
-
धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचा रोमांचकारी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या दोन भागात प्रदर्शित होणाऱ्या भव्य आणि बिग बजेट चित्रपटाच्या पहिल्या भागाचा रोमांचकारी टिझर मराठी आणि हिंदी भाषेत आज प्रसिद्ध करण्यात आला. सागराचे सुलतानही करती मृत्यूचा रे धावा, सह्याद्रीच्या कड्यावर उभा मराठ्यांचा छावा… अशी टॅगलाईन असलेला टिझर अतिशय ऍक्शनपॅक्ड असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आलेले आहे. “जेव्हा सिद्दीला देऊ मात, तेव्हा सांगू मराठ्याची जात” असा दमदार संवाद आणि युद्धाची दाहकता वाढवणारं पार्श्वसंगीत यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा लढाऊ बाणा टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. आजपर्यंत ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आपण अनेक मैदानी युद्धे बघितली आहेत पण या टीझरमुळे “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटात मैदानी युद्धासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी उभारलेल्या आरमाराचे समुद्रातील युद्ध भव्य स्वरूपात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे.
प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता ठाकूर अनुप सिंह साकारणार शंभूराजे
“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. नवरात्री निमित्त रोज प्रसिद्ध होणाऱ्या पोस्टरमुळे किशोरी शहाणे “राजमाता जिजाऊ”, भार्गवी चिरमुले “धाराऊ माता”, पल्लवी वैद्य “सईबाई भोसले”, कृतिका तुळसकर “महाराणी सोयराबाई” या प्रमुख भूमिकेत असून श्रद्धा शिंदे “सरस्वती”, तृप्ती राणे “लक्ष्मी”, शीतल पाटील “दुर्गा” यांची साथ त्यांना लाभणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता याव्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये २२ नोव्हेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार चित्रपटाचा पहिला भाग
उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग १” चा मराठी भाषेतील टिझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=kDeWDGTnRNc
हिंदी भाषेतील टिझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=JEXqHK8piNQ -
संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज

सिनेमांतल्या भूमिकांसाठी कलाकार काय-काय करत असतात. एखादं दृश्य खरं वाटावं यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. काही कलाकार चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो. आगामी ‘रानटी’ चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेत तसेच पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअप मध्ये धावण्यापासून ते अगदी अॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्विकारत संतोषनी घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगतो कि, ‘कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते, दिग्दर्शक समित कक्कड कडून मला नेहमी माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह व्दिगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.
‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. -
Rohit Shetty To Re-Release Blockbuster “Singham”

With Singham Again already creating waves across the country, filmmaker Rohit Shetty has thrilled fans by announcing a nationwide re-release of his original blockbuster, Singham. Scheduled to return to theatres on Friday, 18th October, the re-release will offer audiences to once again enjoy the inception of India’s first cinematic cop universe.
The decision to bring Singham back to theatres comes from the overwhelming demand of fans eager to experience the mass entertainer on the big screen before the release of Singham Again. This re-release will give audiences a chance to relive the high-octane action, intense drama, and iconic dialogues that made Singham an instant classic and while adding to fans’ excitement for Singham Again, releasing this Diwali. -
प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित…

विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर काम करणारे आजच्या पिढीतील निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक मराठमोळ्या चित्रपट संस्कृतीला साजेशी सिनेनिर्मिती करत आहेत. त्यापैकी एक दिग्दर्शक म्हणजे नितीन रोकडे. त्यांच्या ‘हुक्की’ या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘हुक्की’च्या मोशन पोस्टरमध्ये याची झलक अगदी सहजपणे पाहायला मिळते.
लवकरच कोकणच्या वातावरणात होणार शूटिंगला सुरुवात…

मॅजिक स्वान स्टुडिओज, एनएमआर मुव्हीज, फायनानशियल फिटनेस आणि जन्नत फिल्म्स या बॅनरखाली ‘हुक्की’ चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. नितीन रोकडे, सुनंदा काळुसकर आणि विनायक पाष्टे निर्माते असून सुधीर खोत आणि रईस खान हे ‘हुक्की’चे सहनिर्माते आहेत. नितीन रोकडे यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळली असून, त्यांना संदीप कुमार रॅाय आणि मधुलीता दास यांची पटकथा लेखनासाठी साथ लाभली आहे. अतिरीक्त पटकथा लेखन निनाद पाठक यांचं आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये कावळ्यांचा सुरेख वापर करण्यात आला आहे. सूरज, राममास्तर, महेश या कावळ्यांच्या गर्दीत प्रीती नावाची मैनाही मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते. नावासोबतच प्रत्येकाचे स्वाभावही सांगण्यात आले आहेत. संघर्ष, जोखिम, विजय या मार्गावर एकीचे बळ पाहायला मिळणार असल्याचे संकेत मोशन पोस्टर देते. ‘आली हुक्की आता स्वत:साठी लढा…’ हा मंत्र या चित्रपटाद्वारे जनमानसापर्यंत पोहोचणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेलं मोशन पोस्टर नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेलं आहे. ‘हुक्की’ची कथा कोकणात घडत असल्याने तिथलं निसर्गरम्य वातावरण आणि नयनरम्य लोकेशन्स मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सूरज, प्रीती, रामकाका, महेश या भिन्न स्वभाव आणि प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखांभोवती ‘हुक्की’चं धमाल कथानक लिहिण्यात आलं आहे. त्याला खुमासदार विनोदी संवादांची जोड देण्यात आली आहे. प्रसंगानुरुप विनोद निर्मिती या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार असल्याचं मत दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी व्यक्त केलं आहे. मोशन पोस्टरबाबत नितीन रोकडे म्हणाले की, यातील कावळे हे प्रतिकात्मक असून, याद्वारे मानवी स्वभावांचं दर्शन घडवण्यात आलं आहे. ‘हुक्की’ म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘हुक्की’ आली की कोणता माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. अशाच ‘हुक्कीबाज’ पात्रांची गंमतीशीर कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचंही रोकडे म्हणाले.
‘हुक्की’मध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या जोडीला रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील आदी कलावंत आहेत. प्रफुल-स्वप्नील या जोडीने या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. छायांकन फारुख खान यांनी केले असून, संतोष गणपत पालवणकर नृत्य दिग्दर्शक, साहस दृश्ये मास्टर संष कुमार यांची आहेत. तर हर्षित कुमार प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहात आहेत. -
स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!

नव्या भूमिकेत झळकणार- रूपाली गांगुली, अलिशा परवीन आणि शिवम खजुरिया! ‘अनुपमा’च्या या नव्या, मोहक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!
‘अनुपमा’ या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची आगळी उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही वर्चस्व गाजवले आहे. ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. खिळवून ठेवणारे नाट्य आणि या मालिकेला मिळणारी नवी वळणे यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची कायम पसंती राहिली आहे.
या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागात, प्रेक्षकांना नवे काहीतरी रंजक आणि वेधक गवसते. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेला नेहमीच प्रेक्षकांची मोठी प्रशंसा आणि प्रेम लाभले आहे. असे असताना, आता प्रेक्षकांकरता आणखी एक आश्चर्य उलगडणार आहे, याचे कारण ‘अनुपमा’ ही मालिका चक्क एका पिढीची झेप घेत, नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘अनुपमा’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून, आणखी दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आद्याचे पात्र अलिशा परवीन साकारणार असून, आद्याचा जीव ज्याच्यावर जडला आहे, ती- प्रेम ही व्यक्तिरेखा शिवम खजुरिया वठवणार आहे.
या मालिकेच्या निर्मात्यांनी अलीकडेच नव्या रूपातील मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात ‘अनुपमा’च्या नव्या प्रवासाची झलक मिळते. यात अनुपमा वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटते आणि ‘अनु की रसोई’ हा तिचा स्वत:चा व्यवसाय चालविण्यात ती व्यग्र आहे. ‘अनुपमा’ला तिच्या कुटुंबाची आठवण येत असते आणि आद्या या तिच्या लेकीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा असते. दुसरीकडे, आद्या आता एक टूर गाईड बनली आहे आणि एके दिवशी आद्या एका मंदिरात प्रेमला भेटते. आद्याला बघताच क्षणी प्रेमला तिची जणू मोहिनी पडते. आद्या नात्यातील गुंतागुंतीचा विचार करत आहे आणि तिच्या आईच्या जगतापासून दूर आहे. एका नव्या, अनोळखी व्यक्तीच्या प्रयत्नाने आई आणि मुलीतील नाते सुधारेल का? मुलीला शोधून काढण्याचे आईचे प्रयत्न सफल होतील का?
१४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘अनुपमा’ मालिकेचा हा नवा प्रवास बघायला विसरू नका.
राजन शाही निर्मित, ‘अनुपमा’ ही मालिका सोमवार ते रविवार- दररोज रात्री १० वाजता ‘स्टार प्लस’वर प्रसारित होते. -
‘नाद’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांची परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज झालेल्या अॅक्शनपॅक्ड ट्रेलरने खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या ट्रेलरवर राज्यभरातून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटाच्या टॅगलाईनसारखाच ट्रेलरही ‘हार्ड’ असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

२५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘नाद’…
निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांनी ‘नाद’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. ‘नाद’ची व्याख्या सांगत टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अॅक्शनचा धमाका असलेला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा चित्रपट शीर्षकाप्रमाणेच एक हार्ड लव्हस्टोरी सांगणारा आहे. प्रसंगानुरूप असलेले दमदार आणि रोमँटिक संवाद ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही आजवर पाहायला मिळाले नसतील अशी लाल मातीतील अॅक्शन दृश्ये नजर खिळवून ठेवतात. गाण्यांची झलक ट्रेलरमध्ये आहेच, पण रोमँटिक दृश्येही लक्ष वेधतात. प्रेम म्हणजे नेमकं काय? हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही. आजतागायत बऱ्याच दिग्दर्शकांनी प्रेमाचे विविध पैलू रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटात हार्ड लव्ह म्हणजेच खरंखुरं प्रेम काय असतं ते पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत कधीही न उलगडलेल्या प्रेमाच्या पैलूंसोबतच प्रेमाच्या गुलाबी रंगांमधीलही विविधांगी छटा यात बघायला मिळतील. ट्रेलरबाबत दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले की, ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून रसिकांचे लक्ष वेधत असल्याचा खूप आनंद आहे. हे आमच्या संपूर्ण टिमचे श्रेय आहे. असाच प्रतिसाद चित्रपटगृहांमध्येही मिळेल याची खात्री आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीप्रधान अॅक्शनपॅक्ड प्रेमकथा रसिक दरबारी सादर करण्यात आली आहे. कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक कुटुंबासोबत पाहू शकतील असा दर्जेदार चित्रपट तयार केला असून, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असल्याचेही पवार म्हणाले.
‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत असून, त्याचे आजवर कधीही समोर न आलेले रांगडे रूप यात पाहायला मिळणार आहे. किरणच्या जोडीला सपना माने हि नवोदित अभिनेत्री असल्याने नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्रीही लक्षवेधी ठरणार आहे. या दोघांच्या जोडीला यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांच्या लेखणीतून अवतरलेली गाणी सुप्रसिद्ध संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमॅटोग्राफर अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांचे आहे. वेशभूषा निगार शेख यांनी केली असून, कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली आहे. या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रमेश शेट्टी, तर आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत. -
‘गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित

नवरात्रीची आठवी माळ म्हणजे अष्टमी. आजचा रंग गुलाबी असल्याने बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये जयपूरच्या गुलाबी नगरीत तिघींच्या नवीन प्रवासाची कहाणी पाहायला मिळत आहे. मैत्री, प्रेम, स्वप्ने, नाती या भावनांच्या विश्वात रंगून जाणाऱ्या स्त्रिया जेव्हा स्वतःच्या विश्वात जगायला सुरुवात करतात आणि स्वतःला उलगडू पाहातात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास किती आनंददायी असतो, याचा अनुभव ‘गुलाबी’ देणार आहे.
टिझरमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी धमाल करताना दिसत असतानाच यात जयपूर नगरीचे सौंदर्यही दिसत आहे. तीन वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया जयपूर शहरात एकत्र येऊन काय धमालमस्ती करतात, जयपूरमधील तिघींचा हा प्रवास काही वेगळं उलगडू पाहात आहे का, हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. ‘गुलाबी’ चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ‘’ अष्टमीच्या शुभदिनी आम्ही या स्त्रीप्रधान चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. चित्रपट स्त्रिप्रधान असला तरी हा आजच्या स्त्रीचा आहे. नाती, विचार, अस्तित्व, स्वप्नं या सगळ्यांचा गुलाबी प्रवास यातून उलगडणार आहे. कधी हसवणारा तर कधी भावनिक करणारा हा चित्रपट प्रत्येक पुरूषाने आपल्या आई, बहिण, बायको, मुलगी आणि मैत्रीणीसोबत अवश्य पाहावा.’’ -
अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

By SANDESH KAMERKAR (Senior Reporter)
नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर
सर्वत्र नवरात्रोत्सवाचं मंगलमय वातावरण आहे. याचं नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत अनुश्री फिल्म्स प्रस्तुत देवी, त्या दोघी आणि शालिनीझ होम किचन असे तीन वैचारीक लघुपट प्रदर्शित होत आहेत.
नवरात्राच्या पवित्र पर्वावर देवीची आराधना, तिची शक्ती आणि भक्तिरस यांचा अनुभव तुम्हाला या लघुपटांत पाहायला मिळणार आहे. तिन्ही शॉर्ट फिल्म्सचे विषय हे वेगळे असून प्रत्येकातून एक वेगळा संदेश दिला जात असल्याचे दिसून येते. या लघुपटांची निर्मिती मयुर तातुसकर यांनी केली आहे. तर लघुटांचे लेखन आणि दिग्दर्शन शुभम घाटगे याने केले आहे. ‘देवी’ या लघुपटात अमृता सुरेश, सौज्ञा उपाध्ये तर ‘त्या दोघी’ या लघुपटात ऐश्वर्या वखरे, सायली गीते, केशव देशपांडे आणि ‘शालिनीझ होम किचन’ या लघुपटात सुरभी ढमाळ, सौरभ अहिर, कुमार पाटोळे या उत्तम कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटांचे छायाचित्रण अविरत पाटील याने केले आहे. तसेच कला दिग्दर्शन पीयूषा चाळके यांनी केले आहे , ध्वनी श्रेयस किराड व तुषार कांगरकर व सहायक दिग्दर्शन अमिताभ भवार व कार्यकारी निर्मिती पराग जाधव यांनी केली आहे.
अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

अनुश्री फिल्म्सचे निर्माते मयुर तातुसकर लघुपटांच्या संकल्पनेविषयी सांगतात, “स्त्री शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या कालावधीत तीन शॉर्ट फिल्म्स निर्माण करणे हे त्याच उद्देशाशी संबंधित आहे, कारण या काळात महिला सशक्तीकरणाचा विषय अधिक महत्त्वाचा वाटतो. आम्ही या सणाच्या माध्यमातून प्रेम, धार्मिक महत्व, साहस, भक्ती आणि प्रेरणा यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या शॉर्ट फिल्म्सची संकल्पना मी आणि माझे मित्र शुभम घाटगे ज्यांनी अनुश्री फिल्म्सच्या मागील भाव भक्ती विठोबा या लोकप्रिय गाण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या सोबत या नवरात्र उत्सवात जागर स्त्री शक्तीचा हा विषय विचारात घेऊन अंमलात आणताना वेगवेगळ्या विचारधारा आणि कथा एकत्र करून आम्ही ज्या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू इच्छित होतो, त्यावर चर्चा सुरू झाली आणि यामुळे या तीन कथा विकसित झाल्या.”

लेखक – दिग्दर्शक शुभम घाटगे लघुपटांच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “देवी या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पाषाण येथील सोमेश्वर मंदिर या खास आणि देखण्या ठिकाणी केले आहे, जिथे नवीनीकरण, पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम आहे. तर त्या दोघी आणि शालिनीझ होम किचन या लघुपटांचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले. चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय होता, तसेच कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीमुळे आम्हाला अत्यंत सजीव आणि प्रभावी चित्रण मिळाले. प्रत्येक क्षणामध्ये गहनता आणि भावना होती, ज्यामुळे हा अनुभव मनाशी बांधला गेला. प्रेक्षकांना हे तिनही लघुपट भावतील अशी मी आशा करतो.”
Devi Short Film – https://www.youtube.com/watch?v=gmxXDSZsc9I&t=47s
Tya Doghi Short Film – https://www.youtube.com/watch?v=o2jDbKwDsgM -
Star Kids and Struggles in Showbiz: A Conversation on Privilege and Opportunity
In today’s entertainment landscape, achieving success often involves navigating a world of privilege. Whether it’s having a famous parent who paves the way or being a “star kid” catapulted into Bollywood, privilege can certainly open doors. Even those who face setbacks often receive multiple chances to relaunch their careers. However, once the camera starts rolling, it’s ultimately talent that determines your future.

Filmmaker Pooja Bhatt recently weighed in on this topic through Freddy Birdy’s post, emphasizing that while privilege can provide an initial advantage, it doesn’t guarantee success. She stated, “No matter who your parents are, when it’s time for the director to call ‘action,’ you’re on your own. The audience ultimately decides your fate. You may get launched and relaunch repeatedly, but without the ability to connect and resonate with people, whether on the big screen or TV, longevity is unlikely.”

Actor Uorfi Javed engaged in the conversation, agreeing with Freddy’s observation about the unique opportunities afforded to star kids. She reflected on her own journey, highlighting the stark differences in career trajectories for those inside the industry compared to outsiders.
The discussion gained traction when Samantha Prabhu shared the post on her story, and Indian fashion designer Kresha Bajaj also expressed her appreciation for the insights shared on her Instagram. -
मनमौजी’ ८ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात

तारुण्य हे प्रेमाचं, आकर्षणाचं असतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाला कोणती ना कोणती मुलगी आवडतेच… पण मुलगी किंवा बायका न आवडणारा एखादा तरुण असेल तर? अशाच एका तरुणाची गोष्ट उलगडणाऱ्या ‘मनमौजी’ या चित्रपटाचे अनोखे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला “मनमौजी” हा चित्रपट ८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सायली संजीव आणि भूषण पाटील यांची जोडी झळकणार
गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे.
“मनमौजी” म्हटल्यावर आपल्याला हवं तसं वागणं असं म्हणता येतं. पण चित्रपटाचा फर्स्ट लुक फार रंजक आहे. मोकळ्या वातावरणात धावत असलेल्या तरुणाबरोबर आजुबाजूच्या तरुणीही धावू लागतात आणि त्याच्या जवळ येतात. पण मनमौजी चित्रपटात तर मुली किंवा बायका न आवडणारा तरुण नायक आहे. त्यामुळे सतत जवळ येणाऱ्या बायकांमुळे त्याचं काय होत असेल याची रंजक गोष्ट या चित्रपटात उलगडणार आहे. सिक्स पॅक अॅब्ज आणि फ्रेश लुक असलेला भूषण पाटील या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मनमौजी चित्रपटासाठी आता ८ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहायलाच हवी.
