‘एकम’ या नव्या घरातला पहिला गुढीपाडवा… अमृतासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण

नेहमीच अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, दमदार उपस्थिती आणि भावनांचा सखोल आविष्कार करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर यंदाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी एका विशेष भावनिक अनुभवातून जात आहे. कारण, ‘एकम’ या तिच्या स्वप्नवत नव्या घरातला हा पहिलाच गुढीपाडवा, आणि त्यामुळे तो तिच्यासाठी एक वेगळंच स्थान बाळगून आहे. गुढीपाडवा — एक सण, अनेक आठवणी अमृता सांगते, “गुढीपाडवा हा सण… Read More ‘एकम’ या नव्या घरातला पहिला गुढीपाडवा… अमृतासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण

सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मोहक आणि जीवंत चित्रांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘सजना’ हा एक रोमँटिक सिनेमा असून, तो २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रकलेइतकाच मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’चा टिझर आणि पोस्टर ‘सजना’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं पाण्यात रोमँटिक… Read More सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश

कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार ‘चिरायू २०२५’ सोहळा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या उपक्रमाचं हे १८ वे वर्ष असून, ९०च्या दशकात ज्येष्ठ कलाकारांनी सुरू केलेल्या या परंपरेला लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलार यांनी नवसंजीवनी दिली. २००६ पासून सुरू झालेल्या ‘चिरायू’ या उपक्रमाला प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय… Read More कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार ‘चिरायू २०२५’ सोहळा

‘देवमाणूस’च्या निमित्ताने अभिनेत्री नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण

लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या नेहाने ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे. लेखन प्रवासाची सुरुवात याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहासाठी ‘देवमाणूस’ हा मराठी… Read More ‘देवमाणूस’च्या निमित्ताने अभिनेत्री नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण

गुलकंद’ मधील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’ मधील ‘चंचल’ हे गोड प्रेमगीत काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. आता ‘चल जाऊ डेटवर’ हे चित्रपटातील दुसरं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गंमतीदार गाण्याचे खास आकर्षण ‘चल जाऊ डेटवर’ हे गाणं वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या जोशपूर्ण आवाजात स्वरबद्ध झालं… Read More गुलकंद’ मधील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटातील कलाकारांबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. अखेर या चित्रपटातील तिघा कलाकारांची नावं समोर आली आहेत – आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश). मात्र, चित्रपटातील आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे, त्यामुळे… Read More ‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!

निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी,‘बंजारा’चा टीझर प्रदर्शित

मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडणारा ‘बंजारा’ हा मराठी चित्रपट १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या उत्कंठेत भर घातली आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रपट सिक्कीममध्ये चित्रित सिक्कीमच्या १४,००० फूट उंच पर्वतरांगांमध्ये चित्रीत झालेला ‘बंजारा’ हा मराठीतील पहिलाच चित्रपट… Read More निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी,‘बंजारा’चा टीझर प्रदर्शित

‘सुशीला–सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने नववर्षाचे अनोखे स्वागत

“सुशीला–सुजीत” या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नववर्षाच्या पूर्वपूर्व संध्येला पारंपरिक गुढी उभारून, मराठी चित्रपटसृष्टीला यश, भरभराट आणि नवनवीन प्रयोगांचे वर्ष लाभो अशी प्रार्थना केली. चित्रपटाच्या यशासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या शुभेच्छा राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी ‘सुशीला–सुजीत’ चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट फक्त यशस्वी ठरावा एवढंच नाही तर इतरांना स्फूर्ती देणारा… Read More ‘सुशीला–सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने नववर्षाचे अनोखे स्वागत