तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !

तेजश्री प्रधानची खास आठवण ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले. “आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो. या वर्षी माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. माझ्या जन्मापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत… Read More तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा एक विशेष टप्पा असून, या चित्रपटाबाबतची उत्सुकता… Read More श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या आणि सिनेसृष्टीच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘कढीपत्ता’ हा आगामी मराठी चित्रपट आता आणखी चर्चेत आला आहे. नव्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची नायिका रिद्धी कुमार असल्याचे उघड झाले असून, ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची नवी जोडी युवान प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी… Read More ‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. मानवी नात्यांचा हृदयस्पर्शी प्रवास सामान्य कुटुंबातील एका बापाची आणि त्याच्या मुलीच्या नात्यावर… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक कथांना नेहमीच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अगदी तशीच रुचकर मेजवानी घेऊन ‘वडापाव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या धमाल टीझरवरून हा सिनेमा एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असल्याचं स्पष्ट होतंय. प्रसाद ओक यांच्या अभिनयाची शतकपूर्ती हा चित्रपट विशेष ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रसाद ओक यांच्या अभिनय… Read More ‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

सुप्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेची मालिकाविश्वात दमदार एण्ट्री

सिनेमे आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे आता छोट्या पडद्यावर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवरील ‘नशिबवान’ या मालिकेतून तो पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेत दिसणार असून, रुद्रप्रताप घोरपडेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रुद्रप्रताप घोरपडेची व्यक्तिरेखा रुद्रप्रताप हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा आहे. दिसायला रुबाबदार, जणू… Read More सुप्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेची मालिकाविश्वात दमदार एण्ट्री

‘समर्थयोगी’ चित्रपटाचा वसईत भव्य मुहूर्त सोहळा

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न झाला. स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचा मुहूर्त मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला स्वामी समर्थ आणि रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद लाभावेत, अशी भावना… Read More ‘समर्थयोगी’ चित्रपटाचा वसईत भव्य मुहूर्त सोहळा

‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय

महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागरण गोंधळाला विशेष स्थान आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रथेनं जपल्या जाणाऱ्या या परंपरेला आता सिनेमॅटिक रुप मिळालं आहे. ‘आरपार’ या चर्चेत असलेल्या चित्रपटातील ‘जागरण गोंधळ’ हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ललित प्रभाकरचा हटके लूक आणि जबरदस्त एनर्जी या गाण्यात ललित प्रभाकरचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर आला… Read More ‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय