
टेलिव्हिजन विश्वातील सर्वोच्च स्थान पटकावलेली आणि लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनी एंटरटेनमेंट वरील लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते है’- नया सीजन सध्या एका उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. प्रेक्षकांना भाग्यश्री आणि ऋषभ यांच्यातील अनोखी केमिस्ट्री भावून गेली असून त्यांचं नातं आता एका नाजूक वळणावर येऊन ठेपलं आहे.
या आठवड्यात मालिकेतील कथानकात अचानक असा ट्विस्ट आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऋषभ सतत भाग्यश्रीच्या पाठीशी का उभा आहे?, तो तिची खरंच मदत का करतोय? त्याच्या मनात खरंच प्रेम आहे की तो काही सूड घेण्यासाठी हे सगळं करतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार असून ही कथा अजून वेगळं वळण घेणार आहे हा या कडे रसिकांचे लक्ष लागून आहे.

‘बडे अच्छे लगते हैं’ नया सीजन ही मालिका आपल्या दररोजच्या भागांतून नात्यांतील गुंतागुंत, भावनांची खोल रचना, आणि व्यक्तीमत्त्वांच्या छुप्या बाजूंना प्रभावीपणे उलगडत आहे. या आठवड्यात कथानक अधिकच रंगतदार बनणार असून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
