Home

  • Yek Number” Brings The Extraordinary Story Of An Ordinary Young Man To The Screen

    The highly anticipated film, ‘Yek Number’, presented by Zee Studios and Nadiadwala Grandson Entertainment, and produced by Sahyadri Films, recently witnessed a grand trailer launch event. The occasion was graced by the esteemed presence of Raj Thackeray, Bollywood actor Aamir Khan, directors Rajkumar Hirani, Ashutosh Gowariker, Avinash Gowariker, Sajid Nadiadwala, Sajid Khan, and writer Abhijat Joshi. Since the release of the poster, excitement has been building around this film, and now, the powerful trailer has further fueled this anticipation. With its spine-chilling moments, the trailer has left the audience with many questions, intensifying their curiosity. Directed by Rajesh Mapuskar, the film stars Dhairya Gholap and Sayli Patil in lead roles.

    The trailer launch event was graced by esteemed personalities like Honourable Raj Thackeray, Aamir Khan, Sajid Nadiadwala, Rajkumar Hirani, and Ashutosh Gowariker.

    From the moment the poster was revealed, there was a whirlwind of speculation that this film could be a biopic of the honourable Raj Thackeray. However, with the release of the trailer, these rumours have been put to rest. The film appears to tell the extraordinary story of an ordinary young man, who embarks on a journey from Mumbai to his village to bring back Raj Thackeray in order to complete his love story. The trailer highlights Pratap’s intense struggle to reach Raj Thackeray. But the burning question remains, will Pratap achieve his goal? The answer will unfold on October 10. The trailer has sparked immense curiosity, with audiences wondering, will Raj Thackeray himself make an appearance in the film? That’s something audience will have to discover on the big screen. Meanwhile, Bollywood actress Malaika Arora makes a brief appearance, marking her debut in Marathi cinema with ‘Yek Number.’ “We also get to see a special glimpse of actor Siddharth Jadhav.” The film has already created a buzz with its romantic song “Jahir Jhala Jagala,” which has become a fan favourite.

    All of this gives a clear sense of the grandeur of the film. This is probably the first time a movie of this kind is coming to the audience in Marathi cinema. “Yek Number” is undoubtedly a complete entertainment package with a mix of family drama, romance, and suspense.

    Honourable Raj Thackeray expresses about film, “Just as grand films are being made in other languages, we all felt the need for similar large-scale productions in Marathi as well. That’s how the film ‘Yek Number’ has come to life. I extend my gratitude to the entire team behind this film. I must specifically mention Ashutosh Gowariker and Rajkumar Hirani, whose support was invaluable throughout. The entire team united around the simple yet powerful line ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा,’ and together they have delivered an exceptional masterpiece.”

    Actor Aamir Khan expressed his admiration for the film ‘Yek Number’, saying, “I’m truly impressed by everyone’s work in this film. It’s been a unique experience for me, and I extend my best wishes to Tejaswini, Warda, Rajesh Mapuskar, and the entire team. May the film not only succeed in Maharashtra but also resonate globally.”

    Regarding the film, producer Sajid Nadiadwala expressed, “My production house has been around for 74 years, and Maharashtra has given me so much. I’m truly happy that through ‘Yek Number,’ I’ve been given a chance to give something back. Tejaswini and the entire team have worked tirelessly on this project. I truly hope this film achieves great success.”

    Director Rajkumar Hirani shared his thoughts, saying, “I had heard the story of this film, and just a few days ago, I finally watched it. It completely captivated me. The essence of Maharashtra is beautifully showcased in every aspect of the film.”

    Director Ashutosh Gowariker commented about the film, saying, “When I read this story, my first question was whether I would get permission. And if granted, how would I approach the making? Because creating this film is challenging, and now that we are here, it assures me that this film must have turned out to be excellent.”

    Produced by Sahyadri Films, ‘Yek Number’ is presented by Zee Studios and Nadiadwala Grandson Entertainment, with Tejaswini Pandit and Warda Nadiadwala as producers. The film is set to release on October 10, bringing it to the audience.

  • ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला

    कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यासारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या आधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न अडकता, जगण्यासाठीची प्रेरणा देण्याचे कामही तेवढय़ाच ताकदीने आजवर करत आला आहे. एक-दोन नव्हे तर अशा अनेक चित्रपटांची समृद्ध मालिकाच मराठी सिनेसृष्टीने गुंफली आहे. याच मालिकेत दिग्दर्शक संदीप सावंत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर पुष्प ओवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या ८ नोव्हेंबरला पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच  नाही’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

    डॉ.सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू कोणालाच मिळालेलं नसतं, पण कठीण परिस्थितीत माणूस असीम जिद्दीचे तोरण बांधून त्या संकटांवर मात करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, ज्यामध्ये माणसाच्या धैर्याची, चिकाटीची परीक्षा होते. ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातूनही नैराश्याच्या गर्तेत सापडलेला नायक मुकुंद आपल्या कुटुंबाच्या मदतीने जगण्याला कसा आत्मविश्वासाने सामोरा जातो याची प्रेरणादायी कथा पहायला मिळणार आहे. जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.   

    ‘आयुष्यात दुःख भोगण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखात, त्रासात बघणं हे अधिक दुःखदायक असतं, अशावेळी आपलं जीवन अधिक सुंदर करण्याचं सामर्थ्य आत्मसात करणं गरजेचं असतं, हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक संदीप सावंत सांगतात.

    पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील  निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत.

    ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद -दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

    ८ नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • ‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

    चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

    घोषणा झाल्यापासून ‘नाद – द हार्ड लव्ह’  हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘नाद’चा टिझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टिझर ‘नाद’मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत देतो. चित्रपटाच्या शीर्षकासोबत असलेल्या ‘द हार्ड लव्ह’ या टॅगलाईनप्रमाणेच टिझरही हार्ड झाला आहे. ‘नाद’ हा चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. ‘नाद’चं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. टिझरची सुरुवातच मूळात ‘नाद’ची व्याख्या सांगणारी आहे. गावाकडच्या लाल मातीतून नागमोडी वाट काढत जाणारा काळाभोर डांबरी रस्ता आणि त्यावर बुलेटची सवारी करणारा नायक लक्ष वेधून घेतो. दुसरीकडे शीर्षकाची व्याख्या उलगडत जाते. ‘नाद’ म्हणजेच ध्यास जेव्हा श्वासातून रक्तात उतरतो, तेव्हा काय होतं ते टिझरमध्ये सांगितलं आहे. थोडक्यात काय तर गावाकडच्या लाल मातीत, हिरवा शालू नेसलेल्या शेतात रंगलेली रांगडी प्रेमकथा ‘नाद’मध्ये पाहायला मिळणार असल्याचं टिझर पाहिल्यावर जाणवतं. टिझरला देण्यात आलेली काव्यात्मक संवादांची जोड तो अधिकच खुलवण्यास मदत करते. खळखळ वाहणारी नदी, नदी किनारी असलेले मोठाले खडक आणि त्यावर बसून रोमान्स करणारी नायक-नायिकेची गुलाबी जोडीही यात आहे. प्रेम हा शब्द लिहायला, वाचायला, म्हणायला जरी सोपा असला तरी प्रेम झाल्यावर किती आव्हानांना सामोरं जावं लागतं त्याची झलकही यात आहे. गुलाबी प्रेमाच्या या रक्तरंजित कहाणीमध्ये हाणामारीही पाहायला मिळणार आहे. सुरेल गीत-संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. ‘नाद’चा टिझर सर्वार्थाने चित्रपटाचा चेहरा ठरणारा असल्याचे दिग्दर्शक प्रकाश पवार यांचे म्हणणे आहे.

    ‘नाद’ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी, तर पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं असून ही सर्व गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड आणि सपना माने या नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात रसिकांना भुरळ पाडणार आहे. याखेरीज यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग आदी कलाकारांनीही या चित्रपटामध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. सिद्धेश दळवीने कोरिओग्राफी, तर निगार शेख यांनी वेशभूषा केली आहे. सुजित मुकटे कार्यकारी निर्माते असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून संकेत चव्हाण लाइन प्रोड्युसर आहेत.

  • सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र

    सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत.

    मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार, आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझिलंड मोशन पिक्चर्सचे सिड विंचुरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

    परदेशातील न्यूझिलंड मोशन पिक्चर्सची भारतातील फिफ्टी टू फ्रायडेसोबत हातमिळवणी

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, ” मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहे. मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असल्याने ते जगभरातील प्रेक्षकांना भावतात. मी स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून बघायचो. मुळात मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते. चित्रपट निर्मिती करणे हे माझे पॅशन आहे आणि म्हणूनच मी भारतात आलो.  मी माझा पहिला चित्रपट हा मराठीच करणार, हे ठरवलेच होते. लवकरच ‘बोल बोल राणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत. मी खूप उत्सुक हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी.”

    चित्रपटाबद्दल सई ताम्हणकर म्हणते, ‘’ माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. परंतु खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेलली. अपूर्वा आणि मी ‘दुनियादारी’पासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. कारण मला त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे. भूमिकेबद्दल, चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही, परंतु माझा कस लागला होता.’’

    सुबोध भावे म्हणतात, ‘’अपूर्वाचे निर्मिती क्षेत्रात आणि सिडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. या दोघांनीही ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, तो अत्यंत धाडसी विषय आहे. गेली दोन-तीन वर्षं या चित्रपटावर काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत्या आणि म्हणूनच चित्रीकरणात नेमकेपणा होता. अतिशय उत्तम व्यवस्थापन होते. मी चित्रपट पाहायला खूप उसुक आहे. मला आनंद आहे की, मी या चित्रपटाचा एक भाग आहे.’’

    तसंच सिनेमाविषयी बोलताना चिन्मय मांडलेकर सांगतो ‘मी नुकतंच ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलंय. बऱ्याच वर्षांनी सुबोध, सई आणि मी एकत्र काम केलं. आमची चांगलीच भट्टी जमली आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता.’’

    ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच आता न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे आपल्या आणखी दोन चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना काहीतरी कमाल पाहायला मिळणार, हे नक्की !

  • टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमाच्या लिलावासाठी लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एकाव्यासपीठावर

    मुंबई, 26 सप्टेंबर 2024: टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावासाठी आठही फ्रँचायझी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र होते. मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडलेल्या या लिलावाकरिता भारताचे महान टेनिस पटू लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती यांच्यासह रकुलप्रीत सिंग व सोनाली बेंद्रे या सिने तारकाही एकत्र आल्यामुळे ही संध्याकाळ सनसनाटी ठरली.

    ४ फेऱ्यांच्या अत्यंत चुरशीच्या लिलावानंतर सर्व संघांनी स्पर्धात्मक बोली लावून जगभरातील गुणवान खेळाडूंमध्ये आपला संघ निवडला.

    आर्मेनियाची २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यान प्रथमच या स्पर्धेत खेळत असली तरी तिला ४२.२० लाख अशी सर्वोच्च किंमत देऊन प्रियेश जैन यांच्या मालकीच्या व तापसी पन्नूचा पाठिंबा असलेल्या पंजाब पेट्रियॉट्स संघाने खरेदी केले. अन्य संघांकडून कडवी चुरस मिळाल्यानंतर पेट्रियॉट्स संघाने सर्वाधिक बोली लावून विश्वक्रमवारीतील ४७ व्या स्थानी असलेल्या एलिनाला महिला गटातील डायमंड श्रेणीतून मिळवले. पेट्रियॉट्स संघाने पुरूष गटातील प्लॅटिनम श्रेणीतील अर्जुन कढेची ५ लाख या मूळ किंमतीला खरेदी केली. तसेच लिलावाच्या अखेरपर्यंत संयम राखताना मुकूंद ससीकुमारची ६.८०लाख रुपयाला खरेदी केली.

    आर्मेनियाची एलिना एव्हानेस्यान सर्वात महागडी खेळाडू

    गतविजेत्या बेंगळुरू एसजी पायपर्स संघाने दुसऱ्या क्रमांकाच्या महागड्या खेळाडूची खरेदी करताना दोन वेळचा ग्रॅण्ड स्लॅम मिश्र दुहेरी विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅक्स पर्सेल याच्यासाठी ४२ लाख रुपये मोजले. रोहन गुप्ता यांच्या मालकीच्या व एसजी स्पोर्टसचा मुख्य अधिकारी महेश भूपती याचा पाठिंबा असलेल्या बेंगळुरू संघाने लिलावात उशिरा भाग घेतला. तरीही ऑलिम्पिक पटू अंकिता रैनाला ५लाख रुपयांत खरेदी करताना आपल्या संघाची ताकद वाढवली. त्यांनी दुहेरी स्पेशा लिस्ट अनिरुद्ध चंद्रशेखर याची सुद्धा ४ लाख रुपयाला खरेदी केली.

    गतवर्षीच्या उपविजेत्या बंगाल विझार्ड्स संघाने सानिया मिर्झाचा पाठिंबा मिळवला असून क्रोएशियाच्या पेट्रा मॅट्रिकला ३५ लाख रुपयांत खरेदी करताना बरीच बचत केली. तसेच, बंगाल संघाने श्रीराम बालाजी याची केवळ ६.२०लाख रुपयांत खरेदी करून मोठीच बचत केली. तसेच निकी पोनाच्चा खेळाडूला ३.८०लाख रुपयांत खरेदी करताना पहिली फेरी गाजवली.

    रामकु पतगिर यांच्या मालकीच्या गुजरात पँथर्स संघाने गेल्या काही वर्षातील लिलावाचा अभ्यास केल्याचे दाखवून दिले आणि सुमित नागलची ३५ लाख या मूळ किंमतीला तर भारतातील अव्वल क्रमांकाची सहजा यमलापल्ली हिची ७.८०लाख रुपयांना खरेदी करताना सर्वांचा अपेक्षाभंग केला. गुजरातने दुहेरी विशेषज्ञ विजय सुंदरला ११.५लाखात खरेदी करताना आपल्या संघाच्या ताकदीत भर घातली.

    डॉ विकास महामुनी यांच्या मालकीच्या यश मुंबई ईगल्स या संघाने रोमानियाच्या अनुभवी जॅकलिन क्रिस्टीनला खरेदी करताना सर्वोत्तम खेळाडू निवडणार असल्याचे दाखवून दिले. त्यांनी रोमनियाची अनुभवी जॅकलिन क्रिस्टीन तसेच जीवन नेद्दूचेझियन यांना खरेदी करताना दुहेरीतील विजेतेपदासाठी आपला दावा सादर केला. करण सिंग च्या खरेदीसाठी सर्वच संघामध्ये चुरस रंगली होती. परंतु आपल्या संघात त्याला समाविष्ट करण्यासाठी त्यांना खूपच प्रयत्न करावे लागले.

    राहुल तोडी यांच्या मालकीच्या श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स संघाला लिएंडर पेसचा पाठिंबा आहे. अन्य संघाकडूनही चुरस मिळत असतानाही दिल्ली संघाने टेनिसपटू रोहन बोपण्णाची खरेदी करून बाजी मारली. २०२४ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या रोहन बोपण्णाला संघात समाविष्ट करून दिल्ली संघाने निर्णायक कामगिरी बजावली.

    बेलारूसची ईरिना शायमानोविचला मिळवण्यासाठी दिल्ली संघाला प्रचंड प्रयत्न करावे लागले. ईरिनासाठी चाललेला प्रदीर्घ लिलाव जिंकताना दिल्ली संघाने विजेतेपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले. त्याच प्रमाणे ट्यूनेशियाचा २७ वर्षीय अझीझ दौव्हगाज याची झटपट खरेदी केली.

    लीगचे सह संस्थापक कुणाल ठाकूर यांनी यशस्वी लिलावाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, प्रचंड प्रतिसादाबद्दल मी सर्व संघ मालकांचे आणि त्यांच्या एबेसिडर व मेंटोर या सर्वांचे आभार मानतो. पेस, भूपती आणि सानिया यांना एका व्यासपिठावर येऊन भारतातील टेनिसच्या विकासासाठी लीगला पाठिंबा देऊन सर्वांना आनंद झाला आहे

    लीगच्या आणखी एक सह संस्थापक मृणाल जैन म्हणाले की, चुरशीच्या लिलावामुळे स्पर्धेचा दर्जाही सिद्ध झाला असून लिलावासाठी सर्व संघांनी आपापले नियोजन उत्तमरित्या यशस्वी केले. लिएंडर पेस, महेश भूपती व सानिया मिर्झा यांनी स्वतः लिलावाला हजार राहून लीगच्या झगमगीत यशाची ग्वाही दिली आहे.

    टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा ३ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान मुंबई येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात पार पडणार आहे.

  • येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी

    माननीय राज ठाकरे, आमिर खान, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर  यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

    ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला माननीय राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    खरंतर या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट म्हणजे माननीय राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात माननीय राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या १० ऑक्टोबरला होणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे ती, या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, ‘येक नंबर’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे ‘येक नंबर’मधून मलायकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘जाहीर झालं जगाला’ या प्रेमगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली असून सध्या हे गाणे प्रचंड गाजत आहे.

    एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचा चित्रपट बहुदा पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘येक नंबर’म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की !

    चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणतात, ‘’ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत. तसेच मोठे चित्रपट आपल्या मराठीतही व्हावेत, असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते आणि त्यातूनच ‘येक नंबर’ चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन, त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचे विशेष आभार, या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे.’’

    अभिनेता आमिर खान ‘येक नंबर’ चित्रपटाबद्दल म्हणाला,” येक नंबर या चित्रपटातील सगळ्यांचे खूप खूप कौतुक आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. मी तेजस्विनी, वरदा, राजेश मापुस्कर आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. या चित्रपटाला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात यश मिळो.’’

