मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका- ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ अखेर टीव्हीवर प्रसारित झाली आहे. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी अदिती त्रिपाठी (दीपिका) आणि अक्षित सुखिजा (चिराग) यांचा एक रोमांचक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या ‘प्रोमो’त प्रेक्षकांना दीपिकाच्या वेदना आणि तिला तिच्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीकडून मिळणारी वाईट वागणूक बघायला मिळते. दीपिकाच्या अंधाऱ्या आयुष्यात चिरागमुळे प्रकाशाची… Read More मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा

वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा भाग बनणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे

बॉलीवुडची उभरती स्टार शर्वरी, आलिया भट्टसोबत काम करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे. आलिया भट्ट, जी आदित्य चोपड़ा निर्मित  वायआरएफ स्पाई यूनिवर्स मधील पहिली फीमेल लीड असलेली चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे, त्यात शर्वरी सुपर-एजेंटची भूमिका निभावत आहे. शर्वरी या विशाल स्पाई युनिव्हर्सचा भाग बनून अभिभूत आहे, ज्यामध्ये भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या… Read More वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा भाग बनणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे

अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी २ ऑगस्टला पडद्यावर दिसणार

डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा ‘लाईफलाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर,… Read More अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी २ ऑगस्टला पडद्यावर दिसणार

धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..

‘कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे… Read More धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..

डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र

अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची  ताकद असणारे  ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी  जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी  रंगभूमीवर सक्रिय असणारे हे  दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या  चित्रपटात दिसणार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि… Read More डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र

उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

शोध… भीती…  काळजी…  वेदना…  अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक ‘गूगल आई’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.… Read More उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने  नात्यांचे  बंध जपत  उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी… Read More ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

बॉलीवूड स्टार सोनम कपूर लंडनमध्ये विम्बल्डन महिलांच अंतिम फेरीतील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार।

वैश्विक फॅशन आयकन आणि बॉलीवुड स्टार सोनम कपूर 2024 च्या विम्बलडन महिलांच्या अंतिम सामन्यात चमकदार उपस्थिती साठी  सज्ज आहे. ऐतिहासिक ऑल इंग्लंड क्लबमध्ये या वर्षाच्या इव्हेंटमध्ये सोनमची उपस्थिती या प्रतिष्ठित स्थळाला अधिक ग्लॅमर देणार आहे, जे महान टेनिस सामन्यांचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विम्बलडन चॅम्पियनशिप, जी 1877 मध्ये स्थापन झाली, ही जगातील सर्वात जुनी आणि… Read More बॉलीवूड स्टार सोनम कपूर लंडनमध्ये विम्बल्डन महिलांच अंतिम फेरीतील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार।