
-
बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा!
प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं भावनिक, प्रेमळ आणि रोमांचक असून या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुख हे प्रमुख कलाकार आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध गायिका जाई देशमुख यांनी गायलं असून अमेय मुळे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर या गाण्याची गीतरचना सुप्रसिद्ध गीतकार अंबरीष अरुण देशपांडे यांनी केल आहे. त्यांनी या आधी १५ हून अधिक चित्रपटांचे गीत लेखन तसेच ३० हुन अधिक युट्युब सिंगल्स, अनेक जींगलस् आणि जाहिरात लेखन केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन अमोल तुमणे याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती सुप्रसिद्ध गायिका जाई देशमुख यांनी केली आहे.

अभिनेता आदिश वैद्य ‘कशी ओढ’ गाण्याविषयी सांगतो, “मला या गाण्याची विचारणा केली असता मी हे गाण ऐकताच क्षणी होकार दिला. गाण्याच्या चित्रीकरणावेळी सेटवर खूप मज्जा मस्ती केली. गाण्याच्या रिहर्सलला मला वेळच मिळाला नव्हता. परंतु गाण्याच्या चित्रीकरणावेळी मला खूप टेन्शन आल होत. मी आणि जाईने मिळून एकाच टेकमध्ये शूट पूर्ण केले. त्यामुळे गम्मत म्हणजे पॅकअप करून सगळ्यांना वेळेत घरी जाता आल. सोशल मीडियावर गाण्याच्या टीज़र ला आणि गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.”

गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!
गायिका, अभिनेत्री आणि निर्माती जाई देशमुख तिच्या पहिल्या वहिल्या ‘कशी ओढ’ या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, ”मी ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण करत आहे. या आधी मी भरत जाधव यांच्यासोबत पुन्हा सही रे सही या नाटकात मी मीरा ही भूमिका साकारली आहे. या नाटकाच दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केल आहे. शिवाय अशोक पत्की यांनी मला तुकाराम चित्रपटात पार्श्वसंगीत गाण्याची संधी दिली. अभिनय, गायन आणि निर्माती म्हणून प्रोडक्शन सांभाळण हे जबाबदारीच काम होत. पण यातून खूप शिकायला मिळाल. पहिलच गाण आणि ते ही ‘पॅनोरमा म्युझिक’ सारख्या नामांकित रेकॉर्ड लेबलने घेण हे सर्वच माझ्यासाठी स्वप्नवत होत. शाळेतल पहिल निरागस प्रेम या गाण्यातून एस्थेटिकली दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि मी आशा करते की हे गाण प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

-
२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप. महाराष्ट्राचा पहाडी आवाज असं बिरुद मिळालेले लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी,नाटकं व आठवणी आजही मराठी रसिक मनावर रुंजी घालत आहेत. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहीर विठ्ठल उमप यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे आयोजित होणारा ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला संपन्न होणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. हा पुरस्कार विशेष मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. यावर्षी पुरस्कार प्राप्त नामवंत मंडळी कोण असतील? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याविषयीची घोषणा विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदेश विठ्ठल उमप शनिवार ९ नोव्हेंबरला एका पत्रकार परिषदेत करणार आहेत.
याआधी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले, डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
-
‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत त्यांनी लेखक आणि दिगदर्शक म्हणूनही मनोरंजनसृष्टीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सध्या मात्र एका वेगळ्याच कारणाने ते प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. गोल्डमॅन म्हणून सध्या ते सगळीकडे वावरतायेत. त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे त्यांना ही आवड कधी निर्माण झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आगामी ‘पाणीपुरी’ या चित्रपटातील ‘बबन’ ही व्यक्तिरेखा ऋषिकेश जोशी साकारत असून या बबनला अंगावर दागिने घालून मिरवण्याची हौस आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.
मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ऋषिकेश जोशी सांगतात, अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा ‘बबन’ हे एक मजेशीर पात्र आहे. बबनच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि घड्याळ असते. मला स्वतःला ही भूमिका करताना मजा आली. त्यामुळे प्रेक्षकही ही भूमिका एन्जॉय करतील असा विश्वास ते व्यक्त करतात. या चित्रपटात ऋषिकेश जोशी, यांच्यासोबत विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर,अभय गिते आदि कलाकार आहेत.
चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.
-
Pro Panja League and Hon’ble Sports Minister of Mizoram Lalnghinglova Hmar announce Mizoram Mega Matches in December

Aizawl, 7 November 2024: Pro Panja League, in the presence of the Hon’ble sports minister of Mizoram, Lalnghinglova Hmar, has announced a mega event featuring a wide range of Armwrestlers from across India in the hill city of Aizawl during the second half of December 2024.
The mega matches will be headlined by renowned Mizo armwrestler, Denic Lalruattluanga Vangchhia who will go against an international armwrestler. Denic has recently stolen the spotlight for winning gold in the Asian Armwrestling Cup and helping India finish runner-up behind Kazakhstan. Pro Panja League also named Denic as the Indian player of the tournament and was felicitated and given a cash reward of 35,000 INR.
Hon’ble Lalnghinglova Hmar began the proceedings by saying, “I am happy to announce that we’re hosting the Pro Panja League Mega Match Mizoram edition at the Aizawl Winter Festival. This will help showcase our excellent Mizo Armwrestlers to the world and it will inspire a whole generation of Armwrestlers in Mizoram.”
Pro Panja League’s founder, Parvin Dabas thanked Hon’ble Lalnghinglova Hmar for his support and for allowing the league to hold an international event in Mizoram. Parvin stated, “It is going to be one of the best and biggest sporting events Mizoram will see. We are grateful for the opportunity and we will give it our all to make sure the event is a big success.”
The President of the People’s Armwrestling Federation India (PAFI), Preeti Jhangiani too expressed her enthusiasm and said, “PAFI is proud to have the Mizoram Armwrestling Association as a part of this event and we are sure it’s going to be a lot more successful from here.”
The final dates of the event will be announced soon. -
Geetanjali Mishra: My best birthday gift this year is my Mother returning home from Hospital

This Diwali was a rollercoaster of emotions for actress Geetanjali Mishra, who portrays Rajesh on &TV’s Happu Ki Ultan Paltan. Instead of celebrating the festive season as usual, Geetanjali found herself by her mother’s side in the hospital, praying for her recovery after her mother was unexpectedly admitted. Diwali, a time typically filled with light and joy, felt subdued without her mother’s presence at home. With her birthday approaching, Geetanjali’s sole focus was on her mother’s health. She expressed her emotions on social media, sharing her love and hope for her mother’s speedy recovery. Little did she know, a beautiful and unforgettable moment awaited her that would turn her birthday into a celebration far more meaningful than she could have ever imagined. Reflecting on her experience, Geetanjali, aka Rajesh from Happu Ki Ultan Paltan, shared, “This Diwali was an emotional journey. While everyone else was celebrating with lights and laughter, I was by my mother’s side in the hospital, praying for her well-being. Diwali has always been about warmth, family, and togetherness, but without her, our home felt empty despite the festive glow. Every day spent with her reminded me of how fragile life is and how easily we take our loved ones for granted. As my birthday approached, my only wish was to have my mother home, healthy and smiling. Then, just a day before my birthday, I received the most wonderful news: my mother was well enough to be discharged. I’ll never forget the moment she walked back into our home. Her presence at home revived all the warmth and love we had been missing, and it felt as if Diwali had truly come alive again, filling every corner of our home and hearts.”
Geetanjali added, “My mother’s recovery was like a divine blessing, a gift from the universe that I will cherish forever. Her return made my birthday an unforgettable celebration, reminding me of what truly matters in life. This year, I’m grateful for the greatest gift—my mother’s health and her presence. I will hold this memory close, as a reminder to treasure every moment with our loved ones, for they are the true blessings in life.”
Watch Geetanjali Mishra as Rajesh in Happu Ki Ultan Paltan at 10:30 pm, airing every Monday to Friday on &TV! -
“अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्याच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. समोर आलेल्या प्रोमोमधील रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘अशोक मा.मा.’ या मालिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली ,”पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही आमची मालिका आणि माझं काम अशोक मामांना आवडायचं. पण आता ‘अशोक मा.मा’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. भैरवी हे पात्र मी साकारावं यासाठी मामादेखील खूप आग्रही होते. मामांसोबत कॅमेरा शेअर करताना एक जबाबदारीची जाणीव होते. मामा समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. सेटवर त्यांनी अगदी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे. मामा आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलंही दडपण येत नाही. मामांसोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारं आहे. इतक्या मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आता आपल्याला राहता येणार आहे हीच माझ्यासाठी खूप भारी गोष्ट आहे”.
पहा, नवी गोष्ट ‘अशोक मा.मा.’, 25 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.
‘अशोक मा.मा.’ या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली, “भैरवी मुजुमदार असं माझ्या पात्राचं नाव आहे. अतिशय स्ट्राँग, स्वतंत्र, उच्चशिक्षित, मॉर्डन अशी ही मुलगी आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. आधी साकारलेल्या सावीपेक्षा अतिशय वेगळं पात्र मी साकारणार आहे. अशोक मा.मा. या पात्रासोबत भैरवी वाद-विवाद घालताना दिसेल. अर्थात त्यालासुद्धा तितकचं स्ट्राँग कारण आहे. वेगळी गोष्ट असणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांप्रमाणे आता मलाही उत्सुकता आहे”.
‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. पहा, नवी गोष्ट ‘अशोक मा.मा.’, 25 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. -
येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर ८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा*

धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे आणि निर्मिती तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांनी केली आहे.
ZEE5 हा भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकथनकार असून ८ नोव्हेंबर रोजी ‘येक नंबर’ या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजेश मापुस्कर या व्हिजनरी दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या या चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट व सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांची ही निर्मिती असून ‘येक नंबर’मध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय उत्कंठावर्धक घडामोडी आणि थरार यांची सांगड घातलेली आहे.
ही कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरते. तो गावातील एक उमदा आणि राजकारणात करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचे मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकी राज ठाकरे यांची चाहती आहे आणि त्यांच्या विचारांचा तिच्यावर मोठा पगडा आहे. “तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण.”, अशी गळ पिंकी प्रतापला घालते. आपले प्रेम साध्य करण्यासाठी प्रताप हे अशक्यकोटीतील आव्हान स्वीकारतो आणि अनपेक्षितपणे तो राज साहेबांशी संबंधित एका हत्येच्या कटात गोवला जातो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रतापला योग्य-अयोग्याच्या गढूळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि या प्रवासात धक्कादायक वळणांनी भरलेली एक थरारक कथा उलगडत जाते.
‘येक नंबर’ हे एक खिळवून ठेवणारे कथानक आहे आणि यात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेम व राजकारणाचे नाट्य गुंफलेले आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हाने यांची सांगड घालून या चित्रपटात प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.
ZEE5चे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कालरा म्हणाले, “आमच्या मराठी पोर्टफोलिओमध्ये ‘‘येक नंबर’’ या चित्रपटाची भर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रेम व राजकीय नाट्य यांची या चित्रपटात उत्तम प्रकारे सांगड घातली आहे. ‘धर्मवीर २’ या चित्रपटानंतर आमच्या मराठी कंटेन्टमध्ये ही उत्तम कलाकृती समाविष्ट झाली आहे. यातून, विविध प्रकारची कथानके सादर करण्याप्रती असलेली आमची प्रतिबद्धता दिसून येते. स्थानिक कथांमध्ये असलेल्या ताकदीवर आमचा विश्वास आहे आणि ‘येक नंबर’ हा चित्रपट या व्हिजनशी पूर्णपणे सुसंगत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि प्रेक्षकांना उत्तम कथानकांच्या माध्यमातून खिळवून ठेवणारा कंटेन्ट सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
‘येक नंबर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले, “‘येक नंबर’ हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक प्रवास होता. या चित्रपटात प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन भावना गुंफल्या आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE5च्या माध्यमातून हा चित्रपट अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याचा मला अत्यंत आनंद आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना घरी बसून आमच्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. ‘येक नंबर’च्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील प्रेम व विचारधारा यावर अर्थपूर्ण चर्चा घडेल.”
‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या तेजस्विनी पंडित म्हणाल्या, “आम्हाला ही प्रभावी कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ZEE5 सोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. ‘येक नंबर’मध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता आहे आणि इतके गुणवान कलाकार आणि राजेश मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन ही केवळ सुरुवात आहे. आम्ही पुढील प्रवासाबाबत आशावादी आहोत आणि ZEE5 च्या माध्यमातून ही अप्रतिम कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत.
‘येक नंबर’ चित्रपटात प्रतापची व्यक्तिरेखा साकारणारे धैर्य घोलप म्हणाले, “प्रताप ही व्यक्तिरेखा साकरण्याचा अनुभव अतुलनीय होता आणि प्रेक्षकांकडून या व्यक्तिरेखेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने मी अत्यंत रोमांचित झालो आहे. प्रेम आणि महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेला प्रतापचा प्रवास आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झगडणाऱ्या अनेकांचा संघर्ष अधोरेखित करतो. चित्रपटाचे प्रभावी कथानक, आमच्या प्रतिभावान कलाकारांचा उत्तम अभिनय आणि दिग्दर्शकांचे व्हिजन यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी अनुभूती तयार झाली आहे. ZEE5वर चित्रपटाचा प्रीमियर होत असताना, आमच्या चाहत्यांसोबत या प्रवासात पुढे जाण्यास मी उत्सुक आहे.’’ -
Fifth Edition of Indian Sports Honours 2024 Set to Celebrate India’s Top Athletes