    या चित्रपटाबद्दल निर्माते साजिद नाडियाडवाला म्हणाले, “माझ्या प्रोडक्शन हाऊसला ७४ वर्षे झाली. महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मला खूप आनंद आहे की, महाराष्ट्राने मला जे दिले त्याचे ऋण फेडण्याची संधी मला ‘येक नंबर’ने दिली आहे. तेजस्विनीने, टीमने या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत केली आहे. हा चित्रपट खूप यशस्वी होवो, अशी माझी इच्छा आहे.’’

    या चित्रपटाबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणाले, “मी या चित्रपटाची कथा ऐकली होती आणि अखेर काही दिवसांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाने मला अक्षरशः खिळवून ठेवले.  महाराष्ट्राचा प्रत्येक पैलू या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. ‘’

    या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले, “मी ही कथा वाचली, त्यावेळी मी पहिला प्रश्न हा विचारला की, परवानगी मिळणार का? आणि परवानगी मिळाल्यावर बनवणार कसा? कारण हा चित्रपट बनवणे अवघड आहे आणि आज आपण इथे आहोत म्हणजे हा चित्रपच उत्तम बनला असणार, याची खात्री आहे.’’

    झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला  निर्माते आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Nivendi Village in Ratnagiri Remains Out of Network for 4 Years, Despite Promises from BSNL

    Residents of Nivendi village in Ratnagiri district have been living without mobile network connectivity for the past four years. Despite promises from BSNL, the government telecom provider, the village remains cut off from reliable communication. A mobile tower was erected in the area, but it has yet to be activated, leaving the village in a communication dead zone.

    Villagers have expressed their frustration over the delay, highlighting how the lack of connectivity affects essential services, including access to emergency healthcare, online education, and other modern conveniences. Many in the village are heavily dependent on mobile networks for day-to-day tasks, making this a significant setback in their daily lives.

    BSNL had assured residents that the tower would be operational soon, yet no progress has been made. Villagers are now calling on local authorities to take swift action and ensure the activation of the network tower.

    “We’ve waited long enough. It’s becoming increasingly difficult to manage without a network. We urge the government and BSNL to act on their promises,” said one of the village elders.

    The lack of mobile connectivity has also impacted businesses and farmers in the region, who depend on timely updates regarding weather and market prices. Nivendi remains hopeful that BSNL will fulfill its commitment and bring the village back online, connecting it with the rest of the world.

  • जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’

    अभिषेक मेरूकर दिग्दर्शित ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘अपलोड करून टाक’ असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण टिपण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतात. तरुणाईच्या आयुष्यात अपलोड करणे, ही दिनचर्या झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील हे गाणे तरुणाईला विशेष रिलेट होणारे आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर कस्तुरी वावरे यांनी यांच्या मधुर आवाजात हे गाणे गायले आहे.

    लाईक आणि सबस्क्राईब’मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित

    ‘अपलोड करून टाक’ गाण्यात जुई भागवत आयुषयातील प्रत्येक क्षणाचा व्लॅाग बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करताना दिसत आहे. या गाण्यातील प्रत्येक ओळ आजच्या तरुणाईच्या आयुष्याशी जोडलेली आहे. त्यामुळे हे गाणे त्यांना अधिक जवळचे वाटेल. लाईक, सबस्क्राईब, व्लॅाग या शब्दांभोवती फिरणारी ही गोष्ट प्रेक्षकांना १८ ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.  अभिषेक मेरूकर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची निर्मिती नितीन वैद्य प्रॉडक्शन्स, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी, अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांनी केली आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

    या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, “मुळात या चित्रपटाची कथा आताच्या वापरातील लाईक, शेअर, सबस्क्राईब या शब्दांभोवती फिरणारी आहे. ही कथा तरुणाईच्या जवळची असली तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे. आजच्या पिढीला आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर करण्याची एक सवय लागली आहे आणि हेच या गाण्यातून दिसत आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ मधील हे गाणे आजच्या पिढीला नक्कीच आवडेल.”

  • आ.धिरज विलासराव देशमुख व दीपिशीखा धिरज देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा

    वाचन संस्कृती जोपासली जावी व त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला सकारात्मक बदल समाजामध्ये दिसून येत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील अवांतर वाचनाची पुस्तके नियमितपणे वाचत असल्याने त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता रीड लातूर उपक्रमाची मागणी लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात रुजला जावा यासाठी जे काही सहकार्य आवश्यक असेल ते निश्चितपणे आपण करू अशी ग्वाही देऊन, आ.धिरज विलासराव देशमुख व दीपशिखा धिरज देशमुख यांनी पुस्तक वाचना विषयी जी चळवळ सुरू केली आहे ती सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे गौरवउदगार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनमोल सागर यांनी काढले.

