
भारतीय यंग आयकॉन अनुष्का सेन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शैली आणि आत्मविश्वासाने चर्चेत आली आहे. 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुष्काने सादर केलेला दुसरा लूक हा सौंदर्य, एलिगन्स आणि ग्लोबल स्टाईलचा परिपूर्ण मिलाफ ठरला आहे. पहिल्या दिवशीच्या मोहक रेड कार्पेट वॉकनंतर अनुष्काने काळ्या नेटच्या शीर ब्लाउजसह एंटिक ब्रॉन्झ वर्क आणि झगमगत्या एम्ब्रॉयडरीने सजलेला शाही पोशाख परिधान केला. त्यासोबत असलेला जड चंदेरी स्कर्ट तिच्या लूकला एक खास भारतीय पारंपरिकतेची झालर देत होता.
केवळ २२ वर्षांची असूनही जागतिक रेड कार्पेटवर आत्मविश्वासाने झळकणारी अनुष्का, आज केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर भारतीय युथ आयकॉन म्हणूनही नाव कमावत आहे. तिचा हा लूक फक्त स्टाईल स्टेटमेंट नव्हे, तर तिच्या कलेवरील निष्ठा, मेहनत आणि प्रेझेन्सचा परिपाक आहे.

अनुष्काने नुकत्याच ‘दिल दोस्ती डिलेमा’ आणि ‘किल दिल’ या ओटीटीवरील प्रोजेक्ट्समधून अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिच्याकडे सध्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यात लवकरच येणाऱ्या कोरियन चित्रपट ‘एशिया’ मधील मुख्य भूमिका आणि ‘क्रश’ या इंटरनॅशनल वेब सिरीजचा समावेश आहे. ‘क्रश’मध्ये अनुष्का साउथ कोरियन ऑलिंपिक पिस्टल शूटिंग स्टार किम ये-जी सोबत झळकणार असून, तिचा जागतिक प्रवास आता अधिक वेगवान आणि प्रभावी बनतोय.
अनुष्काचा हा लूक म्हणजे फक्त एक ड्रेसिंग स्टाईल नव्हे, तर एक सशक्त सांस्कृतिक प्रतिनिधित्व आहे – भारतीयतेचा आत्मा आणि ग्लोबल आत्मविश्वास यांचा अनोखा संगम.
