Black shades, just getting a bit inspired by Ranveer Singh. Sorab’s fashion choices are a celebration of individuality and self-expression, the same as this look.
*Black Formal Blazer Look*
Sorab is always seen experimenting with the looks be it Indian or Western and in this Indian look he wore black pants along with a black mini kurta and rounded off with a black blazer. Sorab and Ranveer have this similar look which once Ranveer wore for his promotions.
*The funky miss match print*
Sorab fearlessly combines contrasting hues, and eclectic patterns, creating a signature style that demands attention and so does this same look with a vibrant multicolored shirt and orange pants.
*The cheetah print*
Be it formal or casual Sorab never fails to amaze with style and with this cheetah print shirt with an oversized coat and beige pants, the actor is setting some major fashion goals. While Ranveer wore a Cheetah on Cheetah print.
It’s not just about the outfits; it’s about the attitude. Sorab Bedi’s exuberance, much like Ranveer Singh’s, is infectious. His charisma extends beyond the screen where he effortlessly owns every look he sports. We are so sure that just as Ranveer Singh carved a niche for himself as the ultimate Bollywood showstopper, Sorab Bedi seems poised to do the same in the world of television.
https://www.instagram.com/reel/CzI1Bh0Nhqi/
As Sorab continues to dazzle with his fearless approach to style, it’s clear that he is not just an actor; he is a fashion icon, destined to leave an indelible mark on the television industry. And we can’t wait to see where his sartorial journey takes him next.
On the work front, Sorab is currently seen in colors Chand Jalne Laga, and apart from that the actor also has a music video coming up with Miss Universe India 2023 Shweta Sharda, the song is sung sung by Ammy Gill which will be released in the coming week. Apart from that Sorab has also been featured on TV for many well-known brands, such as Amazon, Skecters, Pantaloons, Ajio, Myntra, and many more. He has also walked ramps for many well-known designers and for Lakme Fashion Week. -
हैप्पी बर्थडे रोहित सराफ: रोहित सराफ की 5 दमदार परफॉर्मेंस जो आपको जरूर देखनी चाहिए!

नेशनल क्रश कहे जाने वाले एक्टर रोहित सराफ आज अपना जन्मदिन मना रहे हैं। आइए उन पांच परफॉरमेंस पर नजर डालें, जिन्होंने दर्शकों को छोटे और बड़े स्क्रीन्स पर अपनी वर्सेटिलिटी का प्रदर्शन करते हुए, उन्हें एक लॉयल फैन फॉलोइंग दिलाई है।
मिसमैच्ड 1 और 2: नेटफ्लिक्स सीरीज़ “मिसमैच्ड” में, रोहित सराफ ने ऋषि सिंह शेखावत की भूमिका निभाई है, जो एक आकर्षक और प्यारा किरदार है। रिश्तों की गुत्थी को सुलझाने वाले युवक के उनके किरदार को बहुत प्रशंसा मिली। रोहित और उनकी को-स्टार प्राजक्ता कोली के बीच की केमिस्ट्री एक आकर्षण थी, जिसने “मिसमैच्ड” को एक शानदार सीरीज़ बना दी, जिसे दर्शकों ने पसंद किया।
लूडो: एंथोलॉजी फिल्म “लूडो” में रोहित सराफ के राहुल अवस्थी के किरदार ने कई जॉनर को नेविगेट करने में उनके टैलेंट का प्रदर्शन किया। शॉपिंग मॉल में काम करने वाला एक बेघर लड़का राहुल को कैश से भरा एक सूटकेस मिलता है, जिससे एक दिलचस्प कहानी सामने आती है। मलयालम अभिनेत्री पियरले माने के साथ रोहित की ऑन-स्क्रीन केमिस्ट्री को सराहा गया।
स्काई इज पिंक: इमोशनल ड्रामा “द स्काई इज पिंक” में रोहित सराफ ने ज़ायरा वसीम के किरदार के ऑन-स्क्रीन भाई ईशान चौधरी की भूमिका निभाई। सपोर्टिव भाई और बेटे की भूमिका निभाते हुए, रोहित के किरदार ने एक स्थायी प्रभाव छोड़ा, जिसने फिल्म की कहानी कहने में अपना योगदान दिया।
विक्रम वेधा: रोहित सराफ ने तमिल क्राइम थ्रिलर “विक्रम वेधा” के हिंदी वर्जन में वेधा के छोटे भाई शतक की भूमिका निभाई। पुष्कर-गायत्री के डायरेक्शन में बनी इस फिल्म में ऋतिक रोशन और सैफ अली खान की भी मौजूदगी है। कहानी में मासूमियत की परत जोड़ते हुए रोहित के किरदार की काफी सराहना की गई।
डियर जिंदगी: साल 2016 की फिल्म “डियर जिंदगी” में, रोहित सराफ ने किड्डो के रूप में अपनी शुरुआत की, जो कि आलिया भट्ट द्वारा अभिनीत कायरा का सपोर्टिव भाई है। गौरी शिंदे द्वारा निर्देशित फिल्म, कायरा की पर्सनल और प्रोफेशनल चुनौतियों को दर्शाती है, जिसमें किड्डो अपनी बहन को सपोर्ट करता है। अपनी डेब्यू फिल्म होने और आलिया भट्ट और शाहरुख खान जैसे को-स्टार्स के साथ स्क्रीन साझा करने के बावजूद, रोहित ने अपनी एक अलग छाप छोड़ी।
अब एक्टर “मिडमैच्ड 3” और “इश्क विश्क रिबाउंड” की तैयारियों में व्यस्त हैं, जिन्हें देखने के लिए उनके फैंस बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं। -
सुरांच्या महामंचावर रंगणार रेडिओ जॉकीं बरोबर मैफल…

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या पर्वात खूप काही नवीन पाहायला मिळतं. गाण्यांबरोबरच नवीन कन्सेप्ट्सचे एपिसोड ही अनुभवायला मिळत आहेत. या आठवड्यात RJ स्पेशल हा विशेष भाग घेऊन आले आहे. या अत्यंत अद्वितीय भागात रेड एफएम, रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी, आणि बिग एफएम या प्रसिद्ध रेडिओ स्टेशन्सचे RJs सामील होणार आहेत. RJ श्रुती, RJ द्यानेश्वरी, RJ शोनाली, आणि RJ दिलीप सज्ज आहेत सुरांच्या महामंचावर.
या धमाल एपिसोडमध्ये, या चार RJs त्यांच्या अत्यंत रंगीन आनंदाजाने सर्वांचे मनोरंजन करतील. या भागाचे विशेष म्हणजे RJs प्रेक्षकांच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट घेऊन आले असून ‘सुर नवा ध्यास नवा’चे स्पर्धक तेच गाणे सादर करतील असा अनोखा कन्सेप्ट पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमात घडतोय. जेव्हा आपली प्लेलिस्ट या महामंचावर सादर होईल हा अनुभव अगदीच कमाल असणार आहे.
RJ श्रुती, RJ ज्ञानेश्वरी, RJ शोनाली, आणि RJ दिलीप यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लागले आहेत. या महामंचावरचे वातावरण आणखीनच संगीतमय आणि आनंदमय होणार आहे.
हा एपिसोड फक्त संगीत नव्याने सादर करणारा नसून एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुरांच्या या महामंचावरची धमाल नक्की *पाहा , सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा, शनि -रवि , रात्री ९.०० वा. आवडत्या कलर्स मराठीवर.* -
बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की !

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर ‘झिम्मा २’ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय ‘झिम्मा २’ सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही ‘झिम्मा २’ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत ‘झिम्मा २’ स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.”
-
सोनू सूद ने फ्लड एरियाज में सहायता पहुंचाने के लिए चेन्नई फ्लड रिलीफ को दिया अपना सहयोग!

एक्टर सोनू सूद एक बार फिर आशा की किरण बनकर बाढ़ पीड़ितों की मदद के लिए चेन्नई फ्लड रिलीफ की सहायता की है। उनके कोशिश सिर्फ चक्रवात मिचौंग से प्रभावित बाढ़ पीड़ितों को सहायता प्रदान करना नहीं है बल्कि बेहतर भविष्य के लिए आशा की किरण भी प्रदान करना है। सोनू सूद अपने फाउंडेशन द सोनू सूद फाउंडेशन के माध्यम से समाज पर सकारात्मक प्रभाव डालने के लिए प्रतिबद्ध हैं, जो सामाजिक कल्याण के लिए समर्पित है।
सोनू और उनकी टीम कई पहलुओं में शामिल हैं, जिसमें एसेंशियल सप्लाइज डिस्ट्रीब्यूट करना, मेडिकल ऐड प्रदान करना और घरों का रिकंस्ट्रक्शन करना शामिल है। एक्टर सक्रिय रूप से यह सुनिश्चित करते हुए राहत कार्यों की देख-रेख और ऑपरेशन्स में शामिल हैं, जिससे सहायता सबसे कमजोर समुदायों तक पहुंचे। इस पार्टनरशिप से, वे न केवल प्रभावित लोगों की जरूरतों को पूरा करते हैं बल्कि करुणा और एकता की भावना को ध्यान में रखते हुए लोगों को एक साथ ला रहे हैं।
वर्कफ्रंट की बात करें तो, सोनू ने अपना पहला प्रोडक्शन, ‘फतेह’ पूरा कर लिया है, जो ज़ी स्टूडियो और उनके प्रोडक्शन शक्ति सागर प्रोडक्शंस के बीच एक बड़ा कोलैबोरेशन है। “फतेह” 2024 में रिलीज़ होगी, जिसमें दमदार अभिनय, ज़बरदस्त केमिस्ट्री, हॉलीवुड स्टंट स्टाइल और बेहतरीन लोकेशन्स शामिल है। इस फ़िल्म में पहली बार सोनू एक्ट्रेस जैकलीन फर्नांडीज के साथ स्क्रीन साझा करेंगे।
-
कोकण चित्रपट महोत्सव’ ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान रंगणार

कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी सिंधुरत्न कलावंत मंच सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.
११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोस्तवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन आयोजण्यात आले आहे. पुढील तीन दिवस १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.
सिंधूरत्न कलावंत मंच या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे कोकणातील कला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावा हा आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याही वर्षी ११ डिसेंबरपासून रत्नागिरी मधून या महोत्सवाची सुरुवात होत आहे. १६ डिसेंबरला मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हा भव्यदिव्य महोत्सव रंगणार आहे. कोकणात निसर्गसंपन्नतेसह उत्तोमोत्तम कलाकार-तंत्रज्ञ आहेत त्यांचे कलागुण जगासमोर यावे आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हाच संस्थेचा निर्मळ हेतू आहे. यासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत स्थानिक कलाकारांचे मनोबल वाढवतील. शिवाय संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवाला चारचाँद लावतील यात काही शंका नाही.
विशेष म्हणजे सिंधूरत्न कलावंत मंच संस्थेला महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी पत्ररुपी तर अभिषेक बच्चन यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून येथे आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसेच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील जेणेकरून तेथील चित्रपट संस्कृती वाढावी ही एकमेव भावना असल्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले. कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असून गेल्यावर्षीप्रमाणेच या ही वर्षी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत. -
मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असताना चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी ‘छापा काटा’ चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे. मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे.
शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे यांनी उत्स्फूर्त संगीत दिले आहे. गौरव चाटी यांनी देवतांच्या भक्तीत सर्वांनी विलीन व्हावे असे स्वर या गीतास दिले आहेत. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. येत्या १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ या गोंधळगीताचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.
“आम्ही आमच्या मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सतत उत्साही ठेवण्याच्या दृष्टीने कार्यरत असतो. यावेळीही ‘छापा काटा’ या धमाल चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना कमाल गाणी अनुभवायला देत आहोत. आशा आहे की ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
-
बिग बॉस 17 में अंकिता लोखंडे ने जीता सेलेब्रिटीज़ और फैंस का दिल!

अंकिता लोखंडे और उनके पति विक्की जैन ने बिग बॉस 17 के घर में प्रवेश करने के साथ ही दर्शकों का ध्यान और तारीफ आकर्षित की है। इस कपल को अपने फैंस से तो समर्थन मिला ही है, खासकर साथी सेलिब्रिटीज़ से भी सपोर्ट मिला है, जो हर जगह उनकी प्रशंसा कर रहे हैं।
सेलेब्रिटीज़ ने कई इंटरव्यूज के जरिये अंकिता लोखंडे के लिए अपना सपोर्ट दिखाया है। राखी सावंत, हिना खान, असीस कौर, श्रद्धा आर्य, अशिता धवन और शालीन भनोट जैसे एक्टर्स ने अंकिता का समर्थन किया है, जिससे वह बिग बॉस के घर में सभी की फेवरेट काँटेस्टेन्ट बन गई हैं।
बिग बॉस 17 के घर में अंकिता लोखंडे की यात्रा मनोरंजक से कम नहीं रही है। इस शो के जरिये अंकिता और विक्की ने प्रशंसकों और मशहूर हस्तियों दोनों के दिलों में एक विशेष स्थान बना लिया है। इस कपल के परफॉरमेंस और चार्म ने बिग बॉस के इस सीज़न में विजेता बनने के लिए पसंदीदा के रूप में उनकी स्थिति मजबूत कर दी है।
-
दबंगी –’मुलगी आई रे आई’ मालिकेतील अभिनेत्री यशश्री मसुरकर यांच्याशी केलेली विशेष बातचीत

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेच्या, एका आर्या (माही भद्रा) नावाच्या छोट्या चुणचुणीत आणि दबंगी तेवर असलेल्या मुलीभोवती फिरणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्याचा असा समज आहे की, तिचे वडील एक सुपरकॉप आहेत, पण तिला हे माहीत नाहीये की, ती सत्या (आमीर दलवी) नावाच्या, कोणत्याही मूल्यांची चाड नसलेल्या गुंडाची मुलगी आहे, जो सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आर्याची आई छाया (सई देवधर) हिच्या मृत्यूनंतर सत्याचा भाऊ अंकुश (मानव गोहिल) आर्याला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याची पत्नी बेला (यशश्री मसुरकर) पोटच्या पोरीसारखी तिची काळजी घेते. या सगळ्या गोंधळात सत्याची पत्नी कस्तुरी (हिमानी चावला) बेलाचे कान भरते की आर्या ही अंकुशची अनौरस मुलगी असू शकते. हे सांगून ती अंकुश आणि बेला यांच्यात गैरसमजाची ठिणगी पेटवून देण्याचा प्रयत्न करते. बेलाची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री यशश्री मसुरकर यांनी मालिकेविषयी, आपल्या व्यक्तिरेखेविषयी, सेटवरील वातावरणाविषयी आणि इतर कलाकारांशी असलेल्या नात्याविषयी बातमीवाला न्युज पोर्टल सोबत केलेली ही बातचीत….
बेला, तुझ्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला सांग.
• बेला आदर्शवादी आणि विश्वासार्ह आहे. साधेपणा ही तिची ओळख आहे. ती एक प्रेमळ माता, समर्पित सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि लाघवी पत्नी आहे जी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या कुटुंबाशी समरस झाली आहे. आपला पती अंकुश याने घेतलेल्या निर्णयाला तिचा नेहमीच भक्कम पाठिंबा असतो. बेलाच्या व्यक्तिरेखेतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिच्यात एक उपजत मातृत्व प्रवृत्ती आहे आणि मला वाटते की ती वृत्ती मी मालिकेत जिवंत करू शकले आहे.
प्रत्यक्ष जीवनात तू माता नसल्याने, ही भूमिका करताना तुझे प्रेरणास्थान कोण होते?
• माझ्या अवती-भोवती असलेल्या सर्व माता याच माझी प्रेरणा आहेत. मला लोकांचे निरीक्षण करायला आवडते. बेलासाठी तयारी करताना मला माझ्या या सवयीचा फायदा झाला. शिवाय ‘गिलमोर गर्ल्स’ मालिकेतून देखील मला प्रेरणा मिळाली, कारण या मालिकेत दाखवलेले आई आणि मुलीचे नाते फारच सुंदर आहे. तुमच्यात मातृत्वाची भावना असतेच आणि मला वाटते, आपण आपल्या आईला आपली काळजी घेताना बघत असतो आणि तिचे गुण आपसूक आत्मसात करत असतो.”
लहान मुलांसोबत काम करताना कसे वाटते आहे, जे सेटवर महत्त्वाची भूमिका बजावत असतात?
• फारच मजा येते. मी आजवर लहान मुलांचा सहवास तितकासा अनुभवलेला नाही. या हुशार मुलांसोबत काम करत असताना मला माझ्यातील लहान मूल पुन्हा जाणवते आहे. त्यांची निरागसता आणि प्रेम ही इतके निर्मळ असते की, मालिकेतील दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी काही विशेष प्रयास करावे लागत नाहीत. आम्ही आमची सगळी दृश्ये अगदी सहजपणे करतो. हे सगळे उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्यातील अभिनयाचे वेड अगदी स्पष्ट दिसते.
अभिनेता मानव गोहिलशी तुझे नाते कसे आहे?
• मानव गोहिल म्हणजे जणू सेटवर असलेला माझा मोठा भाऊच आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, मानव खूप आध्यात्मिक वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याच्याशी माझ्या विचारांची देवाण-घेवाण करायला मजा येते. सेटवर तो खोड्याही काढत असतो. तो आसपास असला की वातावरण प्रसन्न असते.
लहान मुलांसोबत काम करताना तुझ्यातील लहान मूल जागे होते का?
• होय, मुलांसोबत काम करताना माझ्यातील लहान मूल जागे होते. मी आधीच हे सांगितले आहे. या मुलांसोबत काम करताना खूप मजा येते. मुले मनाने इतकी निर्मळ असतात! त्यांचे कधीच अंतःस्थ हेतू नसतात. त्यांच्या सहवासामुळे मला माझ्यातील निरागस भावना जिवंत करायला मदत झाली आहे. जेव्हा लहान मुले सेटवर असतात, तेव्हा सेटवरील वातावरण बदलते आणि टवटवीत होते.
रेडियोपासून ते टेलिव्हिजनपर्यंतचा तुझा प्रवास कसा होता?
• हा प्रवास टेलिव्हिजनपासून रेडियोपर्यंत होता, असे मी म्हणेन. मी आधी टीव्हीवर कारकीर्द सुरू केली. जेव्हा माझ्याकडे काम नव्हते आणि सारे काही हरपल्याची भावना मला सतावत होती, त्यावेळी रेडियो हा माझ्यासाठी एक प्रयोग होता. त्या अनुभवाबद्दल मला कृतज्ञता वाटते, कारण त्यामुळे मला माझ्यातील आणखी एका प्रतिभेचा शोध लागला.
प्रवासाचे साधन म्हणून लोक ऑटोचा उपयोग क्वचितच करतात. तू ऑटोने प्रवास करण्याचे का ठरवलेस?
• ऑटो ही माझ्यासाठी एक प्रेमकहाणीच आहे. कठीण परिस्थितीत कोण्या एकाने टुकटुकमधून मला काठमांडूहून भारतात आणून सोडले. ती कृती इतकी हेलावून सोडणारी होती की मी ऑटो विकत घेण्याचे आणि नियमितपणे ती चालवण्याचे ठरवले. आणि आता ती माझी ओळख बनली आहे. मला ऑटो चालवायला आवडते. पण होय, ती एक अपारंपरिक सवारी आहे.
तू मराठी आणि मुख्य प्रवाहाच्या उद्योगात काम करतेस. या दोन्हीमध्ये तुला काय फरक जाणवतो?
• मला वाटते की, मराठी कंटेंट अधिक समृद्ध आहे, कारण मराठीतील अप्रतिम साहित्याचा त्यावर पगडा आहे. पण, स्वाभाविकपणे हिंदी मनोरंजन खूप व्यापक स्तरावर पोहोचले आहे. बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपट मराठी चित्रपटांवरून बनले आहेत. मला वाटते की, मराठी उद्योगातील कंटेंट हा लक्षणीयरित्या अधिक दमदार आहे.
बघा, दबंगी – मुलगी आई रे आई दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
