उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

शोध… भीती…  काळजी…  वेदना…  अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक ‘गूगल आई’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.… Read More उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने  नात्यांचे  बंध जपत  उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी… Read More ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार

आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीझ झालाय. ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे कोणकोणत्या वळणावर जातं याची हिंट हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला येते.… Read More गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा

ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, चित्रपटनिर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धहस्त लेखक अनिल कालेलकर यांनी वडिलांचा कलेचा वारसा पुढे चालवला. हाच वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी मधुसूदन कालेलकर यांची पुढची पिढी आता सज्ज झाली आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे… Read More मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सची घोषणा

मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

बहुचर्चित “ये रे ये रे पैसा ३” या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य… Read More मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

धर्मवीर – २” चित्रपटाचा पहिला दमदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च

क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या  “धर्मवीर -२” या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने  ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे.  “धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी… Read More धर्मवीर – २” चित्रपटाचा पहिला दमदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च

डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा ट्रेलर हरिनामाच्या गजरात प्रदर्शित

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ दर्शन करण्यात आलं आहे.  ‘डंका…हरिनामाचा’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. या चित्रपटातून भक्तांच त्यांच विठ्ठलाप्रती असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे. रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…… Read More डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा ट्रेलर हरिनामाच्या गजरात प्रदर्शित

सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत. संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य… Read More सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण