
-
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४ : मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव.
चित्रपटात शंकर-एहसान-लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटानी संगीतबद्ध केलेली १४ गाणी, १८ गायकांचा आवाज आहे. तसेच त्यातले ७ गायक तर नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत.
खाडिलकरांच्या ११४ वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा सिनेमा कट्यार काळजात घुसली तसेच आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे. नयनरम्य दृश्य, अस्सल संगीतमय कथाकथन आणि एका पेक्षा एक कलाकार आश्वासन देतायत की हा सिनेमा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत, ह्या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे हयांनी आपला आवाज दिला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.
“संगीत मानापमान” च्या या भव्यदिव्य म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. इतकच नव्हे तर गायकांद्वारा लाईव्ह परफॉर्मन्सचा आस्वाद सुद्धा प्रेक्षकांना घेता आला. संगीत मानापमान या मूळ नाटकातील गाजलेल्या गाण्यांचे आणि चित्रपटातील नवीन रचनांचे मिश्रण ह्यावेळी पहायला मिळाले, प्रत्येक गायकाने आपलं गाणं स्टेजवर सादर करून प्रेक्षकांना आपल्या मधुर सुरांनी एका वेगळ्याच जगात असल्याचा अनुभव दिला.
मीडिया अँड कंटेंट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे* म्हणाल्या :– “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही काही तरी विलक्षण आणि भारताची सांस्कृतिक समृद्धी साजरी करणाऱ्या कथा मोठ्या पडद्यावर सादर करण्यास उत्सुक आहोत. संगीत मानापमान ही मराठी संगीत रंगभूमीच्या शाश्वत कलेला केलेले अभिवादन आहे, त्यामुळे सुमधुर असं संगीत आणि चित्रपटाची कथा महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडेल. शंकर-एहसान-लॉय यांच्या अलौकिक टॅलेंट आणि बुद्धिमत्तेसह, संगीत कसं सगळ्यांना एकत्रित करतं आणि प्रेरणा देऊ शकतं याचं हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. संगीत मानापमान व्दारे कलेचा एक उत्कृष्ट नमुना जागतिक स्तरावर प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय.”*
संगीतकार शंकर महादेवन ह्यांनी सुद्धा उत्साह व्यक्त करत सांगितलं, “१८ अविश्वसनीय प्रतिभावान गायकांसोबत काम करणं एक अद्भूत अनुभव आहे. मी याआधीही सुबोधच्या कट्यार काळजात घुसली मध्ये संगीत दिलं असंल तरी या चित्रपटाच्या संगीतात नावीन्य आहे. समीर सामंत यांचे गीत खरोखरच खूपच रिफ्रेशिंग आहेत त्यामुळे खात्री आहे कि या संगीताच्या म्युझिकल प्रवासात प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होतील आणि यासाठी मी संपूर्ण टीमचा खूप खूप आभारी आहे, त्यांच्या मेहनतीचं कौतुक करतो. जीओ स्टुडिओजच्या निमित्ताने नक्कीच “संगीत मानापमान” ला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि सारेगामा सारख्या मोठ्या म्युझिक कंपनीच्या सहाय्याने ही गाणी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”*
अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की “कट्यार काळजात घुसली च्या घवघवीत यशानंतर आम्ही संगीत मानापमान सादर करत आहोत, जे महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. दिग्गज त्रिकूट शंकर-एहसान-लॉय, 18 प्रतिभावान गायकांनी सजलेल्या भावपूर्ण रचनांची जादू मोठ्या पद्यावर जादू मोठ्या पडद्यावर नक्किच दिसेल. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे यांच्या पाठिंब्याने, आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर निरंतर प्रभाव पाडेल .”*
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे.
चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. अशाप्रकारे १० जानेवारी २०२५ ला संगीताने नटलेला चित्रपट थिएटरमध्ये अनुभवायला सज्ज व्हा. -
‘श्री गणेशा’ चित्रपटातील ‘मधुबाला…’ प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘श्री गणेशा’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील आगळा वेगळा रोड मूव्ही असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सुरुवातीलाच लक्ष वेधल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरने उत्सुकता वाढवली. आता या चित्रपटातील नवे कोरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही असलेल्या ‘श्री गणेशा’मधील ‘आली मधुबाला…’ हे गाणे संगीतप्रेमींचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सादर करण्यात आले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच या गाण्याने हजारो व्ह्यूज मिळवले आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या ‘श्री गणेशा’ चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. आजवर नेहमीच संगीतप्रधान मनोरंजक चित्रपट बनवणाऱ्या मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘श्री गणेशा’च्या रूपात प्रेक्षकांना जणू लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाकाच पाहायला मिळणार आहे. यातील ‘आली मधुबाला…’ हे गाणे धमाल करणारे आहे. नानुभाई जयसिंघानी यांच्या व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेले हे गाणे अभिनेत्री मानसी शिंदेवर चित्रीत करण्यात आले आहे. गीतकार जय अत्रेने लिहिलेले हे गाणे पार्श्वगायिका कविता राम यांच्या आवाजात संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘आली मधुबाला…’ हे ढाब्यावरील गाणे आहे. प्रथमेश परब, शशांक शेंडे आणि मेघा शिंदे यांनी चित्रपटात साकारलेल्या तीन मुख्य व्यक्तिरेखा ढाब्यावर जेवण्यासाठी जातात, तेव्हा ‘आली मधुबाला…’ हे गाणे सुरू होते. ‘वाढलंया ताट आता पटकीनी बसा…’ असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहेत. या गाण्यात निळ्या रंगाची नऊवारी परिधान केलेल्या मानसीने मराठमोळ्या शैलीत अफलातून डान्स केला आहे. तिच्यासोबत डान्स करणाऱ्या सहनर्तकांनीही केलेली मराठमोळी वेशभूषा लक्ष वेधून घेते. राहुल ठोंबरे यांचे नृत्य दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या कल्पक कला दिग्दर्शनाचे दर्शन या गाण्यात घडते. थोडक्यात काय तर ‘आली मधुबाला…’ हे एक धमाल गाणे असून, सध्या लगीनसराई सुरू असल्याने लग्नसोहळे आणि वरातींमध्ये वऱ्हाडी मंडळींना ताल धरायला लावणारे आहे.
या धमाकेदार गाण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, ‘आली मधुबाला…’ हे गाणे चित्रपटात एका महत्त्वाच्या प्रसंगी येते. या चित्रपटाच्या रूपात मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही घेऊन आलो आहोत. आमच्या यापूर्वीच्या कलाकृतींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आता ‘श्री गणेशा’ हा चित्रपटही ते डोक्यावर घेतील असा विश्वासही मिलिंद यांनी व्यक्त केला आहे.
‘श्री गणेशा’ची कथा मिलिंद कवडे यांची असून, पटकथा संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डीओपी हजरत शेख वली सिनेमॅटोग्राफी यांनी केली आहे. गीतकार जय अत्रेसोबत मंदार चोळकर यांनीही या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. सर्व गाणी संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केली आहेत. अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिले असून, गुरु पाटील यांनी संकलन केले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, सुमित पाटील यांनी कला दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते दिपक एस कुदळे (पाटील), तर सहदिग्दर्शक विनोद शिंदे आहेत.
Song Link :
https://youtu.be/myHnPSOilmg -
Kriti Sanon In-conversation on ‘Empowering Change: Women Leading the Way in Cinema’ at 55th IFFI

IFFIWood, 25 November 2024, by Sandesh Kamerkar,
When venturing into film-making and acting careers which are by nature uncertain, it is better for aspiring filmmakers to keep back-up career options ready, said national award-winning actor Kriti Sanon today.
She further added that her film ‘Mimi’ was the boldest choice that she had made in her acting career so far and that, that risk paid off well when she won the National Award for Best Actor (female) for that movie. She was speaking in a Panel discussion on the topic of ‘Empowering Change: Women Leading the Way in Cinema’ at Kala Academy, in Goa today. The ‘In-conversation’ session was organized on the sidelines of IFFI, 2024.
“I was advised against selecting this film (Mimi) by many people. They were afraid that I will be given the label of an actor who prefers art house films and it hat it would affect the other projects coming my way. Still, I chose it because the script touched my heart. And this factor should matter most while choosing projects”, Ms. Sanon opined. She also expressed her desire to play a superwoman character and any character in a negative role in the future.
Kriti said she considers her role in the movie ‘Do Patti’ as layered and nuanced and also described the subject of domestic violence as something which touches her heart. Speaking about her role in the movie “Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya” actor expressed how it was difficult to play role of a perfectly straight-faced robot and how that role was well received.
While commenting about negative characters and roles being played by women in recent films, Ms. Sanon said that audience do like and connect well with grey characters and that the ‘male gaze’ is undergoing change nowadays, with lesser demand for the ‘perfect’ girl or woman.
Ms. Kriti had great admiration for the new crop of female writers that gained entry into the industry through OTT platforms. She added that OTT platforms are giving female filmmakers better reach in hundreds of countries.
“Women should grow and work on themselves; they should give their hundred percent, stay curious and ask questions,” concluded the actor. -
AI driven VFX is the future”: Senthil Kumar#IFFIWood

By Sandesh Kamerkar,
From Magadheera to Eega and Baahubali to RRR; acclaimed cinematographer K. K. Senthil Kumar is the man behind the lens, who has skilfully transformed many epic narratives into visually stunning masterpieces for film enthusiasts across the globe. The captivating camera moves, masterful use of vibrant hues, contrasting shadows, and evocative lighting in these blockbusters reflect his ability to balance grand visual storytelling with emotional depth, seamlessly blending action, drama, and fantasy. Senthil Kumar, shared his insights and life-journey in a spell binding ‘In-Conversation’ session on “Integrating VFX with Cinematography” today at 55th IFFI in Goa. The session was moderated by renowned film director and screenwriter Shankar Ramakrishnan.
While addressing the session, Senthil candidly described filmmaking as a challenging process. “Filmmaking is full of challenges. If you don’t to want to face challenges, it’s better you don’t come to filmmaking”, advised the ace cinematographer. He emphasized the importance of embracing these challenges, particularly in the realm of emerging technologies such as VFX, which he sees as a powerful tool that has made the cinematographer’s job easier by enhancing visual storytelling. “VFX has made life of Cinematographer easier and AI-driven VFX is emerging as the future,” he noted, highlighting the potential of technology to push creative boundaries.
However, Senthil was clear in his stance on how he approaches technological advancements. “I don’t want to fight against technology. I want to integrate technology with my works and evolve,” he said. This philosophy has been integral to his success, as he continuously seeks to merge traditional cinematic techniques with innovative VFX to create immersive and visually dynamic experiences.
Reflecting on his creative process, Senthil explained the importance of understanding each story’s unique requirements. “Every story is unique in itself. It’s important how you tell your story to the audience. I take more time during the pre-production phase to understand the story and its requirement and plan the shooting accordingly”, he asserted. He also highlighted the collaborative nature of his work, noting that a cinematographer must work in close harmony with the VFX Director to create images that serve the narrative while complementing the technical demands of visual effects.
As a pioneer in integrating visual effects with cinematic craftsmanship, Senthil underscored the absence of strict rules in filmmaking. “There’s no rule in filmmaking. It’s a creative choice and personal decision. It all depends on how interestingly and convincingly you tell your story”, he affirmed, stressing that at the heart of every successful film lies compelling storytelling.
In his concluding remarks, Senthil also shared a personal anecdote from his early days, revealing that his path to cinematography was somewhat serendipitous. Initially intending to join a film school by chance, he soon found himself pursuing his passion for filmmaking with relentless dedication. Reflecting on the need to push creative limits to tell larger-than-life stories in cinema, he added “Many times, we have to break the logic and rules to board the story in a captivating manner.” -
Film Bazaar 2024: A Celebration of Cinematic Excellence and Global Collaborations concluded at 55th IFFI

By Sandesh Kamerkar
Celebrating yet another milestone in cinematic innovation and international collaboration, Film Bazaar 2024 concluded on a promising note as part of the 55th International Film Festival of India (IFFI) in Goa. Organized by the National Film Development Corporation (NFDC), the event brought together industry stalwarts, emerging filmmakers, and global partners to celebrate the art of storytelling and foster new creative ventures.
Over the years, Film Bazaar has become a vital platform for discovering, supporting, and showcasing South Asian content and talent. It continues to be a dynamic hub for collaboration and growth within the global film industry.
In a major announcement during the event, Mukesh Chhabra revealed his collaboration with Film Bazaar on two Co-Production Market (CPM) projects. The first, Baaghi Bechare (Reluctant Rebels), is a CPM feature film for which he will cast talent for free. The second, ‘Chauhan’s B n B Bed and Basera’, is a CPM web series that will also benefit from Chhabra’s expertise in casting at no cost. This collaboration highlights Film Bazaar’s continued commitment to nurturing creative talent and strengthening industry partnerships.
