
-
छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत.
हे गाणं आपल्या राष्ट्रवीर आणि हिंदवी स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव साजरा करतो. या गाण्यात उत्तम कलाकारांची तगडी फौज आहे ज्यामध्ये ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील हे महत्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाबद्दल निर्माते संदीप रघुनाथ मोहिते-पाटील म्हणतात, “ “छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील नायक नसून ते आजही प्रेरणादायी आहेत. ‘राजं संभाजी’ हे गाणं त्यांचं धैर्य, त्याग आणि आदर्श जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत महाराजांच्या शौर्यगाथेचा संदेश पोहोचेल.”
चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार शेलार म्हणतात, “‘राजं संभाजी’ हे गाणं चित्रपटाच्या हृदयाशी जोडलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्यशील व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाला संगीताच्या रूपात साजरं करणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. या गाण्यातून त्यांची वीरता, निष्ठा आणि संघर्ष रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मला खात्री आहे राज संभाजी गाणं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल.”
धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘राजा संभाजी’ हे गाणं महानायकाच्या शौर्यला सन्मान देणारे ठरेल.
संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत व उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे. येत्या २२ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. -
गगन सदन तेजोमय’ सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट!

मुंबई – (सांस्कृतिक प्रतिनिधी) :* १९ वर्षांपूर्वी दिवाळी पहाट सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा रुजवणाऱ्या ‘ॲड फिज’च्या ‘गगन सदन तेजोमय’ची यावर्षीची २० वी दिवाळी पहाट विशेष संस्मरणीय ठरली. एक अविस्मरणीय भक्तिरसातील सुमधुर संगीताचे अनोखे पर्व साजरे करत ‘मोगऱ्याच्या सुगंधाने ही पहाट अनोखी ठरली. या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्याने संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. त्यांच्या रचनांवर आधारित ‘मोगरा फुलला’ या शब्द-सुरांच्या गंधात रसिक रंगून गेले होते.

संत ज्ञानेश्वरांच्या दैवी स्वरांनी मोगरा फुलला!
समाजातील प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्थांना गौरविण्याची परंपरा जपत यावर्षीचे ‘गगन सदन तेजोमय’चे ‘ध्यास सन्मान’ वैद्यकीय सेवा कार्यासाठी समर्पित करण्यात आले होते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या सेवाभावी संस्थेला आणि “सेवा हेच जीवन” हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे (MBBS) यांना ध्यास सन्मानाने गौरवण्यात आले. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आणि डॉ. अविनाश फडके, डॉ. माधुरी गवांदे या मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ध्यास सन्मान’ देण्यात आले. डॉ. सुल्तान प्रधान यांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा पुरस्कार त्यांच्या कन्या टीना नायडू यांनी स्वीकारला.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया”, मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना ‘ध्यास सन्मान’ बहाल!
‘गगन सदन तेजोमय’च्या ‘मोगरा फुलला’ या विशेष मैफिलीत श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर यांनी त्यांच्या मधुर आवाजात ज्ञानेश्वरांच्या रचना सादर केल्या. निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, आणि अभय ओक या ख्यातनाम कलाकारांनी वाद्यांची साथ दिली. या मैफिलीत विदुषी धनश्री लेले यांनी अत्यंत सुरेख निरूपणाद्वारे कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाला सुगंधित बनवले. संत ज्ञानेश्वरांच्या गूढ आणि आध्यात्मिक विचारांनी ओतप्रोत भरलेल्या या अभंगांचा अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीतून उपस्थितांना दिला. ‘ॲड फिज’ची प्रस्तुती असलेल्या या संपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती विनोद पवार तर संयोजन महेंद्र पवार यांचे होते.

-
मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित – दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली. येत्या वर्षात २३ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
येत्या २३ जानेवारी २०२५ (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!!
‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या शीर्षकाने सर्वांच्या मनात कुतूहल चाळविलें असून अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदीराची रेखीव प्रतिमा या शीर्षक पोस्टरवर असून अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीच्या प्रथम वर्षपूर्तीचे निमित्त साधून हा चित्रपट येत्या वर्षात २३ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
समीर रमेश सुर्वे यांनी यापूर्वी व.पु. काळे यांच्या लोकप्रिय कादंबरीवरील ‘श्री पार्टनर’, ‘शुभलग्न सावधान’, ‘जजमेंट’ या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन दिग्दर्शन आणि ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’चे संवाद लेखन तसेच भोजपुरीतील ‘नचनिया’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. अत्यंत कल्पक आणि शिस्तबद्ध दिग्दर्शक म्हणून समीर हे चित्रपटसृष्टीत सुपरिचित आहेत.
‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची कथा रामभक्ती आणि अयोध्या या ऐतिहासिक संदर्भात गुंफलेली असल्याने चित्रपटाबद्दल जनमानसात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीशी संबंधित इतर सदस्यांची नावे अद्याप गुपित ठेवली गेली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार, याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे.
दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “मिशन अयोध्या’ हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रामप्रेमाच्या आदर्शांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो., एक विशेष औचित्य साधून प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.” -
गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

2024 हे वर्ष शर्वरीसाठी अतिशय खास ठरलं आहे. तिने ‘मुंज्या’ या पहिल्या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरमध्ये चमक दाखवली, नंतर ‘महाराज’ या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये झळकली आणि तिच्या तिसऱ्या ‘वेदा’ चित्रपटासाठीही अभिनय कौशल्यासाठी तिला एकमुखाने दाद मिळाली. शर्वरीला आता बॉलिवूडची नवी उगवती तारा म्हणून ओळखले जात आहे आणि या दिवाळीला ती व तिचे कुटुंब प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मनःपूर्वक कृतज्ञ आहेत.
शर्वरी म्हणते, “गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे. मला फक्त कृतज्ञता व नशीबाची जाणीव होत आहे की 2024 मध्ये मला हे अनुभवता येत आहे. मागील तीन वर्षे माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून खरोखर कसोटीची वेळ होती. हा अस्तित्वाचा लढा होता. रोज संघर्ष, चित्रपट शोधणे आणि सतत ऑडिशन देणे. म्हणून मला माझ्या मनापासून उत्सव साजरा करता आला नाही. मला वाटते, प्रत्येकाच्या बाबतीत असेच होते जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे जात नाहीत. मी खूप आनंदी आहे की, शेवटी कष्ट फळाला आले आहेत.”
शर्वरी पुढे सांगते, “मी या दिवाळीला आणखी यश, अधिक मान्यता आणि सर्वांच्या कडून अधिक प्रेमासाठी प्रार्थना करते आहे. मला माहीत आहे की, माझे कुटुंबही यावर्षी खूप आनंदी आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून आता अधिक हसत आहोत. ज्या वेळी माझ्यासाठी कठीण काळ होता, त्या वेळी त्यांनी माझा आधारस्तंभ म्हणून माझी साथ दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानते.”
दिवाळीतल्या लहानपणीच्या आवडत्या आठवणींविषयी सांगताना शर्वरी म्हणाली, “दरवर्षी नरक चतुर्दशीला आम्ही सूर्योदयापूर्वी उठतो. मोठी चटई टाकतो, दिवे लावतो, जुनी मराठी गाणी लावतो आणि गरम तेल, उटणे आणि केशर एकमेकांच्या हातांवर आणि चेहऱ्यावर लावतो. याला ‘पहिली पहाट’ म्हणतात. हिवाळ्याची सुरुवात दर्शवणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.”
ती पुढे म्हणाली, “त्यानंतर केशर आणि उटनाने आंघोळ करतो – हे सर्व सूर्योदयाच्या आधी केले जाते. नंतर सगळे मिळून फराळाच्या नाश्त्याचा आनंद घेतो. फराळामध्ये गोड आणि चटकदार पदार्थ असतात, जे दिवाळीपूर्वी 3-4 दिवसांपासून केले जातात – त्यात चकली, चिवडा, शेव, करंजी, शंकरपाळे, बेसन लाडू असे अनेक पदार्थ असतात. आम्ही हे टेबलवर वाढतो, आणि नाश्त्याच्या वेळी एकत्र बसून मनसोक्त गप्पा मारतो.”
दिवाळी आपल्या कुटुंबासोबत कशी साजरी करते, यावर बोलताना शर्वरी म्हणते, “माझ्यासाठी दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणे खूप महत्त्वाचे आहे. माझा भाऊ शाळेत आहे, त्यामुळे त्याला दिवाळीच्या सुट्ट्या असतात. माझी बहिणही ऑफिसमधून सुट्टी घेते. आपल्या परिवारासोबत राहणं, जेवणानंतर मिठाईवर चर्चा करणं, यापेक्षा सण साजरा करण्याचा कोणता आनंद असू शकतो? हा एक असा भाग आहे जो मला खूप आवडतो आणि आनंद देतो.”
शर्वरी लवकरच वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या मोठ्या ॲक्शन एंटरटेनर ‘अल्फा’ मध्ये बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्टसोबत झळकणार आहे. -
फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय वाघ, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
२४ जानेवारीला होणार प्रदर्शित
पोस्टरमध्ये एक एकत्रित कुटूंब दिवाळी साजरी सादरी करताना दिसत आहे. यावरून हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा धमाका असणार हे कळतेय. मुळात हेमंत ढोमे यांचे चित्रपट हलक्या-फुलक्या पद्धतीने काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांची एखादा संवेदनशील विषय उत्तमरित्या हाताळण्याची प्रगल्भता कमाल आहे. त्यामुळे हा चित्रपटही काहीतरी हटके असणार, हे नक्की!
आपला आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणतात, “दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तुम्हाला भाऊ-बहिणींचे मजेदार आणि भावनिक नातेसंबंध पाहायला मिळतील, त्यासोबतच भावंडांमधील प्रेम आणि नोकझोक पाहायला मिळेल. हास्य आणि हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली ही कथा आपल्यापैकी अनेकांना आपली वाटेल. भावंडांमधली गोड नाती असोत किंवा खेळकर वादविवाद, ही गोष्ट तुमच्या आठवणींना पुन्हा जागं करेल.”
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा चित्रपट माझ्या जीवनातील काही अनुभवांवर आधारित आहे. भावंडांची आणि त्यांच्या इरसाल कुटूंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल आपल्या नातेवाईकांची, सग्या सोयऱ्यांची आठवण करून देईल आणि आपण आपल्याच कुटूंबाची कथा मोठ्या पडद्यावर बघतोय असा अनुभव प्रेक्षकांना देईल याची मला खात्री आहे.”
‘फसक्लास दाभाडे’ हा टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे ज्यामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे हे पुन्हा एकदा ‘झिम्मा २’ नंतर एकत्र येणार आहेत. २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे वितरण अनिल थडानी यांच्या ए ए फिल्म्सने केले आहे. -
Sonu Nigam Launches Meenal Nigam’s Maate Lakshmi Maate with Lalita Goenka and Sanjeev Kohli

The Senate Hall at The Club became a haven of devotion as Maate Lakshmi Maate, a soulful bhajan honoring Goddess Lakshmi, was launched in an atmosphere filled with reverence and spirituality. The bhajan, performed by Meenal Nigam—a yogini and healer—interweaves Lalita Goenka’s profound lyrics with Sanjeev Kohli’s stirring composition, creating a tribute that deeply moved the audience.

The launch saw an impressive gathering of luminaries, including Sonu Nigam, Agam Kumar Nigam, Sanjay Tandon, Padmashri Anup Jalota, Smita Thackeray, Shamir Tandon, Nikhil Kamath, Rabbani Mustafa, and Sonu Shrivastava. Agam Kumar Nigam extended his heartfelt congratulations to Sanjeev Kohli, describing his composition as “immortal.” Reflecting on his sister’s spiritual journey, Sonu Nigam shared, “Meenal’s voice holds a unique healing energy. *Maate Lakshmi Maate* captures that essence beautifully, with Lalita Goenka’s heartfelt words and Sanjeev Kohli’s melody transforming it into a sacred offering.”

Distinguished journalists such as Soumya Vajpayee, Debarati Sen, Chirantana Bhatt, Chaitanya Padukone, Kumar Mohan, and Dr. (Hon) Anusha Srinivasan Iyer were also present, witnessing the bhajan’s formal unveiling. A two-minute rendition enveloped the hall, creating an atmosphere of tranquility and devotion.
Padmashri Anup Jalota, a revered figure in devotional music, noted, “This song serves as a bridge to the divine.” Sanjay Tandon echoed these sentiments, adding, “Music like *Maate Lakshmi Maate* transcends boundaries, radiating pure devotion to all who hear it.”
About Maate Lakshmi Maate
Now streaming on T-Series, Maate Lakshmi Maate is a devotional masterpiece designed to connect listeners with the blessings of Goddess Lakshmi. Its powerful lyrics and uplifting melody make it a beautiful choice for spiritual gatherings and moments of personal reflection.
-
सोनी मॅक्सवर आपल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी अक्षय कुमार म्हणाला, “प्रत्यक्ष जीवनात टायगर माझा ‘छोटे’च आहे!”

बॉलीवूडचे दोन अॅक्शन स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आपल्या जबरदस्त अॅक्शन-कॉमेडीने परिपूर्ण असा ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येत आहेत! अली अब्बास झफर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर सोनी मॅक्सवर 27 ऑक्टोबर 2024 रोजी बघायला मिळणार आहे.
या प्रीमियरच्या आधी अक्षय कुमारने या चित्रपटात टायगर श्रॉफ बरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. तो म्हणतो, “टायगर मला लहान भावासारखा आहे. आमच्या दोघांची लगेच गट्टी जमली होती. आम्ही तासन् तास एकत्र असायचो- अटीतटीची अॅक्शन दृश्ये करण्यापासून ते वॉलीबॉल आणि लुडो खेळून रिलॅक्स होण्यापर्यंत सारे काही आम्ही केले. त्याचे वागणे अत्यंत व्यावसायिक आहे आणि मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो. मी प्रामाणिकपणे सांगतो की, टायगरसोबत शूटिंगचे दिवस मला खूप आठवणार आहेत! प्रत्यक्ष जीवनात तो खरोखर माझा ‘छोटे’च आहे.”
‘बडे मियां छोटे मियां’ ही त्या क्लासिक चित्रपटाची आधुनिक आवृत्ती आहे, ज्यात रोमांचक कहाणी, नेत्रसुखद दृश्ये आणि जबरदस्त अॅक्शन दृश्ये आहेत. यामध्ये दोन माजी सैनिकांची कहाणी आहे, जे जगाला एका भयानक धोक्यापासून वाचवण्यासाठी सैन्यात दाखल होतात.
‘बडे मियां छोटे मियां’ म्हणजे अॅक्शन, कॉमेडी आणि नाट्य यांचे एक खुमासदार रसायन आहे, जे लहान-थोर सर्वांना नक्कीच भावेल! या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला विसरू नका, 27 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी मॅक्सवर -
“मोगरा फुलाला” संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफिल!

मुंबई – २३ ऑक्टो : (सांस्कृतिक प्रतिनिधी)* समाजासाठी प्रतिकुल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्था यांचा ‘ॲड फिज’द्वारे “गगन सदन तेजोमय” या दिवाळी पहाट सोहळ्यात ‘ध्यास सन्मान’ देऊन गौरव करण्याची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सण साजरा करण्याची ही अनोखी परंपरा विनोद आणि महेंद्र पवार यांनी १९ वर्षांपूर्वी सुरु केली होती. आपल्या संस्कृतीचे पावित्र्य त्यासोबत उत्तम दर्जा हे “गगन सदन तेजोमय” वैशिष्ट्य आहे. प्रसिध्दी पत्रकाद्वारे आज या वर्षीचे ‘ध्यास सन्मान’ ‘ॲड फिज’ने जाहीर केले असून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया” या सेवाभावी संस्थेला तर “सेवा हेच जीवन” हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे(MBBS) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
ॲड फिजच्या “गगन सदन तेजोमय”चे विसावे वर्ष! १९ वर्षात ५७ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांचा गौरव!!
‘ॲड फिज’ गेली १९ वर्ष विविध संकल्पना घेऊन “गगन सदन तेजोमय” हा दिवाळी पहाट कार्यक्रम करीत आली आहे. संस्थेचे हे २० वे वर्ष असून गेली १९ वर्ष समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ति व संस्था यांचा “ध्यास सन्मान” पुरस्कार देऊन गौरव केला जातो. रुपये २५,०००/- रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया”, मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना २०२४ चे ‘गगन सदन तेजोमय’, दिवाळी पहाट सोहळ्यात प्रदान करण्यात येणार!

मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ प्रतिकुल परिस्थितीतील कॅन्सर रुग्णांसाठी दिलासादायक संस्था म्हणून उभी राहिली आहे. जगविख्यात ‘टाटा रुग्णालया’सोबतच आता मुंबईला हक्काचे आणखी एक कॅन्सरचे रुग्णालय मिळाले आहे. दरवर्षी, ५ लाखांहून अधिक रुग्णांना डोके आणि मानेच्या कर्करोगाचे निदान होते. या पुरस्काराचे दुसरे मानकरी असलेल्या डॉ. सुभाष दिघे यांचा जन्म आणि शिक्षण मुंबई-दादर येथील आहे. 1964 ते 1970 या काळात त्यांनी सर जे जे हॉस्पिटल, मुंबई इथे MBBS ची पदवी संपादन केली. त्यानंतर दोन वर्षाच्या सक्तीच्या नोकरीसाठी कोकणातील ‘आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र’ इथे नेमणूक झाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याशी त्यांचा प्रथम संबंध आला. त्यावेळी संपूर्ण कोकण पायाभूत गोष्टींसाठी संघर्ष करीत होता. रस्ते नाही, वीज नाही, गाड्या नाहीत, कायम पूरसदृष्य स्थिती, आर्थिक दारिद्र्य. वैद्यकीय सेवांचा अभाव, डाॅक्टर, मेडिकल दुकान नाहीत. घरात आणि गावात अस्वच्छता आणि सोबतीला अंधश्रद्धा. त्यावेळी लोकांसोबतच सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे प्रचंड हाल होत असत अश्या परिस्थतीत डॉ. सुभाष दिघे यांनी वीस पंचवीस किमी पायपीट करून तर कधी होडीने जाऊन कंदिलाच्या लुकलुकत्या प्रकाशात रुग्णसेवा, प्रसूती, सर्पदंशाने मृत्यूशैयेवरील रुग्णांना जीवनदान देण्याचे सुरु केलेले सेवाकार्य तेव्हापासून आजमितीस अविरत सुरु ठेवले आहे. मुंबईतून स्वतःच्या खर्चाने औषधे आणून रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या या धन्वंतरीचा ‘गगन सदन तेजोमय’च्या ध्यास सन्मानाने केला जाणारा सन्मान विशेष आहे.
यावर्षी ‘गगन सदन तेजोमय’ दिवाळी पहाट गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ७.०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे साजरी होणार असून ‘मोगरा फुलला’ ही संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफल रंगणार आहे. या मैफिलीची संकल्पना आणि दिग्दर्शन राहुल रानडे यांचे असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर तर सहभाग श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर, निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, अभय ओक यांचा असणार आहे. या मैफिलीचे निरूपण विदुषी धनश्री लेले करणार असून निर्मिती विनोद पवार तर संयोजन महेंद्र पवार यांचे असून प्रस्तुती ‘ॲड फिज’ची असणार आहे.
*प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख* : राम कोंडीलकर(राम पब्लिसिटी)
मो : ८०८०८२२३८५
इमेल : ramkondilkar.pr@gmail.com -
सॅटरडे नाईट’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ

अध्यांश मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू – गंगावणे दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रणाली उन्मेश वाघमोडे आणि उन्मेश विलास वाघमोडे निर्माते आहेत. या थरारक चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले आणि जितेंद्र पोळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद विलास वाघमोडे आणि डॉ सुधीर निकम ह्यांचे असून रविंद्र सिद्धू गावडे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. तर धनाजी यमकर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. छायाचित्रणाची धुरा निशांत भागवत याने सांभाळली असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर होणार आहे.
अध्यांश मोशन पिक्चर्स घेऊन येत आहेत थरारक चित्रपट

‘सॅटरडे नाईट’ हा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित थ्रिलर चित्रपट असून प्रेक्षकांना एक वेगळा थरार यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
‘सॅटरडे नाईट’ विषयी बोलताना दिग्दर्शक विलास वाघमोडे म्हणतात, “हा चित्रपट फक्त गुन्हेगारी तपासावर आधारित नाही, तर मानवी स्वभावाच्या गूढ कोपऱ्यांवर प्रकाश टाकतो. स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. ही कथा जरी काल्पनिक असली तरी त्यात वास्तवाचा अंश आहे, जो प्रेक्षकांना त्यांच्याशी जोडेल.”
अनुप्रिता कडू गंगावणे म्हणतात, “सस्पेन्स आणि थ्रिलर हा असा जॉनर आहे, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेमाला एका वेगळया उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. ” -
गुलाबी’चे टायटल साँग उलगडणार मैत्रीचा रंग

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल यात अनुभवायला मिळत आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांच्यावर चित्रपट करण्यात आलेल्या हा उत्स्फूर्त गाण्याला साई – पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे हंसिका अय्यर यांनी गायले आहे. मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणाऱ्या तिघींचा प्रवास या गाण्यातून उलगडत आहे.

नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच या गाण्याचे सादरीकरणही कमाल आहे. तिघींची बहरत जाणारी मैत्री यात दिसत असतानाच जयपूरचे रंगीबेरंगी सौंदर्यही यात अधिक रंगत आणत आहे. तीन मैत्रिणींच्या जीवनातील अनोख्या प्रवासाची एक झलक या गाण्यातून दिसून येत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ गुलाबी चित्रपटाचं टायटल साँग म्हणजेच या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे. या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नं यांचा एक सुसंवाद प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पिंक सिटीमध्ये घडणाऱ्या या कथेत प्रेक्षकांना जीवनातील विविध रंग अनुभवायला मिळतील. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलं जाईल.”
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती आहे.
