Home

  • ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

    काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता.  तर ही अभिनेत्री आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या जुई भागवतचा. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे.

    आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल जुई भागवत म्हणते, ” माझी आई एक उत्तम अभिनेत्री आहे, सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे बालपणापासूनच माझ्यावर नकळत अभिनयाचे संस्कार होत गेले. याआधीही मी एका मालिकेत बालकलाकाराचे काम केले होते,. एका शोमध्येही सहभागी झाले होते. मालिका केली. आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. यातील माझी भूमिका खूपच वेगळी असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप जास्त उत्सुक आहे. चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त आहे, त्यात पदार्पणात अशा कलाकारांसोबत, टीमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. संपूर्ण टीमकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. एका नवोदिताला आणखी काय हवे असते?

    नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत,  आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • फ्युचर तयार आयोजित ग्रॅविटास परिषदेत अभिनेत्री – टेक स्टार्टअप संस्थपाक श्रद्धा मुसळे यांनी केला महिलांचा आवाज बुलंद 

    मुंबई, ३१ ऑगस्ट :   ग्रॅविटास हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आजच्या स्पर्धात्मक जगात बऱ्याचदा स्वत:ला कमी लेखणाऱ्या किंवा दुर्लक्षित
    महिलांचे स्थान उंचवणारी, महिलांचा आवाज बुलंद करून त्यांना समाजात आदर- सन्मान मिळवून देणारी ही एक चळवळ आहे “,असे प्रतिपादन अभिनेत्री आणि आता टेक उद्योजक झालेल्या श्रध्दा मुसळे यांनी येथे केले.

    आपला हक्क आणि सन्मान मिळवण्यासाठी महिलांना नेहमीच समाजामध्ये झगडावे लागते. अशा समाजात महिलांना त्यांचे नेतृत्व आणि वैयक्तिक ओळख निर्माण करण्यासाठी विविध  साधनांनी सुसज्ज असे हक्काचे व्यासपीठच नव्हते किंवा त्याची गरज भासली नव्हती. पण फ्युचर तयारी या भारतातील आघाडीच्या फिनिशिंग स्कूलने ही महत्त्वाची गरज ओळखली. आणि शनिवारी मुंबईत ‘ग्रॅविटास’ परिषद आयोजित केली.या प्रकारच्या पहिल्या थेट परिवर्तन कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन उंचावून त्यांना सक्षम बनवणारा सर्वसमावेशक प्रतिमा परिवर्तन अनुभव देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ञ या निमित्ताने एकत्र आले होते.

    अभिनेत्री आणि टेक उद्योजिका श्रद्धा मुसळे यांच्या नेतृत्वाखाली, ग्रॅविटास परिषदेत परमिता काटकर, आंतरराष्ट्रीय इमेज ट्रान्सफॉर्मेशन कोच परमिता काटकर, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओजस रजनी, गीतार्ष कौर, शिष्टाचार आणि ग्रूमिंग कोच गीतार्ष कौर, फॅशन सेलिब्रिटी फोटोग्राफर मुन्ना ठाकूर, सेलिब्रिटी स्टायलिस्ट मनोशी नाथ आणि ऋषी  शर्मा यांच्यासह उद्योगातील अव्वल व्यवसायिकांच्या  मार्गदर्शनाखाली परिवर्तन घडवणारी विविध सत्रे झाली.

    पर्सनल स्टायलिंग, एटिक्वेट, मेकअप, बॉडी लँग्वेज आणि कॅमेरा प्रेझेंस यावरील विविध संवादात्मक  कार्यशाळांच्या माध्यमातून कृतीशील रणनीतीसह  सहभागी महिलांना त्यांची पहिली प्रतिमा तसेच त्यांचा वैयक्तिक ब्रँड उंचावण्यासाठी आणि नेतृत्वगूण  वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. एवढेच नाही तर या कार्यक्रमाने नेटवर्किंगच्या मौल्यवान संधी देखील उपलब्ध करून दिल्या ज्या माध्यमातून सहभागी महिलांनी उद्योग तज्ञ आणि यशाची शिखरे काबीज करणाऱ्या समविचारी महिलांशी संवाद साधला.

