जास्तीत जास्त मतदान करा: मतदानाचा दिवस केवळ सुट्टी म्हणून न पाहता सण म्हणून पाहा– नरिंदर सिंग बाली

SVEEP कडून महाराष्ट्र राज्य विधानसभा
२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा दिवस असून मुंबईतील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (SVEEP) ची सायकल रॅली. या सायकल रॅलीचे आयोजन मतदान करून लोकशाही साजरी करण्यासाठी करण्यात आले. मतदानाचा दिवस केवळ एक सुट्टी म्हणून न पाहता तो नागरी कर्तव्याचा सण म्हणून पाहा असा संदेश या सायकल रॅलीतून मुंबईकर नागरिकांना देण्यात आला. या सायकल रॅलीत २०० हून अधिक उत्साही मतदार सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच  महापालिका आयुक्त व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई भूषण गगराणी, निवडणूक निरीक्षक नरिंदरसिंग बाली, उपनगर व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सह महापालिका आयुक्त विश्वास शंकरवार आणि उपमहापालिका आयुक्त विश्वास मोटे, मनपा सहाय्यक उपायुक्त चक्रपाणी, मनीष वळंजू आणि वॉर्ड 165 अंधेरी पश्चिमचे उपजिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी  वैशाली परदेशी ठाकूर आदि यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीत मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

या सायकल रॅलीमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी श्रेयस तळपदे, पद्मिनी कोल्हापुरे, पर्यावरण आणि सामाजिक कामासाठी प्रख्यात वकील, मेक अर्थ ग्रीन अगेन (मेगा) फाऊंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर, अवादा फाऊंडेशनचे विनीत मित्तल यांनीही यावेळी मतदान करण्याची शपथ घेतली. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी आणि सायकल रॅलीला प्रेरक संदेश दिले. कार्यक्रमात बोलताना भूषण गगराणी म्हणाले, “मतदान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. आपल्या राज्याचे भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येक मतदाराने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करणे अत्यावश्यक आहे. चला एकत्र येऊन ही निवडणूक खऱ्या अर्थाने उत्सव बनवूया आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करूय़ा.” असेही गगराणी यावेळी म्हणाले.

“मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून नव्हे तर सण म्हणून पाहिला पाहिजे” अशी आठवण नरिंदर सिंग बाली यांनी यावेळी करून दिली. मतदान हा केवळ अधिकार नसून बदलाचे एक शक्तिशाली साधन आहे. हा संदेश आणखी सशक्त करण्यासाठी या रॅलीत प्रयत्न करण्यात आला आणि उपस्थितांनीही या आवाहनाला उत्सूर्फ प्रतिसाद दिला. समाजातील विविध नेते, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यातील व्यक्ती SVEEP मोहिमेच्या बॅनरखाली एकत्र येत असल्याने, ही रॅली मतदान हे कर्तव्य आणि उत्सव दोन्हीचे स्मरण करून देणारी होती.

Leave a comment