
आमिर खान यांचा बहुप्रतीक्षित आणि भावनिक चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ या कालातीत चित्रपटाचा हा स्पिरिचुअल सिक्वेल असून, यातील कथानक पुन्हा एकदा बालविश्वातील संघर्ष, उमेद आणि प्रेरणा मांडणार आहे. २० जून २०२५ रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘लोटस’च्या भूमिकेत आयुष भंसाली; आमिर खान प्रोडक्शन्सचा खास उल्लेख
या चित्रपटात आयुष भंसाली ‘लोटस’ ही भूमिका साकारत आहे, ज्याची उपस्थिती ट्रेलरमध्येच रसिकांच्या नजरेत भरली. आमिर खान प्रोडक्शन्सने आयुषचा एक खास व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे – “दूरून पाहिलं तेव्हा कमाल वाटलं, जवळून पाहिलं तेव्हा ‘कमााल’ होता.”
१० नवोदित कलाकारांची चमकदार टीम मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना
‘सितारे जमीन पर’मध्ये गुड्डू, सुनील, शर्मा जी, करीम, लोटस, बंटू, सतबीर, राजू, गोलू आणि हरगोविंद ही नावं असलेली मुलांची चमू त्यांच्या प्रशिक्षक गुलशन यांच्या मार्गदर्शनाखाली एका भावनिक आणि प्रेरणादायक प्रवासाला निघते.
चित्रपटात झळकणाऱ्या नव्या चेहऱ्यांमध्ये उत्सुकता
आयुष भंसालीसह या चित्रपटात झळकणारे नवोदित कलाकार म्हणजे अरुष दत्ता, गोपीकृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. प्रत्येक पात्र या कथेला एक नवा पैलू देतं आणि मुलांच्या जगातली वास्तवाशी झुंज अधोरेखित करतं.
दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांचं; सामाजिक भान असलेली मांडणी
चित्रपटाचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केलं आहे, जे ‘शुभ मंगल सावधान’ या सामाजिक आशय असलेल्या यशस्वी चित्रपटामुळे ओळखले जातात. आता ते आमिर खान प्रोडक्शन्सच्या माध्यमातून या भावनिक कथेला चित्ररूप देत आहेत.
प्रमुख भूमिकेत आमिर खान आणि जेनेलिया देशमुख
या चित्रपटात **