The event also announced exciting new landmark partnerships such as a collaboration with Final Draft for screenwriting development, engagements with the Film Independent Episodic Writing Workshop to foster episodic storytelling and a partnership with SAAVA & ATF IP Accelerator, which recognized Kothiyan- Fishers of Men in the CPM.
Apart from these initiatives, Work in Progress (WIP) Awards were given to the following films:
Kaatti Ri Raatti: Hunter’s Moon by Ridham Janve received the Prasad Labs Award for 50 hours of free 4K DI.
Shape of Momo by Tribeni Rai was awarded a DI package worth ₹6 lakhs by the Nube Studio.
Special Mentions included The Good, the Bad and the Hungry and The Red Hibiscus, which received a 50% discount on 50 hours of DI from Prasad Labs.
Reflecting the vibrant and inclusive spirit of the event, the top three winners in the Film Bazaar Recommends (FBR) category were each awarded Rs. 3 lakhs in sponsorship and promotional benefits.
The winners were:
Angammal, directed by Vipin Radhakrishnan
House of Manikanta, written and directed by Pinaki Janardhan
Flames, written and directed by Ravishankar Kaushik
In addition to the financial rewards, the winners will receive several additional benefits. This includes Rs. 2 lakh worth of trailer promotion in up to 300 QUBE Cinema theatres, along with other promotional opportunities to help elevate their projects to a broader audience.
The winner of the Student Producer Workshop Pitch Awards was announced to Deadly Dosas by Anusree Kelat, while the Runner-up award went to Lakad Haara by Punjal Jain.
In a first for Film Bazaar, the event introduced the Co-Production Market Feature Cash Grants category, recognizing outstanding pitches from filmmakers.
The First Prize in this category was awarded to Kurinji (The Disappearing Flower), directed by Payal Sethi and produced by Thanikachalam SA.
The Second Prize went to Kothiyan – Fishers of Men, directed by Sanju Surendran and produced by Pramod Sankar.
The Third Prize was given to All Ten Heads of Ravana, directed by Pranjal Dua and produced by Bich-Quan Tran.
Additionally, a Special Mention for Best Pitch was awarded to Baaghi Bechare (Reluctant Rebels), directed by Sumit Purohit and produced by Chippy Babu and Abhishek Sharma.
In a special initiative, the French Institute of India was also honoured for its consistent efforts to promote French delegates’ participation in the Film Bazaar. The evening concluded with a teaser for WAVES 2025, offering a glimpse into the exciting future of Film Bazaar.
The ceremony featured addresses by Shri Prithul Kumar, Joint Secretary of the Ministry of Information and Broadcasting and MD, NFDC, and Ms. Vrunda Manohar Desai, Joint Secretary of Films at the Ministry of Information and Broadcasting. Also present were Jerome Paillard, Advisor to Film Bazaar, renowned actor Avinash Tiwary, and acclaimed casting director Mukesh Chhabra.
The event reaffirmed its legacy as a global hub for storytelling and innovation, setting the stage for Film Bazaar 2025. With excitement already building, next year’s edition promises to deliver another year of ground-breaking achievements and dynamic cinematic collaborations. -
सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच…

By संदेश कामेरकर,
मराठी सिनेमाच्या कक्षा सातत्याने रुंदावत आहेत आणि सुजय एस. डहाकेचा नवीन चित्रपट ‘तुझ्या आयला’ त्याला अपवाद नाही. ‘शाळा’, ‘फुंतरू’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या धाडसी कथाकथनासाठी ओळखला जाणाऱ्या सुजयने शाब्दिक शिवीगाळ आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम या सशक्त विषयासह पुन्हा एकदा एक धाडसी झेप घेतली आहे. गोव्यातील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये ‘तुझ्या आयला’च्या बहुप्रतिक्षित पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले, ज्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणि उत्साह अधिक वाढला आहे.
सुनील जैन, प्रकाश फिल्म्स, प्रशांत बेहेरा आणि वन स्टॉप मीडिया प्रस्तुत ‘तुझ्या आयला’ची निर्मिती पुणे फिल्म कंपनी आणि कल्ट डिजिटलच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, सुजय डहाके, अश्विनी परांजपे या चित्रपटाचे निर्माते असून मेघना प्रामाणिक, देबाशीष प्रामाणिक, राजेश सिंग आणि अंकित चंदिरामाणी सहनिर्माते आहेत. ‘शिवी नाय खेळाचं नाव हाय ते’, ही टॅगलाइन चित्रपटाच्या मध्यवर्ती कल्पनेचे भाषांतर करण्यासाठी पुरेशी आहे. शाब्दिक शिवीगाळ हा खेळ नाही – ही एक मोठी परिणामाची बाब आहे. चित्रपटाची कथा मुलांच्या भावनिक जीवनाभोवती फिरते आणि त्यांच्या तोंडी येणारी शिवीगाळ खेळकर पद्धतीने तसेच खेळीमेळीच्या वातावरणात सादर करण्यात आली आहे. ही थीम विशेषत: आजच्या जगाला साजेशी आहे, जिथे ऑनलाइन ट्रोलिंगने शाब्दिक हिंसेला चिंताजनक पातळीवर नेले आहे. शब्द शारिरीक आघातांइतकेच खोलवर जखमा करू शकतात आणि आपण किती अनौपचारिकपणे अशी भाषा वापरतो जिच्या जखमा मनावर चिरकाल राहतात हे चित्रपटाद्वारे सांगण्याचे खरे आव्हान होते.
दिग्दर्शक सुजय डहाके याबाबत स्पष्ट करतात की, “शाब्दिक गैरवर्तनाने मला नेहमीच भुरळ घातली आहे आणि त्रास दिला आहे. आज हे आपल्या संस्कृतीत सामान्य झाले आहे, तरीही त्याचा प्रभाव खोलवर आहे. विशेषत: ते शब्द जेव्हा आपल्यासाठी प्रेम आणि आदराची मूर्ती असलेल्या आईबद्दल वापरले जातात, तेव्हा अशा भाषेच्या मुळांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या चित्रपटाद्वारे, मला शब्दांची शक्ती आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान यावर ऑफलाइन आणि डिजिटल दोन्ही ठिकाणी चर्चा सुरू करायची आहे.” फेस्टिव्हल विश्वात आधीच आपला ठसा उमटवल्यानंतर या चित्रपटाला लक्षणीय ओळख मिळाली आहे. भारतीय पॅनोरामाच्या निवडीत त्याचा समावेश करण्यात आला आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने विशेष ज्युरी पुरस्कार जिंकला आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटाने तांत्रिक चमक आणि भावनिक अनुनाद अधोरेखित करत सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि ऑडियन्स चॉईस अवॉर्डसाठी प्रशंसा मिळविली आहे.
राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत आणि आश्वासक बालकलाकारांचा समूह असलेल्या प्रतिभावान कलाकारांसह, ‘तुझ्या आयला’ हा एक सिनेमॅटिक अनुभव देणारा सिनेमा जसा विचार करायला लावणारा आहे तसाच तो दृश्यास्पदही आहे. ‘तुझ्या आयला’ हा केवळ एक चित्रपट नसून, हे एक सामाजिक विधान आहे, जे आपण ज्या पद्धतीने संवाद साधतो आणि आपल्या शब्दांमुळे होणारी अनपेक्षित हानी यावर पुनर्विचार करण्याची विनंती करतो. खेळाच्या मैदानात आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी शाब्दिक हिंसेकडे लक्ष वेधून, हा चित्रपट एक दयाळू, अधिक सहानुभूतीशील समाज घडवण्यासाठी आपण सर्वजण पार पाडत असलेल्या जबाबदारीची एक सशक्त आठवण करून देण्याचे काम करणारा आहे. -
55th IFFI presents ‘Bassima’s Womb’ and ‘Loonies’: A Deep Dive into Human Struggles

by Sandesh Kamerkar,
The 55th International Film Festival of India (IFFI) featured two remarkable films in the ‘Cinema of the World’ category: Canadian film, ‘Bassima’s Womb’ and Polish film, ‘Loonies’. Crafted by visionary directors and producers, these films delve into profound themes such as societal pressures, the quest for identity, redemption, hope and pursuit of a better life.
During the media interaction, Babek Aliassa, Director and Actor of ‘Bassima’s Womb’, revealed that the film was inspired by Indian surrogacy stories. When asked about the absence of music, he explained that it was a conscious decision to avoid manipulating the audience.In comparing Indian and Canadian cinema, he noted that Canada produces fewer feature films than India and emphasized the need for more Indo-Canadian collaborations to promote artistic films.
Actress, Maxine Denis described the story as intense, with her character ‘Bassima’ representing a young woman full of hopes and aspirations. She explained that the lack of music was an artistic choice, aimed at pushing boundaries rather than relying on an easy addition. She also shared that preparing for the role involved watching many surrogacy documentaries and learning to speak French and Arabic with a Syrian accent, which was both challenging and fun.
Actress, Nicole-Sylvie Lagarde, who plays the antagonist, described the film as a personal journey for her character, who bears scars and seeks healing. She also mentioned the difficult weather conditions faced while shooting in Canada.
Actress, Alicja Stasiewicz, from ‘Loonies’, shared that her role required significant physical transformation, including weight changes, making it a demanding part. She credited her 11 years in theatre which helped her emotionally prepare for the character.
Actor, Lech Mackiewicz, spoke about the central theme of love in the film, calling it a powerful force in life. On the film’s music, he noted that it aligns with the characters’ emotions. He also contrasted the vibrant, epic style of Indian cinema with the more subdued tones of Polish cinema, expressing a desire to create films in the style of India.
About the films:
Bassima’s Womb: It revolves around a young Syrian woman whose husband without proper documentation getting deported from Canada. In a desperate attempt to reunite with him, she agrees to become a surrogate in exchange for a forged passport. However, she is soon confronted with the shocking revelation that she is already pregnant, forcing her to make the heartbreaking decision to give up her own child.
Loonies: Eryk and Karolka, idealists seeking a fresh start, leave prison to find peace in nature, away from their troubled past. Eryk is driven by the desire to give his daughter, Dżesika, a better life. Together, they embark on a journey across Poland to build a new future, but their plans are threatened when Karolka falls seriously ill, and the only treatment she needs is too expensive for them to afford. -
Manisha Koirala and Vikramaditya Motwane candidly discuss ‘From Big Screen to Streaming Platforms’ at the 55th IFFI

By Sandesh Kamerkar:
A packed auditorium at the Kala Academy warmly welcomed veteran actor Manisha Koirala and visionary filmmaker Vikramaditya Motwane with a thunderous round of applause. The much-anticipated rendezvous between the iconic Mallikajaan from ‘Heeramandi’ and t
he director behind acclaimed films like ‘Udaan’, ‘Lootera’, and the series ‘Sacred Games’, among many others, took place today at the 55th International Film Festival of India (IFFI). The two film industry veterans engaged in an insightful ‘In-Conversation’ session on ‘From Big Screen to Streaming,’ attended by film aficionados, students, media personnel, and fans from across India, all gathered in Goa for the occasion.

In the candid discussion, Manisha Koirala shared that both theatrical releases and series or films on OTT platforms require the same level of effort, preparation, sincerity, and mindset from actors. “In my thirty years of career, Heeramandi was the biggest set I’ve ever worked on,” she revealed. She also expressed her love for both experiences, saying, “I love going to theatres, but I also enjoy sitting at home and watching good content.” According to her, both have their own significance, and there’s a wealth of excellent content available on OTT. “I binge-watch OTT content,” she added, acknowledging the platform’s appeal.
When asked if actors still hesitate to work on OTT shows, Manisha candidly replied that there are ongoing discussions in the industry about it. “Anything new and unfamiliar is often met with doubt initially,” she explained. “But good results encourage people to embrace it.” She acknowledged that there is still some apprehension in the film industry regarding projects on streaming platforms. However, she expressed hope that “this will fade away in a few generations.” Both Manisha and Vikramaditya Motwane noted that many actors, including Shahid Kapoor, Alia Bhatt, and Varun Dhawan, have already starred in films released on OTT platforms, signalling a growing acceptance of the medium.
When Vikramaditya Motwane asked if working for OTT platforms felt like a ‘come down’ from the big screen, Manisha replied, “Actors should break the mould. I didn’t want to be confined to just one genre. As an actor, you want to explore different facets.” She further added, “Streaming is going to be a game changer. It’s opening up new opportunities and encouraging emerging filmmakers, writers, and actors to step into the spotlight.
Manisha also noted that roles for older women are evolving compared to what senior actresses were offered in the past. “Thanks to the audience, OTT is slowly breaking the mould,” she said. “In cinema as well, older actors are now being given more meatier roles. A lot has changed since the ’90s and 2000s. There’s so much to learn,” added the veteran actress.
Bringing a director’s perspective to the conversation, Vikramaditya Motwane, who is credited with successful projects in both formats, opined, “There is separate kind of magic in good series. It is hard to sustain multiple seasons from a creative perspective. It’s tough to keep the flow. And it is important that cast and crew energy sustains over the period.”
Speaking about his experience in both formats, the visionary director said, “I enjoy breaking genres. My first four films were all for cinema. Streaming platforms give you a little bit of more freedom when it comes to language. OTT platforms give more liberty. For theatrical releases, the budget and length are limited, stories have to be more for the mass.” However, production and post-production is almost the same, he informed. “The shooting process is getting quicker. 10 episodes of Jubilee was shot in 90 days, ‘Sacred Games’ was shot in 80 days”, he added. You have to take more instinctive choices during shooting, feels the director.
Speaking on writing for OTT platform, Vikramaditya informed, it’s a different process altogether. While writing, one has to keep the episodes and timing in mind, he noted. Both Manisha and Vikram agreed that there has to be a balance between big screen and OTT releases.
Vikram candidly agreed to the fact that giving direction to a series is a little difficult. “For showrunners it is difficult. Many international series have had different show runners for different seasons. OTT is a fairly new thing in India. We need to build on it. Bit by bit, it will happen”, he opined.
In his concluding remarks, Vikramaditya also expressed the opinion that the movie-watching experience in theatres needs improvement. He believes that unnecessary intervals and lengthy ads are often disliked by audiences. “However, cinema on the big screen will always have its magic,” he added. On the other hand, he noted that OTT platforms offer quality family entertainment and the freedom of private viewing. “A perfect blend of both formats will create a marvel in the cinema universe,” said Vikramaditya Motwane.
In the debate of big screen vs OTT, both the reputed industry experts agreed that – ‘when boundaries are pushed, many new wonderful things happen’. -
मराठी नाटक समूह आयोजित, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’ हा सोहळा रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न

नामवंत नाट्य सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ह्यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा ह्या ठिकाणी चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे, ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’ स्वगत … स्वागत … सादरीकरण हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्याची सुरुवातीला मराठी नाटक समूहाचे तरुण ऍडमिन अभिषेक मराठे , ह्यांनी समूहाच्या आजवरच्या यशस्वी उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. हा केवळ व्हाट्सऍप समूह नाही तर नाटकासाठी एकत्र आलेल्या ज्येष्ठ कनिष्ठ हौशी व्यावसायिक रंगकर्मींचा समूह आहे जो व्हाट्सअँप वर कार्यरत आहे असे प्रतिपादन करून व्हाट्सअँप वर असून देखील अनेक विधायक कामे क्षणात निर्णय घेऊन कसे साकारता येतात हे समूहाच्या कार्याने दाखवून दिलेले आहे हे स्पष्ट केले.
संकर्षण कऱ्हाडे ह्या गुणी निवेदकाने आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करून कार्यक्रमाची जोरदार सुरुवात केली. नामवंत व्याख्याते अभिनेते दीपक करंजीकर आणि लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ह्यांनी चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ह्या पुस्तकाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. राजहंस प्रकाशन ह्या नामवंत प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ह्या प्रकाशनाच्या करुणा गोखले ह्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी ह्या नाट्यप्रवासातील दोन भागांचे अभिवाचन केले आणि मग ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, अभिनेते प्रशांत दामले आणि सुमीत राघवन ह्यांच्या शुभहस्ते द्वितीय आवृत्तीचे स्वागत रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात संपन्न झाले आणि पहिल्या अंकाचा पडदा पडला.

दुसऱ्या अंकाची सुरुवात नीना कुलकर्णी ह्यांनी ध्यानीमनी ह्या नाटकातील उताऱ्याचे अभिवाचन करून केली. त्यानंतर यळकोट ह्या नाटकातील प्रसंग संकर्षण कऱ्हाडे आणि आशुतोष गोखले ह्यांनी सादर केला. त्या नंतर गांधी विरुद्ध गांधी ह्या एकेकाळी प्रचंड गाजलेल्या नाटकातील प्रवेशाचे अभिवाचन रोहिणी हट्टंगडी आणि चंद्रकांत कुलकर्णी हयांनी केले. मग्न तळ्याकाठी ह्या नाटकातील प्रसंग चिन्मय मांडलेकर आणि पूर्वा पवार ह्यांनी सादर केला आणि हॅम्लेट ह्या नाटकातील स्वगत सुमीत राघवन ह्याने बहारदार सादर केले. मानसी मराठे हिच्या सुंदर कृतज्ञतेने सोहळ्याची सांगता झाली.
