
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील लिजेंडरी शो पुन्हा परतणार?
टेलिव्हिजनपासून ओटीटीपर्यंत आपला मजबूत ठसा उमटवणाऱ्या एकता कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या आयकॉनिक शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात एक उत्सुकता वाढवणारा हिंट दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून त्यांनी या शोच्या पुनरागमनाची शक्यता सूचित केली आहे. बॅकग्राउंडला वाजणारे ते जुने संगीत आणि एकताचा हावभाव पाहता प्रेक्षकांमध्ये ताज्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
इंटरनॅशनल एम्मी आणि पद्मश्रीने सन्मानित निर्माती
एका बाजूला ‘क्योंकि सास…’च्या परतण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच दुसऱ्या बाजूला एकता कपूर यांना नुकताच इंटरनॅशनल एम्मी डायरेक्टोरेट अवॉर्ड मिळाला आहे. त्याचप्रमाणे, भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या कंटेंटच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
मध्य प्रदेश फिल्म टुरिझ्म पॉलिसी २०२५ चं उद्घाटन
WAVES समिट 2025 मध्ये एकता कपूर यांनी मध्य प्रदेश फिल्म टुरिझ्म पॉलिसी 2025 चे उद्घाटन करत त्या राज्यातील फिल्म इंडस्ट्रीसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या नैसर्गिक सौंदर्याचे, सांस्कृतिक वारशाचे आणि शूटिंग लोकेशन्सचे भरभरून कौतुक केले आणि राज्याला एक सशक्त फिल्म हब बनवण्यासाठी
