अनुराग कश्यप यांचा “निशानची” चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

ट्रेलर लाँचसह सुरू होणार सिनेमॅटिक धमाका
अनुराग कश्यप आणि अ‍ॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया यांच्या “निशानची” चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमुळे खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक धमाका सुरू होणार असून, आधीच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. दमदार डायलॉग्स, अ‍ॅक्शन आणि ड्रामाने भरलेला हा ट्रेलर मसाला एंटरटेनरची खरी झलक देणार आहे.

ऐश्वर्य ठाकरेची दुहेरी भूमिका आकर्षणाचा केंद्रबिंदू
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत डेब्यूटंट ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. तर वेदिका पिंटो, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्यासारखे दमदार कलाकार कथेला अधिक ताकद आणि खोलपणा देणार आहेत. फ्रेश कास्टिंग आणि दमदार अभिनयामुळे “निशानची”ला आधीपासूनच विशेष ओळख मिळाली आहे.

गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित रॉ आणि एनर्जेटिक कथा
“निशानची” ही दोन भावांच्या गुंतागुंतीच्या कहाणीवर आधारित आहे. वेगवेगळ्या वाटा निवडलेले हे दोन भाऊ आपल्या निर्णयांमुळे नशिब घडवतात. गावाच्या पार्श्वभूमीवर उभी असलेली ही कथा रॉ, एनर्जेटिक आणि देसी फ्लेवरने भरलेली आहे, जी फक्त थिएटरमधील अनुभवातूनच खरी खुलून दिसणार आहे.

अनुराग कश्यपची दमदार स्टोरीटेलिंग शैली
दिग्दर्शक अनुराग कश्यप हे त्यांच्या बोल्ड आणि प्रभावी स्टोरीटेलिंगसाठी ओळखले जातात. “निशानची”चं कथालेखन प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी एकत्र केलं आहे. प्रेक्षकांना यात अ‍ॅक्शन, ह्यूमर आणि ड्रामाचा अफलातून मिलाफ पाहायला मिळणार आहे.

१९ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार “निशानची”
अजय राय आणि रंजन सिंग यांच्या “जार पिक्चर्स” या प्रोडक्शन हाउसच्या बॅनरखाली, “फ्लिप फिल्म्स”सोबतच्या असोसिएशनमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. उत्सुकता वाढवणारा हा मसाला एंटरटेनर येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment