
कलर येलो प्रॉडक्शन ने आजवर अनेक उत्तम कलाकृती दिल्या “तनु वेड्स मनू, रांझना, गुड लक जेरी आणि तुंबाड यांसारख्या गाजलेल्या चित्रपटा ची पर्वणी त्यांनी प्रेक्षकांना दिली. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट ” फिर आयी हसीन दिलरुबा ” च शूट नुकतच पूर्ण झालं. यशस्वीरित्या शूट पूर्ण झाल्याची खास घोषणा त्यांनी सोशल मीडिया वर दिली. हा चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात दाखल झाला आहे.
निर्माते आनंद एल राय यांच्या घरी हे खास रॅप-अप सेलिब्रेशन दणक्यात झालं ज्यात चित्रपटाची कास्ट आणि क्रू सोबतीने त्यांचे जवळचे काही मित्र मंडळी उपस्थित होते.
हसीन दिलरुबा हा OTT मनोरंजनाच्या क्षेत्रात एक ट्रेलब्लेझर ठरला आणि सर्वाधिक पाहिलेला चित्रपट म्हणून सलग अनेक आठवडे आपला दबदबा कायम ठेवत त्याने आपल स्थान निर्माण केले. आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन ने OTT वर आपल्या कामाची जादू कायम दाखवली.
2024 मध्ये Netflix वर फिर आयी हसीन दिलरुबाच्या OTT रिलीजच्या घोषणेने या प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊस ने अजून वेगळी उंची गाठली आहे.
फिर आयी हसीन दिलरुबा व्यतिरिक्त, कलर यलो प्रॉडक्शन्स तेरे इश्क में आणि नखरेवाली असे अनेक रोमांचक प्रोजेक्ट करत आहेत.
