गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचं मोठ्या उत्साहानं, जल्लोषात आणि आत्मीयतेनं पालन केलं जातं. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. ‘नाद – द हार्ड लव्ह’  या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज… Read More गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘नाद – द हार्ड लव्ह’चा फर्स्ट लूक प्रदर्शित…

मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..

वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय  पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून  करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा” २०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या   बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती,… Read More मुखवट्यांचा “बोहाडा” येतोय प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला..

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आज या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि… Read More गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर

आशा भोसले यांनी सांगितल्या बाबुजींच्या आठवणी

मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या १ मे रोजी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या… Read More आशा भोसले यांनी सांगितल्या बाबुजींच्या आठवणी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणाचा, बलिदानाचा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातली शिवप्रेमी,धर्मप्रेमी, शंभूप्रेमी जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळा मध्ये दिडशे लढाया यशस्वीरित्या जिंकल्या. थोरल्या महाराजांच्या महानिर्वाणानंतर दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांचे स्वरूप म्हणजे ईश्वर स्वरूपच आहे. ‘यदा यदाही धर्मस्य’ पद्धतीने धर्मरक्षणाची जबाबदारी… Read More छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया

नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला  ‘चिरायू’

‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही.  नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरजंनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दणक्यात साजरं केलं जातं. यंदाही गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. ‘चिरायू २०२४’ साठी… Read More नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला  ‘चिरायू’

गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज..

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे, वैष्णवी जोशी चमकले आहेत.    सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष… Read More गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज..

आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘मायलेक’ या नावावरूनच हा मराठी चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असेल. रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय.  या ट्रेलर लाँच सोहळ्याला हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवणारी  आदी मान्यवर उपस्थित… Read More आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’ जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला