Home

  • बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

    नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड  मराठी सिनेसृष्टीत रानटी  धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे

    २२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

    माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते.पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी  काही जणांना रानटी व्हावे लागते. आजूबाजूची परिस्थिती त्यांना तसं बनवत असेल कदाचित त्यामुळेच काही रानटी असतात तर काही बनतात… असाच रानटीपणा घेऊन  या दशकातील  सर्वात मोठा ‘अँग्री यंग मॅन’ दिग्दर्शक समित कक्कड २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात.

    आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, मराठीत अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता.  मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

    भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपूरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश  करण्यासाठी विष्णु येतोय. याच विष्णूचा दमदार अवतार ट्रेलर मध्ये पहायला मिळतोय. पिळदार शरीरयष्टी, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरद यांचं ‘अँग्री यंग मॅन’ रूपच समोर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग विष्णूला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे.

    अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी विष्णूचा ‘रानटी’ अवतार सज्ज झाला आहे. प्रसिध्द अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव  देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.

    ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

  • Kartik Aaryan To Conclude Bhool Bhulaiyaa 3’s Massive 34-Day, 12-City Promotional Tour with a Grand Finale in Patna!

    _Kartik Aaryan’s Electrifying Return as Rooh Baba Causes Fan Frenzy During Film Promotions_

    Bhool Bhulaiyaa 3 has reached an incredible 200 crores at the box office within a mere 10 days! The journey has been nothing short of spectacular, fueled by the team’s passion and relentless work to promote the film worldwide. Led by stars Kartik Aaryan, Vidya Balan, Madhuri Dixit and Triptii Dimri the cast kicked off the promotion in Jaipur with its grand trailer launch, setting the stage for an epic tour across India and beyond.

    The energy built city by city—from fan-packed gatherings in Ahmedabad, Surat, and Delhi to electric college meets in Noida, Indore, and Hyderabad. Highlights included Pune, where Kartik and Madhuri bonded over local favorites like Vadapav, and Kolkata, where Kartik and Vidya posed at the iconic Hawrah Bridge and fans celebrated their presence in a grand college event. The excitement reached new heights in Lucknow and Varanasi, with record-breaking crowds joining the fun.

    A grand event unfolded in Dubai, where fans across the Middle East poured in to meet Rooh Baba aka Kartik Aaryan in an unforgettable celebration of the franchise’s global impact. Now Kartik is all set to conclude the biggest movie promotion campaign in the Hindi heartland, Patna tomorrow with a grand success meet and greet with his fans. Known for his promotional frenzy, Kartik worked tirelessly along with BB3 team this time to take the film on ground level amongst the audience and made sure the masses enjoy his BB3 promotions. Undoubtedly, this has been Kartik’s biggest promotional campaign and now onc can easily say that it has surely paid off.

    Directed by Anees Bazmee and initiated by Bhushan Kumar, Bhool Bhulaiyaa 3 has become unstoppable at the box office shattering big box office records and writing a new history for a horror- comedy franchise. The film has already done 300 CR plus business worldwide and its still growing as we close the tour.

  • धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

    १५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याचे एक वेगळेच रूप यात आहे.

    निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली बनवलेला ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. आपल्या कल्पक दिग्दर्शन शैलीद्वारे पवार यांनी ‘नाद’मध्ये एक अनोखी प्रेमकहाणी सादर केली आहे. या चित्रपटात उदय आणि शुभ्रा यांची प्रेमकहाणी पाहायला मिळेल. या चित्रपटातील अजिंक्य ही आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ‘नाद’ हा म्हणजे दोन प्रेमी जीवांची आवड पूर्ण करण्याचा प्रवास आहे. या चित्रपटात जरी आजवर कधीही न पाहिलेली लाल मातीतील अ‍ॅक्शनदृश्ये पाहायला मिळतील. सकस कथानकाला मुद्देसूद कथानकाची जोड आणि सहजसुंदर अभिनयाच्या साथीने सादर केलेली प्रेमकथा हे ‘नाद’चं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे संगीतकार पंकज पडघन यांनी गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. ‘डोळ्यांत तूच आहे…’, ‘तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे…’, ‘नादखुळा डान्स करा रे…’ आणि ‘जीवाचे हाल…’ ही चारही गाणी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी येतात आणि मनाला भुरळ घालतात. अर्थपूर्ण शब्दांना सुरेल संगीताची जोड हे या गाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आल्याने पडद्यावर चित्र पाहताना ते सुखावह वाटेल.

