
संपूर्ण महाराष्ट्रात मनोरंजनाचा बाप म्हणून ओळखला जाणारा एकमेव मराठी नॉन-फिक्शन शो म्हणजे बिग बॉस मराठी ! जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला आणि संपूर्ण भारतात हुकुमत गाजवणारा हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या दमाने येतोय. बिग बॉस मराठी येत असल्याचं जाहीर झाल्यावर प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चांना उधाण आलं आहे.
पहिल्या पर्वापासून महाराष्ट्राला लागलं वेड !
या रिऍलिटी शोने पहिल्याच पर्वापासून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. मग तो बिग बॉसचा दमदार आवाज असो, घरातील छोटे-मोठे वाद असोत, नाट्यमय घडामोडी असोत किंवा अनोखे टास्क – बिग बॉस मराठी हा लोकांच्या दैनंदिन गप्पांमध्ये कायम चर्चेचा विषय राहिला आहे.
बिग बॉस मराठी सिझन ५ ने गाजवला टीआरपी खेळ
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने अपार लोकप्रियता मिळवली. हा सिझन सुरु होण्याआधी अनेक चर्चा रंगल्या होत्या –
स्पर्धक कोण असतील?
बिग बॉसचे घर यावेळी कसं असेल?
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न – सूत्रसंचालन कोण करणार?
रितेश देशमुख – बिग बॉस मराठीचा भाऊ!

कोणताही रिऍलिटी शो यशस्वी करण्यासाठी त्याचा सूत्रसंचालक हा महत्वाचा दुवा असतो. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील हा दुवा यंदाही हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या मागील सीझनमध्ये रितेशने सूत्रसंचालन करताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. त्याची लयभारी स्टाईल, विनोदबुद्धी, थेट प्रश्न विचारण्याची पद्धत आणि शोमध्ये टाकलेले भन्नाट ट्विस्ट यामुळे हा सिझन गाजला. ‘भाऊच्या धक्क्या’ने बिग बॉस मराठीच्या टीआरपीने उच्चांक गाठला होता.
रितेश पुन्हा घेऊन येतोय धमाका!
आता बिग बॉस मराठी पुन्हा सुरू होत आहे आणि सोबतच रितेश भाऊही परततोय! यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोणते सेलिब्रिटी यावेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार? कोणता नवा वाद रंगणार? कोणता सदस्य प्रेक्षकांची मने जिंकणार? आणि सगळ्यात महत्वाचं – भाऊचा धक्का यावेळी कोणाला बसणार?
हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी १० फेब्रुवारीपासून दररोज दु. ३ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
