
-
रीलॉइडच्या 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉपमुळे वर्टिकल एंटरटेनमेंटमध्ये भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल

वर्कशॉपची यशस्वी मांडणी
मुंबई, 16 सप्टेंबर 2025 – रीलॉइडने यशस्वीपणे 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉप आयोजित केले. या वर्कशॉपमध्ये नवोदित दिग्दर्शक, फिल्म विद्यार्थी आणि उद्योगातील तज्ञांनी भाग घेतला. अभिनय, लेखन, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगच्या माध्यमातून वर्टिकल स्टोरीटेलिंगवर मार्गदर्शन झाले.
वर्टिकल मायक्रोड्रामाच्या भविष्यावर चर्चा
शेवटी झालेल्या पॅनेल चर्चेत चित्रपट, लेखन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी वर्टिकल मायक्रोड्रामाच्या भविष्यावर चर्चा केली. रीलॉइडचे सीईओ श्री रोहित गुप्ता म्हणाले, “चीननंतर भारत पुढच्या मोठ्या एंटरटेनमेंट वेव्हसाठी सज्ज आहे. अब्जावधी मोबाईल-प्रथम प्रेक्षकांसह, भारत वर्टिकल रिव्होल्यूशनमध्ये आघाडीवर राहणार आहे.”लेखन आणि मायक्रोड्रामा अनुभव
मिर्झापूर वेब सीरिजचे सहलेखक श्री विनीत कृष्णा यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी ओटीटीपासून मायक्रोड्रामा लेखनाकडे कसे वळले ते स्पष्ट केले. “60–90 सेकंदांच्या छोट्या वर्टिकल कथेत प्रभाव टाकणे हे आव्हान असून संधी देखील आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सोनी इंडियाच्या टीमकडून प्रात्यक्षिक
सोनी इंडियाचे श्री सुनील गवई, श्री संधीव नायर आणि श्री इशान सिंग यांनी थेट प्रात्यक्षिकातून दाखवले की वर्टिकल शूटिंग, लाईटिंग आणि वस्तूंची मांडणी मोबाईल स्क्रीनवर किती महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितले की सोनीच्या मिररलेस कॅमेऱ्यांसारखी आधुनिक साधने वापरून वर्टिकल फिल्म्सची क्वालिटी अधिक चांगली होऊ शकते.विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
वर्कशॉपमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःची स्क्रिप्ट लिहून, अभिनय करून, शूटिंग व एडिटिंग करून स्वतःचे वर्टिकल मायक्रोड्रामा तयार केले.रीलॉइडचा दृष्टीकोन
श्री गुप्ता म्हणाले, “अशा वर्कशॉप्समुळे नव्या कथाकारांना बळ मिळते. आमच्यासाठी वर्टिकल हा फक्त फॉर्मेट नाही तर सिनेमा बोलण्याची नवी भाषा आहे. रीलॉइड हे भारताचे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म आहे.”रीलॉइड बद्दल
रीलॉइड हे नवीन पिढीचे एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. वर्टिकल मायक्रोड्रामा आणि क्रिएटिव्ह फॉरमॅट्स यावर लक्ष केंद्रित करून हे प्लॅटफॉर्म मोबाइल-फर्स्ट जगासाठी नवे सिनेमा साकारते. -
राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आदितीला खास संदेश