    किरण गायकवाडची मुख्य भूमिकेसाठी करण्यात आलेली निवड आणि त्याची सपना माने या नवोदित अभिनेत्रीसोबत जमलेली जोडी चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. किरण गायकवाडसाठी हा चित्रपट इमेज ब्रेकिंग ठरणारा असून, त्याने आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले. ते म्हणाले की, चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी अचूक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. किरणसारखा तगडा अभिनेता मुख्य भूमिकेत असल्याने ‘नाद’ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. त्याला सपनाची सुरेख साथ लाभली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यातील गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर रुंजी घालणारी असून, चित्रपटगृहातून बाहेर पडणारे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण कलाकृती पाहिल्याचा आनंद पाहायला मिळेल अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

    संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. किरण गायकवाड आणि सपना माने यांच्यासह यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांनी केले असून, डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली असून, वेशभूषा निगार शेख यांची आहे. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.

  • यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

    स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला संगमनेरचा सारंग भालके. विरारच्या पलाक्षी दीक्षितने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक जुई चव्हाण, देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने यांना विभागून देण्यात आलं. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची विजेती गीत बागडेला पाच लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

    विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना गीत बागडे म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.’

    गीत बागडे जरी या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

  • Top Indian athletes mark their presence at the fifth edition of the Indian Sports Honours

    Mumbai, 9th November, 2024: The Indian Sports Honours is back with its fifth edition, aiming to put the spotlight on India’s finest athletes and their remarkable performances throughout the year. Conceptualized by Cornerstone Sport, the honours celebrate achievements across a broad range of sports, including Olympic sports, Paralympic sports, the Asian Games, and the Commonwealth Games, along with Cricket, Squash, and Chess.

    The star-studded event began with the red carpet where the sports and entertainment fraternity came together for the honours.

    Present at the event were some of India’s famous sportspeople, including Abhinav Bindra, Sania Mirza, Muralikant Petkar, Vijender Singh, Yogeshwar Dutt, Yashasvi Jaiswal, Shreyanka Patil, Sarabjot Singh, Lakshya Sen, Robin Uthappa, Avani Lekhara, Rani Rampal, and Harmanpreet Singh.

    Also present at the event were some of the recognizable names in the entertainment industry, including Kartik Aaryan, Karan Johar, Ananya Panday, Angad Bedi and Neha Dhupia.

    The athletes were at the forefront of the event, that not only recognizes them but also promotes sports in the country.

  • पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

    लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत  १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा

    ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे. 

    या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या  सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या *पुरस्काराचे मानकरी श्री. पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), श्री. ज्ञानेश महाराव (लेखक  व पत्रकार), श्रीमती सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र),  श्रीगौरी  सुरेश  सावंत (सामाजिक  क्षेत्र), श्री. आदेश बांदेकर (आभिनय व सूत्रसंचालक), श्रीमती सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती),  श्री रोहित राऊत  (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), श्रीमती दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत.* शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत.

    बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश  उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

    या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून श्री. तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. श्री विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज  श्री विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद  रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सोहळ्याला *प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रोहिणी हटट्गंडी (अभिनेत्री), श्री.जयराज साळगावकर (संपादक कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे)* आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

    *आजपर्यंत विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्कार प्राप्त मान्यवर*

    पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम  जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री  डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले,  डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक  वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र  भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी  माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

  • जास्तीत जास्त मतदान करा: मतदानाचा दिवस केवळ सुट्टी म्हणून न पाहता सण म्हणून पाहा– नरिंदर सिंग बाली

    SVEEP कडून महाराष्ट्र राज्य विधानसभा
    २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा दिवस असून मुंबईतील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (SVEEP) ची सायकल रॅली. या सायकल रॅलीचे आयोजन मतदान करून लोकशाही साजरी करण्यासाठी करण्यात आले. मतदानाचा दिवस केवळ एक सुट्टी म्हणून न पाहता तो नागरी कर्तव्याचा सण म्हणून पाहा असा संदेश या सायकल रॅलीतून मुंबईकर नागरिकांना देण्यात आला. या सायकल रॅलीत २०० हून अधिक उत्साही मतदार सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच  महापालिका आयुक्त व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई भूषण गगराणी, निवडणूक निरीक्षक नरिंदरसिंग बाली, उपनगर व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सह महापालिका आयुक्त विश्वास शंकरवार आणि उपमहापालिका आयुक्त विश्वास मोटे, मनपा सहाय्यक उपायुक्त चक्रपाणी, मनीष वळंजू आणि वॉर्ड 165 अंधेरी पश्चिमचे उपजिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी  वैशाली परदेशी ठाकूर आदि यावेळी उपस्थित होते.

    निवडणुकीत मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

    या सायकल रॅलीमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी श्रेयस तळपदे, पद्मिनी कोल्हापुरे, पर्यावरण आणि सामाजिक कामासाठी प्रख्यात वकील, मेक अर्थ ग्रीन अगेन (मेगा) फाऊंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर, अवादा फाऊंडेशनचे विनीत मित्तल यांनीही यावेळी मतदान करण्याची शपथ घेतली. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी आणि सायकल रॅलीला प्रेरक संदेश दिले. कार्यक्रमात बोलताना भूषण गगराणी म्हणाले, “मतदान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. आपल्या राज्याचे भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येक मतदाराने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करणे अत्यावश्यक आहे. चला एकत्र येऊन ही निवडणूक खऱ्या अर्थाने उत्सव बनवूया आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करूय़ा.” असेही गगराणी यावेळी म्हणाले.

    “मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून नव्हे तर सण म्हणून पाहिला पाहिजे” अशी आठवण नरिंदर सिंग बाली यांनी यावेळी करून दिली. मतदान हा केवळ अधिकार नसून बदलाचे एक शक्तिशाली साधन आहे. हा संदेश आणखी सशक्त करण्यासाठी या रॅलीत प्रयत्न करण्यात आला आणि उपस्थितांनीही या आवाहनाला उत्सूर्फ प्रतिसाद दिला. समाजातील विविध नेते, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यातील व्यक्ती SVEEP मोहिमेच्या बॅनरखाली एकत्र येत असल्याने, ही रॅली मतदान हे कर्तव्य आणि उत्सव दोन्हीचे स्मरण करून देणारी होती.

  • Get ready to witness magic with Kaakbhushundi Ramayan and discover the untold stories from our ancient saga

    The legendary success of Ramanand Sagar’s “Ramayan” is no secret. The show revolutionized television, redefining entertainment and catapulting Doordarshan to unprecedented popularity. Now, the channel joins hands with Sagar World Multimedia to present a tale that promises to leave an indelible mark across the nation.

    In an exciting collaboration, the makers of “Singham Again” have crafted an intriguing video for “Kaakbhushundi Ramayan,” which will air on Doordarshan. This series aims not only to enlighten us but also to portray the iconic story from a different lens. Audiences can expect a visual spectacle, with captivating moments that will stay etched in their hearts.

    Sagar World Multimedia brings to an unforgettable tale with a visual spectacle that is unforgettable_

    The show evokes a nostalgic feeling among viewers, blending high-tech VFX and music to deliver a culturally rich experience with superior technology. “Kaakbhushundi Ramayan – Untold Stories,” produced by Sagar World Multimedia, is set to premiere on Doordarshan (DD1) starting 18th November 2024, airing Monday to Friday at 7:30 PM.

    Creative director and producer Shiv Sagar shares his excitement regarding the show and said, “We are thrilled to bring these untold stories from Ramayan and present it in an interesting manner for the audiences to have an unforgettable experience. The series is an amalgamation of advanced techniques, mega scale of production, impressive music and discovering some facts that we have been unaware of.”

    The series is helmed by creative director and producer Shiv Sagar, the grandson of the late Dr. Ramanand Sagar, who brought the epic to life in 1987, captivating millions of hearts worldwide. At a time when television was in its nascent stages in India, Ramanand Sagar’s “Ramayan” became the most-watched television series, with an estimated viewership of over a billion people globally. It has been broadcast in over 65 countries and has remained on-air since its first telecast on 25th January 1987.

    Sagar World Multimedia, headed by Shiv Sagar, continues the legacy of creating impactful content. Shiv Sagar’s father, Prem Sagar, who was the marketing director of Sagar Arts and an award-winning cinematographer, directed the award-winning series “Vikram Aur Betal” in 1985. This series became the precursor to “Ramayan,” serving as a test-marketing effort for this new genre, which was non-existent at the time.

    Join us as we relive the magic and grandeur of “Kaakbhushundi Ramayan” and celebrate the festival of lights with a story that promises to be as timeless and unforgettable as the original epic.

  • अनुपम खेर हे एक चमत्कार आहेत… मला अभिमान आहे की त्यांनी कधी लढाई थांबवली नाही!’ : महेश भट्ट

    1984 मध्ये, प्रख्यात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी राजश्री फिल्म्सद्वारे बनवलेल्या सारांश या कल्ट क्लासिक चित्रपटासाठी अनुपम खेर यांच्या रूपात एक ‘चमत्कार’ शोधला. महेश यांनी एका तरुण, महत्वाकांक्षी आणि संतापलेल्या अभिनेत्याला पडद्यावर ६९ वर्षांचा दु:खी पिता म्हणून साकारले, आणि त्यानंतर इतिहास घडला. अनुपम खेर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि त्यांच्या अद्वितीय अभिनय क्षमतेच्या जोरावर भारतीय सिनेमाच्या पानांवर कायमचे नाव कोरले.

    आज विजय 69 च्या रिलीजच्या दिवशी, महेश भट्ट यांनी त्यांच्या दीर्घकालीन मित्र अनुपम यांना एक खास ४० वर्षांचा सारांश चा आठवणींचा पोस्टर भेट देऊन आश्चर्यचकित केले—एक चित्रपट ज्याने जगाला सांगितले की हा अभिनेता एक दिवस महान बनणार आहे.


    महेश भट्ट यांनी अनुपमला एक पत्रही दिले, ज्यात ते लिहितात, “अनुपम खेर हे एक चमत्कार आहेत—या इंडस्ट्रीच्या ठोस कंक्रीटमध्ये फुललेल्या एका हट्टी फुलासारखे… त्यांनी ५४२ पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत, पण त्यांच्यातली भूक आजही जिवंत आहे, तशीच जशी ते मला पहिल्यांदा भेटले होते. ती ज्वाला—ती आजही प्रज्वलित आहे.”

    महेश भट्ट पुढे लिहितात, “४० वर्षांनंतर, ६९ व्या वर्षी, अनुपम अजूनही धावत आहेत—खरेच. विजय 69 मध्ये त्यांची नवीन भूमिका एक ट्रायथलॉन अॅथलीट आहे, जी त्यांच्या जीवनाशी सुसंगत आहे. ते आमच्या इंडस्ट्रीचे ‘मॅराथन मॅन’ आहेत, जे स्वतःला अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे इतरांनी हार मानली असती, त्यांचा प्रवास परत त्याच ठिकाणी पोहोचतो, जिथून त्यांनी प्रारंभ केला होता—एक नवा अशक्य वाटणारा स्वप्न पुन्हा साध्य करण्यासाठी.”

    महेश भट्ट यांनी आणखी लिहिले, “चाळीस वर्षांनंतर, मला अभिमान आहे—अभिमान आहे की त्यांनी कधी लढाई थांबवली नाही, त्यांनी तो बेचैन आत्मा कधी हरवला नाही ज्याने त्यांना अनुपम खेर बनवले. हा सलाम अनुपम ला, जो अजूनही धावत आहे, अजूनही स्वप्न पाहत आहे. त्यांनी आम्हाला दाखवले की आयुष्याला पूर्णविराम नाही; तुम्ही तेव्हा धावता जेव्हा सर्व प्रकाश विझतात. आणि ४० वर्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी विजय 69 च्या पेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो? तीन वेळा सलाम, अनुपम—तुम्ही माझी परंपरा आहात.”

    महेश भट्ट यांनी विजय 69 च्या रिलीज निमित्त काढले अनुपम खेर बद्दल गौवोद्गार 

    अनुपम यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सारांश चे हे विशेष पोस्टर आणि महेश भट्ट यांनी लिहिलेला पत्र भावूक संदेशासह पोस्ट केले

    अनुपम यांनी महेशचे आभार मानत लिहिले, “”या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ती माझी उत्सुकता आहे, माझ्या गुरु, मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरक महेश भट्ट यांनी मला भारतीय फिल्म इंडस्ट्रीत ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन दिले! अनेक वर्षे माझ्या कामावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले आहे, पण आज मला असं वाटतंय की मला अंतिम पुरस्कार मिळाला आहे.

    ते पुढे म्हणतात “या चित्रात जे तुम्हाला दिसत नाहीत, ते आहेत ते अश्रू, जे या क्षणी माझ्या डोळ्यात आले. तुम्ही माझ्या भावना पाहू शकत नाहीत, तुम्हाला दिसत नाही की महेश भट्ट यांच्या या प्रेमळ आणि उदारतेच्या हावभावाने मला किती भावूक केले आणि कितीतरी जुन्या आठवणी जागवल्या. त्यांनी माझ्यासाठी लिहिलेलं मी परत परत वाचत होतो, आणि मी निशब्द झालो. मी काही बोलू शकलो नाही आणि कृतज्ञतेने त्यांचा हात धरून बसलो.

    महेश भट्ट हे ते व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी मला एक अभिनेता म्हणून ओळख दिली. त्यांनी मला त्या व्यक्ती आणि कलाकाराचं घडवलं जे मी आज आहे. त्यांनी मला प्रत्येक पातळीवर रूपांतरित केलं. मी कायमच त्यांचा ऋणी राहीन, त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं.

    धन्यवाद महेश भट्ट, आज माझ्या खास चित्रपटाच्या #Vijay69 च्या रिलीज दिवशी मला असे अनुभवायला लावल्याबद्दल ❤️💫🙏. तुम्हीच कारण आहात की मी इथे आहे..”.

    #Vijay69onNetflix #YRFEntertainment @yrf @netflix_in”

  • बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. तीन मैत्रिणींच्या मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर दर्शवणारा हा कमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एकत्र आलेल्या या तीन मैत्रिणी कशा आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातात आणि मैत्रीतून जगण्याची एक वेगळी दिशा शोधतात, हे या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

    गुलाबी’ मैत्रीचा प्रवास उलगडला…

    गुलाबी’ ही कथा फक्त मैत्रीची नसून, त्यांच्या वैयक्तिक संघर्षांची आणि आत्मसन्मानाच्या शोधाची गोष्ट आहे. या प्रवासात श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका मुख्य आहेत. तिघींच्या प्रवासाची रंगमय झलक ट्रेलरमध्ये दिसत असतानाच जयपूरमधील विविध रंगांचे आणि सौंदर्याचे दर्शनही घडत आहे.

    दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ” या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मैत्री, स्वप्न आणि स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकला आहे. गुलाबी केवळ स्त्रियांच्या भावविश्वाचा कहाणी नसून त्या आपला प्रवास कसा घडवतात, हेही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या जीवनात असलेल्या गुलाबी रंगाची छटा दाखवली आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना एक सकारात्मक दृष्टिकोन देईल, याची मला खात्री आहे.”

    अभ्यंग कुवळेकर यांनी दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाची निर्मिती सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संगीतकार साई-पियुष यांचे संगीत चित्रपटाच्या भावनांना आणखी उजळवते, ज्यामुळे ही कथा प्रेक्षकांना अधिक भावते.