Home

  • अभिनेता अंकित मोहन दिसणार बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्यात, सोशल मीडियावर प्रोमो प्रदर्शित !

    आला बैलगाडा, शिवबाच नाव, लैला मजनू, दोस्ती यारी, अप्सरा या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर बिग हिट मीडिया घेवून येत आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नातं जोडणार एक मराठमोळ ‘पैलवान’ गाण. या गाण्यात अंकित मोहन सोबत भूषण शिवतारे, दीनानाथ सिंग, शंभू आणि आयुष काळे झळकणार आहेत. नुकताच या गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

    मराठमोळ्या लोकसंगीताची जादू जगभर पसरवण्यासाठी ‘बिग हिट मीडिया’ रेकॉर्ड लेबल पुन्हा सज्ज, पैलवान गाण लवकरच भेटीला

    हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर या गाण्याची गीतरचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केली आहे. या गण्याचं दिग्दर्शन मनीष महाजन याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याच्या प्रोमोची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

    अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत!

    निर्माता हृतिक अनिल मनी पैलवान गाण्याविषयी सांगतात, “महाराष्ट्राची संस्कृती तसेच आपल्या मातीतलं मराठमोळं लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबलमार्फत प्रदर्शित करत आहोत. अभिनेता अंकित मोहन याने या गाण्यासाठी आपल्या फिटनेसवर संपूर्ण महिनाभर मेहनत केली आहे. तसेच पैलवान दिसण्यापेक्षा पैलवान कश्यापद्धतीने विचार करत असतील त्यांचं वागण बोलण या सर्वच गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आहे. गाण्याच्या प्रोमोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असच प्रेम गाण्यावरही करा हिचं सदिच्छा !!”

    निर्माती अनुष्का अविनाश सोलवट ‘बिग हिट मीडिया’च्या नव्या गाण्याविषयी सांगतात, “मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी मी फारच उत्सुक असते. आम्ही मराठी संस्कृती गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता मला खात्री आहे की ‘बिग हिट मीडिया’ रेकॉर्ड लेबल वरील ‘पैलवान’ हे गाण प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. तुमच असंच प्रेम आमच्यासोबत कायम राहू देत.”

    Link – https://youtu.be/R0Ygxf8DdxA?si=dU-Nb12x6IH5CBWa

  • “कर्मयोगी आबासाहेब”  चित्रपटाचा ट्रेलर लाँच

    राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार,  राज्याचे  कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

    मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत.

    २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित

    चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख,  वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता  अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

    राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. आता प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी मा. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच… त्यामुळेच “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून घडणार आहे.

    Trailer Link

    https://youtu.be/bjEmbUBeeH4?si=07tHtr6cOfwqLXOg

  • All We Imagine as Light to release in cinemas across India on November 22

    By: SANDESH KAMERKAR (Senior Reporter)

    Mumbai, 17th October 2024: Payal Kapadia’s All We Imagine as Light is all set for its Indian release on 22nd November, 2024, with distribution led by Spirit Media.  Payal Kapadia and actor-producer Rana Daggubati shared their thoughts on the film’s global journey and its upcoming plans in India.*Speaking about the India theatrical release, Payal Kapadia shared,* “_This film has been years in the making, and with our partnership with Spirit Media, I am incredibly excited for the next phase. It is for the first time that a film  of mine will be released in theatres and  Indian audiences will finally be able to buy tickets and experience it on a big screen, where cinema truly comes to life.”_

    Rana Daggubati expressed his enthusiasm and said, _“We are very excited to bring this incredible film to Indian theatres. At Spirit Media, we are committed to bringing unique and meaningful stories to audiences across the country. Payal has made a beautiful film, and we can’t wait to share it with Indian audiences.”_

    The film is all set to hit theatres across India on 22nd November 2024 and will be available in all major cities, including Mumbai, Delhi, Chennai, Bengaluru, Hyderabad, Pune, Kochi, Thiruvantanapuram and Kolkata*

    The film is an official Indo-French co-production between petit chaos from France and Chalk & Cheese and Another Birth from India.

    The film is being distributed in India by Spirit Media across all major cities.

  • बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना ने ऑनलाइन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी Meta सोबत केली भागीदारी

    Meta ने आपली सुरक्षा मोहीम ‘स्कैम्स से बचो’ लाँच केली आहे आणि बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना यांच्यासोबत भागीदारी केली आहे, ज्याचा उद्देश लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि डिजिटल सुरक्षा पद्धतींचे पालन करण्याचे शिक्षण देणे आहे. ही मोहीम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्र (I4C) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. Meta च्या या मोहिमेने ऑनलाइन लोकांचे संरक्षण करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे आणि देशातील वाढत्या फसवणूक आणि सायबर धोखाधडीच्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला पाठिंबा दिला आहे.

    या शैक्षणिक मोहिमेत लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या सर्वसामान्य फसवणुकींबाबत सतर्क राहण्याचे आणि कोणतेही पाऊल उचलण्याआधी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वीडियोमध्ये फेसबुक , इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप  वरील सुरक्षा वैशिष्ट्ये दाखवण्यात आली आहेत, जी वापरकर्त्यांना त्यांच्या ऑनलाइन सुरक्षेवर नियंत्रण ठेवण्याची संधी देतात.

    वीडियोमध्ये आयुष्मान खुराना एक दक्ष विवाहसोहळ्यातील पाहुणा म्हणून दिसतोय, जे फसवणुकीच्या बळी पडत असलेल्या लोकांना त्याच्या चाणाक्ष विचारांनी आणि हास्यपूर्ण पद्धतीने वाचवतोय. Meta च्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, ब्लॉक आणि रिपोर्ट, तसेच व्हाट्सअप  ची ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्ज हायलाइट केल्या आहेत. ही मोहीम Meta च्या उत्पादन वैशिष्ट्यांमुळे आणि सुरक्षा साधनांमुळे लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून, धोखाधड़ी पासून आणि खात्याचे नुकसान होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक संरक्षण कसे उपलब्ध होते याची महत्त्वाची आठवण करून देते.

    अभियानाच्या लाँचबाबत प्रतिक्रिया देताना आयुष्मान खुराना म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन फसवणूक आणि धोखाधडीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये जे अनेकदा खरे वाटतात – आपल्याला सतर्क राहणे आणि सुरक्षित राहण्याचे मार्ग शिकणे खूप महत्वाचे आहे. Meta च्या या सुरक्षाविषयक उपक्रमाचा भाग बनून मला आनंद होत आहे, ज्याचा उद्देश लोकांना संभाव्य सायबर फसवणुकीपासून कसे संरक्षण करावे याबद्दल जनजागृती करणे आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि Meta च्या सुरक्षा साधनांचा वापर करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑनलाइन सुरक्षेवर नियंत्रण मिळवता येईल.”

    OTP फसवणूक, खाती आणि गोपनीय माहितीचा ताबा घेणारी फसवणूक, खोट्या ओळखीतून लोकांना पैसे देण्यास प्रवृत्त करणारी फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणूक फसवणूक, आणि बनावट लोन अॅप्स आणि ऑफर यासारख्या विविध फसवणुकीचे या मोहिमेत प्रदर्शन करण्यात आले आहे. Meta च्या साध्या परंतु प्रभावी सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून आणि धोखाधडीपासून सुरक्षित ठेवले जाऊ शकते, हे मोहिमेत दाखवले गेले आहे.


    Check out the campaign here – https://www.instagram.com/reel/DBGCrcyIgGf/?igsh=bG5tcGZhOG5hNTBt

  • दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…

    स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही. ‘रीलस्टार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’ या मल्टीस्टारर चित्रपटाचे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

    ‘रीलस्टार’ची निर्मिती जोस अब्राहम, मोनिका कंबाती आणि निशील कंबाती यांनी जे फाइव्ह एंटरटेनमेंट्स, फोनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. ‘अन्य’ फेम सिम्मी आणि रॉबिन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सुधीर कुलकर्णी आणि रॉबिन यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘रीलस्टार’मध्ये मुख्य कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांची जणू ओळखच या पोस्टरद्वारे करून देण्यात आली आहे. पोस्टरवरील वेगवेगळ्या गेटअपमधील कलाकारांचे चेहरे लक्ष वेधून घेतात. यासोबतच ‘रीलस्टार’मध्ये काहीतरी भन्नाट आणि अनोखे पाहायला मिळणार असल्याची चाहूलही देतात. समाजात वावरताना कुठेही एखादी घटना घडली किंवा आनंदाचा क्षण दिसला की तो कॅमेऱ्यात कैद करून सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम रीलस्टार करत असतात. या चित्रपटामध्ये अशाच अनोख्या रीलस्टारची रोमांचक कहाणी पाहायला मिळणार आहे.

    प्रमुख कलाकार

    प्रसाद ओक आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचे भाऊ भूषण मंजुळे ‘रीलस्टार’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच या चित्रपटात मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, करीश्मा देसले आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

    रिलीज झालेल्या नवीन मोशन पोस्टरबद्दल, दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन म्हणाले की, रीलस्टार ही प्रत्येक सामान्य माणसाची कथा आहे ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्या वाईटाला सामोरे जावे लागते आणि म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चा फर्स्ट लुक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. प्रसाद ओकसारख्या अतिशय लोकप्रिय अभिनेत्याच्या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आल्याने, मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षाही रीलस्टारबद्दल शिगेला पोहोचल्या आहेत. धर्मवीर-२ नंतर रीलस्टार हा प्रसाद ओक यांचा पुढचा चित्रपट असेल. निर्माता जोस अब्राहम म्हणाले की हा चित्रपट जानेवारीमध्ये पडद्यावर येईल.

    सिनेमॅटोग्राफी डीओपी शिनूब टीसी यांनी केली आहे. गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिली आहेत, तर दृश्यम सारख्या सुपरहिट साऊथ चित्रपटांना संगीत देण्यासाठी प्रसिद्ध असलेले विनू थॉमस यांनी संगीत दिले आहे. डीजो यांनी संकलन केले आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी, तर राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. दीपक पांडे हे कास्टिंग डायरेक्टर आणि रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत.

  • जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट “अंत्यआरंभ”

    श्रीमती. किरणमयी आर कामथ निर्मित “अंत्यआरंभ” हा नवीन कोकणी  चित्रपत लवकारच प्रेक्षाकांच्य भेटीस येणार अहे. या चित्रपाटाची निर्मिती आदित्य  क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत  करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन,  गीतलेखन सुप्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त  डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः  आजवर बनविले आहेत.

    “अंत्याआरंभ” येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला

    “अंत्यआरंभ” हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून  प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवत असते असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ.रमेश कामठ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ , विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय  जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. कॅमेरामन पीव्हीआर स्वामी,  संगीत सुप्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचे आहे.  संवाद लेखन श्री कृष्ण राव ह्यांचे आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे 

    येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • Has Uorfi Javed been boycotted by the Paparazzi after a public showdown?

    A few weeks ago, during the promotions of her new series Follow Kar Lo Yaar Uorfi Javed was spotted in a striking outfit that featured a moving lizard. The spotting made headlines not just for her bold fashion choice or for being papped alongside Ananya Panday, but raised serious questions about the conduct of the paparazzi. During her routine interaction with the paparazzi, Uorfi found herself at the center of controversy when an inappropriate comment came from the crowd. But who exactly made the remark? Whether it was a spectator or one of the paparazzi is still unclear.
    Uorfi didn’t respond at the moment, but a few days later, she took to social media to express the emotional toll the incident had taken. In a heartfelt post, she questioned whether such treatment was justified and revealed a more vulnerable side, expressing that behind her bold fashion choices, she too feels hurt by disrespectful comments.
    What followed was a rapid escalation. Rumors spread that the paps had become upset with the Uorfi over the post, leading to some tension. There are even claims that the paparazzi have decided to boycott her, insisting that the inappropriate comment came from a spectator, not from them, demanding an apology from Uorfi for the incorrect allegations. But the question remains: who is really to blame?
    Is Uorfi justified in feeling hurt and angry, or was this a misunderstanding? The full truth remains elusive, but it’s clear that the incident has sparked a debate about how celebrities are treated in the public eye, and the boundaries that must be respected even in the world of relentless media attention.

  • The Return of the Party Anthem: “Na Na Na Re” is Back in Vicky Vidya Ka Woh Wala Video

    Get ready to dance, Bollywood fans! The legendary party anthem “Na Na Na Re” has returned, and it’s bringing the heat with a fresh twist! This iconic track, originally sung by Daler Mehndi, is now featured in a highly anticipated film starring Rajkummar Rao and Triptii Dimri.

    In this electrifying new version, watch as Rajkummar Rao and Triptii Rao take the stage, showcasing their killer dance moves to the catchy beats. The original magic of the song is preserved while being revamped by the creative minds at White Noise Collectives.

    The original music was composed by Anand Milind, with lyrics penned by Sameer, capturing the spirit of celebration that fans know and love. Daler Mehndi himself lends his voice once again, ensuring that the energy remains high and infectious.
    This video isn’t just a nostalgia trip; it promises to be a visual feast that will have everyone hitting the dance floor. Whether you’re a long-time fan of the original or new to the track, thisversion is sure to get your party started.

    Produced by Gulshan Kumar, T-Series, Balaji Telefilms, and Wakaoo Films, in association with Kathavachak Films, Vicky Vidya Ka Woh Wala Video was released in theaters on October 11, 2024.

  • Vijay Dada to Drop His New Single Dhyaan Se on 15th October

    Dhyaan Se is set to get you moving with its groovy beats, composed by Arabinda Neog and Gauranga Shehkar, and catchy lyrics sung and written by Vijay Dada, along with his infectious moves in the music video featuring him.

    Vijay Dada shares, “I’m really happy and proud of how this music video has turned out. The concept and substance blend together to showcase a lifestyle that is often unseen in the media. It’s raw, and it’s real.”

    The music video, directed by Abhay Singh, promises to burst with energy as Vijay Dada dances his way through a vibrant carnival scene. From rapping on a brightly lit stage to performing while riding a Ferris wheel, the visuals are set to be just as eye-catching as the song. The carnival setting adds an element of thrill and fun, perfectly matching the vibe of the track.

  • नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!

    नव वर्षाची भव्यदिव्य सांगितिक भेट! १० जानेवारी २०२५ पासून रंगणार मनोरंजन आणि संगीताचा एक अद्भुद संगम, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटातून वैदेही परशुरामी आणि सुमित राघवनचा लूक आऊट


    जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार असल्याची बातमी आज विजयादशमीचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज् ने दिली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून सुबोध भावे बरोबर सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

    सुबोध भावेंचा पहिला पोस्टर जेव्हा रिलीज झाला तेव्हाच या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
    वैदेहीचे नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज तर राजबिंडा पारंपरिक पोशाख मधला सुमित राघवनचा लुक पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले संगीत मानापमान नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे.

    “चित्रपटा बद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले , “संगीत मानापमान या मराठीतल्या एका अत्यंत अभिजात अशा नाट्यकृती वरती काम करायला मिळणं हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्वची भूमिका करत असताना मानापमान या नाटकाशी संबंध आला, पण कधी तरी आपण त्याच्यावरती सिनेमा करू असा वाटलं हि नव्हतं. पण मधल्या काळात कट्यार नंतर नवीन चित्रपटाची आखणी करताना सगळ्यात भावलं ते म्हणजे मानापमानची प्रेम कथा तसेच गोविंदराव टेंबेंसारख्या दिग्गज अशा संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी ज्याची  इतक्या वर्षानंतर ही गोडी तशीच आहे. बालगंधर्व असतील केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील अशा दिग्गज नेत्यांचा स्पर्श,  खडीलकरांची लेखनी असं एक वेग वेगळ्या अंगाने नटलेल्या नाटका वरती प्रेरित असा सिनेमा घडवताना तितक्याच तोलामोलाची मंडळी आजूबाजूला हवी होती. जिओ स्टुडिओज ची भक्कम साथ,कट्यार आणि काशिनाथच्या वेळेस जी माझ्यासोबत टेक्निकल टीम होती ती हि तितक्याच प्रमाणे माझ्या सोबत उभी राहिली. सुमित राघवन, वैदेही आणि बरेच कलावंत आहेत ज्यांची नावं लवकरच तुमच्यासमोर येतील त्यांचा माझ्यावरचा विश्वास. मला असा वाटतं कि हा सिनेमा फक्त सुबोध भावेचा नसून संपूर्ण संघाचा सिनेमा आहे.आणि नवीन वर्षाची आमच्या संगीत मानापमान टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना हि संगीतमय प्रेम कथाभेट असणार आहे.

    या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर -एहसान – लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

    जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, “संगीत मानापमान” ह्या संगीतमय चित्रपटात वैदेही परशुरामी, सुमित राघवन सोबत आणखी काही दिग्गज कलाकार असणार आहेत.

    हा सिनेमा नवीन वर्षात १० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.