मराठी नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत, नवोदित रंगकर्मी आणि रसिकांनी यशवंत नाट्य मंदिर अक्षरशः फुलून गेले होते. विनामूल्य प्रवेश, काही रांगा राखीव आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्यामुळे रसिकांनी नाट्यगृहावर दुपारी 03.00 वाजल्यापासूनच हजेरी लावली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ह्या सोहळ्याचे आयोजन केले असल्यामुळे कुठेही गडबड गोंधळ न होता हा सोहळा संपन्न झाला. यशवंत नाट्यगृहाचे मुख्य प्रेक्षागार आणि बाल्कनी हाऊस फुल्ल झालेली असल्याने अनेक नामवंत रंगकर्मी आणि रसिकांनी अक्षरशः उभं राहून पायऱ्यांवर बसून ह्या सोहळ्याचा आनंद लुटत होते हे फारच कौतुकास्पद वाटले.
जिगिषा अष्टविनायक ह्या संस्थेच्या सहकार्याने मराठी नाटक समूहाने आपल्या दर्जेदार कार्याची परंपरा कायम ठेवली. येणाऱ्या रसिकांचे स्वागत चाफ्याचे फुल आणि पेढा देऊन करण्यात आले. सरोज स्वीट्स, चेंबूर च्या मनीषा मराठे ह्यांनी सोहळ्याचा गोडवा सुंदर पेढा देऊन द्विगुणित केला. -
शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” मानापमान चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “संगीत मानापमान” या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक अप्रतिम टिझर रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” या सिनेमासोबत रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ‘संगीत मानापमान’ ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत. आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या “वंदन हो गाण्याने झाली.
मानापमान चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना १८ दिग्गज गायकांनी गायले आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाला सुरेख संगीत देणारे त्यातले ७ गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे सर्वश्रेष्ठ गायकांनी सजवलेली मैफिल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
कट्यार काळजात घुसली नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना संगीत विश्वातील दिग्गज संगीतकार शंकर महादेवन, गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा आवाजातील तिहेरी संगम अनुभवायला मिळणार आहे. या आधीही ही सुप्रसिद्ध तिकडी एकत्र येऊन गायली होती परंतु चित्रपटातील गाण्यासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हल्लीच चित्रपटातील पहिल्या गाण्यासाठी शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी मुंबईतील एका स्टुडिओत वंदन हो हे गाणं शूट केलंय. उत्तम संगीत आणि गीतकार हयामुळे सेट वर किती प्रसन्न वातावरण होतं हे नुकताच सेट वरून वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये तूम्ही पहिलंच असेल. आज “वंदन हो” गाण्याने सुरवात करुन चित्रपट निर्मात्यांनी नक्कीच कलेला केलेले एक सांगीतिक वंदन आहे. मंत्रमुग्ध करणारं साउंडट्रॅक “वंदन हो” वैविध्यपूर्ण संगीत शैलींचा कळस आणि परंपरेचा मिश्रण असलेलं हे गाणं चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याची खात्री आहे.
संगीतकार शंकर महादेवन हे “वंदन हो” या गाण्याबद्दल आपलं मत व्यक्त करत म्हणाले की, “माझं सौभाग्य आहे कि मला हे गाणं राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सोबत करायला मिळालं, नक्कीच आमच्यासाठी हे एक फेरिटेल आहे, संपूर्ण टीम जरी तीच असली तरी आमचं म्युझिक मात्र खूप वेगळं आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात अजून भरपूर अप्रतिम गायक आहेत, समीर सावंत यांनी लिरिक्स सिनेमाच्या गाण्याला दिले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही संगीतमय भेट नक्कीच आवडेल.”
राहुल देशपांडे म्हणाले की ” मला अतिशय आनंद झाला, कट्यारचे दिवस आठवले, शंकरजी खूप मोठे जिनिअस आहेत त्यांनी खूप छान कंपोझिशन केलय त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समझतो.
इतकच नव्हे तर महेश काळे ह्यांनी सुद्धा भावना व्यक्त करत सांगितलं की “मानापमानचा हिरो म्हणजे या चित्रपटाची गाणी आहेत. मला खात्री आहे कि आमच्या कट्यारच्या ह्या संघाकडून नवीन येणारा संगीत मानापमान चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.”
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ सारखे आणखी दिग्गज कलाकारांना आपण सिनेमात पाहू शकतो. अजरामर संगीत कलाकृती संगीत मानापमानचं म्युझिक कंपनी सारेगामा आहे. ‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, “संगीत मानापमान!” १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
