पुण्यातील रसिकप्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाचा वर्षावात न्हाऊन निघालेला चॅम्पियन कार्तिक आर्यन कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाला, “कोटी कोटी धन्यवाद, पुणे!”

कार्तिकच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले आहे. या दरम्यान कार्तिक आर्यन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच पुण्यात आला होता.

अभिनेत्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, चाहते त्यांच्या चॅम्पियन- कार्तिक आर्यनला मॉलमध्ये प्रत्यक्ष बघून हरखून गेले होते. या युवा सुपरस्टारने मंचावर प्रवेश करताच, चाहत्यांचा आनंद व उत्साह शिगेला पोहोचला, त्याच्या नावाचा जयजयकार केला जात होता, शिट्ट्या वाजवत चाहते कार्तिकच्या नावाचा पुकारा करत होते. चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करीत, कार्तिकने आनंदाने चाहत्यांना त्याच्यासोबत फोटो काढू दिले. उत्साही चाहत्यांसोबत त्याने सेल्फी घेतले, त्याच्या सर्व चाहत्यांना कार्तिकने ऑटोग्राफ दिले, त्याच्या चाहत्या असलेल्या स्त्रीवर्गाकडून गुलाब स्वीकारले आणि त्यांच्याशी मराठीत संवाद साधून, त्यांना आश्चर्यचकित केले.

*स्वारस्यपूर्ण गोष्ट म्हणजे, कार्तिकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत एक कॅप्शन मराठीतही आहे, ज्यात त्याने मान्यता मिळवून देणारी ओळख प्रदान केल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, ते असे-

*”तुमचा चंदू चॅम्पियन एवढं प्रेम बघून खूप खूप खूष झाला!

कोटी कोटी धन्यवाद, पुणे ❤️❤️

ChanduChampion”

‘चंदू चॅम्पियन’ मधील त्याच्या अभिनयाबद्दल कार्तिकचे मोठे कौतुक होत आहे. या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. कार्तिकची अभूतपूर्व कामगिरी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे, प्रेक्षकांच्या भावनांना हात घालत आहे.

साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेला, ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप उमटणार आहे. या चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कार्तिक आर्यनने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले असून, चित्रपटाच्या यशात मुरलीकांत पेटकर यांची लक्षवेधी कथा आणि अभिनेत्याने जीव तोडून केलेली कामगिरी यांचा मोठा वाटा आहे.

Leave a comment