
मुंबई, 11 जून, 2024: स्वयम या ॲक्सेसिबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित अग्रगण्य संस्थेने 18 व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये दिव्यांगांना प्रवेश करण्यायोग्य सुलभता भागीदार म्हणून आपली भूमिका जाहीर केली आहे. MIFF च्या इतिहासात प्रथमच अशी युती झाली आहे, ज्याद्वारे दिव्यांगांना देखील या महोत्सवात पूर्णपणे सहभागी होता येणार आहे.
मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये 15 ते 21 जून दरम्यान मुंबई मध्ये सिनेमाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण आवाज आणि कथा सादर केल्या जातील. स्वयंमच्या या भागीदारीमुले या उत्सवाचा अनुभव सर्वांप्रयन्त पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे स्वयंमने या स्थळाचे दिव्यांगांना प्रवेश करण्यायोग्य सुलभता, सर्वसमावेशक प्रवेश ऑडिट केले आहे, त्यानंतर कर्मचारी, स्वयंसेवक आणि सहभागींसाठी विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली गेली आहेत. ही सत्रे ॲक्सेसिबिलिटी शिष्टाचार, शब्दावली आणि स्वागतार्ह वातावरण तयार करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करतील.
या भागीदारीबद्दल भाष्य करताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे महोत्सव संचालक आणि सहसचिव श्री. प्रितुल कुमार म्हणाले, “18व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी स्वयम आम्हांला ॲक्सेसिबिलिटी भागीदार म्हणून मिळाल्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. आमच्या इतिहासात प्रथमच, मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या महोत्सवाचे ठिकाण अपंग लोकांसाठी पूर्णपणे प्रवेशयोग्य असेल. ही भागीदारी महोत्सवाला अधिक सुंदर बनवेल आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक सहभागींना स्क्रीनिंग, मास्टरक्लास, पॅनल चर्चा आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची अनुमती मिळेल. स्वयमच्या ॲक्सेसिबिलिटी कौशल्याने अधिकाधिक लोकांना सिनेमाशी जोडण्यासाठी मदत होईल. NFDC मध्ये आम्ही यासाठी वचनबद्ध आहोत.
श्रीमती स्मिनू जिंदाल, स्वयंमच्या संस्थापक-अध्यक्षा म्हणाल्या, “ॲक्सेसिबिलिटी हा मूलभूत अधिकार आहे. सर्वांचे स्वागत करणारी जागा तयार करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. MIFF 2024 शी जोडल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये योगदान देण्यासाठी समर्पित आहोत जेणेकरून ते केवळ सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि मनोरंजक नाही तर सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी प्रवेशयोग्य देखील असेल.”
स्वयमच्या सहकार्याने मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024 चे उद्दिष्ट फिल्म फेस्टिव्हला अधिक समावेशक बनवणे, प्रत्येकासाठी समृद्ध आणि आनंददायक अनुभव प्रदान करणे आहे.
