
-
Rohan Bopanna’s Rajasthan Rangers and Vishnu Vardhan’s Hyderabad Strikers top the table after day one in TPL 6

Mumbai, December 3, 2024: The opening day of the Tennis Premier League (TPL) Season 6 served up a series of delicious and well-contested games at the Cricket Club of India in Mumbai, with the likes of Rohan Bopanna putting on quite a show for the fans. The matches took place on a charcoal-colored court and saw all eight teams being a part of the action on Tuesday.
The Rajasthan Rangers, Hyderabad Strikers, Yash Mumbai Eagles, and Chennai Smashers came away with resounding wins at the end of a high-octane day of tennis.
Rajasthan Rangers and Gujarat Panthers got the action underway in the first match of the season, with Christina Dinu taking on Ekaterina Kazionova in the Women’s Singles category. Christina Dinu prevailed with a scoreline of 14-11 in a tightly contested first game. Arthur Fery of the Rajasthan Rangers got the better of Gujarat Panthers’ Sumit Nagal with the same scoreline (14-11) in the Men’s Singles.
Rajasthan Rangers continued their winning run in the Mixed Doubles category, courtesy Rohan Bopanna and Christina Dinu defeating Vijay Sundar Prashanth and Ekaterina Kazionova with a scoreline of 14-11. In the Men’s Doubles category, the pair of Rohan Bopanna and Arthur Fery emerged victorious against Sumit Nagal and Vijay Sundar Prashanth with the scoreline reading 15-10, helping the Rajasthan Rangers win the game 57-43.
Hyderabad Strikers and Bengal Wizards headlined the second match on day one. Harriet Dart and Kamilla Rakhimova got things underway, with the former winning 18-7 in the Women’s Singles category. In the Men’s Singles category, Benjamin Lock overcame a tough contest against Niki Poonacha with a scoreline of 16-9.
The Mixed Doubles category saw Harriet Dart and Vishnu Vinod go up against Kamilla Rakhimova and Sriram Balaji. Bengal Wizards clinched a thrilling encounter with the score at 13-12. Despite Niki Poonacha and Sriram Balaji getting the better of Benjamin Lock and Vishnu Vinod with the score at 14-11 in the Men’s Doubles category, Hyderabad Strikers won the match 57-43.
The third match of the day saw Punjab Patriots and Yash Mumbai Eagles go head-to-head. Elina Avanesyan won a nail-biting contest against Zeynep Sonmez with a scoreline of 13-12 in the Women’s Singles. In the Men’s Singles, Karan Singh of Yash Mumbai Eagles dominated against Mukund Sasikumar of Punjab Patriots with the score reading 18-7.
Saketh Myneni and Elina Avanesyan of the Punjab Patriots came out on top against Jeevan Neduncheziyan and Zeynep Sonmez, winning 13-12 in a hard-fought game in the Mixed Doubles category. In another close contest in the Men’s Doubles category, Saketh Myneni and Mukund Sasikumar faced Jeevan Neduncheziyan and Karan Singh. The Yash Mumbai Eagles duo won the game 13-12, sealing the match with the scoreline of 55-45.
In the final match of the day, Bengaluru SG Pipers and Chennai Smashers took center stage. Chennai Smashers’ Conny Perrin won her Women’s Singles game against Gabriela Knutson of the Bengaluru SG Pipers with the scoreline of 13-12. It was another closely fought encounter in the Men’s Singles, where Hugo Gaston triumphed against Bernabe Zapata by a scoreline of 13-12.
Chennai Smashers continued their domination as the pair of Conny Perrin and Rithvik Choudary Bollipalli cruised to a 17-8 victory against Anirudh Chandrasekar and Gabriela Knutson. In the final game of the day, Bengaluru SG Pipers got the win in the Men’s doubles category. Anirudh Chandrasekar and Bernabe Zapata clinched a 14-11 win against Rithvik Choudary Bollipalli and Hugo Gaston. However, the Chennai Smashers still ended up winning the match with a scoreline of 54-46.
After an exciting day of action on day one, Hyderabad Strikers and Rajasthan Rangers are on top of the table with 57 points each. Yash Mumbai Eagles are in third place with 55 points, while Chennai Smashers are right behind in fourth place with 54 points. Followed by them are the Bengaluru SG Pipers and Punjab Patriots tied on 45 points. To complete the league standings, it was Bengal Wizards and Gujarat Panthers with 43 points each.
-
आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘क्षण प्रेमाचे..गोड गुलाबी आठवणींचे’…असं म्हणत या चित्रपटाचे रोमँटिक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
असं म्हणतात, ‘पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही,’ प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘इलू इलू’ हा चित्रपट प्रत्येकाला नक्कीच नॉस्टॅलजिक करेल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके व्यक्त करतात.
वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात असून हॉलीवूड आणि बॉलीवूड गाजवलेला एक लक्षवेधी चेहरा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चेहरा नेमका कोणाचा? याचा उलगडा लवकरच होणार आहे.
‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत. -
Sahiba Bali escapes to Maldives to celebrate her birthday

Actor and content creator Sahiba Bali, admired for her charismatic charm and inspiring journey in movies like Laila Majnu, Amar Singh Chamkila, alongside singer and actor Diljit Dosanjh, and shows like Shark Tank, is celebrating her birthday in the stunning beaches of Maldives.

Ahead of the big release of her new show Taanav 2, Sahiba is embracing the essence of work-life balance, celebrating her special day with close friends and loved ones. Her Instagram stories capture her dancing to Bollywood beats, indulging in delectable cuisines, and basking in the sun by the Indian Ocean.

An avid traveler, Sahiba often speaks about her passion for exploring new destinations, in her recent interview, she opened up about her love for travel and how she seizes every opportunity to explore.
Catch Sahiba’s dreamy getaway on Instagram for a dose of travel inspiration and a lesson in balancing life with grace and style -
सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.
झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र

‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’ -
Tollywood’s Queen Seerat Kapoor All Set to Bring Timeless Elegance At The Runway As Showstopper For Hyderabad Times Fashion Week

Celebrities are renowned for their considerable impact on fashion trends in India and beyond and their acting abilities. Their fashion choices frequently influence the business and millions of fans by setting the standard. Tollywood queen Seerat Kapoor remains one of the best actresses in the business because of her exceptional performances and unrivaled sense of style. She has always walked ramps for various celebrity designers for social causes and now once again she is all set to walk for one of the elite fashion shows as the show stopper. Seerat is gearing up to shine at the esteemed Hyderabad Times Fashion Week
Seerat Kapoor is known to amaze the audience with her charm and now she is all set to grace the runway at one of Hyderabad’s most anticipated fashion gatherings. The Fashion show will showcase the beauty of timeless elegance. This would also showcase the exclusive opportunity to explore Vasthralekha’s newest collection, a stunning line combining classic craftsmanship and contemporary styles. Seerat will work closely with the designers to create a look showcasing her flair while aligning with the event’s theme and designer’s vision.
Seerat Kapoor’s fashion sense is undoubtedly remarkable, reflecting a balance between elegance and bold choices. She has a knack for blending contemporary styles with traditional elements, making her stand out in every appearance. Her runway appearance at Hyderabad Times Fashion Week is set to be the season’s main event. Fans and style enthusiasts can look forward to an enchanting display of fashion and elegance, led by the Tollywood star herself.
-
‘जगण्याचा योग संघर्षांमध्ये आहे!’ : अनुपम खेर यांनी मुंबईतील त्या ६ जागांना दिली भेट ज्या त्यांच्या आयुष्याला आणि अभिनय प्रवासाला आकार देणाऱ्या ठरल्या

