
-
५४ व्या इफ्फीमधे जागतिक सिनेमातील सर्वोत्तम सिनेमे बघण्याची संधी, आजपासून गोव्यात दिमाखदार सोहळ्याने महोत्सवाची सुरुवात

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना पुन्हा एकदा सिनेतारकांच्या झगमागाटाने प्रकाशमान करण्यासाठी, दरवर्षी भारतात होणारा, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फी ५४ पुन्हा एकदा, जगातील आणि भारतातील सर्वोत्तम सिनेमंचा खजाना घेऊन सज्ज झाला आहे. म्हणजेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पणजीतल्या श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते एकादिमाखदार सोहळ्यात या महोत्सवाचा शुभारंभ.
यावेळी अनुराग ठाकूर यांच्या हस्ते, आयनॉक्स संकुलात शुभारंभाच्या चित्रपटातील चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा सत्कार केला जाईल. इफ्फी ५४ च्या उद्घाटनप्रसंगी अनुराग ठाकूर फिल्म बझारचे उद्घाटनही करतील. चित्रपट बाजार हा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा(एनएफडीसी) कडून दरवर्षी इफ्फी सोबत आयोजित केला जाणारा दक्षिण आशियातील सर्वात मोठा जागतिक चित्रपट बाजार आहे. या अंतर्गत, दक्षिण आशियातील चित्रपट आशय आणि प्रतिभांना पाठबळ देत चित्रपट निर्मिती आणि वितरणात मदत केली जाते. फिल्म बाजार मुळे, दक्षिण आशियात जागतिक चित्रपटांच्या प्रचार देखील होऊ शकतो.नऊ दिवसांच्या ह्या महोत्सवात, जगातील सर्वोत्तम चित्रपट सिनेरसिकांना दाखवले जाणार आहेत. चित्रपटाचा शुभारंभ, पुरस्कारप्राप्त ब्रिटिश चित्रपट निर्माते, स्टुअर्ट गॅट यांच्या, ‘कॅचिंग डस्ट’ या मनोवेधक थरारपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रीमियरने होणार आहे. तर, फ्रेंच दिग्दर्शक, नुरी बिल्गे सिलान यांनी दिग्दर्शित केलेला ड्राय ग्रासेस हा मिड फेस्ट म्हणजे महोत्सवातील मध्यवर्ती चित्रपट असेल आणि रॉबर्ट कोलोड् दिग्दर्शित द फेदरवेट या चित्रपटाने ५४ व्या इफ्फीची सांगता होणार आहे.उद्घाटन समारंभात श्रिया सरन, नुसरत भरुचा, पंकज त्रिपाठी, शंतनू मोईत्रा, श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंग यांच्यासह सुपरस्टार माधुरी दीक्षित आणि शाहिद कपूर यांचे परफॉर्मन्स दाखवले जातील. त्याशिवाय, हॉलीवूडची अभिनेत्री, कॅथरीन झेटा जोन्ससह,सुपरस्टार सलमान खान, विद्या बालन, आयुष्मान खुराना, अनुपम खेर, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, अदिती राव हैदरी, एआर रहमान, श्रेया घोषाल, शंतनू मोईत्रा, सुखविंदर सिंग, अमित त्रिवेदी, असे अनेक कलाकार या चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत.
ह्या महोत्सवाला, शुभेच्छा देत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आपल्या शुभ संदेशात म्हटले आहे, की आज जेव्हा आपण जो काही आशय बघतो आहोत, त्याला तंत्रज्ञानाने एक नवे स्वरूप दिले आहे, अशा युगात, चित्रपट महोत्सवांची लोकप्रियता हेच दाखवणारी आहे, की सिनेमाच्या अद्भुत अनुभवांचे आकर्षण चिरकाल टिकणारे आहे. ‘‘चित्रपट निर्मितीसाठी सहकार्य, संयुक्त निर्मिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घाळण्यासाठी, इफ्फी हे एक परिपूर्ण व्यासपीठ ठरले आहे. आमच्या चित्रपट निर्मात्यांचा सिनेमाचा ध्यास, इच्छाशक्ती आणि दिग्दर्शक तसेच चित्रपट निर्माते यांच्या सहकार्यामुळे इफ्फीचा दरवर्षी विस्तार होत आहे.’’असे ठाकूर यांनी म्हटले आहे.यावर्षी, महोत्सवाच्या चार स्थळांवर २७० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील. इफफी ला यावर्षी १०५ देशांमधून २ हजार ९२६ प्रवेशांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आंतरराष्ट्रीय अर्ज आले होते. यावर्षी, महोत्सवात १३ वर्ल्ड प्रीमियर्स, १८ इंटरनॅशनल प्रीमियर्स,६२ आशियाई आणि ८९ भारतीय प्रीमियर्स होतील. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून १० भाषांमध्ये ३२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. १५ विशेष चित्रपटांमधे (१२ आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि ३ भारतीय चित्रपट) प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कारासाठी स्पर्धा होणार आहे.
डॉक्यु-मॉन्टेज या नव्या विभागात, जगभरातील आकर्षक माहितीपटांचे एक सुरेख मिश्रण दाखवले जाणार आहे. भारताचे ऑस्कर मध्ये प्रवेश करणारे माहितीपट तसेच आज चित्रपट निर्मितीमध्ये माहितीपटांचे वाढते महत्त्व या विभागात अधोरेखित केले जाणार आहे. गांधी पदक पुरस्कार विभागात सात आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणारे तीन भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जातील.उदयोन्मुख प्रतिभेला वाव देण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा दाखला म्हणून, इफ्फीमध्ये प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शकांद्वारा मास्टरक्लास, कार्यशाळा आणि पॅनेल चर्चांचे आयोजन देखील केले जाणार आहे. या वर्षी ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो उमेदवारांसाठी व्यावसायिक वर्ग देखील असणार आहेत , जे विशेषत: दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांद्वारे तयार केलेले असतील आणि २० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांच्या सहकार्याने भरतीसाठी एक प्रतिभावंतांचे शिबीर आयोजित केले जाईल.एनएफडीसी फिल्म बाजारमध्ये व्हीएफएक्स आणि टेक पॅव्हेलियन, माहितीपट आणि नॉन-फीचर प्रोजेक्ट्स/चित्रपटांचा परिचय, नॉलेज सिरीज आणि बुक टू बॉक्स ऑफिस सारखे उपक्रम असतील.याशिवाय, जुन्या भारतीय चित्रपटांच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहीम (एनएफएचएम) अंतर्गत एनएफडीसी-एनएफएआय यांनी केलेल्या जागतिक दर्जाच्या पुनर्संचयित चित्रपटांचे सात जागतिक प्रीमियरचा समावेश असलेला पुनर्संचयित क्लासिक्स विभाग देखील सुरु केला आहे. त्याचबरोबर या विभागात तीन आंतरराष्ट्रीय पुनर्संचयित चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार विभागाने सहभागी करून घेणाऱ्या दृश्य सामग्रीसह एक प्रदर्शन देखील स्थापित केले आहे , ज्यामधून चित्रपट रसिकांना संवादात्मक प्रदर्शनांद्वारे चित्रपटांबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. इफ्फीला भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून जगभरात लोकप्रिय बनवण्यासाठी कॅरावॅन , शिगमोत्सव, गोवा कार्निव्हल, सेल्फी पॉइंट्स, इफ्फी मर्कंडाइज आणि इतर उपक्रमांसह तीन ठिकाणी लोकांसाठी ओपन एअर स्क्रिनिंग देखील आयोजित केले जाईल .पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) या महोत्सवाशी संबंधित सर्व कार्यक्रमांवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये बातम्या प्रसिद्ध करेल. प्रथमच स्थानिक प्रसारमाध्यमांची मागणी पूर्ण करत पत्र सूचना कार्यालय कोकणी भाषेत देखील बातम्या उपलब्ध करून देईल. पीआयबीची सोशल मीडिया टीम पत्रकार परिषद आणि इतर कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करेल, आपल्या सोशल मीडिया हँडलवर ताज्या बातम्या पोस्ट करेल. पत्र सूचना कार्यालयाने प्रसारमाध्यमांना आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी कार्यक्रम स्थळी माध्यम सुविधा केंद्र देखील उभारले आहे.चित्रपट महोत्सव अधिक सर्वसमावेशक आणि सुगम्य बनवण्यासाठी विशेष दिव्यांग प्रतिनिधींना सर्व स्क्रीनिंग आणि इतर ठिकाणी सहज जाता यावे यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दृष्टिहीन आणि एम्बेडेड सांकेतिक भाषेसाठी एम्बेडेड ऑडिओसह चित्रपट दाखवले जातील. विविध इंडियन पॅनोरमा चित्रपट यावेळी स्मार्टफोन आणि इअरफोन वापरून आपल्या पसंतीच्या भाषेत डबिंगसह पाहता येतील.इफ्फी हा सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवापैकी एक ठरावा या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे.उद्घाटन सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रसारण केले जाईल. व्हायकॉम मीडिया प्रा. लि . हे उद्घाटन आणि समारोप समारंभातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास माध्यम आणि प्रसारण भागीदार असून समारंभांचे प्रसारण कलर्स टीव्ही वाहिनी आणि त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा वर केले जाईल.
-
सिंगापुर मध्ये शिवानी रांगोळेला भेटली अक्षराची चाहती

बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला कोणाला नाही आवडतं? प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जाता तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. झी मराठीची चर्चित मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडाची’ अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे, नुकतीच सिंगापुरला गेली होती आणि तिचा तिकडचा अनुभव कसा होता हे तिने व्यक्त केलंय.
सिंगापूरला मी दोन दिवससाठी गेली होती. एक खास प्रोजेक्ट शूट करायला. बाहेरगावी शूट म्हणजे काम आणि मजा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होतात. पूर्ण दिवस ‘तुला शिकवीन चांगलाच धडाच’ शूटिंग करून रात्रीचं उड्डाण भरलं मुंबईहुन सिंगापूरला. मला नवीन शहरात जायची कुतुहुलता नेहमीच असते. फक्त दोन दिवस हातात होते पण माझा उत्साह आकाशात होता. जिथे जिथे शूट करत होते तिथे तर मी फिरलीच पण शूटिंग संपल्यावर ही भटकंतीसाठी माझी बॅकपॅक घेऊन मी निघायची. सिंगापूर मध्ये ‘गार्डन बाय द बे’ , मरिना बे सॅण्डस , मुस्तफा मार्केट आणि लिटल इंडिया ही ठिकाणं मी फिरली. ‘गार्डन बाय द बे’ चे अद्भुत वास्तुकला माझ्या डोळ्यासमोर अजून ताज़ी आहे. सर्वात जास्त माझं लक्ष ज्या गोष्टींनी वेधून घेतलं ती म्हणजे तिकडच्या लोकांन मधली शिस्त. अत्यंत स्वछ आणि शिस्तबद्ध देश आहे. एक प्रसंग मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल पहाटे २:३० वाजले होते आणि आम्ही शूट संपवून आमच्या गाडीची वाट पाहत होतो तर तिथे सिग्नलवर एक माणसांनी पूर्ण एक मिनिट आपली गाडी थांबवली होती कारण तो ट्रॅफिक लाइटचा कायदा पाळत होता. पूर्ण शुकशुकाट असताना ही तो थांबला नियमाचे पालन केले ह्या गोष्टीच मला खूप कौतुक वाटलं. मला आपल्या ही देशात असं काही बघायला आवडेल. जेवणाचं म्हणाल तर मला नवीन नवीन पदार्थाची चव घ्यायला खूप आवडते. मी तिथे निरनिराळ्या प्रकारचे वोक बाउलचा आस्वाद घेतला. मला आवडणारे साहित्य घेऊन मी वोक बाउल बनवायची आणि खायचे. एक दिवशी मी भारतीय जेवणाची चव घ्यायला ही गेली होती.
असा कुठचा ही देश नसेल जिथे आपल्याला भारतीय मिळणार नाहीत आणि सिंगापूर मध्ये भटकताना माझी गाठ भेट एका पुणेकरशी झाली. काहीतरी भेट घरी घेऊन जायची म्हणून एका दुकानात शॉपिंगसाठी गेले असता हे पुणेकर भेटले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पुणेकर त्या दुकानाचे मालक होते. योगायोग असा की त्यांची आई आमचा कार्यक्रम ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ बघते. गप्पा गोष्टीं मध्ये कधी वेळ गेला कळलेच नाही पण ही भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती आणि ती माझ्या आठवणीत नेहमीच राहील.
मला भटकंती करायची आवड असल्यामुळे, मी खूप नियोजन करून निघते, जेव्हा कुठच्याही नवीन ठिकाण गाठायचं असेल, माझी एक टू डू- लिस्ट रेडी असते, माझ्या ट्रॅव्हल पॅकिंग मध्ये एक छोटी बॅक पॅक, एक पुस्तक आणि सार्वत्रिक वापरणारा चार्जर नेहमीच असतो.
तुम्हाला शिकवीन चांगलाच धडा’ वर प्रेम करत राहा आणि रोज रात्री ८: ०० वाजता आपल्या झी मराठीवर पाहत रहा. -
५००व्या प्रयोगाने ‘संगीत देवबाभळी’ चा प्रवास आता विसावणार

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’ निरोप घेणार ऐसा लाभा जो चुकला | तुका म्हणे वाया गेला |
२२ डिसेंबर २०१७ यादिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे.बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वही झाला. मध्ये करोना सारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही आपलं प्रेम कमी झालं नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं.
याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.
खरं तर मायबाप रसिकांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेवून आपण थांबणार आहोत. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे.
अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. तेव्हा कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या विठू सावळ्या नाट्यकृतीसह हरीमय होण्यासाठी अवघे अवघे या!!!!
ऐसा कार्तिकीचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा । -
ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर!

मी नथुराम गोडसे बोलतोय, लवकरच ८१८ वा प्रयोगसखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…!’ या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी नाट्यसृष्टी ढवळून निघाली. राष्ट्रपिता समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामची बाजू मांडणाऱ्या या नाटकाचे लेखन ज्येष्ठ नाटककार कै. प्रदीप दळवी यांनी केले आणि ते नाटक दिग्दर्शित करण्याचे धाडस मराठी रंगभूमीवरील त्यावेळचे डॅशिंग दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नावानेच त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आणि नाटकावर बंदी आणण्याचे सत्र सुरू झाले. तरीही माऊली प्रॉडक्शन्सचे संचालक आणि नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी त्यावेळी यशस्वीपणे लढा दिला आणि नाटक कोर्टाच्या विवादातून मुक्त केले. नाटक सेन्सॉर संमत करावे लागले. त्यानंतरही अनेक वेळा या नाटकावर विविध पद्धतीने दबाव आणायचा राजकीय प्रयत्न झाला, नाटकाची बसही सामानासकट जाळण्याचे प्रयत्न झाले, त्यातील एक यशस्वी ठरला; परंतु तरीही रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणारे उदय धुरत नाटकाच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी सातत्याने प्रयोग सुरूच ठेवले. नाटकावर जेव्हा जेव्हा गंडांतर आले तेव्हा तेव्हा त्यांनी न्यायालयीन लढा दिला. न्यायदेवतेनेही त्यांना योग्य न्याय मिळवून दिला असे म्हणायला हरकत नाही. नवीन कलाकारांना त्यांनी या नाटकात त्यावेळी संधी दिली आणि नाटकाबरोबरच त्यांनाही मोठे केले. मध्यंतरीच्या काळात माऊली प्रॉडक्शन्सने नाटक काही कारणास्तव थांबवले तेव्हा ८१७ प्रयोग धडाडीने पूर्णत्वास नेले होते. मात्र पुन्हा एकदा माऊली प्रॉडक्शन्सच्या ओरिजनल नाटकाचा लवकरच ८१८ वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. नाटकाचे पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून कै. विनय आपटे यांच्या तालमीत तयार झालेल्या वैचारिक आणि कलात्मक बैठकीचा प्रभाव त्यांच्या या नाटकात पाहायला मिळेल. नथुराम यांच्या वयाच्या जवळपास जाणाऱ्या वयाचा अभिनेता त्यांना या नाटकासाठी हवा होता, तो शोध आता पूर्ण झाला आहे.
नव्या नाटकात संगीतकार अशोक पत्की, नेपथ्य प्रकाश परब, रंगभूषा प्रदीप दरणे, वेशभूषा नाना गुजर, दृक्श्राव्य संकलन अभिमान आपटे, ध्वनी संकेत रुपेश दुदम, जाहिरात संकल्पना अक्षर कमल शेडगे अशी तंत्रज्ञांची चांगली फळी काम करीत आहे. नाटकाच्या मागे उभे असणारे आणि गेली ५० वर्षे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते उदय धुरत, निर्मिती सूत्रधार श्रीकांत तटकरे, निर्मिती प्रशासक चैतन्य गोडबोले, तसेच निर्मिती सहाय्यक प्रणित बोडके, सूत्रधार भगवान गोडसे यांचे योगदान महत्वाचे आहे.
या नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्निल फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर विविध व्यक्तिरेखा साकारत असून नथुराम गोडसेंच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले झळकणार आहे. नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून नव्या तंत्रांसह, नव्या ढंगात, तितक्याच ताकदीचा आणि वेगळ्या धाटणीचा ‘दुसरा नथुराम’ ८१८ वा प्रयोग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. -
Animal Star Saloni Batra Gears Up For The Film’s Release as She Plays Ranbir Kapoor’s Sister

Saloni Batra, the talented Indian actress, singer, and designer has been making waves in the film industry with her compelling performances. Known for her roles in “Soni” (2018), “Taish” (2020), and “200: Halla Ho” (2021), she is now set to grace the silver screen in the highly anticipated film “Animal” (2023). Directed by Sandeep Reddy Vanga and starring alongside Ranbir Kapoor, Batra’s journey in the industry is reaching new heights.
In the upcoming film, Batra takes on the role of Reet, playing Ranbir Kapoor’s sister in a pivotal relationship dynamic. The bond between the two actors has been glimpsed in behind-the-scenes pictures, creating a buzz among fans eagerly awaiting the film’s release. These images not only showcase their on-screen connection but also highlight the remarkable transformations both actors underwent for their roles.
“Animal” boasts a star-studded cast, including Anil Kapoor, Bobby Deol, Rashmika Mandanna, and Tripti Dimri in key roles. With the trailer already creating immense anticipation, these behind-the-scenes glimpses intensify the excitement.
As “Animal” gears up for its release on 1st December 2023, fans are on the edge of their seats. With each role, Saloni Batra cements her status as a rising star, and “Animal” is set to be another milestone in her promising career. -
Ankita Lokhande’s Grace Wins Salman Khan’s Approval On Bigg Boss 17!

Ankita Lokhande stands out as a symbol of charm and grace in the intense world of Bigg Boss 17. Her good behaviour wins people over. Her amazing journey on the popular reality show shows how strong, real, and unwavering her spirit is. The iconic show host, Salman Khan too complimented Ankita on her impressive presence, praising her good manners and ability to handle stress with ease. The actress’s team shared the video clip on her social media account captioned:
“Some people just play the game but some win hearts. She’s one of those rare gems who won all the love and hearts, even from @beingsalmankhan 💙
Ankita Lokhande continues to win hearts and leave an indelible mark on Bigg Boss 17. Her journey is an inspiration, showing that being true to yourself and having strong character can shine through even in the toughest situations. People are eager to see what happens next for Ankita in the Bigg Boss house, as she continues to set an example of what it means to be poised and strong! -
Saqib Saleem’s Unique Fitness Regimen and Diet Plan For A Wholesome Lifestyle Is An Inspiration

Saqib Saleem is a famous Indian actor and model who is known for playing a wide range of roles. He is also praised for maintaining a healthy lifestyle. Beyond his acting skills, Saqib follows a strict diet and exercise plan that helps him stay fit and healthy.
To stay in shape, Saqib does fitness in a unique way. He prefers bodyweight exercises like push-ups, pull-ups, and kickboxing to traditional weightlifting. Besides going to the gym, he runs 3–5 km every day and does aerial yoga, which is a great way to relax his muscles. For breakfast, Saqib has egg whites and low-fat milk. He eats a protein-rich meal for lunch and two egg whites, fish or chicken, and soup for dinner, emphasising a well-balanced, nutrient-dense diet.
Saqib Saleem’s distinctive fusion of bodyweight workouts, cardio sessions, and a protein-centric diet has played a pivotal role in preserving his remarkable physique. His fitness journey stands as a motivating factor for individuals aspiring to embrace a holistic and well-balanced lifestyle. This dynamic actor has some exciting projects in the pipeline, Kakuda and Crime Beat which is set for an OTT release.
-
एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया यांनी आयोजित केला “बटरफ्लाय” चित्रपटाचा विशेष शो

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट येत्या बुधवारी म्हणजेच २२ नोव्हेंबरला दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा यांनी मंगळवार २१ नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे.

अशा पद्धतीने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आणि फिल्म बाजार या दोन्ही ठिकाणी दाखवला जाणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. अशा अनोख्या आणि मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग होणं ही गौरवाची गोष्ट आहे
याप्रसंगी या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते अभिजीत साटम चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांनी समीक्षकांनी कौतुक केलेला हा चित्रपट प्रत्येकानी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहायलाच हवा अशा ह्या “बटरफ्लाय” चित्रपटाचा आस्वाद आता गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ला उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित “बटरफ्लाय” या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज निर्मित बटरफ्लाय या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन!!

-
Is Seerat Kapoor Shooting For Something Special With Allu Arjun ?

In the dynamic world of Indian cinema, the internet often becomes the breeding ground for speculation and excitement, especially when it involves two talented and beloved stars. Not sometime back, Seerat Kapoor uploaded a picture with Pusha star Allu Arjun, and that picture went immensely viral over social media. Now, in one of the recent interviews, the actress is seen speaking about her close bond with Allu Arjun, and that has once again sparked rumors of the duo collaborating on one of the projects.
The social media frenzy began when a picture featuring Seerat Kapoor and Allu Arjun surfaced online. The photograph showcased the duo sharing a candid moment, radiating charm and sparking curiosity among their followers. The chemistry between the two was palpable, leaving fans eager to know more about the context behind the snapshot.
Adding fuel to the fire, Seerat Kapoor recently opened up about her impression of Allu Arjun. Contrary to the stereotypical image of a larger-than-life movie star, Seerat had revealed, “Well, I’ve known him personally. We have way too many things in common. We’ve all seen him as this dynamic energy on screen. But few get the opportunity to know him on a personal level. And I think he’s one of the most humble people that I’ve come across despite the stardom. He makes you feel comfortable, he makes you feel like you’re good in your own zone. I’m more of a quality person versus a work. If I take to someone emotionally, or if I connect to their qualities, that draws me towards them, and Allu has that spark.”
This appreciation of Seerat Kapoor for Allu Arjun has definitely aroused a lot of eyebrows and has added a big question mark to fans: Will Seerat shoot something special with the actor, or are the duo shooting something and going to be seen sharing screen space for the first time ever?
Whether the duo is indeed shooting for something or not, their off-screen camaraderie has already left an indelible mark on the hearts of fans, making them yearn for more glimpses of this enchanting pairing. Only time will tell if this speculation turns into reality, but until then, the anticipation and excitement linger in the air.
On the other hand, Seerat Kapoor has been making waves in the South Indian film industry with her stellar performances and captivating screen presence. Known for her versatility and ability to portray diverse characters, Seerat has carved a niche for herself in the competitive world of cinema. -
लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

मुंबई : लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया”(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’ची तिकिटे हातोहात संपली, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे आयोजकांच्या वतीने लंडन स्थित “युनिक एअरएक्सप्रेस कुरिअरचे संचालक सिनेरसिक सचिन पाटील, कुलदीप शेखवात, तुषार जोगी, संतोष पारकर(बीजेपी), आबेडकरी विचाराचे प्रवीण करुणा यांनी व्यक्त केले आहे. या खास प्रीमियरसाठी मोऱ्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व प्रमुख अभिनेते जितेंद्र बर्डे हे खास उपस्थित होते.
आपल्या मराठी चित्रपट, नाटक, संगीत कलाकृतींचे लाखो चाहते जगभरात आहेत. अश्या कलाकृती पाहण्यासाठी ते आतुर असतात. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाने लक्ष वेधले होते. त्यामुळे लंडन मधील रसिकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. UK मधील प्रीमियर शो पाहिल्यावर प्रेक्षक काही वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते जितेंद्र बर्डे यांच्या कामाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. ‘मोऱ्या’ चित्रपटातील व्यक्तिरेखा मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रिया सर्वच प्रेक्षकांनी बोलून दाखविली. या चित्रपटाचे शोज् संपूर्ण युरोप देशामध्ये करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
एका सफाई कर्मचाऱ्यांची भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली असून ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांचा नैसर्गिक सहज – संयमी अभिनय रसिकांच्या मनात घर करीत असून रसिकांसोबत त्यांची नाळ जोडली जात आहे. खास या शोसाठी उपस्थित असलेले जितेंद्र बर्डे हा सर्व अनुभव पाहून भारावून गेले होते. ते म्हणाले, “आपण जन्माला घातलेल्या कलाकृतीला प्रेक्षक आपलं म्हणतात, आणि तो विचार, ती कलाकृती स्वतः सोबत घेऊन जातात, हा विलक्षण अनुभव मी इथे अनुभवाला आहे. माझा हा पहिला चित्रपट आहे, त्यासाठी मी आणि माझ्या टीमने केलेले सर्व कष्ट सार्थकी लागले आहेत, विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर ते लंडन’ हा माझा प्रवासही ‘मोऱ्या’मुळेच घडला आहे”
८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात! ‘मोऱ्या’चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.
‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी येत्या ८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