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये सुपर क्लासिक आठवडा
या आठवड्यात ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये ‘सुपर क्लासिक’ हा खास आठवडा साजरा होत आहे, ज्या अंतर्गत मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.आदितीला उपेंद्र लिमये यांचा संदेश
आदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरतो, कारण या आठवड्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ‘जोगवा’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले मराठी सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांच्याकडून तिला खास संदेश प्राप्त झाला आहे.सातारहून आलेले शुभेच्छा संदेश
सातारहून पाठवलेल्या या संदेशात उपेंद्र लिमये लिहितात – “ही माझी खास शुभेच्छा आहे त्या एकासाठी — जिला साताऱ्याने घडवलंय आणि जिला आज संपूर्ण भारत पाहतोय सुपर डान्सरमध्ये. आपल्या साताऱ्याचीच लेक – आदिती – कमाल, अप्रतिम, सुंदर! तुझं १००% देणं प्रत्येकवेळी दिसतं. तुला खूप खूप शुभेच्छा. साताराही तुझ्यासोबत आहे, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रही! ऑल द बेस्ट!”आदिती ठरली प्रेरणास्थान
आपल्या गावाचं नाव उज्वल करणारी आदिती आज महाराष्ट्रभरातील लहानग्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. उपेंद्र लिमये यांच्या शब्दांनी तिच्या नृत्ययात्रेला नवे बळ मिळाले आहे.कार्यक्रम पाहण्याची संधी गमावू नका
हा खास भाग चुकवू नका! ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ पाहा, शनिवार आणि रविवार, रात्री ८ वाजता – फक्त Sony Entertainment Television आणि SonyLIV वर. -
‘शेवग्याच्या शेंगा’ नाटक पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीची वाढती लोकप्रियता
मागील काही वर्षांमध्ये मराठी रंगभूमी पुन्हा बहरू लागली आहे. नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली मराठी नाटके पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. नाट्यगृहांसमोर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड दिमाखात झळकत असून, बाल्कनीही उघडल्या जात आहेत. यामध्ये नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेल्या जुन्या नाटकांचा मोलाचा वाटा आहे.सदाबहार नाटकाची पुनर्रचना
या यादीत आता आणखी एका आशयघन नाटकाचे नाव जोडले जाणार आहे. मराठी रसिकांच्या मनात घर केलेले ‘शेवग्याच्या शेंगा’ हे सदाबहार नाटक नवीन संचात पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे.गजेंद्र अहिरे यांची संकल्पना
देश-विदेशांतील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी १० एप्रिल २०१५ रोजी सर्वप्रथम ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले होते. त्यात स्वाती चिटणीस आणि संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता १० वर्षांनंतर “मिलाप थिएटर्स” या रॉमकॉम नाटकाची पुनःनिर्मिती करत आहे. या नाटकाचे लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले असून, त्यांनीच पुन्हा नव्याने दिग्दर्शनही केले आहे.२७ सप्टेंबरला पुण्यात शुभारंभ
या नवीन संचातील ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, २७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन रिअल लाईफ जोडी या नाटकात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यांच्या सोबत नंदीता पाटकर, अपूर्वा गोरे, अंकिता दिप्ती, साकार देसाई हे कलाकारही नाटकात आहेत.निर्मिती आणि तांत्रिक बाजू
दिप्ती प्रणव जोशी या नाटकाच्या निर्मात्या असून, राहुल कर्णिक, पुलकेशी जपे, डॉ. मंदार जोशी सहनिर्माते आहेत. अथर्व थिएटर्स चे संतोष भरत काणेकर या नाटकाचे प्रस्तुतकर्ता आहेत. फिक्शन फॉक्स या नाटकाचे जाहीरात संकल्पक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार तन्मय नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. नितीन नेरूरकर यांनी नेपथ्य केले असून, शितल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकामध्ये रंजक दृष्यपरिणाम साधते. -
‘आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश

बॉलिवूड अभिनेत्याचा मराठी सिनेमाला पाठिंबा
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आरपार ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले – “Running in theatres. Must watch guys. #AarPar”.कलाकारांना दिला टॅग
या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ह्रुता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग केलं.१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट
१२ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आरपार हा प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित चित्रपट असून सध्या थिएटर्समध्ये चांगल्या प्रतिसादासह झळकत आहे.पाठींब्यामुळे वाढणार चित्रपटाची पोहोच
राजकुमार राव यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्याने दिलेल्या या पाठींब्यामुळे चित्रपटाला अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.मराठी सिनेमाची दमदार परंपरा
मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दमदार कथा सांगण्याची परंपरा जपली असून, बॉलिवूडमधील मोठ्या नावांचा पाठिंबा मिळाल्याने आरपार सारखे चित्रपट अधिक चर्चेत येत आहेत. -
३०० वर्षांनंतर ती परत येतेय…

