प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ ह्या मालिकेमध्ये सध्या अंजली प्रितमच्या लग्नाची तयारी सुरु आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून आपण अंजली प्रितमची घट्ट मैत्री बघत आलो आहोत. अखेर अंजलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार, प्रितमच्या स्वरूपात मिळणार आहे. एकेकाळी मैत्रीचे प्रतीक असलेले प्रितम आणि अंजली आता एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत. प्रितांजलीच्या मेहंदी, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नासाठी घरातले तर उत्सुक आहेतच… Read More प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ

सुरांच्या महामंचावर रंगणार रेडिओ जॉकीं बरोबर मैफल…

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या पर्वात खूप काही नवीन पाहायला मिळतं. गाण्यांबरोबरच नवीन कन्सेप्ट्सचे एपिसोड ही अनुभवायला मिळत आहेत. या आठवड्यात RJ स्पेशल हा विशेष भाग घेऊन आले आहे. या अत्यंत अद्वितीय भागात रेड एफएम, रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी, आणि बिग एफएम… Read More सुरांच्या महामंचावर रंगणार रेडिओ जॉकीं बरोबर मैफल…

बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया… Read More बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

कोकण चित्रपट महोत्सव’ ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान रंगणार

कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या… Read More कोकण चित्रपट महोत्सव’ ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान रंगणार

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असताना चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस… Read More मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

हार्दिक जोशी यांचा “क्लब 52″चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता हार्दिक जोशीची ॲक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून, हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा… Read More हार्दिक जोशी यांचा “क्लब 52″चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

ऋतुजा बागवे बनली भारुडकार

महाराष्ट्रात आजही अनेक कुप्रथा आहेत, ज्या स्त्रियांवर अन्याय करतात. ज्यात अनेकांच्या आयुष्याची, स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी होते. या सगळ्याविरुद्ध आवाज उठवणारा मराठी चित्रपट ‘सोंग्या’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १५ डिसेंबरला ‘सोंग्या’ राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. समाजातील अन्यायविरुद्ध ठामपणे उभ्या राहणाऱ्या एका जिद्दी तरुणीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘सोंग्या’ चित्रपटात साकारली आहे. चित्रपटात एका भारुडाच्या… Read More ऋतुजा बागवे बनली भारुडकार

शतक महोत्सवी नाट्यसंमेलन महाराष्ट्रभर संपन्न होणार

शंभरावे नाट्यसंमेलन महाराष्ट्रात विविध ठिकाणी संपन्न होणार आहे या संमेलनाचा उद्घाटन सोहळा ५ जानेवारीला होणार असून मे महिन्यात याची सांगता करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ‘प्रशांत दामले’ यांनी केली शंभराव्या नाट्यसंमेलनाची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशांत दामले यांच्यासोबत नाट्य संमेलनाचे मुख्य निमंत्रण… Read More शतक महोत्सवी नाट्यसंमेलन महाराष्ट्रभर संपन्न होणार