
प्रसनजीत चॅटर्जी यांचे
बंगाली चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची अमिट छाप निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेता प्रसनजीत चॅटर्जी यांनी आता हिंदी टेलिव्हिजनमध्ये निर्माता म्हणून आपला नवा प्रवास सुरू केला आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ या नव्या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेचा पहिला हिंदी मालिका प्रोजेक्ट लाँच केला.
शानदार पत्रकार परिषदेत मालिकेची झलक
या मालिकेच्या शुभारंभासाठी मुंबईत एका भव्य पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मालिकेतील सर्व प्रमुख कलाकार या प्रसंगी उपस्थित होते. पत्रकार परिषद हसतखेळत, मजेदार संवाद आणि खेळांनी सजलेली होती.
भावनिक कथा आणि कौटुंबिक नात्यांची सरमिसळ

‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ ही मालिका म्हणजे भावनांची, नात्यांची आणि माणसांमधील गुंतागुंतीच्या संबंधांची कथा आहे. प्रसनजीत चॅटर्जी यांच्या मते, ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडेल आणि प्रत्येक घराच्या कथा सांगेल.
खेळांमधून रंगला शुभारंभ
पत्रकार परिषदेत प्रसनजीत दादा आणि मालिकेतील उदय वीर दादाजी यांच्यामधील ‘फूड गेसिंग’ खेळ विशेष रंगतदार ठरला. त्यांच्यातील ट्युनिंग आणि विनोदी शैलीने वातावरण हलकंफुलकं केलं. कलाकार उदय आणि कथा यांनी या खेळात सामील होत वातावरणात उत्साह आणला.
स्टार प्लसवर लवकरच प्रसारण
‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ ही मालिका लवकरच स्टार प्लसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नात्यांचे गोड-कडू रंग घेऊन येणारी ही मालिका तुमच्या संध्याकाळी नव्या अर्थाने उजळवेल, हे निश्चित!