या वर्षी अनुपम खेर यांनी सिनेविश्वात ४० वर्षांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित विजय ६९ या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रचारादरम्यान त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा खास पद्धतीने साजरा केला.
चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीला एक स्ट्रगलिंग अभिनेता म्हणून त्यांच्या प्रवासातील संघर्षाच्या काळातल्या आठवणी जाग्या केल्या. या आठवणींच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील ६ ठिकाणांना भेट दिली, ज्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील टप्पे ठरले.
खेरवाडी, बांद्रा ईस्ट
“१९८१ मध्ये मी खेरवाडी, बांद्रा ईस्टमध्ये चार लोकांसोबत राहायला सुरुवात केली. हे माझ्या संघर्षाचं सुरुवातीचं ठिकाण होतं.”
शास्त्री नगर, सांताक्रूझ लिंकिंग रोड एक्सटेंशन
“१९८२-८३ दरम्यान मी शास्त्री नगरमध्ये चार लोकांसोबत राहत होतो. आम्ही जमिनीवर झोपायचो, आणि पंखाही नव्हता!”कासा मारिया, बांद्रा
“सेंट पॉल्स रोडवरील कासा मारिया हे मुंबईतलं माझं तिसरं घर होतं. याच दरम्यान मी सारांश (१९८४) करत होतो. इथे मी पहिल्या मजल्यावर राहत होतो.”
बाल गंधर्व रंग मंदिर, बांद्रा वेस्ट
“३ जून १९८१ रोजी मी मुंबईत आलो आणि इथे एका अभिनय शाळेत काम करू लागलो. पण नंतर समजलं की प्रत्यक्षात ती शाळा किंवा इमारत अस्तित्वातच नाही! आम्ही समुद्रकिनारी वर्ग घेत होतो.”
कालूमल इस्टेट, जुहू
“कालूमल इस्टेटमधील माझा बी२३ नंबरचा फ्लॅट, हा माझा पहिला वन बीएचके होता, जो मी विकत घेतला.”
पृथ्वी थिएटर, जुहू
“मुंबईत माझ्या करियरला सुरुवात पृथ्वी थिएटरमधून झाली. इथे सतीश कौशिक यांचा ‘उस पार का नज़ारा’ ह्या नाटकाचा प्रयोग केला, जो आर्थर मिलर यांच्या ‘अ व्यू फ्रॉम द ब्रिज’ वर आधारित होता. येथे मी किरणसोबत अनेक नाटकं केली.”
अनुपम खेर यांची ही कहाणी संघर्षाचा प्रवास कसा यशस्वी होऊ शकतो, याचं प्रेरणादायी उदाहरण आहे. विजय ६९ सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.
Link – https://www.instagram.com/p/DC-4F8mvJ0S/?img_index=5&igsh=dW1qbWxycXh4MWgwकासा मारिया, बांद्रा
“सेंट पॉल्स रोडवरील कासा मारिया हे मुंबईतलं माझं तिसरं घर होतं. याच दरम्यान मी सारांश (१९८४) करत होतो. इथे मी पहिल्या मजल्यावर राहत होतो.”
बाल गंधर्व रंग मंदिर, बांद्रा वेस्ट
“३ जून १९८१ रोजी मी मुंबईत आलो आणि इथे एका अभिनय शाळेत काम करू लागलो. पण नंतर समजलं की प्रत्यक्षात ती शाळा किंवा इमारत अस्तित्वातच नाही! आम्ही समुद्रकिनारी वर्ग घेत होतो.”
कालूमल इस्टेट, जुहू
“कालूमल इस्टेटमधील माझा बी२३ नंबरचा फ्लॅट, हा माझा पहिला वन बीएचके होता, जो मी विकत घेतला.”
पृथ्वी थिएटर, जुहू
“मुंबईत माझ्या करियरला सुरुवात पृथ्वी थिएटरमधून झाली. इथे सतीश कौशिक यांचा ‘उस पार का नज़ारा’ ह्या नाटकाचा प्रयोग केला, जो आर्थर मिलर यांच्या ‘अ व्यू फ्रॉम द ब्रिज’ वर आधारित होता. येथे मी किरणसोबत अनेक नाटकं केली.”
अनुपम खेर यांची ही कहाणी संघर्षाचा प्रवास कसा यशस्वी होऊ शकतो, याचं प्रेरणादायी उदाहरण आहे. विजय ६९ सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. -
चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. मोरया प्रॉडक्शन्स, भूमिका थिएटर्स, अथर्व थिएटर्स निर्मित, जाई काजळ प्रस्तुत ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसतील. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे.
१४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग
स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य हे विषय या कथेच्या केंद्रस्थानी असून ते प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.
‘पुरुष’ हे नाटक परत रंगभूमीवर आणण्याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ” आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषा ज्या असंख्य साहित्यिकांनी समृद्ध केली. त्यातील एक अजरामर नाव म्हणजे नाटककार जयवंत दळवी. आजवर त्यांनी विविध विषयावर नाटकं, कथा कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकीच एक ८० च्या दशकातील अतिशय गाजलेलं नाटक ‘पुरुष’. आज त्या नाटकाला ४० वर्षे उलटून गेली असून तेच नाटक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा रंगमंचावर आणत आहोत. या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे ही सुंदर कलाकृती आम्ही नाट्यप्रेमींसमोर घेऊन येण्यासाठी प्रचंड आतुर आहोत. हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजही समाजात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि ही स्थिती मला कायमच अस्वस्थ करते. हीच विचारसरणी बदलण्यासाठी आम्ही हे नाटक घेऊन आलो आहोत. ‘पुरुष’मध्ये केवळ सामाजिक प्रश्न हाताळण्यात आला नसून यात त्याचे उत्तरही दडलेले आहे.” -
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”

मुंबई : साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ याना जाहीर झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत याना नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
बालगंधर्व स्मारक समितीचे संस्थापक- खजिनदार आणि साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक दत्तात्रय बाळकृष्ण माने व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातुन सन २००० सालापासून सामाजिक, कला क्रिडा आणि सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्थेमार्फत सामाजिक, कला-क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, औद्योगिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व करु पाहणाऱ्या व्यक्तींना / संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विविध पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचा गौरव केला जातो. संस्थेच्या माध्यमातून नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व) यांच्या नावाने नाट्य व चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय काम केलेल्या जेष्ठ व करू पाहणाऱ्या युवा कलाकारांना “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२४ चा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुकेश पटेल सभागृह,एनएमएसआयएस विद्यापीठ (मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले वेस्ट, मुंबई येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सी. पी. राधाकृष्णन राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, गायक सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.साईदिशा प्रतिष्ठान व आयटीएसएफच्या विविध पुरस्कारांचे आज वितरण झाले
स्वप्नील बांदोडकर , सतीश प्रजापती (सँडी), संतोष लिंबोरे, रविकुमार सोलापुरे ,श्रावणी किरण खोत यांना कला रत्न पुरस्कार तर ठाणे पोलीस आयुक्त आयपीएस आशुतोष डुंबरे यांना रणझुंजार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कामगार आणि प्रशासन प्रधान सचिव आयएएस विनिता वैद सिंघल , सारथी इन्स्टिट्युट, पुणे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अशोक काकडे , अतिरिक्त आयकर आयुक्त आयआरएस सुधाकर शिंदे, नवी मुंबई मनपा सहाय्यक आयुक्त सतीश जाधव यांना सेवारत्न पुरस्कार,महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण एस. लुंकड यांना क्रीडा रत्न रतन पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
श्री असोसिएट्स इन्फ्राव्हेंचर्स प्रा. लि., डी.जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रा. लि.चे मंगेश येंधे,आनंद डुंबरे, सोपान बेल्हेकर, डिनेरो डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे तुषार शिंदे, फॉरएव्हर केअर इंडिया प्रा. लिचे श्री. गुरु महाराणा एम.आर. मनीष सोनी यांना उद्योग रत्न पुरस्कार , शार्प इंडस्ट्रीजचे निलेश गोसालिया , प्रशांत चिवडशेट्टी यांना शिक्षण महर्षी पुरस्कार तर आचार्य – राजकुमार सिंग यांना वास्तु महर्षी पुरस्कार आणि आशा होमिओपॅथी चे डॉ. बी.एस. भोसले यांना धन्वंतरी धन्वंतरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळयाप्रसंगी गायक स्वप्नील बांदोडकर आणि सुपरस्टार सिंगर ३ फेम गायिका पिहू शर्मा यांचा सेलिब्रेटी गेस्ट परफॉर्मन्स शो सादर होईल. -
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला

55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर ‘घरत गणपती’ या त्यांच्या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो आणि त्यांना चित्रपट उद्योगातील एक नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहतो.
भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने यंदाच्या इफ्फी आवृत्तीसाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नव्याने सुरू केला आहे.
प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये रोख, असे स्वरूप असलेला हा पुरस्कार इफ्फीच्या समारोप सोहळ्यात नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रभावीरित्या मांडलेल्या कथेसाठी प्रदान करण्यात आला.
परंपरेला आणि आधुनिक संवेदनांना जोडणारी हृदयस्पर्शी कथा सादर करण्याच्या क्षमतेबद्दल परीक्षकांनी बांदिवडेकर यांची दिग्दर्शक म्हणून प्रतिभा दाखवल्याबद्दल प्रशंसा केली.
“बांदिवडेकरांनी कौटुंबिक बंधांची गुंतागुंत मोठ्या खुबीने टिपली आहे. उत्कट भावनिक नादमयता कायम राखताना कौटुंबिक जीवनातील बारकावे उत्तमरीत्या अधोरेखित केले आहेत, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चित्रपटाची भट्टी उत्तम जमली आहे,” अशा शब्दांत ज्युरींनी त्यांचे कौतुक केले.
पूर्वावलोकन समितीने शिफारस केलेल्या पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बांदिवडेकर यांची एकमताने निवड केली. प्रशस्ती पत्रात ज्युरींनी ‘घरत गणपती’चे सुरेख कथा सादरीकरण आणि दमदार अभिनयाबद्दल कौतुक केले आहे. “वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये काही छोटे मतभेद असले तरी कुटुंबातील ऐक्याचे प्रभावीरित्या दर्शन घडवले आहे,” असे ज्युरींनी प्रशस्ती पत्रात नमूद केले आहे.
सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक या श्रेणीच्या ज्युरीमध्ये संतोष सिवन (अध्यक्ष), सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक . सुनील पुराणिक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता;. शेखर दास, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक;. एम. व्ही. रघु, सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक; विनित कनोजिया, चित्रपट निर्माता, लेखक आणि संकलक यांचा समावेश होता.
देशभरातील चित्रपट आणि कला समुदायातील प्रख्यात व्यावसायिकांचा समावेश असलेल्या पूर्वावलोकन समितीने 117 पात्र प्रवेशिकांमधून पाच चित्रपट निवडले. भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार श्रेणीसाठी स्पर्धा करणारे चित्रपट पहा.
“घरत गणपती मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे परस्परांमधील नाते विविध आनंदाने भरलेल्या तसेच गोंधळलेल्या परिस्थितीमधून शोधले आहे,” असे नवज्योत बांदिवडेकर यांनी काही दिवसांपूर्वी पीआयबीने, गोवा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. -
मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार पटकावला

मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ला 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मिती मूल्ये आणि अपवादात्मक कामगिरी यासाठी या वेब सिरिजला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही एका स्वप्नाळू मुलाची अपार उत्सुकता असलेली कथा आहे.
डिजिटल सामग्रीमधील नावीन्यपूर्णतेचा उत्सव साजरा करणारा हा पुरस्कार, एक आकर्षक आणि विचारप्रवर्तक कथा वितरीत करण्याच्या त्यांच्या समर्पणाबद्दल निर्मात्यांना आणि लंपनच्या मागे असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रदान करण्यात आला.
डिजिटल सामग्रीमधील सर्जनशीलतेची भरभराट ओळखून, 54 व्या आवृत्तीमध्ये सुरू करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील उत्कृष्ट कथाकथनाचा गौरव करण्यासाठी एक परिवर्तनात्मक मैलाचा दगड आहे. जागतिक मनोरंजनावरील ओटीटी प्लॅटफॉर्मचा वाढता प्रभाव ओळखून या वर्षी पाच वेब सिरीज त्यांच्या कलात्मक तेज, कथाकथन चातुर्य, तांत्रिक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक प्रभावासाठी निवडल्या गेल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट ओटीटी वेब सिरीज पुरस्कार रुपये 10,00,000 रोख पारितोषिकासह दिला जातो, जे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म दरम्यान सामायिक केले जातील. याशिवाय मालिकेच्या यशातील योगदान ओळखून वैयक्तिक प्रमाणपत्रेही दिली जातात.
हा पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णता जोपासण्याची इफ्फीची वचनबद्धता दृढ करतो. भारतीय भाषांमध्ये उच्च गुणवत्तेच्या सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देऊन आणि जागतिक निर्माते आणि प्लॅटफॉर्म्समध्ये सहकार्य वाढवून, डिजिटल कथाकथनाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्याचे इफ्फीचे उद्दिष्ट आहे.
