२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत. यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने,… Read More २६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज!

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे. या टीझरमध्ये सिद्धार्थचा… Read More मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज!

प्रत्येकाची आई अशीच असते का?’ ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष

सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि खोडकर श्याम व त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच्या आईच्या संस्कारांमध्ये कसे घडले याचं अगदी मार्मिक चित्रण केल्याचा उत्तम दाखला मिळाला. खोडकर श्याम ते आदर्श साने गुरुजी बनण्यापर्यंतचा हा प्रवास अनुभवणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की.… Read More प्रत्येकाची आई अशीच असते का?’ ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.   प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत… Read More ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’

आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा आहेत त्या जशा चांगल्या आहेत तशाच काही कुप्रथाही आहेतच. ज्या स्त्रियांवर अन्याय करतात केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यात भरडल्या जातात. मुलींची स्वप्न धुळीला मिळतात. अशाच एका कुप्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक नवा संघर्ष. या संघर्षातून तिचं… Read More स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’

‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणारी ‘कांड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी,शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी… Read More ‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणारी ‘कांड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं… Read More अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

लंडन मिसळ, ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…

ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी… Read More लंडन मिसळ, ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…