
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोडदौड कायम असून, भारताचा विजयरथ रोखण्याचे बांगलादेशचे स्वप्न विराट कोहलीने धुळीस मिळवले. भारताने विश्वचषक स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. बुधवारी (19 ऑक्टोबर) पुण्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला.
