Home

  • ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट

    सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील

    वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे गणेश कदम दिग्दर्शक आहेत. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडिल म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडिल म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल यात पाहायला मिळणार आहेत. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची ओळख का लपवून ठेवली आणि मुलगा कारण कळल्यानंतर वडिलांना स्वीकारणार का, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.

    या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘’ या चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच अतिशय स्वीट आहे. वडिल मुलाच्या नात्यात नेहमीच गुंतागुंत असते. परंतु काही गोष्टी मान्य केल्या, सुसंवाद साधला तर हे नाते नक्कीच चांगले होऊ शकते. हेच दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून यात धमालही आहे. ‘’

  • Giorgia Andriani Exudes ‘Maharani’ Vibes In A Royal Bridal Look By Ace Designer Lalit Dalmia

    Giorgia Andriani Looks Like A Maharani In Her Resplendent Royal Avatar

    Giorgia Andriani who has always aced up the fashion game with her stunning sartorial choices has once again made everyone captivated with her stunning bridal look. Desi kudi turned completed videsi with royalty and elegance for ace designer Lalit Dalmia. Giorgia took to her social media and shared a few pictures of herself in a bridal look which has just made our hearts skip a beat and is turning out to be a perfect inspiration for all the brides out there.

    Giorgia donned a bridal lehenga from the exclusive collection of ace designer Lalit Dalmia. The bridal outfit donned by Giorgia Andriani was nothing less than a work of art. The lehenga, exquisitely embroidered in intricate patterns, featured shades of maroon and red that gracefully complemented her beauty. The green strap embellishments on the ghagra provided a striking contrast and added an element of vibrancy to the ensemble. The blouse was a masterpiece in itself, designed to accentuate her figure with a delicate embroidery plunging neckline that was a perfect fit for the actress.

    Giorgia Andriani’s bridal look was further elevated with royal accessories. She adorned a heavy necklace, a stunning matha patti, and beads interwoven into her hair, creating a magnificent aura reminiscent of a Maharani. Her bangles and rings added a touch of elegance, completing her look as the epitome of Indian royalty.

    The actress opted for nude eyeshadows that enhanced her natural beauty and highlighted her expressive eyes. Her lips were adorned with a nude shade, perfectly complementing her overall appearance. The result was a harmonious blend of timeless beauty and modern finesse.

  • ‘OnePlus’ maiden foldable smartphone launched for ₹139,999

    One plus “The foldable handset” was launched at an event titled ‘Open for Everything’. In India, OnePlus Open can be bought for ₹139,999. Its open sale will begin from October 27.

    The smartphone comes in two colours Vulture Black and Emerald Dust.

    Over the years, OnePlus has established itself as one of the most-trusted smartphone makers in the Indian market. The brand’s name is considered to be synonymous with quality and users in India have generally been quite pleased with OnePlus devices so far. The phone’s first foldable smartphone, the OnePlus Open, was much-hyped even before its launch. Tech enthusiasts have been keen on getting a look at the foldable smartphone and are quite curious to know about its features, specifications and India price as well.

    In February, OnePlus during the Cloud 11 event in Delhi, had offered a glimpse of the company’s first-ever foldable phone.

    OnePlus Open’s cover display measures 6.31 inches, while the unfolded inner display is 7.82 inches. Both screens boast a 120Hz refresh rate and utilize LTPO 3.0 technology. The 2K screen is clear and sharp, which makes it good to consume content.

  • प्रो-कबड्डीच्या १०व्या हंगामाचा कार्यक्रम निश्चित

    प्रो-कबड्डीच्या १०व्या हंगामाचा कार्यक्रम निश्चित

    अहमदाबाद येथून २ डिसेंबरला होणार सुरुवात

    पुणे – १९ ऑक्टोबर २०२३ – प्रो-कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाच्या कार्यक्रमाची घोषणा आज करण्यात आली. हंगामास अहमदाबाद येथून २ डिसेंबरला सुरुवात होणार असून, हंगाम २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या वेळी लीगचे सामने प्रत्येक फ्रॅंचाईजीच्या शहरात होणार आहे. सलामीच्या वलझतीत गुजरात जाएंटसची लढत तेलुगु टायटन्सशी होईल. अहमदाबाद येथील सामने ट्रान्सस्टेडिया स्टेडियमवर होणार आहेत. प्ले-ऑफचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल. यंदाचे विशेष म्हणजे उदघाटनानंतरचे सर्व सामने १२ संघाच्या शहरात होणार आहेत. अहमदाबाद येथे ७ डिसेंबरपर्यंत सामने होतील.


    या पहिल्या टप्प्यानंतर बंगळूरु (८ ते १३ डिसेंबर), पुणे (१५ ते २० डिसेंबर), चेन्नई (२२ ते २७ डिसेंबर), नॉयडा (२९ डिसेंबर २३ ते ३ जानेवारी २०२४), मुंबई (५ ते १० जानेवारी २०२४), जयपूर (१२ ते १७ जानेवरी २०२४), हैदराबाद (१९ ते २४ जानेवारी २०२४), पाटणा (२६ ते ३१ जानेवारी २०२४), दिल्ली (२ ते ७ फेब्रुवारी), कोलकता (९ ते १४ फेब्रुवारी), पंचकुला (१६ ते २१ फेब्रुवारी) अशा लीग लढती होणार आहेत.



    गुजरात आणि तेलुगु यांच्यातील सामन्यात १०व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. या पर्वाच्या सुरुवातीच्या आठवड्यात पवन कुमार, फझल अत्रातेली, अजिंक्य पवनार, नविन कुमार यांचा खेळ बघायला मिळणार आहे.

    या नव्या पर्वाच्या कार्यक्रमाविषयी बोलताना लीगचे प्रमुख अनुपम गोस्वामी म्हणाले, मशाल स्पोर्टसला या नव्या पर्वाचा कार्यक्रम जाहिर करताना खूप आनंद होत आहे. या वेळी सर्व सामने फ्रॅंचाईजींच्या शहरात होत आहेत. त्यामुळे या वेळी लीगची रंगत अधिक वाढणार आहे.

  • विश्वचषक स्पर्धेत भारताचा मोठा विजय बांगलादेशचे स्वप्न मिळवले धुळीस!

  • शार्प शूटरच्या भूमिकेत विशाखा सुभेदार

    अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. हातात गन घेतलेलं त्यांचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसतील. त्यांचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या ‘डॅशिंग रावडी लूक’ मध्ये दिसणार आहेत.

    या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने सांगितलं की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं त्या सांगतात. येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

    विशाखा सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

  • सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!

    आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचरा, टाकलेलं – कुजलेलं अन्न, प्लास्टिक, बाटल्या, रत्यावर मारलेल्या पिचकाऱ्या, स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील सांडपाणी, फुटलेली – तुंबलेली गटारे, कुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी ‘मोऱ्या’ चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीस येत आहे.

    ‘मोऱ्या’ची कथेने युरोपमधील लंडन, मिल्टन केन्स, मेंचेस्टर, इटली इत्यादी शहरांसह अमेरिकेतील न्यूयॉर्क, रॅले, ऑक्सफर्ड (यूएसए) तसेच ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अश्या देशांतील रसिकांना आकर्षित केले असून ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेला भेटण्यासाठी ते विशेष उत्सुक आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला मोऱ्या उर्फ सीताराम जेधेची भूमिका करणारा लेखक, दिग्दर्शक व अभिनेता जितेंद्र बर्डे लंडनला रवाना होणार आहे. वरील देशांतील प्रतिनिधींसाठी या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग लंडनजवळच्या मिल्टन केन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या शो नंतर डिसेंबर २०२३ मध्ये जगभरातील अनेक शहरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

    ‘मोऱ्या’चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

    ‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रातही प्रदर्शित होणार आहे.

  • प्रसाद ओक साकारणार लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र


    अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी “कच्चा लिंबू”, “हिरकणी”, “चंद्रमुखी” अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आले.

    लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र आता रुपेरी पडद्यावर

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर “पठ्ठे बापूराव” या चित्रपटाच्या पोस्टरचं सोशल मीडियावर अनावरण

    स्वरुप स्टुडिओज, डेस्टिनी प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि प्रसाद ओकचं दिग्दर्शन

    अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका


    स्वरुप स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे,सपना लालचंदानी हे “पठ्ठे बापूराव” या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे. श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत “पठ्ठे बापूराव” या नावानं प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.