Home

  • Ten Roles, Ten Faces and How Dhanush Keeps Reinventing Himself

    A star who refuses to stay in one shape
    In an industry that often encourages safe, repetitive roles for its leading men, Dhanush has chosen the exact opposite path. He slips in and out of characters with astonishing fluidity, rarely repeating a look, a rhythm or even an emotional temperature. When actors speak of “range,” this is the benchmark — few demonstrate it as boldly and unapologetically as he does.

    Aadukalam (2011): A transformation carved in dust
    As the wiry rooster-fighter, Dhanush didn’t look like a movie star at all. The shaved-down physique, slouched shoulders and dusty aura made him appear like someone born and raised in Madurai’s lanes. It remains one of Tamil cinema’s most convincing physical reinventions.

    Raanjhanaa (2013): Innocence wrapped in heartbreak
    Hindi audiences met a completely different Dhanush — passionate, awkward, heartbreakingly sincere. As Kundan, the lovesick Banarasi boy, he carried fragility in every gesture. His devotion made his downfall hurt twice as much.

    Asuran (2019): Ageing into pain and survival
    Few actors of his generation age themselves the way he does here. The greying beard, roughened skin and a body marked by oppression — Dhanush looked decades older in some frames, and in others, like an entirely different man.

    Vada Chennai (2018): A chameleon across timelines
    From an aimless carrom player to a hardened gangster, he recalibrates himself scene by scene. The shift in his gaze alone — from innocent to deadly — shows why this performance is considered a masterclass in character evolution.

    VIP (2014): A mass hero built from attitude
    Raghuvaran is perhaps the closest he’s come to a classic mass-hero silhouette. Yet he avoids conventional gloss — uncombed hair, stubble, ordinary tees. He captures the restless middle-class youth without smoothing the rough edges, proving heroism can come from raw authenticity.

    Captain Miller (2024): Ferocity forged in grit
    Sunburnt skin, hardened posture, and the fatigue of a man who sleeps on the ground — his transformation for this period epic is visceral. The grime wasn’t makeup; it sold the world of the film instantly.

    Idly Kadai (2025): Looseness from a master of intensity
    Just months before Tere Ishk Mein, he appeared in this tender drama with rounder cheeks, louder shirts and an easy looseness. It felt almost subversive coming from him — like an actor enjoying the freedom of being unpredictable.

    Maari 2 (2018): Flamboyance without apology
    Oversized shades, flamboyant shirts, a near-cartoonish swagger — Dhanush dives into Maari’s world with infectious joy. He doesn’t resemble himself in any other role, as though he created his own genre of swagger cinema.

    Tere Ishk Mein (2025): A matured heart, not a lovestruck boy
    As Shankar, he returns to romance but leaves behind Kundan’s innocence. Here, he carries emotional weight, stillness and lived-in pain — the romance of a man shaped by life, not a boy discovering it.

    Kuberaa (2025): Elegance dipped in danger
    In Kuberaa, Dhanush inhabits a darker, morally ambiguous space. This is not a man suffering under the system but one who plays it with cold precision. The transformation is sleek, calculated and quietly menacing.

    The reinvention lies deeper than appearance
    There are actors who change through makeup and costume — and then there is Dhanush, who seems to reinvent himself from the marrow outward. Across these ten films, and many more, he has refused to let audiences settle on any one version of him, proving time and again that true stardom lies in evolution, not repetition.

  • इंडियन टेलिव्हिजन अकादमी (आयटीए) ने आपला २५ वा वर्धापन दिन जेडब्ल्यू मॅरियट, एनिग्मा, जुहू येथे एका विशेष पत्रकार परिषदेत साजरा केला.

