या वर्षी अनुपम खेर यांनी सिनेविश्वात ४० वर्षांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित विजय ६९ या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रचारादरम्यान त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा खास पद्धतीने साजरा केला.
चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीला एक स्ट्रगलिंग अभिनेता म्हणून त्यांच्या प्रवासातील संघर्षाच्या काळातल्या आठवणी जाग्या केल्या. या आठवणींच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील ६ ठिकाणांना भेट दिली, ज्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील टप्पे ठरले.
खेरवाडी, बांद्रा ईस्ट
“१९८१ मध्ये मी खेरवाडी, बांद्रा ईस्टमध्ये चार लोकांसोबत राहायला सुरुवात केली. हे माझ्या संघर्षाचं सुरुवातीचं ठिकाण होतं.”

शास्त्री नगर, सांताक्रूझ लिंकिंग रोड एक्सटेंशन
“१९८२-८३ दरम्यान मी शास्त्री नगरमध्ये चार लोकांसोबत राहत होतो. आम्ही जमिनीवर झोपायचो, आणि पंखाही नव्हता!”कासा मारिया, बांद्रा
“सेंट पॉल्स रोडवरील कासा मारिया हे मुंबईतलं माझं तिसरं घर होतं. याच दरम्यान मी सारांश (१९८४) करत होतो. इथे मी पहिल्या मजल्यावर राहत होतो.”
बाल गंधर्व रंग मंदिर, बांद्रा वेस्ट
“३ जून १९८१ रोजी मी मुंबईत आलो आणि इथे एका अभिनय शाळेत काम करू लागलो. पण नंतर समजलं की प्रत्यक्षात ती शाळा किंवा इमारत अस्तित्वातच नाही! आम्ही समुद्रकिनारी वर्ग घेत होतो.”
कालूमल इस्टेट, जुहू
“कालूमल इस्टेटमधील माझा बी२३ नंबरचा फ्लॅट, हा माझा पहिला वन बीएचके होता, जो मी विकत घेतला.”
पृथ्वी थिएटर, जुहू
“मुंबईत माझ्या करियरला सुरुवात पृथ्वी थिएटरमधून झाली. इथे सतीश कौशिक यांचा ‘उस पार का नज़ारा’ ह्या नाटकाचा प्रयोग केला, जो आर्थर मिलर यांच्या ‘अ व्यू फ्रॉम द ब्रिज’ वर आधारित होता. येथे मी किरणसोबत अनेक नाटकं केली.”
अनुपम खेर यांची ही कहाणी संघर्षाचा प्रवास कसा यशस्वी होऊ शकतो, याचं प्रेरणादायी उदाहरण आहे. विजय ६९ सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.
Link – https://www.instagram.com/p/DC-4F8mvJ0S/?img_index=5&igsh=dW1qbWxycXh4MWgw
कासा मारिया, बांद्रा