    वाचनसंस्कृतीस चालना देत असताना रीड लातूर उपक्रमात सहभागी होवून वाचन चळवळीला आकार देत असलेल्या शिक्षक व शाळांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार श्री धिरज विलासराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,रीड लातूरच्या संस्थापीका  सौ.दीपशिखा धिरज देशमुख लातूरच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, श्री शंकर सदाकाळे सर, लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव, औसा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी गोविंद राठोड आदींची उपस्थिती होती.

    पुढे बोलताना श्री अनमोल सागर म्हणाले की, ग्रामीण भागात वाचन संस्कृती रजवणे एवढी सोपी बाब नाही. ग्रामीण भागातील मुलांसाठी रीड लातूर उपक्रम हितकारक ठरत असल्याचे सांगून आ. धिरज देशमुख,सौ.दीपशिखा देशमुख व रीड लातूर टीमला भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक मंडळी करत असलेले कार्य कोतूकास्पद- आ.धिरज विलासराव देशमुख

    सत्कार सोहळ्यात आमदार धिरज विलासराव देशमुख आपल्या मनोगत म्हणाले की,  ग्रामीण भागातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आधी 2G, नंतर 3G ,4G, 5G… भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे ‘गुरु G’  एवढे महत्त्व शिक्षकांचे असून यातून एक स्पष्ट होते की,शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी कायम ठेवत अनेक वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवले आहेत.
    आपला विद्यार्थी जिवनातील कोणत्याही स्पर्धेत मागे न राहता जीवनातील प्रत्येक स्पर्धेस तो यशस्वीपणे सामोरे जावा यासाठी जे काही चांगले करता येईल त्याचा स्वीकार शिक्षकांनी नेहमीच केला आहे. त्याच विचाराने रीड लातूर हा उपक्रम शिक्षकांनी आपला उपक्रम मानून हाती घेतला म्हणूनच यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप चांगला बदल घडत असतो,वाचनामुळे जगाचे ज्ञान आपणास मिळते व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हे अनेकांनी पहिले व अनुभवले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या वाचनातून शब्दसाठा समृद्ध होऊन विचाराला ऊंची प्राप्त होते. म्हणूनच मुलगा वंश व मुलगी दिवियाना यांना आपण आवर्जून पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन देत असतो असे आमदार धिरज विलासराव देशमुख आपल्या मनोगत म्हणाले.

    समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून सुरू असलेला रीड लातूर हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा ठरत असून या उपक्रमास  नेहमीच आपले सहकार्य राहील असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

    वाचन संस्कृती जोपासून एक चांगली पिढी घडवूयात- सौ.दीपशिखा धिरज देशमुख

    समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून पुढच्या पिढीसाठी काय चांगले करता येईल या विचारातून कार्य करायला हवे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खुप आत्मविश्वास व वाचना विषयी आवड आहे. ही बाब ओळखून रीड लातूरने  जिल्हा परिषद शाळांना पुस्तके पुरवली आहेत. या पुस्तकांचा खुप चांगल्या प्रकारे  विद्यार्थी वापर करत असून यासाठी शिक्षक मंडळी मोलाचे सहकार्य करत आहेत. शिक्षकां शिवाय रीड लातूर हा उपक्रम रूजला जावू शकत नव्हता असे सांगून सर्व शिक्षकांचे मोलाच्या सहकार्याबद्दल सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी आभार मानले.

    या कार्यक्रमात रीड लातूरच्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री शंकर सदाकाळे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक,शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी शाळा, रीड लातूर उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य करत असलेली शाळा व शिक्षकांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले तर आभार सुरेश सुडे यांनी व्यक्त केले.

  • “नवरा माझा नवसाचा २”ला प्रेक्षक पावले

    बॉक्स ऑफिसवर ट्रेन सुसाट निघाली

    “नवरा माझा नवसाचा २”ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद.. वीकेंडला ७.८४ कोटीची कमाई

    दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही अधिक  शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला ७.८४ कोटींची  कमाई या चित्रपटाने केली आहे.

    सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती,  कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे.  नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहु ण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.  बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे.

    चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिलं आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंका नाही.