
चित्रपटगृहांऐवजी प्राइम व्हिडिओवर होणार रिलीज
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंगदेखील सुरू करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.
मेकर्सचा महत्त्वपूर्ण निर्णय
चित्रपटाच्या मेकर्सनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की ‘भूल चूक माफ’ हा सिनेमा चित्रपटगृहात न प्रदर्शित करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आता हा चित्रपट १६ मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

मॅडॉक फिल्म्स आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की, “अलीकडील घडामोडी आणि देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता आम्ही चित्रपटगृहांऐवजी ओटीटी मार्ग स्वीकारला आहे. जरी चित्रपटगृहातील अनुभवाची उत्सुकता होती, तरी राष्ट्राची भावना आमच्यासाठी सर्वोच्च आहे. जय हिंद.”
प्रेक्षकांचा ओटीटीवर अनुभव अधिक खास होणार
कौटुंबिक विनोदी मनोरंजन असलेल्या ‘भूल चूक माफ’ चित्रपटासाठी आता प्रेक्षकांना १६ मेपर्यंत थोडी वाट पाहावी लागणार असली, तरी हा चित्रपट घरबसल्या पाहण्याचा अनुभव निश्चितच खास ठरणार आहे.