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी गूढ मालिका ‘काजळमाया’
स्टार प्रवाहची सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल
दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी गेली पाच वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतील अशी मालिकेतली पात्र हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण ठरत आलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर लवकरच नवी गूढ मालिका पाहायला मिळणार आहे.
चेटकीण पर्णिकेची अद्भूत गोष्ट
मालिकेचं नाव आहे काजळमाया. चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिकेची ही कहाणी आहे. तिला चिरतारुण्याचं वरदान लाभलेलं असलं तरी तिचं व्यक्तिमत्व कमालीचं स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा याशिवाय इतर कुठलाही विचार तिच्या मनात नसतो. चेटकीण वंश वाढवणं हेच तिचं एकमेव ध्येय असून त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरू होते एका अद्भूत प्रवासाची गोष्ट – काजळमाया.
आरुष वालावलकरच्या भूमिकेत अक्षय केळकर
सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर या मालिकेत आरुष वालावलकरची भूमिका साकारणार आहे. या पात्राबद्दल सांगताना अक्षय म्हणाला, “मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका आहे. हे पात्र माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे. आरुष हा कवी मनाचा, साधा, सरळ आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा आहे. त्याचा चांगुलपणा हीच त्याची खरी ओळख आहे. आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर असून कविता वाचनातली त्याची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे. पहिल्यांदाच अशा गूढ मालिकेत वेगळं पात्र साकारताना मी खूप उत्सुक आहे.”

स्टार प्रवाहचा नवा प्रयोग
स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी या नव्या प्रयोगाविषयी सांगितलं की, “गूढ, उत्कंठावर्धक विषय कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. याआधीही प्रेक्षकांनी अशा विषयांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. काजळमाया हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे, जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने ही मालिका नक्कीच लोकप्रिय ठरेल, असा विश्वास आहे. तेव्हा पाहायला विसरू नका – नवी गूढ मालिका ‘काजळमाया’, लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.”
-
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘महती अष्टविनायकाची’ गीत प्रकाशित

अष्टविनायकाच्या महिम्याचं अनोखं संगीतमय दर्शन
गणेशभक्तांसाठी खास तयार करण्यात आलेलं ‘महती अष्टविनायकाची’ हे धमाकेदार गीत नुकतंच प्रकाशित झालं आहे. स्वरपर्व आणि संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीतमय सादरीकरणातून आलेलं हे गीत गणेशभक्तांना एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. आजवर श्री गणेशावर अनेक गीते आली असली तरी अष्टविनायकावर गाण्यांची संख्या फारच कमी आहे. विशेष म्हणजे सचिन पिळगांवकर यांच्या अष्टविनायक (१९७९) चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ नंतर असे लक्षवेधी गीत सादर झालेले नव्हते.स्वरपर्व आणि चिनार-महेश यांचा अनोखा उपक्रम
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्वरपर्व संस्थेने आणि अनुदीप माळवी यांनी चिनार-महेश या लोकप्रिय जोडीला घेऊन ‘महती अष्टविनायकाची’ ही ध्वनिचित्रफीत साकारली आहे. सहनिर्माती म्हणून ॲड. प्रणिता देशपांडे यांचे योगदान राहिले आहे. गजलकार संदीप माळवी यांच्या लेखणीतून गीत साकारलं असून त्याला चिनार-महेश यांनी स्वरसाज दिला आहे. तरुण गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या आवाजात गाणं रंगतदार झालं आहे.दिग्दर्शन, अभिनय आणि नृत्याची रंगत
या गाण्याचं दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक अभिजीत दाणी यांनी केलं असून, यात अभिनेता आयुष्य संजीव आणि अभिनेत्री प्रतिभा जोशी यांच्या नृत्याभिनयाने गाण्याला वेगळी उंची मिळाली आहे. त्यांच्यासोबत बालकलाकार शोर्या टोकरे हिचा नृत्यप्रयोग विशेष ठरतो. नृत्यदिग्दर्शन दिनेश शिरसाट यांनी करत ग्रामिण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिभाव आणि थिरकायला लावणारा जल्लोष साकारला आहे.संगीत संयोजन आणि निर्मितीतील बारकावे
या ध्वनिचित्रफितीचं मार्गदर्शन विजय सोनावणे आणि चेतन भारिया यांनी केलं आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी संकेत गुरव यांनी पार पाडली असून, व्यवस्थापन प्रियांका क्षत्रिय आणि अभिषेक क्षत्रिय यांनी सांभाळलं आहे.गणेशभक्तांसाठी खास मेजवानी
‘महती अष्टविनायकाची’ हे गीत चिनार-महेश ऑफिशियल युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, सी एन एम म्युझिक फॅक्टरी लेबलखाली सादर करण्यात आलं आहे. हे गाणं तमाम गणेशभक्तांना भारावून टाकेल, असा विश्वास स्वरपर्वचे अनुदीप माळवी आणि संगीतकार चिनार-महेश यांनी व्यक्त केला आहे. -
जाऊबाई गावात फेम अंकिता मेस्त्रीचं नवं गाणं ‘इंस्टाची स्टार’ प्रदर्शित

