Home

  • पाणीपुरी चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार

    ‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही  कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका  घरातील  सासू आणि जावई  यांच्यातील  धमाल जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्याला पहायला मिळणार आहेत. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.


    ‘पाणीपुरी’ चित्रपटात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी चिवट सासू रंगवली आहे. तिचा आणि जावयाचा कलगीतुरा सतत सुरु असतो. सासू आणि जावई यांच्या जुगलबंदीत काय होतं? याची धमाल गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. धमाल कथानक, उत्तम स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल असा विश्वास  या दोघांनी  व्यक्त केला.

    चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत.

    मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

  • बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

    मुंबई – बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते. बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखा विविध  उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नाट्य, नृत्य, संगीत व चित्र, शिल्प अशा ललित कला संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहेत. बालकांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा आणि हक्क यांच्यासाठी चळवळ उभी करणारी महाराष्ट्रातील शीर्ष संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्यरत आहे. बालकला केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक स्वरुपापर्यंत मर्यादित न राहता, ही लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमी परिषदेचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून विशेष, दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक मंच उपलब्ध करू देताना, त्यांच्या कला कौशल्याला वाव देण्याच्या हेतूने महाराष्ट्रभर दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव “यहां के हम सिकंदर” हा विशेष मुलांचा कला महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे असे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    महोत्सवात विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या सर्व प्रकारच्या अनूदानीत व विनाअनूदानीत संस्था / शाळा यात सहभागी  होणार आहेत. वय वर्षे १८ खालील मुले या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघास सादरीकरणासाठी १० मिनीटे वेळ दिला जाणार आहे. ज्यात ( नाटीका, नकला, गाणे , नृत्य, रांगोळी, चित्र, योगा, वाद्य वाजवणे यातील काहीही ) कला सादर करता येणार आहे.

    या महोत्सवात अधिकाधिक संस्थांनी, शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या वतीने करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. हा विशेष मुलांचा कला महोत्सव ५ ऑक्टोंबर ते ३० ऑक्टोबर या दरम्यान राज्यभर आयोजित करण्यात आला असून विशेष, दिव्यांग मुलांचा महोत्सव “यहां के हम सिकंदर” या उपक्रमात विविध जिल्ह्यांमधून चार हजारहून अधिक दिव्यांग कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग प्रेक्षक मुलांना हा महोत्सव पाहता येणार आहे.  महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व संस्था व शाळांना पाच हजार रुपये मानदेय देण्यात येणार आहे. तसेच सर्व दिव्यांग कलाकार, शिक्षक व दिव्यांग प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक सहभागी संघास व शिक्षकास स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले जाणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रर्दशन ठेवण्यात आले असून या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. सक्षम मुलांच्या प्रमाणे दिव्यांग मुलांच्या मनोरंजनाचा हक्क त्यांना मिळावा म्हणून हा संकल्प बालरंगभूमीने केल्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के- सामंत यांनी सांगितले.

    पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष ॲड .शैलेश गोजमगुंडे, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकुमार जुवेकर, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, दीपाली शेळके समिती प्रमुख धनंजय जोशी , नागसेन पेंढारकर व इतर कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते.

  • अमृता खानविलकर साकारणार ‘महाराणी येसूबाई भोसले’

    महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सचा भव्य आणि बिग बजेट “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन भागात असणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

    ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे पहिल्या पोस्टरने जाहीर झाले आणि आणखी कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमुळे या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ‘महाराणी येसूबाई भोसले’ ही व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिव स्मरूनी, असुरा मर्दूनी, नटली असे शंभू अस्तुरी, पिवळा मळवट, भगवी धरणी, सह्याद्रीची शैलपुत्री! अशा ओळी असलेल्या पोस्टर मध्ये अमृता पिवळी साडी, मराठमोळा साजशृंगार करून हात जोडून शिवलिंगाकडे भक्तिभावाने बघताना दिसते आहे. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती या महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या अभिनयाने अनेक भूमिका संस्मरणीय करणाऱ्या अमृताला  ‘महाराणी येसूबाई भोसले’ या भूमिकेत बघणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.

    मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

    मराठी चित्रपटसृष्टीत बिग बजेट चित्रपट फार कमी प्रमाणात बनतात त्यापैकीच एक “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनकार्याचा पट खूप भव्य आणि साहसी आहे त्यामुळे मोठ्या पडद्यावरसुद्धा तो भव्यदिव्यच दिसला पाहिजे असे निर्मात्यांचे ठाम मत होते. म्हणूनच या चित्रपटाची निर्मितीमूल्ये ही अतिशय उच्च दर्जाची ठेवताना प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्य चित्रपट पाहण्याचा समृद्ध अनुभव मिळेल अशीच  या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

    उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग १५ नोव्हेंबर २०२४ रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • ‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

    २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर लाँच

    वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. स्वर्गीय मा .गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला “कर्मयोगी आबासाहेब” हा चित्रपट २५ ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभर रिलीज होत आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच करण्यात आलं आहे.

    मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख,  वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता  अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

    अनिकेत विश्वासराव स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख ह्यांच्या भूमिकेत


    आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं. तब्बल अकरा वेळा ते आमदार झाले. त्यात दोनवेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे. त्यामुळे आबासाहेबांना चित्रपटातून पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता २५ ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

  • ४ ऑक्टोबरला “धर्मवीर २” बघा अवघ्या ९९ रुपयात

    नवरात्रीचे खास औचित्य साधुन “धर्मवीर २” हा चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी शुक्रवार ४ ऑक्टोबरला अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरला पाहण्याची  अनोखी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

    शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित  करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला सर्वत्र मिळत असून आजपर्यंत चित्रपटाने तब्बल १२.२८ कोटींचा गल्ला कमावला आहे.

    “धर्मवीर २” ची नवरात्रीनिमित्त खास भेट

    १५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. ‘नाथा घरच्या आनंदाची गोष्ट’, ‘व्हू इज एकनाथ शिंदे सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट’ , चरित्रपटातून प्रखर हिंदूत्वाचा जागर…. अशा शब्दांत समीक्षकांनीही चित्रपटाला गौरवले आहे. धर्मवीर चित्रपटानंतर “धर्मवीर २” चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक प्रतिसादातून दिसून येत आहे. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटानं दिली असून, ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना ती योग्य प्रकारे मिळाली आहेत

    महिला वर्गाचा चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबच चित्रपटगृहात जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे,पालघर नाही तर पुणे,कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छ.संभाजीनगर, मराठवाडा  अशा संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल यात शंका नाही.

  • एक डाव भुताचा” अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची अनोखी संधी

    सगळीकडे सध्या चर्चेत असलेल्या आणि उद्या म्हणजेच ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या “एक डाव भुताचा” हा चित्रपट अवघ्या ९९ रुपयांमध्ये केवळ पहिल्या दिवशी पाहण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना चित्रपटाच्या  मिळणार आहे.      

    रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने “एक डाव भुताचा” या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, आशय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत.

    स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल गोष्ट “एक डाव भुताचा”‘ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

  • लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

    काही दिवसांपूर्वी’लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे.

    नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

    व्लॅागर… खून… रहस्य… ?

    ‘लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकवर्ग थक्क झाला आहे. जुई भागवत एका व्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून, ती एका संकटात अडकल्याचे दिसतेय. टिझरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचेही दिसत आहे. तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीने कोणत्यातरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय वाघकडेही काहीतरी गुपित असल्याचे दिसत आहे. हा सगळाच प्रकार संशयित असून याचा उलगडा १८ ॲाक्टोबर रोजी होणार आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल असणार, हे नक्की!

    चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, “लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून  आजच्या तरूणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रत्येक पात्राचे ध्येय वेगळे असले तरी त्यांचे आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबते. हे सर्वात मोठे रहस्य चित्रपटाची औस्त्युक्य वाढवते . प्रत्येळ वेळी चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेणारी असून प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवणारी आहे.”

  • “मनमौजी” चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट

    मनमौजी” येतोय नोव्हेंबरमध्ये

    प्रत्येक मुलीला आपला जोडीदार हा स्मार्ट, हॅंडसम, डॅशिंग असावा अशी अपेक्षा असते. अशाच एका तरुणाची गोष्ट आगामी “मनमौजी” या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रत्येक स्त्रीला हवा-हवासा वाटणाऱ्या या तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल 
    राग असतो.कोणतीच स्त्री त्याला आवडत नसते. नात्यांचे अनेक मानसिक, भावनिक पदर असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होत असून, चित्रपटाचा टीजर  नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

    भूषण पाटील, सायली संजीव यांची मुख्य भूमिका

    गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहे.

    “मनमौजी” च्या निमित्ताने अभिनेत्री रिया नलावडेचे सिनेसृष्टीत पदार्पण

    “मनमौजी” नावावरून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज येत नाही. चित्रपटाचं पोस्टर अतिशय फ्रेश आणि युथफुल आहे. मात्र ह्या हॅंडसम तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल राग का असतो ? तो शांत होतो का?  हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

  • Kratex and Rock Kacchi Take Marathi Music Global

    Krunal “Kratex” Ghorpade and his manager Rock Kacchi (aka Wajid Kacchi) have surged from the Pune music scene to global recognition in just 1.5 years, pioneering Marathi House Music (M-House) and taking it to new heights. Together, they transformed World of Vibes into a trailblazing brand, with Kratex’s genre-defining sound and Rock Kacchi’s ability to pull massive crowds, including India’s biggest sold-out show at Pune’s Ballr Club, where Kratex headlined to a packed audience.

    Their breakthrough hit *Taambdi Chaamdi*, featuring rapper Shreyas, went viral, attracting attention from fans, influencers, and eventually, global music giant Spinnin’ Records. This led to a groundbreaking deal, making *Taambdi Chaamdi* the first Marathi House track to reach international success.

    From Pune’s M-House Scene to Sold-Out International Stardom

    After their iconic Pune show, Kratex and Rock took M-House global with sold-out international performances, including a four-city tour of Australia and New Zealand, hitting Sydney, Melbourne, Brisbane, and Auckland. With a growing list of sold-out shows across India and the world, the duo’s relentless passion and hard work have propelled Marathi music onto the global stage, proving that regional music can make waves worldwide.

  • धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

    गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. १५००  पेक्षा ही अधिक शोजने या  चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे.

    चित्रपटाचा  टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मानत चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शन मध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही.    

    धर्मवीर २ या चित्रपटाची अजुन एक विशेष बाब म्हणजे, शिंदे साहेबांची अगदी हूबे हुब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून  सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पहायला मिळत असून पडद्यावर मुख्यमंत्री साहेबांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ वन टेक मध्ये साहेबांनी तो सीन झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले.