Home

  • Blockbuster Tamil film ‘Dragon’ Set to release theatrically in Hindi on March 14th

    A Phenomenal Success Across the South, Now Ready to Captivate Hindi Audiences

    The much-talked-about Tamil blockbuster film, Dragon, is all set to release in Hindi as Return of the Dragon on March 14th. With record-breaking success across the South, the film has already crossed the 100 crore mark, emerging as one of the biggest hits of 2025.

    A Powerhouse Team Behind the Film

    Directed by Ashwath Marimuthu, known for his work on the hit film Oh My Kadavule, and starring Pradeep Ranganathan, the director-actor behind the sensational success Love Today, Return of the Dragon also features Kayadu Lohar, Anupama Parmeswaran, Gautham Vasudev Menon, and Myosin, among others. The film promises to captivate Hindi audiences with its gripping storyline and stellar performances.

    Critics Call It “Pitch Perfect” and “Fun & Fully Charged”

    The film has garnered widespread critical acclaim, with reviews praising it as:
    ✔️ “Pitch Perfect”
    ✔️ “A fun-filled, youthful entertainer”
    ✔️ “Fun and Fully Charged”

    A Thrilling Story of Power, Greed, and Redemption

    The film follows the journey of Ragavan, who, after a painful breakup, abandons his studies and plunges into the dangerous world of financial fraud, driven by a thirst for wealth and power. As he gets caught in a web of lies, his life spirals out of control, forcing him to face the consequences of his choices.

    Pradeep Ranganathan on Bringing the Film to Hindi Audiences

    “I’m thrilled to finally share ‘Return of the Dragon’ with the Hindi-speaking audience. The love and support we’ve received from fans so far has been overwhelming, and I hope Hindi viewers will enjoy this journey as much as our Southern audience has. A big thank you to everyone who’s embraced the film till now, and I can’t wait for you all to experience it on March 14th!”Pradeep Ranganathan

    AGS Entertainment Expands Its Blockbuster Reach

    Produced by AGS Entertainment, the powerhouse behind Love Today, Bigil, The Greatest of All Time, and Conjuring Kannappa, Return of the Dragon is yet another testament to the studio’s commitment to delivering high-quality entertainment.

    “At AGS Entertainment, we are always driven by our passion for telling meaningful stories. Dragon (Return of the Dragon) is one such story that we believe needed to be told. The response we’ve received from audiences has been phenomenal, and after numerous requests, we felt it was the right time to bring it to the Hindi-speaking audience. Our collaboration with Ashwath and Pradeep, both immensely talented creators, has resulted in a film that we are incredibly proud of, and we’re excited to share it with even more viewers.”Archana Kalpathi, CEO, AGS Entertainment

    A Film Set to Storm the Hindi Market

    With Return of the Dragon, AGS Entertainment, Pradeep Ranganathan, Ashwath Marimuthu, and AA Films are poised to make a massive impact in the Hindi film industry.

    📅 Mark your calendars – Return of the Dragon releases in theaters on March 14th! 🎬🔥

  • मे महिन्यात तापमान वाढणार – ‘पी.एस.आय. अर्जुन’ ९ मे रोजी येणार!

    अंकुश चौधरी म्हणतोय – ‘थांब म्हटलं की थांबायचं’

    मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    चित्रपटाची टॅगलाईन आणि कथा अधिकच उत्कंठा वाढवणारी

    “थांब म्हटलं की थांबायचं” अशी चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे यंदाच्या मे महिन्यात तापमान अधिकच गरम होणार आहे. पोलिसी धाडस, अ‍ॅक्शन आणि रोमांच असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवेल.

    निर्मिती आणि दिग्दर्शन

    व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित विक्रम शंकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत, तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास या चित्रपटाचे निर्माते आहेत.

    अंकुश चौधरीचा दमदार पोलिसी लूक

    चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी.एस.आय. चा लूक पाहायला मिळत आहे. हा लूक आणि त्याच्या भूमिकेचा दमदार अंदाज चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करत आहे.

    📅 ९ मे २०२५ पासून प्रेक्षकांना एक रोमांचक पोलिसी थरारकथा अनुभवायला मिळणार आहे! 🚔🎬🔥

  • श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

    श्रेयस तळपदे झी मराठीवर पुन्हा झळकणार

    ‘चल भावा सिटीत’ ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होतं – “तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!” यावर अनेक युजर्सनी ‘श्रेयस तळपदे’ अशी कमेंट केली.

    लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेची मोठी पुनरागमनाची बातमी

    मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ पुन्हा एकदा झी मराठीवर आणि छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या फॅन्ससाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण झी मराठीच्याच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सुपरहिट मालिकेतील यश-नेहा जोडी खूप गाजली होती.

    श्रेयस तळपदे नवा रिॲलिटी शो होस्ट करणार

    यावेळी श्रेयस ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटी शोचा होस्ट म्हणून दिसणार आहे आणि आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाने शोमध्ये रंग भरताना दिसणार आहे.

    शीर्षकगीत गाजतंय, श्रेयसचा हुक स्टेप प्रेक्षकांच्या पसंतीस

    या कार्यक्रमाचं भन्नाट शीर्षकगीत नुकतंच झी मराठीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर रिलीज करण्यात आलं. या शीर्षकगीतातील श्रेयसची हुक स्टेप आणि त्याचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

    ग्रामीण आणि शहरी जीवनाचा अनोखा संगम

    या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकत्र येणार असून, त्यांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त केलं जाईल.

    महाराष्ट्राची संस्कृती आणि समृद्धी यांचा अनोखा मिलाफ

    ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल.

    मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा बदलणारा कार्यक्रम

    सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार, हे प्रेक्षकांना हळूहळू उलगडत जाईलच. अशा एका अफलातून संकल्पनेवर आधारित हा शो प्रेक्षकांना नक्कीच एक नवा अनुभव देईल.

    १५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

    📺 तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा नवा कार्यक्रम ‘चल भावा सिटीत’ १५ मार्चपासून दररोज रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर! 🎬✨

  • ‘यो यो हनी सिंह: फेमस’ ने मोजेज़ सिंह के निर्देशन को कैसे प्रभावित किया

    डायरेक्टर मोजेज़ सिंह ने अपने करियर पर ‘यो यो हनी सिंह: फेमस’ के प्रभाव के बारे में खुलकर बात की

    मशहूर फिल्ममेकर मोजेज़ सिंह, जो अपनी बारीक और प्रभावशाली कहानी कहने की शैली के लिए जाने जाते हैं, उन्होंने ‘ज़ुबान’ और ‘ह्यूमन’ जैसी समीक्षकों द्वारा सराही गई परियोजनाओं के साथ एक अलग पहचान बनाई है। इन प्रोजेक्ट्स में विस्तृत स्क्रिप्ट, योजनाबद्ध शॉट और बड़ी प्रोडक्शन टीमें आम बात थीं। लेकिन डॉक्यूमेंट्री फिल्ममेकिंग की दुनिया में कदम रखना उनके लिए एक नया और चुनौतीपूर्ण अनुभव था।

    ‘यो यो हनी सिंह: फेमस’ ने बदल दी फिल्म बनाने की शैली

    ‘यो यो हनी सिंह: फेमस’ के साथ, मोजेज़ को एक पूरी तरह अलग प्रक्रिया अपनानी पड़ी—जहां न तो कोई निश्चित स्क्रिप्ट थी और न ही पहले से तय किया हुआ रास्ता। उन्हें इस यात्रा में सहजता को अपनाना पड़ा और खुद को कहानी के प्रवाह के अनुसार ढालना पड़ा। इसका नतीजा एक कच्चा, वास्तविक और बिना किसी फ़िल्टर के प्रस्तुत किया गया अनुभव था।

    डायरेक्टर मोजेज़ सिंह का इमोशनल इंस्टाग्राम पोस्ट

    उन्होंने सोशल मीडिया पर इस व्यक्तिगत यात्रा को साझा करते हुए लिखा:
    #FAMOUSTaughtMeToLETGO! ❤️
    IIFA 2025 के लिए तैयार! नामांकन के लिए धन्यवाद — हमारा पहला! 🙏
    यो यो हनी सिंह: फेमस

    छोटे क्रू के साथ काम करने का नया अनुभव

    एक छोटे क्रू के साथ काम करने का अनुभव भी खास रहा। कम लोगों की टीम ने एक गहरी और व्यक्तिगत कनेक्शन बनाने में मदद की—न सिर्फ हनी सिंह के साथ, बल्कि खुद मोजेज़ के भीतर भी। अपने अनुभव पर बात करते हुए उन्होंने कहा,
    “इसने मुझे मेरे असली व्यक्तित्व के करीब ला दिया और मेरी उस पहचान से रूबरू कराया, जिसे मैं अब तक नहीं जानता था।”

    डॉक्यूमेंट्री फिल्ममेकिंग ने निर्देशक की सोच को नया रूप दिया

    निर्धारित ढांचे को छोड़ने से उन्हें कहानी कहने की सबसे शुद्ध कला को खोजने का मौका मिला और साथ ही वह एक अधिक सहज और इंटेंस फिल्ममेकर के रूप में आकार दिए गए।

    फिक्शन से डॉक्यूमेंट्री तक – एक नया सफर

    हालांकि फिक्शन हमेशा उनके रचनात्मक व्यक्तित्व का एक अहम हिस्सा रहेगा, लेकिन डॉक्यूमेंट्री फिल्ममेकिंग ने उनकी दृष्टि को एक नया आयाम दिया है— जिसने उन्हें अधिक सहज, अनुकूल और गहराई से जुड़े हुए कहानीकार बना दिया है। कभी-कभी, सबसे शक्तिशाली कहानियाँ वे होती हैं जो आपको तब मिलती हैं जब आप उनकी सबसे कम उम्मीद करते हैं। 🎬

  • महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

    रंगभूमीवर थ्रिलर नाट्याचा नवा स्वाद

    कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही ‘फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे.

    नाटकाची दमदार स्टारकास्ट आणि निर्मितीसंस्था

    रितीशा प्रोडक्शन्स निर्मित, महेश वामन मांजरेकर लिखित व दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकाचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत.
    या नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.

    १९९२ पासून वाट पाहिलेलं नाटक!

    महेश मांजरेकर म्हणतात, “१९९२ साली मला हे नाटक करायचं होतं. त्यावेळी ते शक्य झालं नाही, आता हे नाटक मी स्वतः दिग्दर्शित करतोय. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्य रसिकांना अनुभवायला मिळेल.”
    सस्पेन्स थ्रिलर असं हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्या धाटणीचा अनुभव देईल.

    थ्रिलर जॉनरमधलं हटके नाटक

    अभिनेता विराजस कुलकर्णी सांगतो, “वैविध्यपूर्ण नाटक मराठी रंगभूमीवर येत आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. महेश मांजरेकर यांच्या सोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हतं. आम्ही घेऊन येत असलेलं हे नाटक थ्रिलर जॉनरचं असून काहीतरी वेगळं नाट्यरसिकांना पाहायला मिळेल, याची खात्री देतो.”

    अभिनेत्री उर्मिला कानिटकरची पहिली नाट्यकृती

    उर्मिला कानिटकर म्हणते, “माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली.”

    तांत्रिक बाजू आणि कलाकारांचा सहयोग

    • सहलेखन – अभय देखणे
    • सहाय्यक दिग्दर्शक – सुरज कांबळे
    • संगीत – हितेश मोडक
    • प्रकाशयोजना – शीतल तळपदे
    • नेपथ्य – संदेश बेंद्रे
    • वेशभूषा – लक्ष्मण येलप्पा गुल्लार
    • विशेष सहकार्य – दीपक कुलकर्णी

    महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ ६ एप्रिलपासून रंगभूमीवर!

    🎭 मराठी नाट्यरसिकांसाठी ही नवीन ‘फिल्टर कॉफी’ नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे!

  • Netflix Becomes the Exclusive Home for WWE in India Starting April 1

    Long-Term Partnership Brings WWE’s Weekly Live Sports Entertainment Exclusively to Netflix in India

    Mumbai, 8 March 2025 – Beginning April 1, 2025, Netflix will become the exclusive new home for WWE in India. As part of Netflix’s long-term partnership with the sports entertainment giant, Indian fans can now stream WWE’s weekly flagship shows — Raw, NXT, and SmackDown — along with major Premium Live Events like SummerSlam, Money in the Bank, Royal Rumble, and the much-anticipated WrestleMania.

    Live and Exclusive WWE Content on Netflix

    For the first time ever, Netflix will bring WWE’s high-adrenaline action, scripted storytelling, and unpredictable live entertainment exclusively to its platform in India. WWE fans will be able to enjoy three live shows every week — Raw, NXT, and SmackDown — airing 52 weeks a year.

    Additionally, live Hindi commentary will be available, making the experience even more immersive for Indian audiences.

    Triple H Welcomes Indian Fans to the Netflix Era

    To celebrate this historic partnership, WWE Chief Content Officer Paul “Triple H” Levesque shared a special announcement video, welcoming Indian fans to the “Netflix era” of WWE.

    “This partnership ensures that WWE fans in India have seamless and immersive access to all WWE programming, including new and exclusive archival content from the WWE vault. Fans can stream live or watch on demand, anytime, anywhere.”

    India – One of WWE’s Biggest International Markets

    With a massive wrestling fanbase, India has been one of WWE’s most engaged global markets. Through this partnership with Netflix, WWE is set to reach even more Indian fans, delivering its signature mix of athleticism, drama, and storytelling like never before.

    Are You Ready? WWE Streams Live in India from April 1, Only on Netflix!


    About Netflix

    Netflix is one of the world’s leading entertainment services, with over 300 million paid memberships in 190+ countries, offering TV series, films, and games across a wide variety of genres and languages. Members can watch anytime, anywhere, on any device.

    About WWE

    WWE® is a global leader in sports entertainment, delivering original content 52 weeks a year to a worldwide audience. WWE’s TV-PG programming is available in over 1 billion households across 20+ languages. In the United States, NBCUniversal’s Peacock is the exclusive home for WWE’s premium live events. Outside the U.S., WWE is now exclusively available on Netflix in most international markets.

    WWE is a part of TKO Group Holdings (NYSE: TKO).

  • स्त्री शक्तीचा जागर! ‘चंडिका’ चित्रपटाचा पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित

    आनारसा स्टुडिओज प्रस्तुत, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित ‘चंडिका’!

    महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात अनेक माध्यमांद्वारे केले जाते. त्यापैकीच एक प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेसृष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. स्त्रीकेंद्री चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक सशक्त महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    महिला दिनानिमित्त ‘चंडिका’ सिनेमाचं दमदार पोस्टर प्रदर्शित

    आनारसा स्टुडिओज प्रस्तुत, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित ‘चंडिका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा पहिला पोस्टर आज जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आला आहे.

    वन फोर थ्री (143)’ आणि ‘आम्ही जरांगे’ यासारख्या चर्चेत असलेल्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शक योगेश भोसले पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावर प्रेक्षकांसमोर येत आहेत.

    पोस्टरवरूनच जाणवणारी ताकद

    चित्रपटाच्या पोस्टरवर असलेल्या महिलेच्या कपड्यांवर आणि अंगावर सर्वत्र रक्त दिसत आहे. मागे सध्याचं वास्तव पाहायला मिळत असलं तरी महिलेच्या उजव्या हातात ‘त्रिशूल’ आहे.

    या दमदार पोस्टरवरूनच हा चित्रपट किती प्रभावी आणि ताकदीचा असेल, याचा अंदाज येतो.

    स्त्रीशक्तीचा जागर – अत्याचाराविरोधात संघर्ष

    आदिशक्ती विविध रूपात पृथ्वीवर अवतरते – कधी महालक्ष्मी, कधी तुळजाभवानी तर कधी चंडिका! दुष्टांचा नाश करण्यासाठी देवीने विविध रूपे धारण करून सत्याचा विजय साधला.

    ‘चंडिका’ हा चित्रपट देखील अत्याचार, असहिष्णुता आणि अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या स्त्रीशक्तीचं प्रतीक ठरणार आहे.

    स्त्रियांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करुन देणारा चित्रपट

    आजच्या स्त्रिया सक्षम आणि सजग आहेत, मात्र कधीकधी त्या स्वतःच्या अद्भुत शक्तींपासून अनभिज्ञ राहतात. जोपर्यंत त्यांच्या विरोधात अन्याय आणि अत्याचाराचा कडेलोट होत नाही, तोपर्यंत त्यांना स्वतःच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव होत नाही.

    ‘चंडिका’ कोण? तिचा उद्देश काय?

    हा प्रश्न प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहातच कळेल!

    संघटक व चित्रपटाची निर्मिती

    • प्रस्तुती: आनारसा स्टुडिओज
    • दिग्दर्शन आणि निर्मिती: योगेश पांडुरंग भोसले
    • लेखन आणि संगीत: सुरेश पंडित
    • गीतकार: वैभव देशमुख
    • प्रदर्शनाची तारीख: जागतिक महिला दिवस – ८ मार्च २०२६

    ‘चंडिका’ – एक नवा प्रवास, एक नवी शक्ती, एक नवी क्रांती! 🚩🔥

  • व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

    महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो. असचं एक व-हाडी भाषेतील “झामल झामल” हे व-हाडी भाषेतील गाणं नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. आणि विशेष म्हणजे हे गाणं प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुद्धा गेलं आहे. यावरून असे दिसते की आपल्या माय मराठी भाषेतील बोली भाषांना आजही लोक आवडीने स्वीकारतात तसेच अमराठी लोकांनाही या भाषा आवडतात.

