
18 नोव्हेंबर 2017 मध्ये मानुषी छिल्लरने 17 वर्षांनंतर भारतात पुनरागमन करत मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास घडवला होता. हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व करत तिच्या विजयाने केवळ तिचे सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ता आणि करिष्मा देखील साजरा केला होता.
मिस वर्ल्ड चा किताब पटकावण्या पासून ते मानुषीने फॅशन , सोशल वर्क आणि बॉलीवूडच्या जगात सहजतेने आपली छाप पाडली. एक फॅशन आयकॉन म्हणून तिने आपली ओळख संपादन केली. एका छोट्या शहरातून जागतिक फॅशन स्टेजपर्यंतचा तिचा प्रवास हा कायम प्रेरणादायी ठरला.

फॅशन, अभिनय यांच्या पलिकडे जाऊन मानुषीची सामाजिक बांधिलकी देखील तिच्या प्रयत्नांतून दिसून येते. पर्यावरणीय कारणांमध्ये गुंतून जाऊन जसे की गणपती उत्सवानंतर समुद्रकिनारा साफ करणं यातून तिने अनोखी सामाजिक बंधालकी जपली.
व्यावसायिक आघाडीवर मानुषी यशस्वी वाटचाल करत आहे. “द ग्रेट इंडियन फॅमिली” आणि “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” सारख्या प्रकल्पांसह तिने मनोरंजन उद्योगात एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे.
