प्रो-कबड्डीच्या १०व्या हंगामाचा कार्यक्रम निश्चित

प्रो-कबड्डीच्या १०व्या हंगामाचा कार्यक्रम निश्चित

अहमदाबाद येथून २ डिसेंबरला होणार सुरुवात

पुणे – १९ ऑक्टोबर २०२३ – प्रो-कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाच्या कार्यक्रमाची घोषणा आज करण्यात आली. हंगामास अहमदाबाद येथून २ डिसेंबरला सुरुवात होणार असून, हंगाम २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या वेळी लीगचे सामने प्रत्येक फ्रॅंचाईजीच्या शहरात होणार आहे. सलामीच्या वलझतीत गुजरात जाएंटसची लढत तेलुगु टायटन्सशी होईल. अहमदाबाद येथील सामने ट्रान्सस्टेडिया स्टेडियमवर होणार आहेत. प्ले-ऑफचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल. यंदाचे विशेष म्हणजे उदघाटनानंतरचे सर्व सामने १२ संघाच्या शहरात होणार आहेत. अहमदाबाद येथे ७ डिसेंबरपर्यंत सामने होतील.


या पहिल्या टप्प्यानंतर बंगळूरु (८ ते १३ डिसेंबर), पुणे (१५ ते २० डिसेंबर), चेन्नई (२२ ते २७ डिसेंबर), नॉयडा (२९ डिसेंबर २३ ते ३ जानेवारी २०२४), मुंबई (५ ते १० जानेवारी २०२४), जयपूर (१२ ते १७ जानेवरी २०२४), हैदराबाद (१९ ते २४ जानेवारी २०२४), पाटणा (२६ ते ३१ जानेवारी २०२४), दिल्ली (२ ते ७ फेब्रुवारी), कोलकता (९ ते १४ फेब्रुवारी), पंचकुला (१६ ते २१ फेब्रुवारी) अशा लीग लढती होणार आहेत.



गुजरात आणि तेलुगु यांच्यातील सामन्यात १०व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. या पर्वाच्या सुरुवातीच्या आठवड्यात पवन कुमार, फझल अत्रातेली, अजिंक्य पवनार, नविन कुमार यांचा खेळ बघायला मिळणार आहे.

या नव्या पर्वाच्या कार्यक्रमाविषयी बोलताना लीगचे प्रमुख अनुपम गोस्वामी म्हणाले, मशाल स्पोर्टसला या नव्या पर्वाचा कार्यक्रम जाहिर करताना खूप आनंद होत आहे. या वेळी सर्व सामने फ्रॅंचाईजींच्या शहरात होत आहेत. त्यामुळे या वेळी लीगची रंगत अधिक वाढणार आहे.

Leave a comment