Mumbai, November 6, 2024: The Indian Sports Honours (ISH) is back with its fifth edition,
aiming to spotlight India’s finest athletes and their remarkable performances from October
2023 to September 2024.
Conceptualized by Cornerstone Sport, the honours celebrate
achievements across a broad range of sports, including Olympic sports, Paralympic
sports, the Asian Games, and the Commonwealth Games, along with Cricket, Squash, and
Chess. This year’s event follows a detailed selection process, set to culminate in a grand
honours ceremony where winners will be revealed live on stage.
The prestigious Indian Sports Honours, conceptualized by Cornerstone Sport, returns to
honor outstanding achievements in Olympic, Paralympic, Asian Games, Commonwealth Games, and other key sports.
Indian Sports Honours has partnered with Ernst & Young LLP (EY) acting as the Process
Advisors to oversee and validate the entire selection and jury process with inputs from
Sportskeeda.
The jury for this esteemed event features a distinguished panel of sports icons, led by
Abhinav Bindra, a member of the IOC and India’s first individual Olympic medal, as a
chairperson. Alongside him will be legendary Indian athlete and President of the IOA, P.T.
Usha, former World Number One shooter, Anjali Bhagwat, and Sanjog Gupta, Head of
Sports at Disney+ Star. The jury will also include Boxing Olympic Bronze medalist in 2008
Vijender Singh, Wrestling Bronze medalist in 2012, Yogeshwar Dutt, and former Indian
hockey captain and player, Sardar Singh, as they all bring their combined expertise and
insight into the selection process.In a comprehensive and transparent evaluation, nominations will be shortlisted for ten
prestigious Jury Honours and four Popular Choice Honours. The Jury Honours include
categories such as Sportsman of the Year, Sportswoman of the Year, and Team of the Year,
while the Popular Choice Honours allow fans to participate in recognizing their favorite
athletes through online polls currently live on Twitter.
Jury Honours: Sportsman of the Year (Individual), Sportswoman of the Year (Individual),
Para-Athlete of the Year (Male), Para-Athlete of the Year (Female), Coach of the Year
(Male), Coach of the Year (Female), Team of the Year (Male), Team of the Year (Female),
Sportsman of the Year (Team), and Sportswoman of the Year (Team).
Popular Choice Honours: Breakthrough Performance of the Year (Male), Breakthrough
Performance of the Year (Female), Fan Club of the Year, and Club of the Year.
In addition to the established categories, there will also be a Lifetime Achievement
Honour, and a new Grassroots Initiative of the Year Honour that has been introduced this
year. This honour seeks to facilitate organizations and individuals making significant
contributions to the development of sports at the grassroots level. By focusing on the
promotion and nurturing of young talent, this initiative aims to inspire a culture of
sportsmanship from the ground up. The honour will recognize those who have successfully
implemented programs that engage, educate, and empower aspiring athletes, creating
pathways for future sports stars. The recognition of these programs will motivate others to
follow the same path, laying down a definite pathway for future athletes.
Bunty Sajdeh, CEO Cornerstone Sport said, “We’re thrilled to return with the fifth edition of
Indian Sports Honours. This platform allows us to celebrate India’s finest sporting talent
and share their journeys with a larger audience. Their journeys, combined with the support
from fans, inspires us to make the event bigger and better every year.”
The Indian Sports Honours is a prestigious event that brings together India’s sports
community and entertainment icons to celebrate our nation’s athletes. This powerful
convergence of sportsmanship and entertainment shines a spotlight on the dedication,
talent, and spirit of our athletes, making it an unforgettable celebration of excellence. -
“My Captain forever” – Shah Rukh Khan’s reply to Gautam Gambhir in a wholehearted exchange on X (Twitter)

Mumbai, 5th November: Former Indian cricket and current head coach of the Indian Cricket Team, Gautam Gambhir marked Bollywood superstar Shah Rukh Khan’s birthday with a warm and witty tribute on social media. The two have a long standing association with each other via the Indian Premier League franchise, Kolkata Knight Riders.
The actor is the owner of the franchise since its inception in 2008. It was in fact under Gautam Gambhir’s leadership that the Kolkata Knight Riders won two IPL titles in 2012 and 2014. They were also champions in 2024, when the former captain returned to the team as a mentor.
Gambhir took to social media to wish the Bollywood actor on his birthday on November 2nd. The post celebrated the actor’s timeless charm, while humorously describing him as “the man who keeps turning 25.” Gambhir said:
“Here’s to the man who keeps turning 25! Your energy, charisma & charm gets more youthful every year! May you keep spreading love forever! @iamsrk”
https://x.com/GautamGambhir/status/1852699214926446778
Shah Rukh Khan responded in his typical charming manner, jokingly questioning his age while honouring Gambhir as an inspiration and his “Captain forever.” He said:
“I’m 25?!? I thought I was younger…. Ha ha… thank you GG for being such an inspiration. And the honesty u bring to life. My Captain forever and more. Love u”
https://x.com/iamsrk/status/1853749185453154527?s=48
This light-hearted exchange reflects the camaraderie and bond between the two icons. It illustrates the kind of mutual respect and admiration between the two icons, in their respective fields. -
धर्मवीर २” या चित्रपटाला एकाच आठवड्यात ५० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज!!

साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या “धर्मवीर २” या चित्रपटानं मोठा मान मिळवला आहे. झी5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज “धर्मवीर २” या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
“धर्मवीर २” या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, समीर धर्माधिकारी, हृषिकेश जोशी, आनंद इंगळे, कमलेश सातपुते, मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर “धर्मवीर २” हा चित्रपट झी5 या ओटीटीवर लाँच करण्यात आला.
झी 5 ओटीटीवर “धर्मवीर २” या चित्रपटाला एकाच आठवड्यात ५० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी वाळवी या चित्रपटाला एका आठवड्यात १४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यामुळे “धर्मवीर २” चित्रपटानं वाळवी चित्रपटाला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ओटीटीवरही जगभरातील प्रेक्षकांनी “धर्मवीर २” या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