    गाण्यात लोकप्रिय जोडी – विश्वास पाटिल आणि राजेश्वरी बोकन

    ‘झामल झामल’ गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री राजेश्वरी बोकन आणि अभिनेता विश्वास पाटिल यांची नवीन जोडी पाहायला मिळेल. अक्षय शिवाजी भाकरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिलं आहे. गाण्याचे बोल प्रशांत तिडके यांचे आहेत. गायिका सानिका अभंग हिने हे गाणं गायलं असून या गाण्यातील रॅपचा भाग रॅपर ओंकार दासगुडे यांनी गायला आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर विकी वाघ हे आहेत. या गाण्याची निर्मिती सौरभ मास्तोळी यांनी केली आहे.

    अभिनेता विश्वास पाटिल यांचा गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव

    “मी मुळचा मराठवाड्यातला आहे. आणि हे गाणं विदर्भातील व-हाडी प्रांतातील आहे. मी जेव्हा पहिल्यांदा ही भाषा ऐकली तेव्हा ती खूप साजूक वाटली. त्यामुळे मी लगेच गाण्यासाठी होकार दिला. गाण्याची संपूर्ण टीम फार मेहनती होती, त्यामुळे गाणं शूट करताना खूप मजा आली. टीमचे आणि प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”

    अभिनेत्री राजेश्वरी बोकन यांच्या आठवणी

    “गाण्याची प्रोसेस खूप कमाल होती. परंतु गाण्याच्या शूटिंगच्याच दिवशी मी आजारी पडले होते. कोरिओग्राफर विकी दादा बोलत होता की, तू आता कसं शूट करणार आणि हे गाणं डान्सीकल आहे, यात एनर्जीवाले स्टेप्स आहेत. पण काय माहित माझ्यात कुठून एनर्जी आली आणि मी ते संपूर्ण गाणं शूट केलं. आता प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय हे पाहून खूप आनंद होत आहे.”

    गाण्याच्या निर्मितीमागील प्रेरणा – संगीतकार सौरभ मास्तोळी

    “गीतकार प्रशांत तिडके माझे मित्र आहेत. ते म्हणाले की, आमच्या विदर्भाच्या भाषेत एकही गाणं अजून आलेलं नाही. तेव्हा आम्ही ठरवलं की, विदर्भाच्या भाषेत व-हाडी गाणं करूया. “झामल झामल” या शब्दाचा अर्थ आहे टंगळ मंगळ करणे किंवा टाईमपास करणे.

    हे रोमँटिक गाणं एका कपलच्या गोड प्रेमकथेवर आधारित आहे. त्यात मुलगी मुलावर प्रेम करत असते, आणि तो मुलगा थोडासा इंट्रोवर्ट असतो. या गाण्यातून मुलगी प्रेमाने त्याला विचारत असते, ‘चल आता भाव खाऊ नकोस, हो म्हण.’ व-हाडी भाषेचा तडका आणि दोघांची प्रेमाने केलेली नोकझोक गाण्यात अगदी उत्तम झाली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हे गाणं त्यांना खूप आवडलं आहे आणि हीच आमच्या मेहनतीची पोचपावती आहे.”

    गायिका सानिका अभंग यांचा रेकॉर्डिंगदरम्यानचा अनुभव

    “हे माझं पहिलंच व-हाडी गाणं आहे. जेव्हा आम्ही या गाण्याचं रेकॉर्डिंग करत होतो, तेव्हा प्रत्येकाचे पाय या गाण्यावर थिरकत होते. आणि हे गाणं रेकॉर्ड करताना आम्ही खूप धम्माल केली.”

    प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण रोमँटिक भेट!

    मधुर संगीत, हृदयस्पर्शी कथा, व-हाडी बोली भाषा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून ‘झामल झामल’ हे गाणं सर्व प्रेमीयुगूलांसाठी एक परिपूर्ण रोमँटिक भेट ठरणार आहे. प्रेमाच्या दुनियेत हरवण्यासाठी तयार व्हा! 🎶💃🕺💖

  • ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

    टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात… मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त होतं सोनी मराठी वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या चित्रीकरणाचं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. कार्यक्रम १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    पुण्यात पार पडले भव्य शीर्षकगीत चित्रीकरण

    ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचं चित्रीकरण नुकतंच पुण्यात पार पडलं. गीतकार ईश्वर अंधारे यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘इठ्ठल इठ्ठल, संग म्हणायला चला चला चला कीर्तनाला चला’ हे गाणं संगीतकार हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलं आहे. गायक हृषीकेश रिकामे यांचा स्वरसाज या गाण्याला लाभला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांच्या नजरेतून हे गाणं चित्रित झालं आहे.

    वारीच्या दिव्य परंपरेचा भक्तिमय अनुभव

    ‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा आहे. वारीची दिव्य परंपरा सोप्या आणि साध्या शब्दांत उलगडत गाण्याच्या माध्यमातून हा भव्य आणि अनुपम सोहळा जसाच्या तसा दाखवण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी करत आहे. तो रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास छायाचित्रकार महेश लिमये यांनी व्यक्त केला.

    पहिल्यांदाच कीर्तनावर आधारित रिअ‍ॅलिटी शो

    ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधारानं कीर्तन करत जनजागृती केली. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचा शोध घेतला जाणार आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

    महाराष्ट्रभरातून भरघोस प्रतिसाद

    यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या. महाराष्ट्रातल्या ३६ जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धकांची निवड सुरू झाली असून ‘चला चला चला कीर्तनाला चला’ या उत्साहपूर्ण शीर्षकगीतामुळे स्पर्धकांचा हुरूप वाढला आहे. हे गाणं सर्व वयोगटांतल्या व्यक्तींची कीर्तनाची ओढ वाढवेल हे नक्की…! 🎶✨

  • ‘गाव समृद्ध तर देश समृद्ध…’ – ‘गाव बोलावतो’ ट्रेलर प्रदर्शित!

    आपलं गाव समृद्ध करण्यासाठी एका बापाने आपल्या शहरातील मुलाला हाक द्यावी आणि मुलाने कोणताही विचार न करता आपल्या गावासाठी झोकून द्यावे आणि वडिलांचे समृद्ध गावाचे स्वप्न साकार करावे… हीच गोष्ट ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विनोद माणिकराव यांनी केला आहे. भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे आणि श्रीकांत यादव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

    तरुणांनी गावाच्या विकासासाठी पुढे यावं हा चित्रपटाचा गाभा

    सध्या गावाकडे असं चित्र निर्माण झालंय की, गावात केवळ म्हातारी लोक दिसतात आणि त्यांची मुलं, नातवंडं नोकरी-उद्योगधंद्यांच्या निमित्ताने शहरात स्थिरावलेली दिसतात. मात्र, तरूणाईनेही आपल्या गावात राहून, गावाला जाणून घेऊन प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं ही तरूण पिढीची जबाबदारी आहे.

    गावाच्या विकासात अडथळे आणि संघर्ष

    गावाच्या भल्यासाठी, विकासासाठी गावातीलच नागरिकांनी एकत्र येऊन गाव सुधारायला हवं असा संदेश या चित्रपट देऊन जातो. कोणतंही चांगलं काम हाती घेतलं की त्यात नानाप्रकारे त्रास देऊन त्यात विघ्न आणणारे लोकंही गावात असतात, अशांच्या विरोधात गावकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिल्यास गावाचा विकास नक्कीच होईल, असे भाष्य या ट्रेलरमधून करण्यात आले आहे.

    चित्रपटात दमदार कलाकारांची फौज

    गाव, शेती, शेतकरी, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण, विकासाचं स्वप्न बघणारा एक भला माणूस, त्याच्या मुलाची गावाकडे परतलेली पावलं यावर बेतलेला ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट!

    या चित्रपटात भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे यांच्यासोबतच श्रीकांत यादव, शुभांगी लाटकर, किरण शरद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    संस्कार वाहिनी प्रोडक्शन आणि फिल्मिटेरियन मीडिया वर्क्सची प्रस्तुती

    ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव आहेत.

    निर्माते प्रशांत मधुकर नरोडे, शंतनू श्रीकांत भाके असून, व्हिज्युअल बर्ड्स इन्स्टिट्यूट अँड स्टुडिओ, अमित मालवीय, प्रवीण इंदू, गणेश इंगोले, सुधीर इंगळे, तुषार खेरडे, दिनेश राउत हे सहनिर्माते आहेत.

    २१ मार्चपासून महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार!

    📅 २१ मार्चपासून हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल! 🎬