
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे!
स्वरदा ठिगळे – योगाची जिद्द आणि प्रवास

मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिचे वडील स्वतः योगतज्ज्ञ असल्यामुळे स्वरदालाही योगाची गोडी लागली.
सुरुवातीला स्विमिंग आणि योगा असं सत्र चालू असायचं. योगावरच्या याच प्रेमापोटी स्वरदाने म्हैसूर गाठलं आणि महिनाभर अष्टांग योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं.
योगाचे नवनवे प्रकार शिकण्याचा जणू स्वरदाला ध्यासच लागला होता. त्यामुळे तिने पुण्यातील एका संस्थेतून एरियल योग शिकण्याचा निर्णय घेतला.
होऊ दे धिंगाणाच्या मंचावर हटके सादरीकरण

होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग सादर करताना स्वरदाच्या मनात थोडं दडपण होतं. मात्र, होस्ट सिद्धार्थ जाधव आणि सहकलाकारांनी स्वरदाला जबरदस्त प्रोत्साहन दिलं, आणि तिने मंचावर अफलातून सादरीकरण केलं.
योगाने मिळालेली नवी दिशा
स्वरदाच्या आयुष्यात अभिनयासोबतच योगसाधनेलाही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही ती नियमित योगसाधनेसाठी वेळ काढते.
“योगसाधनेने तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे. प्रत्येकानेच ही कला आत्मसात करायला हवी” असं स्वरदाला वाटतं.
स्वरदाचा हटके अंदाज पाहायचा असेल तर…
स्वरदाचा हा हटके अंदाज पाहायचा असेल तर होऊ दे घिंगाणाचा हा खास एपिसोड नक्की पाहा!
📺 येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