रोमँटिक गाण्याची नवी जोडी – अंकिता मेस्त्री आणि जगदीश झोरे
‘जाऊबाई गावात’ फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि अभिनेता जगदीश झोरे यांच्यावर चित्रित झालेलं ‘इंस्टाची स्टार’ हे नवं रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गाण्याला अभिजीत दाणी यांनी दिग्दर्शन केलं असून संगीत रोहित पाटील यांचं आहे. गायक शैलेश राठोड आणि गायिका कृतिका बोरकर यांच्या आवाजाने सजलेलं हे गाणं नाशिकच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे.प्रेमकथेचं तरुणाईला भावणारं गाणं
या गाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून मेहनत घेऊन स्वप्नं रंगवणाऱ्या तरुण प्रेमकथेला वेगळ्या शैलीत सादर करण्यात आलं आहे. जय पालवकर निर्मित या गाण्याची कथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. कोरिओग्राफी दिनेश शिरसाठ यांनी केली असून, कॉस्ट्यूम आणि ईपीचं काम प्रियांका आणि अभिषेक क्षत्रिय यांनी सांभाळलं आहे.
अंकिता मेस्त्रीची प्रतिक्रिया
गाण्याविषयी बोलताना अंकिता म्हणाली, “इंस्टाची स्टार खूप सुंदर गाणं आहे. मला ऐकताच या गाण्यासाठी होकार द्यावा असं वाटलं. यातून एक वेगळी वाईब येते. विशेष म्हणजे हे गाणं तरुणाईला आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या जनरेशन Z ला खास भावेल. माझ्या फॅन्सना विनंती करते की जस तुम्ही माझ्या आधीच्या गाण्यांना प्रेम दिलं तसंच या गाण्याला द्या आणि रील व्हिडिओ बनवून मला टॅग करा.”निर्माता आणि दिग्दर्शकांचा अनुभव
निर्माता जय पालवकर म्हणाले की, “श्रीजय क्रिएशन हे स्वतंत्र म्युझिक चॅनल असून आम्ही दर्जा टिकवून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. इंस्टाची स्टार गाण्याची कल्पना मनाला भिडली आणि त्यावर आम्ही काम केलं. खात्री आहे की प्रेक्षक या गाण्यावर थिरकतील.” दिग्दर्शक अभिजीत दाणी म्हणाले की, “गाण्याचं शूट पावसाळ्यात नाशिकमध्ये झालं. अंकिताने कठीण परिस्थितीतही उत्तम परफॉर्मन्स दिला. त्यामुळे गाण्याला खास रंग आला.”
कलाकारांचा प्रवास
अभिनेत्री अंकिता मेस्त्री याआधी ‘जाऊबाई गावात’ या रिएलिटी शोमुळे चर्चेत आली होती, तसेच तिची ‘नखरेवाली’ आणि ‘झुमका’ ही गाणी हिट झाली होती. तर अभिनेता जगदीश झोरे याची ‘लयभारी दिसते पोर’ आणि ‘रंभा’ ही गाणी लोकप्रिय आहेत.ट्रेंडिंग गाण्याची नवी धून
‘इंस्टाची स्टार’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे हे गाणं तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये जलदगतीने स्थान मिळवत आहे. -
‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार कलाकारांची भक्कम फौज!

