
सोनू सूदने त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. सोनू ने त्याची सह-अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या सोबत पडद्यामागील फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने या कलाकारांमधील निर्विवाद केमिस्ट्री बघायला मिळाली. या दोघांची ऑन-स्क्रीन जादू मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत.
“फतेह” त्याच्या अॅक्शन चित्रपट असणार असून हॉलीवूड-प्रेरित स्टंट्ससह उत्साह वाढवणारा असणार आहे. अलीकडेच सोनू ने काही खास फोटो शेयर केले असून पडद्यामागील या फोटो ची सोनू ने खास झलक दाखवली आहे. सूद आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची एक आकर्षक झलक दिली आहे. भारतीय सिनेमात हॉलीवूड-शैलीचा थरार अनुभवण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. झी स्टुडिओज, शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने, “फतेह” प्रतिभा, केमिस्ट्री, हाय-ऑक्टेन स्टंट्स ची पर्वणी असणार आहे.

