
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेच्या, एका आर्या (माही भद्रा) नावाच्या छोट्या चुणचुणीत आणि दबंगी तेवर असलेल्या मुलीभोवती फिरणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्याचा असा समज आहे की, तिचे वडील एक सुपरकॉप आहेत, पण तिला हे माहीत नाहीये की, ती सत्या (आमीर दलवी) नावाच्या, कोणत्याही मूल्यांची चाड नसलेल्या गुंडाची मुलगी आहे, जो सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आर्याची आई छाया (सई देवधर) हिच्या मृत्यूनंतर सत्याचा भाऊ अंकुश (मानव गोहिल) आर्याला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याची पत्नी बेला (यशश्री मसुरकर) पोटच्या पोरीसारखी तिची काळजी घेते. या सगळ्या गोंधळात सत्याची पत्नी कस्तुरी (हिमानी चावला) बेलाचे कान भरते की आर्या ही अंकुशची अनौरस मुलगी असू शकते. हे सांगून ती अंकुश आणि बेला यांच्यात गैरसमजाची ठिणगी पेटवून देण्याचा प्रयत्न करते. बेलाची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री यशश्री मसुरकर यांनी मालिकेविषयी, आपल्या व्यक्तिरेखेविषयी, सेटवरील वातावरणाविषयी आणि इतर कलाकारांशी असलेल्या नात्याविषयी बातमीवाला न्युज पोर्टल सोबत केलेली ही बातचीत….
बेला, तुझ्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला सांग.
• बेला आदर्शवादी आणि विश्वासार्ह आहे. साधेपणा ही तिची ओळख आहे. ती एक प्रेमळ माता, समर्पित सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि लाघवी पत्नी आहे जी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या कुटुंबाशी समरस झाली आहे. आपला पती अंकुश याने घेतलेल्या निर्णयाला तिचा नेहमीच भक्कम पाठिंबा असतो. बेलाच्या व्यक्तिरेखेतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिच्यात एक उपजत मातृत्व प्रवृत्ती आहे आणि मला वाटते की ती वृत्ती मी मालिकेत जिवंत करू शकले आहे.
प्रत्यक्ष जीवनात तू माता नसल्याने, ही भूमिका करताना तुझे प्रेरणास्थान कोण होते?
• माझ्या अवती-भोवती असलेल्या सर्व माता याच माझी प्रेरणा आहेत. मला लोकांचे निरीक्षण करायला आवडते. बेलासाठी तयारी करताना मला माझ्या या सवयीचा फायदा झाला. शिवाय ‘गिलमोर गर्ल्स’ मालिकेतून देखील मला प्रेरणा मिळाली, कारण या मालिकेत दाखवलेले आई आणि मुलीचे नाते फारच सुंदर आहे. तुमच्यात मातृत्वाची भावना असतेच आणि मला वाटते, आपण आपल्या आईला आपली काळजी घेताना बघत असतो आणि तिचे गुण आपसूक आत्मसात करत असतो.”
लहान मुलांसोबत काम करताना कसे वाटते आहे, जे सेटवर महत्त्वाची भूमिका बजावत असतात?
• फारच मजा येते. मी आजवर लहान मुलांचा सहवास तितकासा अनुभवलेला नाही. या हुशार मुलांसोबत काम करत असताना मला माझ्यातील लहान मूल पुन्हा जाणवते आहे. त्यांची निरागसता आणि प्रेम ही इतके निर्मळ असते की, मालिकेतील दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी काही विशेष प्रयास करावे लागत नाहीत. आम्ही आमची सगळी दृश्ये अगदी सहजपणे करतो. हे सगळे उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्यातील अभिनयाचे वेड अगदी स्पष्ट दिसते.
अभिनेता मानव गोहिलशी तुझे नाते कसे आहे?
• मानव गोहिल म्हणजे जणू सेटवर असलेला माझा मोठा भाऊच आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, मानव खूप आध्यात्मिक वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याच्याशी माझ्या विचारांची देवाण-घेवाण करायला मजा येते. सेटवर तो खोड्याही काढत असतो. तो आसपास असला की वातावरण प्रसन्न असते.
लहान मुलांसोबत काम करताना तुझ्यातील लहान मूल जागे होते का?
• होय, मुलांसोबत काम करताना माझ्यातील लहान मूल जागे होते. मी आधीच हे सांगितले आहे. या मुलांसोबत काम करताना खूप मजा येते. मुले मनाने इतकी निर्मळ असतात! त्यांचे कधीच अंतःस्थ हेतू नसतात. त्यांच्या सहवासामुळे मला माझ्यातील निरागस भावना जिवंत करायला मदत झाली आहे. जेव्हा लहान मुले सेटवर असतात, तेव्हा सेटवरील वातावरण बदलते आणि टवटवीत होते.
रेडियोपासून ते टेलिव्हिजनपर्यंतचा तुझा प्रवास कसा होता?
• हा प्रवास टेलिव्हिजनपासून रेडियोपर्यंत होता, असे मी म्हणेन. मी आधी टीव्हीवर कारकीर्द सुरू केली. जेव्हा माझ्याकडे काम नव्हते आणि सारे काही हरपल्याची भावना मला सतावत होती, त्यावेळी रेडियो हा माझ्यासाठी एक प्रयोग होता. त्या अनुभवाबद्दल मला कृतज्ञता वाटते, कारण त्यामुळे मला माझ्यातील आणखी एका प्रतिभेचा शोध लागला.
प्रवासाचे साधन म्हणून लोक ऑटोचा उपयोग क्वचितच करतात. तू ऑटोने प्रवास करण्याचे का ठरवलेस?
• ऑटो ही माझ्यासाठी एक प्रेमकहाणीच आहे. कठीण परिस्थितीत कोण्या एकाने टुकटुकमधून मला काठमांडूहून भारतात आणून सोडले. ती कृती इतकी हेलावून सोडणारी होती की मी ऑटो विकत घेण्याचे आणि नियमितपणे ती चालवण्याचे ठरवले. आणि आता ती माझी ओळख बनली आहे. मला ऑटो चालवायला आवडते. पण होय, ती एक अपारंपरिक सवारी आहे.
तू मराठी आणि मुख्य प्रवाहाच्या उद्योगात काम करतेस. या दोन्हीमध्ये तुला काय फरक जाणवतो?
• मला वाटते की, मराठी कंटेंट अधिक समृद्ध आहे, कारण मराठीतील अप्रतिम साहित्याचा त्यावर पगडा आहे. पण, स्वाभाविकपणे हिंदी मनोरंजन खूप व्यापक स्तरावर पोहोचले आहे. बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपट मराठी चित्रपटांवरून बनले आहेत. मला वाटते की, मराठी उद्योगातील कंटेंट हा लक्षणीयरित्या अधिक दमदार आहे.
बघा, दबंगी – मुलगी आई रे आई दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