चित्रीकरण यशस्वीरित्या संपन्न
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.कलाकारांची ताकदीची फौज
चित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कोण कलाकार असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. नुकत्याच प्रदर्शित पोस्टरमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पोस्टरमध्ये चेहरे जरी न दाखवलेले असले तरी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीतील स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांची भक्कम फौज चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “माझे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं आणि आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे त्याचं चित्रीकरण याच भागात करता आलं, याचा प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद मनाला खूप आनंद देणारा होता. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. माझ्यासोबत असलेले हे सर्व कलाकार आणि माझी संपूर्ण टीम हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे.”लवकरच प्रदर्शन
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाची प्रदर्शन तारीख अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल. -
‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत

५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.नेहा जोशीची भूमिका आणि अनुभव
नेहा जोशीने सांगितले की, “सखाराम बाईंडर हे नाटक ५० वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मला या नाटकातील लक्ष्मीची व्यक्तिरेखा खूप भावली. वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून खूप कणखर आहे. लग्नसंस्थेवर आणि देवावर श्रद्धा असणाऱ्या लक्ष्मीचे, लग्नसंस्थेच्या पूर्ण विरोधात असलेल्या सखारामसोबतचे नाते कसे जुळते, हे नाटकातून पाहायला मिळेल. ५० वर्षांनंतर आपण कलाकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने किती पुढे आलो आहोत, हेही समजेल.”नाटकाची निर्मिती आणि तांत्रिक टीम
सुमुख चित्र निर्मित या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप असून, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांचे आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांनी सांभाळली आहे. संकेत गुरव सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. मूळ संहितेला धक्का न लावता नाटक सादर केलं जात आहे.
सयाजी शिंदेसोबत काम करण्याचा अनुभव
कवी प्रकाश होळकर यांनी नेहाचे नाव अभिनेता सयाजी शिंदे यांना सुचवले होते. दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांच्या मनातही तिचे नाव होते. सयाजी शिंदेसोबत काम करण्यापूर्वी नेहाला थोडं दडपण आलं, पण त्यांच्या अभिनयातील समरसता आणि कलेप्रती निष्ठेमुळे ती लवकरच सहजतेने काम करू लागली. त्यांच्या प्रामाणिकपणातून खूप शिकायला मिळाल्याचं नेहाने सांगितलं.प्रेक्षकांना नेहाचं आवाहन
नेहा म्हणाली, “आता काळ बदलला आहे आणि कलाकारही वेगळे आहेत. तुम्हाला नाटक आवडेल किंवा नाही, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कळवा. यामुळे आम्ही विजय तेंडुलकरांच्या विचारांपर्यंत कितपत पोहोचू शकलो, हे समजून घेण्यास मदत होईल.” -
“छबी” चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण?
फोटोग्राफी करणारा एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्या फोटोंचा एक विचित्र अनुभव त्याला येतो. प्रत्यक्षात त्या फोटोंमध्ये कुणीच दिसत नाही, पण फोटोग्राफरला मात्र त्या फोटोंत एक मुलगी दिसत असते. या गूढाचा उलगडा नेमका कसा होतो, हे पाहण्याची उत्कंठा “छबी” चित्रपटातून प्रेक्षकांना लागणार आहे.ट्रेलर आणि म्युझिक लाँच दिमाखात पार पडले
या रंजक चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. येत्या २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.निर्मिती आणि दिग्दर्शनाची टीम
केके फिल्म्स क्रिएशन आणि उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माती असून, चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांनी केलं आहे. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवर ही कथा उलगडते.कलाकारांचा भक्कम ताफा
चित्रपटात समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित यांसारखे अनुभवी कलाकार आहेत. त्याचबरोबर ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम, संकेत मोरे यांसारख्या नव्या दमाच्या कलाकारांनीही उत्तम अभिनय साकारला आहे.
संगीत आणि तांत्रिक बाजू
मंगेश कांगणे आणि प्रशांत मडपूवार लिखित गीतांना रोहन-रोहन यांनी संगीत दिलं असून, अभय जोधपूरकर आणि रोहन-रोहन यांच्या आवाजाचा सुरेल संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. रोहन मडकईकर यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे.कोकणातील निसर्गरम्य गूढरम्य कहाणी
गेल्या काही काळात कोकणाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट आले आहेत. मात्र “छबी” ही कथा वेगळी असून, फोटोग्राफी आणि रहस्याचा अनोखा संगम यात आहे. निसर्ग, गूढ आणि मानवी भावनांचा मिलाफ असलेला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे.
