फ्युचर तयार आयोजित ग्रॅविटास परिषदेत अभिनेत्री – टेक स्टार्टअप संस्थपाक श्रद्धा मुसळे यांनी केला महिलांचा आवाज बुलंद 

मुंबई, ३१ ऑगस्ट :   ग्रॅविटास हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आजच्या स्पर्धात्मक जगात बऱ्याचदा स्वत:ला कमी लेखणाऱ्या किंवा दुर्लक्षित
महिलांचे स्थान उंचवणारी, महिलांचा आवाज बुलंद करून त्यांना समाजात आदर- सन्मान मिळवून देणारी ही एक चळवळ आहे “,असे प्रतिपादन अभिनेत्री आणि आता टेक उद्योजक झालेल्या श्रध्दा मुसळे यांनी येथे केले.

आपला हक्क आणि सन्मान मिळवण्यासाठी महिलांना नेहमीच समाजामध्ये झगडावे लागते. अशा समाजात महिलांना त्यांचे नेतृत्व आणि वैयक्तिक ओळख निर्माण करण्यासाठी विविध  साधनांनी सुसज्ज असे हक्काचे व्यासपीठच नव्हते किंवा त्याची गरज भासली नव्हती. पण फ्युचर तयारी या भारतातील आघाडीच्या फिनिशिंग स्कूलने ही महत्त्वाची गरज ओळखली. आणि शनिवारी मुंबईत ‘ग्रॅविटास’ परिषद आयोजित केली.या प्रकारच्या पहिल्या थेट परिवर्तन कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन उंचावून त्यांना सक्षम बनवणारा सर्वसमावेशक प्रतिमा परिवर्तन अनुभव देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ञ या निमित्ताने एकत्र आले होते.

अभिनेत्री आणि टेक उद्योजिका श्रद्धा मुसळे यांच्या नेतृत्वाखाली, ग्रॅविटास परिषदेत परमिता काटकर, आंतरराष्ट्रीय इमेज ट्रान्सफॉर्मेशन कोच परमिता काटकर, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओजस रजनी, गीतार्ष कौर, शिष्टाचार आणि ग्रूमिंग कोच गीतार्ष कौर, फॅशन सेलिब्रिटी फोटोग्राफर मुन्ना ठाकूर, सेलिब्रिटी स्टायलिस्ट मनोशी नाथ आणि ऋषी  शर्मा यांच्यासह उद्योगातील अव्वल व्यवसायिकांच्या  मार्गदर्शनाखाली परिवर्तन घडवणारी विविध सत्रे झाली.

पर्सनल स्टायलिंग, एटिक्वेट, मेकअप, बॉडी लँग्वेज आणि कॅमेरा प्रेझेंस यावरील विविध संवादात्मक  कार्यशाळांच्या माध्यमातून कृतीशील रणनीतीसह  सहभागी महिलांना त्यांची पहिली प्रतिमा तसेच त्यांचा वैयक्तिक ब्रँड उंचावण्यासाठी आणि नेतृत्वगूण  वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. एवढेच नाही तर या कार्यक्रमाने नेटवर्किंगच्या मौल्यवान संधी देखील उपलब्ध करून दिल्या ज्या माध्यमातून सहभागी महिलांनी उद्योग तज्ञ आणि यशाची शिखरे काबीज करणाऱ्या समविचारी महिलांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करताना श्रद्धा मुसळे पुढे म्हणाल्या, एक परिपूर्ण आणि व्यावसायिक म्हणून स्वतःला सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान देऊन महिलांना सज्ज करण्यासाठी फ्युचर टायरच्या ग्रॅविटासच्या माध्यमातून काळाची गरज असे काम झाले आहे. महिला व्यावसायिक जगात स्वतःला कसे सादर करतात हे पुन्हा परिभाषित करण्याच्या आमच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे आणि परिषदेत सहभागी झालेल्या महिला एका नवा आत्मविश्वास अंगी बाणत येथून बाहेर पडतील असा  मला विश्वास आहे.”

अंशा सय्यद (सीआयडी), जान्हवी छेडा (सीआयडी), सुहानी धनकी (पोरस), अश्लेषा सावंत (अनुपमा), मानिनी डे (क्रिश), परिणीता सेठ (वंशज) आणि वैष्णवी धनराज (ना आना, बेगुसराय) यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे आकर्षण आणखी वाढले आणि ग्रॅविटास खरोखरच संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरले. फ्यूचर तायरी यांच्या ग्रॅविटासच्या पहिल्या आवृत्तीचे यश आहे. महिला योग्य साधने आणि मार्गदर्शनाने काय साध्य करू शकतात याचे हे एक शक्तिशाली द्योतक आहे.

Leave a comment