    मुंबई, दिनांक -इंडियन टेलिव्हिजन अकादमी (आयटीए) ने आपला २५ वा वर्धापन दिन जेडब्ल्यू मॅरियट, एनिग्मा, जुहू येथे एका विशेष पत्रकार परिषदेत साजरा केला. मुंबईत आयोजित २५ व्या आयटीए वर्धापन दिन पत्रकार परिषदेत मनीष पॉल, रोहित रॉय, महिमा चौधरी, शुभांगी अत्रे, किकू शारदा, ध्वानी पवार, असित कुमार मोदी, जसवीर कौर, माहिर पंधी आणि बरेच जण उपस्थित होते. या मैलाच्या दगडी मेळाव्यात आयटीएचा वारसा, भारतीय मनोरंजनावरील त्याचा प्रभाव आणि पुढील रोमांचक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला.

    आयटीएचे अध्यक्ष अनु रंजन यांनी सांगितले, “२५ वर्षे पूर्ण होणे हा एक अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण उद्योगाच्या पाठिंब्याने अकादमीचा प्रवास समृद्ध होत आहे”

    आयटीएचे संयोजक शशी रंजन म्हणाले “आयटीए नेहमीच आपल्या मनोरंजन समुदायातील प्रतिभा, नावीन्य आणि सचोटी साजरी करेल”

    “आयटीए भारतीय टेलिव्हिजनच्या वाढीचे प्रतिबिंब आहे आणि स्टार प्लसला आपल्या उद्योगातील सर्वोत्तम व्यक्तींना सन्मानित करणाऱ्या व्यासपीठाशी सहयोग करण्यास आनंद होत आहे” जियोस्टारच्या एंटरटेनमेंट (हिंदी-स्टार प्लस, स्टार भारत, स्टार उत्सव, बंगाली, मराठी आणि गुजराती चॅनेल) च्या क्लस्टर प्रमुख सुमंता बोस म्हणाल्या

  • Dhurandhar is Unstoppable! The massiest blockbuster of 2025

    A film built for sheer big-screen domination
    In a year packed with big-ticket entertainers, Dhurandhar storms ahead with the confidence of a film that knows exactly what it is — a full-blown, crowd-pleasing spectacle. Since the day it was announced, the project has carried an aura of scale and ambition. Every poster, every teaser, every music drop has only intensified the excitement.

    A powerhouse ensemble that ignites the screen
    A major reason behind the frenzy is the film’s electrifying cast. Ranveer Singh leads with fierce screen presence, but Dhurandhar draws its real power from the collective energy of performers like Akshaye Khanna, Sanjay Dutt, R. Madhavan, Arjun Rampal and Sara Arjun. Each brings a distinct tone, and together they create the big-screen magic reminiscent of classic, all-out Hindi entertainers.

    Music that’s already a cultural wave
    The soundtrack is thundering, addictive and festival-ready. The anthem “Ishq Jalakar – Kaarvan” is roaring across speakers nationwide, “Shararat” has triggered a storm of reels, and “Gehra Hua” surprises with its emotional depth. Even the background score teased in the trailer carries the kind of adrenaline-laced punch that can transform an action scene from thrilling to unforgettable.

    Emotion meets spectacle — a rare mainstream blend
    At its core, Dhurandhar tells a high-tension story, but what sets it apart is its seamless blend of emotional weight with massive-scale action. The trailer reveals flashes of pain, torture and sacrifice, grounding the spectacle in something deeper and more human.

    A modern attempt at that Sholay-like resonance
    Directed by Aditya Dhar, the film appears to chase the very spirit that made classics like Sholay unforgettable — a mix of mass appeal, emotional heft, iconic characters and moments that linger long after the film ends. Action works best when fueled by emotion, and Dhurandhar seems poised to strike that balance.

    All signs point to a bona fide blockbuster
    With towering scale, a stacked cast, fiery music and a story crafted for maximum impact, Dhurandhar has every ingredient of a crowd-pleaser — the kind audiences cheer for, whistle for and watch again.

    If the buzz holds, it may well become the defining mass blockbuster of 2025.

    Produced by Jyoti Deshpande, Lokesh Dhar and Aditya Dhar, Dhurandhar releases worldwide on December 5, 2025.

  • श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार?

    कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत ७ डिसेंबरचा भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. कथानकात पहिल्यांदाच घडणाऱ्या एका अनपेक्षित अध्यात्मिक वळणामुळे संपूर्ण मालिकेचा प्रवाह बदलणार असून इंद्रायणी आणि श्रीकला यांच्या संघर्षाला नवे स्वरूप मिळणार आहे. हा नाट्यमय क्षण घराघरात उत्सुकता निर्माण करणार आहे.

    नवे अध्यात्मिक वळण आणि वाढती उत्कंठा

    किर्तन सुरू होण्यापूर्वीच श्रीकला इंद्रायणीला “आज व्यंकू महाराजांच्या कीर्तनात काही तरी होणार आहे…” असा संशयास्पद इशारा देते. हा संकेत पुढच्या घटनांसाठी महत्त्वाचा ठरत जातो. कीर्तनादरम्यान व्यंकू महाराज भावनिक होतात आणि त्यांना सावरण्यासाठी इंद्रायणी पुढे येण्याआधीच गोपाळ आश्चर्याने सर्वांना थक्क करत पुढे येतो.

    गोपाळचा आयुष्य बदलणारा क्षण

    पहिल्यांदाच गोपाळ स्वतःहून मंदिरात प्रवेश करतो, व्यंकू महाराजांना आधार देतो आणि त्यानंतर थेट विठुरायांच्या चरणी जाऊन नमस्कार करून पूर्ण भक्तिभावाने टाळ वाजवू लागतो. गोपाळमधील हा बदल पाहून मंदिरातील सर्वजण स्तब्ध होतात. व्यंकू महाराजांच्या डोळ्यांत पाणी येते आणि ते भावनिक होत हा बदल घडवून आणल्याचे श्रेय श्रीकलाला देतात.

    श्रीकलाचा विजयाचा क्षण की इंद्रायणीची रणनीती?

    व्यंकू महाराज पुढे येऊन सर्वांसमोर श्रीकलाचे आभार मानतात, त्यामुळे श्रीकला हा क्षण आपल्या ‘विजयाचा’ शिखर समजते आणि इंद्रायणीला खिजवते. मात्र इंद्रायणी शांत हसून तिचे सर्व गणित मोडून काढणारे वाक्य म्हणते— “धन्यवाद, श्रीकला… हे करून तू उलट माझं जिंकणं अजून सोपं केलंस.” हे ऐकताच श्रीकला गोंधळून जाते आणि इथूनच संघर्षाला नवे वळण मिळते.

    कथानकातील पुढचा टप्पा – प्रेक्षकांना पडलेले प्रश्न

    आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे — इंद्रायणीच्या मनात नेमका काय प्लॅन आहे? गोपाळचा हा भावनिक क्षणच श्रीकलासाठी सापळा ठरणार की ती पुन्हा परिस्थिती आपल्या बाजूने वळवून इंद्रायणीच्या आयुष्यात नवे वादळ निर्माण करणार?

    ७ डिसेंबरचा भाग या सर्व प्रश्नांची उत्तरं देत ‘इंद्रायणी’ मालिकेला एक धक्कादायक वळण देणार आहे.

    पहा, ‘इंद्रायणी’, ७ डिसेंबर, संध्या. ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

  • रोमँटिक आणि रहस्याची सांगड असलेला ‘कैरी’चा ट्रेलर समोर, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

    कोकणातील निसर्गरम्य वातावरणात खुललेलं ‘कैरी’चं विश्व

    उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण ‘कैरी’ हा बिगबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. पोस्टरनंतर आता समोर आलेल्या ट्रेलरने उत्सुकतेची पातळी आणखीनच वाढवली आहे. अनेक टर्न-ट्विस्टने सजलेला हा ट्रेलर रोमँस आणि थ्रिलरची मिश्रण असलेली कथा नेमकी कशाकडे वळणार याबद्दल प्रेक्षकांना ताणतणावात ठेवतो. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित हा रोमँटिक थ्रिलर आधीच चर्चेत होता आणि ट्रेलर रिलीजने त्यात भर घातली आहे.

    सायली–शशांकच्या रोमँसपासून कथेतल्या ट्विस्टपर्यंत

    ट्रेलरमध्ये सर्वप्रथम डोळ्यात भरतं ते कोकणाचं नयनरम्य सौंदर्य. हिरवाईने नटलेल्या कोकणात शूट झालेलं ‘कैरी’चं विश्व स्क्रीनवर पाहताच मनाला भुरळ घालणारं आहे. सुरुवातीलाच शशांक केतकर आणि सायली संजीव यांची लव्हेबल केमिस्ट्री दिसते. कोकणातील परिसरात खुलणारा त्यांचा रोमँटिक प्रवास लक्ष वेधून घेतो. त्यातच कोकणातील लग्नसमारंभाची थाटमाट दाखवणारे दृश्येही ट्रेलरला खास रंग देतात. पण या सगळ्या रोमँटिक प्रवासाला अचानक ब्रेक लागतो आणि इथेच कथा थ्रिलरकडे वळते. नवरा हरवला म्हणून अस्वस्थ झालेली पत्नी, तिची घालमेल आणि त्यातून उलगडणारा रहस्याचा धागा — या सगळ्याची झलक ट्रेलरमध्ये मिळते आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचते.

    कलाकारांची प्रभावी फळी आणि मन वेधून घेणारे लोकेशन्स

    ‘कैरी’च्या ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या अनुभवी कलाकारांचा दमदार अभिनय लक्षवेधी आहे. प्रत्येक फ्रेममध्ये कोकणाची नैसर्गिक शोभा आणि चित्रपटाची रहस्यमयता सुंदरपणे मिसळली आहे. कोकणातील लोकेशन्स हे ट्रेलरमधील आणखी एक मोठं आकर्षण ठरलं आहे.

    भव्य निर्मिती आणि उत्तम क्रिएटिव टीम

    ‘कैरी’ची निर्मिती ९१ फिल्म स्टुडिओज अंतर्गत झाली आहे. ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन यशस्वी व्यावसायिक चित्रपटांनंतर त्यांचा हा तिसरा प्रोजेक्ट असल्याने चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. हा चित्रपट अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंटच्या सहकार्याने बनला असून निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे सहनिर्माते म्हणून जोडले गेले आहेत.

    ‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले असून संगीत दिग्दर्शन निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी केलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली तर छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे.

    १२ डिसेंबरला उलगडणार ‘कैरी’चं रहस्य

    रोमँटिक प्रेमकथा, कोकणाची रमणीयता आणि अचानक उभं राहिलेलं रहस्य — या सगळ्यांचा संगम असलेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमाल पातळीवर पोहोचली आहे. ‘कैरी’च्या रूपाने कोणता अनोखा प्रवास पहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

  • प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

    ‘सन मराठी’वरील ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून रोज रात्री ९:३० वाजता..

    ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रत्येक घराशी नाळ जुळवणारी नवी मालिका घेऊन येत आहे — ‘मी संसार माझा रेखिते’. १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सोबतच आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, पूजा महेंद्र, संदीप गायकवाड आणि वेद आंब्रे यांसारखे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे कथानकात आणखी रंगत वाढणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मालिकेच्या कथेबद्दल आणि तिच्या भावविश्वाबद्दल खास माहिती देण्यात आली.

    आजच्या काळातल्या प्रत्येक गृहिणीचं प्रतिबिंब — अनुप्रिया

    मालिकेची मध्यवर्ती व्यक्तिरेखा अनुप्रिया ही नात्यांना जपणारी, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या कुटुंबासाठी जगणारी आणि प्रत्येक गोष्ट हसत हसत सांभाळणारी स्त्री आहे. काळ पुढे गेला असला तरी अनेक स्त्रिया आजही अनुप्रियासारखंच आयुष्य जगतात — स्वतःसाठी वेळ न काढता घरातील प्रत्येकासाठी अडजस्टमेंट करणाऱ्या, प्रेम जपणाऱ्या, माणसं सांभाळणाऱ्या. या मालिकेतून स्त्रीला सक्षम करण्याची आणि तिच्या भावविश्वातील न बोलल्या गेलेल्या गोष्टींना आवाज देण्याची प्रामाणिक धडपड दिसून येते.

    अनुप्रियाच्या जगण्याची लढाई आणि तिची स्वप्नं

    अनुप्रियाचा प्रेमविवाह झालेला असला तरी तिच्या बाबांनी गेली १७ वर्ष तिला स्वीकारलेले नाही. सासरच्यांचा पाठिंबा नसतानाही ती तिच्या जवळच्या माणसांसाठी रोज नवी उमेद घेऊन जगते. कुटुंबाची, नात्यांची, जबाबदाऱ्यांची धुरा सांभाळताना तिच्या मनात दडलेली स्वप्नं मात्र कोसळू न देता पुढे नेत असते तिची मुलगी — पिहू. आता या सगळ्यातून अनुप्रिया स्वतःसाठी कशी उभी राहणार, तिच्या स्वप्नांना नवं बळ कसं मिळणार, हे मालिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

    पहिल्याच प्रोमोने वाढवली उत्सुकता

    मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर मालिकेचं शीर्षक गीतही सर्वत्र प्रदर्शित करण्यात आलं असून त्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. कुटुंबातील नात्यांची ऊब, गृहिणीच्या आयुष्याची धडपड आणि तिचा आत्मविश्वास यातून या मालिकेचा गाभा आकार घेताना दिसतो.

    दीप्ती केतकरची मनोगते

    अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणते, “एक गृहिणी तिच्या संसारासाठी किती अडजस्टमेंट करते हे आपण नेहमी पाहतो. पण या मालिकेतून आम्ही केवळ तिच्या संघर्षाची कहाणी न दाखवता, तिच्यासमोर येणाऱ्या प्रसंगांना तिने कसं सामोरं जायचं, आपला संसार आणखी कसा सुंदर आणि सुखी करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘मी संसार माझा रेखिते’ ही फक्त अनुप्रियाची नव्हे, तर प्रत्येक घरातील स्त्रीचीच गोष्ट आहे.”

    ‘मी संसार माझा रेखिते’ ही कथा प्रेक्षकांच्या मनात नाते, प्रेम, जबाबदारी आणि स्त्रीशक्तीची नव्यानं जाणीव करून देईल, यात शंका नाही. १ डिसेंबरपासून ही हृदयस्पर्शी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

    नात्यांच्या कडू–गोड प्रवासाची सुरुवात

    मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    विरुद्ध स्वभाव, विरुद्ध मनोवृत्ती आणि सुरू होणारा गोंधळ

    ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत. काही अनपेक्षित कारणास्तव ते एकमेकांसमोर येतात आणि त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा अखंड धडाका!

    अनुभवी आणि तरुण कलाकारांची दमदार फळी

    या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकारांची मजबूत उपस्थिती. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले या ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे नाटक रंगभूमीवर नक्कीच धमाल घडवणार आहे.

    हास्य, घरगुती प्रसंग आणि भावनिक रेशीमगाठी

    नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवून लोटपोट करेल. सहजसुंदर प्रसंगांची मालिका आणि मधूनच उकलणारे नात्यांचे धागे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देतील.

    रत्नाकर मतकरींचं लेखन आणि विजय केंकरे यांचं दिग्दर्शन

    रत्नाकर मतकरी यांच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या रंगभूमीवरील समृद्ध अनुभवामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. शब्द आणि अभिनयाचा संगम नाटकाला अधिकच रंगतदार बनवतो.

    शुभारंभाची तारीख आणि ठिकाण

    भूमिका, प्रवेश क्रिएशन्स आणि असंम्य थिएटर्स निर्मित ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. निर्माते श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे व अजय विचारे यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. हास्याचे वादळ घेऊन येणारे हे नाटक ६ डिसेंबर रोजी पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे भव्य शुभारंभास सज्ज होत आहे.

  • भारतीय सिनेमा के बागी की वापसी! सिद्धांत चतुर्वेदी निभाएंगे दिग्गज वी. शांताराम की भूमिका

    भारतीय सिनेमा एक ऐतिहासिक क्षण का साक्षी बनने जा रहा है, क्योंकि भूले-बिसरे वैश्विक आइकन वी. शांताराम की विरासत अब एक नई पीढ़ी को प्रेरित करने के लिए बड़े पर्दे पर लौट रही है। सिद्धांत चतुर्वेदी अपने करियर की सबसे रूपांतरणकारी और चुनौतीपूर्ण भूमिका निभाते हुए उस अग्रणी फिल्मकार को जीवंत करेंगे, जिन्हें लंबे समय से भारतीय सिनेमा का मूल बागी कहा जाता रहा है।

    घोषणा-पोस्टर ने मचाई धूम

    मेकर्स ने इस भव्य जीवनी-आधारित फिल्म के घोषणा-पोस्टर में सिद्धांत को वी. शांताराम के रूप में पेश किया है। यह पोस्टर न सिर्फ फिल्म की भव्यता का संकेत देता है, बल्कि उस गहराई और शक्ति की भी झलक दिखाता है, जो शांताराम जी के व्यक्तित्व का मुख्य आधार थी।

    सिद्धांत चतुर्वेदी का भावनात्मक वक्तव्य

    सिद्धांत चतुर्वेदी कहते हैं, “वी. शांताराम जी को निभाना मेरे जीवन के सबसे बड़े सम्मान में से एक है। उनकी यात्रा के बारे में जितना पढ़ा, उतना ही विनम्र होता गया। वे सिर्फ भारतीय और वैश्विक सिनेमा के अग्रदूत नहीं थे, बल्कि एक दूरदर्शी थे जो हर बाधा के बावजूद आगे बढ़ते रहे। उनकी दुनिया में कदम रखना मेरे लिए एक अभिनेता के रूप में सबसे रूपांतरणकारी अनुभव रहा। उनका जीवन मुझे गहराई से छू गया और धैर्य की शक्ति की याद दिलाई। यह सीख मैं अपने काम और जीवन के हर पल में संजोकर रखना चाहता हूं।”

    दिग्दर्शक अभिजीत शिरीष देशपांडे की दृष्टि

    दिग्दर्शक अभिजीत शिरीष देशपांडे बताते हैं, “वी. शांताराम मेरे लिए हमेशा से प्रेरणा-स्रोत रहे हैं। उनके भीतर प्रयोग करने का साहस था, उनकी दृष्टि अलौकिक थी, और उनकी कृतियों ने आज के भारतीय सिनेमा को आकार दिया है। उनकी कहानी कहना मेरे लिए गर्व की बात है। सिद्धांत चतुर्वेदी इस भूमिका के लिए हमेशा से हमारी पहली पसंद थे, और इस पोस्टर के साथ हम उसी यात्रा की शुरुआत दिखा रहे हैं जिसका इंतज़ार लंबे समय से था।”

    निर्माताओं के मन की बात

    निर्माता सुभाष काले कहते हैं, “वी. शांताराम जी की विरासत भारतीय सिनेमा के सबसे मजबूत स्तंभों में से एक है। उनके संघर्ष, उनकी दृष्टि और उनकी नवाचार-शक्ति ने कई पीढ़ियों को प्रेरित किया है। इस फिल्म के माध्यम से हम उनके जीवन को सबसे ईमानदार तरीके से सम्मानित करना चाहते हैं। हमें गर्व है कि सिद्धांत चतुर्वेदी इस भूमिका में कदम रख रहे हैं।”

    निर्माता सरिता अश्विन वर्दे का मानना है, “वी. शांताराम सिर्फ महान फिल्मकार नहीं हैं, वे भारतीय सिनेमा की आत्मा हैं। फिर भी उन्हें वह सम्मान हमेशा नहीं मिला जिसके वे हकदार थे। इस फिल्म के ज़रिए हम उनकी दूरदर्शिता और कलात्मकता को नई रोशनी देने का प्रयास कर रहे हैं। सिद्धांत इस भूमिका के लिए हमारी पहली और एकमात्र पसंद थे—उनकी सच्चाई और समर्पण उन्हें शांताराम जी का परफेक्ट रूप बनाते हैं।”

    शांताराम जी की विरासत — मूक से रंगीन सिनेमा तक की यात्रा

    यह ऐतिहासिक बायोपिक भारत के सबसे दूरदर्शी कथाकारों में से एक की रंगीन जीवन-यात्रा को बड़े पर्दे पर साकार करती है। अभिजीत शिरीष देशपांडे द्वारा लिखित और निर्देशित यह फिल्म शांताराम जी की असाधारण यात्रा का अनुसरण करती है—मूक फिल्मों के दौर से लेकर ध्वनि और फिर रंगीन युग तक—जहां वे भारतीय सिनेमा की सबसे प्रभावशाली हस्तियों में से एक बनकर उभरे।

    भव्य निर्माण और दूरदर्शी प्रस्तुति

    राजकमल एंटरटेनमेंट, कैमरा टेक फिल्म्स और रोअरिंग रिवर्स प्रोडक्शन्स द्वारा प्रस्तुत ‘वी. शांताराम’ का निर्माण राहुल किरण शांताराम, सुभाष काले और सरिता अश्विन वर्दे कर रहे हैं। इस विशाल और प्रेरणादायी कथा को अभिजीत शिरीष देशपांडे ने अपने निर्देशन से एक सिनेमाई रूप दिया है, जो भारतीय सिनेमा के स्वर्णिम इतिहास को पुनर्जीवित करेगा।

  • भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर — ‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर

    पहिलं पोस्टर आऊट आणि सोशल मीडियावर धुमाकूळ

    भारतीय चित्रपटसृष्टीला नवे तत्त्वज्ञान, नवी दृश्यभाषा आणि कलात्मकतेची अभिनव उंची देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा असामान्य प्रवास आता पहिल्यांदाच एका भव्य मेगा बायोपिकमधून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. धडपड, प्रयोगशीलता, निष्ठा आणि कलाप्रेम या सगळ्यांचा संगम असलेले त्यांचे जीवन नव्या पिढीला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

    व्ही. शांताराम यांच्या परंपरेची भव्य झलक

    ‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक चिंतनापर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक नवकल्पनेपासून ‘नागरिक’च्या वास्तववादी कथानकापर्यंत प्रत्येक कलाकृतीतून व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटाला नवे वळण दिले. त्यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा दीपस्तंभ, सर्जनशील ध्यास आणि सामाजिक जाणिवेची उज्ज्वल परंपरा. आता हे संपूर्ण वैभव एका सिनेमॅटिक महाकाव्यातून प्रेक्षकांसमोर साकारले जात आहे.

    पहिल्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ

    ‘व्ही. शांताराम’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. पोस्टरमधील भव्य दृश्यरचना आणि सिनेमॅटिक ग्रँडर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची नवी लाट उसळली आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत दिसणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

    दिग्दर्शनाची उंची आणि भव्य पटकथा

    ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन हाताळले आहे. तांत्रिक उत्कृष्टता, भव्य दृश्यरचना आणि व्यक्तिचित्रणाची खोली यांचा सुंदर संतुलन साधत त्यांनी या चित्रपटाला एका वेगळ्याच कलात्मक पातळीवर नेले आहे.

    दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांची भावना

    दिग्दर्शक म्हणतात, “व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर भारतीय चित्रपटाच्या संपूर्ण तात्त्विक प्रवाहाची परंपरा डोळ्यांसमोर उभी राहते. त्यांच्या संघर्ष, निष्ठा आणि प्रयोगशीलतेचं अविस्मरणीय दर्शन पडद्यावर साकारताना एक विलक्षण आध्यात्मिक अनुभव मिळाला. प्रत्येक फ्रेम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हाच आमचा ध्यास आहे.”

    निर्मात्यांची मनोगते आणि भावना

    निर्माते राहुल किरण शांताराम सांगतात, “हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी केवळ प्रोजेक्ट नाही, ती आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली श्रद्धांजली आहे. भारतीय चित्रपटाला त्यांनी दिलेले योगदान किती अफाट आहे हे नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे हा चित्रपट अत्यंत भव्यतेने आणि संवेदनशीलतेने साकारत आहोत.”

    निर्माते सुभाष काळे म्हणतात, “व्ही. शांताराम हे नाव घेताच भारतीय चित्रपटाची घडण डोळ्यांसमोर उभी राहते. एका मराठी माणसाने जागतिक दर्जाचा उद्योग उभारण्यात इतकं मोठं योगदान दिलं, ही गोष्ट प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात नवी विचारशक्ती आणि कलाकौशल्याचा अद्वितीय आविष्कार होता. हा आत्मा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”

    भव्य निर्मिती आणि लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट

    राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे आहेत. भारतीय चित्रपटाच्या सुवर्णपरंपरेचा हा महान अध्याय येत्या नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • ‘मॅजिक’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत

    रवींद्र विजया करमरकर दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर “मॅजिक” १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

    आजवर अनेक बहुआयामी भूमिकांमधून स्वतःची अभिनयक्षमता सिद्ध केलेले जितेंद्र जोशी आता नव्या वर्षाची सुरुवात ‘मॅजिक’च्या भुरळ घालणाऱ्या भूमिकेतून करणार आहेत. सायकोलॉजिकल थ्रिलर या प्रकारातील हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित होत असून त्यातील एन्काऊंटर स्पेशलिस्टची व्यक्तिरेखा जितेंद्र जोशी एका वेगळ्याच आवेशात रंगवत आहेत. नुकतेच लाँच झालेल्या पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांत आणखी वाढली आहे.

    चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन

    तुतरी व्हेंचर्सच्या राजू सत्यम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, लोकप्रिय आणि प्रशंसित मालिका ‘आई कुठे काय करते’चे दिग्दर्शक रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनातील संवेदनशीलता आणि थरारक प्रस्तुतीची शैली ‘मॅजिक’मध्येही जाणवणार असून, सायकोलॉजिकल थ्रिलर या विषयाला नवं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    लेखन, संगीत आणि तांत्रिक बाजू

    कथालेखनाची माळ योगेश विनायक जोशी आणि रवींद्र विजया करमरकर यांनी रचली आहे. पटकथा लेखन योगेश विनायक जोशी आणि अभिषेक देशमुख यांनी केले असून, थ्रिलरच्या परिपूर्णतेसाठी कथानकात नेमकी बांधणी दिसून येते. केदार फडके यांनी केलेले छायांकन चित्रपटाच्या थराराला पूरक ठरणार आहे. मंदार चोळकर आणि वैभव जोशी यांच्या गीतांना देवेंद्र भोमे आणि चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. दिनेश पुजारी आणि नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे.

    अभिनेत्यांची दमदार फळी

    चित्रपटात जितेंद्र जोशींसोबत सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे आणि रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथानकाला वजन देणारी ही स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रभावात भर घालणार आहे.

    कथानकाची उत्सुकता वाढवणारी झलक

    ‘मॅजिक’ ही केवळ थरारक गोष्ट नसून तिच्या केंद्रस्थानी अरूण राऊत हा एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेला पोलिस अधिकारी आहे. त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांची मानसिक गुंतागुंत, त्याची धडाडी आणि त्याचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. नेमके काय ‘मॅजिक’ आहे आणि या कथेत कोणते रहस्य दडलेले आहे, याची उत्सुकता चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत टिकून राहणार आहे.

    फेस्टिवलमधील यश आणि प्रेक्षकांची अपेक्षा

    आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘मॅजिक’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विषयातील नावीन्य, सशक्त अभिनय आणि दिग्दर्शनाची ताकद यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढवत आहे.

    नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या या कथानकातील प्रत्येक वळण, थरार आणि रहस्य अनुभवण्यासाठी १ जानेवारीची वाट पहावी लागणार आहे.