    या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करताना श्रद्धा मुसळे पुढे म्हणाल्या, एक परिपूर्ण आणि व्यावसायिक म्हणून स्वतःला सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान देऊन महिलांना सज्ज करण्यासाठी फ्युचर टायरच्या ग्रॅविटासच्या माध्यमातून काळाची गरज असे काम झाले आहे. महिला व्यावसायिक जगात स्वतःला कसे सादर करतात हे पुन्हा परिभाषित करण्याच्या आमच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे आणि परिषदेत सहभागी झालेल्या महिला एका नवा आत्मविश्वास अंगी बाणत येथून बाहेर पडतील असा  मला विश्वास आहे.”

    अंशा सय्यद (सीआयडी), जान्हवी छेडा (सीआयडी), सुहानी धनकी (पोरस), अश्लेषा सावंत (अनुपमा), मानिनी डे (क्रिश), परिणीता सेठ (वंशज) आणि वैष्णवी धनराज (ना आना, बेगुसराय) यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे आकर्षण आणखी वाढले आणि ग्रॅविटास खरोखरच संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरले. फ्यूचर तायरी यांच्या ग्रॅविटासच्या पहिल्या आवृत्तीचे यश आहे. महिला योग्य साधने आणि मार्गदर्शनाने काय साध्य करू शकतात याचे हे एक शक्तिशाली द्योतक आहे.

  • सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

    मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. 

    रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. 

    सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट

    टॅबू’चे चित्रीकरण पूर्ण

    आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘ती आणि ती’, ‘वेल डन बेबी’, ‘व्हिक्टोरिया’, ‘बापमाणूस’ आणि ‘मुसाफिरा’ असे नातेसंबंधांवर भाष्य करणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर पुष्कर जोग आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांचा हा सहावा एकत्रित चित्रपट असून या चित्रपटाची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘टॅबू’च्या निमित्ताने पुष्कर जोग आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी पडद्यावर एकत्र झळकणार असून पूर्वी मुंदडा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, किशोरी अंबिये, विजय पाटकर पृथ्वीक प्रताप आणि अनुष्का सरकटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोग लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे  चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे योगेश महादेव कोळी डीओपी आहेत.

    या चित्रपटाबद्दल पुष्कर जोग म्हणतात, ” आनंद पंडित यांच्यासोबत मी हा सहावा चित्रपट करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कायमच कमाल असतो. ते नेहमीच चांगल्या चित्रपटांना, कलाकारांना प्रोत्साहन देतात. मुळात आमच्या दोघांमध्ये एक बॉण्डिंग तयार झाले आहे. ज्यामुळे आम्हाला एकमेकांकडून काय अपेक्षित आहे, हे कळते आणि त्यामुळेच आम्ही उत्तम कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ शकतो. प्रेक्षकांना काहीतरी उत्तमोत्तम देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आम्हा दोघांचा मानस असून ‘टॅबू’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत.”

  • ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

    सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित प्रस्तुत या नाटकाचा शुभारंभ २२ सप्टेंबरपासून होणार असून याचा पहिला मुंबईतील प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. यानिमित्ताने सूर्य होऊ न शकलेल्या त्याच्या पिल्लांची पोटभर हसवणारी… मनभर सुखावणारी…  एक कानेटकरी क्लासिक कॉमेडी! नाट्यरसिकांना परत अनुभवायला मिळणार आहे. हलक्या फुलक्या विनोदातून विचार करण्यास भाग पाडणारे असे हे नाटक आहे.

    रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार शुभारंभाचा प्रयोग

    प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे सुनिल बर्वे, नितीन भालचंद्र नाईक निर्माते आहेत.

    या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे म्हणतात, ” १४  वर्षांपूर्वी मी एका उपक्रम अंतर्गत या नाटकाचे २५ प्रयोग सादर केले होते. त्यावेळी प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, त्यांची पुन्हा हे नाटक रंगमंचावर आणण्याची मागणी, या सगळ्याचाच मान राखत आम्ही ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहोत. खरंतर हे नाटक कोरोनानंतर लगेच आणण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. परंतु आता सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्याने आम्ही पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहोत. हे नाटक जुन्या काळातील असल्याने त्याचा ठहराव जपत, मूळ संहितेसह हे नाटक समोर येणार आहे.

  • धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

    देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट  पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना  प्रेक्षकांचाही  जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची  बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक  स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.

    सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर आधारलेल्या ‘फौजी’ चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी  कासार, शाहबाज  खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे  या कलाकारांच्या भूमिका आहेत. 

    चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे  असून सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ. शंकर तलबे, उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस.पी. गावडे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे , प्रविण बुरुंगे याचे आहे.

    शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

    चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा, तर संकलन विश्वजीत यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. संगीत राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार तर पार्श्ववसंगीत उमेश रावराणे, सूरज कुमार यांचे आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती प्रमुख महेश चाबुकस्वार तर वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्सने सांभाळली आहे.

    ‘फौजी’ मराठी चित्रपट १३ सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.

  • वीर मुरारबाजी १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला  प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ला ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर  येण्यासाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

    अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकामालिका विश्वात ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांची तसेच ‘ओम नमो व्यंकटेशाय’ या दाक्षिणात्य  चित्रपटात ‘तिरुपती  बालाजी’ यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेते सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती  शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यांचे विलोभनीय पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची  तारीख  जाहीर करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

    सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यचं समजतो.‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला ही  प्रेक्षकांचं  हेच प्रेम मिळेल, अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त  केली.

    १६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

    येत्या  १४  फेब्रुवारीला हिंदीत आणि मराठीत  हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

  • ‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

    ‘मराठी वाजलाचं पाहिजे’ असे उच्चार होतात तेव्हा आपसूकच एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे आपला मराठमोळा क्रेटेक्स. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाण आता जगभरात गाजणार आहे. जगभरातील लोक हे गाण आता बघू आणि ऐकू शकतात. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या ऑफिशल चॅनेलवर क्रेटेक्सच ‘तांबडी चांबडी’ गाण प्रदर्शित झाल आहे. आणि त्या लेबलवरील हे पहिलच मराठी गाण आहे. संगीतकार क्रेटेक्स (कृणाल घोरपडे) याचे ‘तांबडी चांबडी’ या गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण होत आहे. त्याने या गाण्याच पार्श्वसंगीत केलं आहे तर श्रेयस सागवेकर याने हे गाण लिहिलं असून गायलं आहे. या गाण्याची निर्मिती वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी केली आहे. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे या कलाकारांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

    या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच ठाण्यातील आय लिफ बँक्वेट्स येथे पार पडला. या सोहळ्याला संगीतकार क्रेटेक्स, गायक श्रेयस, ‘तांबडी चांबडी’ गाण्याची संपूर्ण टीम तसेच हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप, स्टँडप कॉमेडियन अनिश गोरेगांवकर, भाडिपा टीम आणि सागरिका म्युझिक चैनल हेड सागरिका दास असे नामवंत मान्यवर उपस्थित होते.

    तांबडी चांबडी’ गाण ठरलं आंतरराष्ट्रीय संगीत रेकॉर्ड लेबलवरील पहिलचं मराठी गाण

    ‘तांबडी चांबडी’ गाण्याविषयी संगीतकार क्रेटेक्स सांगतो, “माझा आनंद गगनात मावत नाही आहे. माझ स्वप्न होत की माझं गाण स्पिनिंग रेकॉर्डस वरती कधीतरी याव. ज्या रेकॉर्ड लेबलवरती जगभरातील डेव्हिड ग्वेट, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक, डिमिट्री व्हेग्स एंड लाइक माइक, हार्डवेल, स्टीव्हओकी अश्या सुप्रसिद्ध कलाकारांची गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. आणि  आता या विविध भाषेमधील गाण्यांमध्ये आपलं मराठी गाण प्रदर्शित होण. माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याच्या ऑडियोला भारतातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही व्हिडीओच्या स्वरूपात गाण तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. आणि आता लवकरच मी परदेशात मराठी गाण्याचे शो करत आहे. प्रेक्षकांच प्रेम कायम असच राहो. आणि मराठी भाषा, मराठी गाणी देशात नव्हे तर परदेशातही वाजू दे हीच सदिच्छा. येत्या १ सप्टेंबरला पुण्यातील बॉलर येथे मराठीतील सर्वात मोठा शो होणार आहे. तेव्हा पुणेकर आणि सर्व प्रेक्षकांनी जरुर या शो ला या.”

  • १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

    काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीत हसणारे चेहरे दिसत असतानाच मागच्या चेहऱ्यांमध्ये मात्र काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

    नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी  आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

    दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, ‘’ लाईक आणि सबस्क्राईब हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दांभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या १८ ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे, याचा उलगडा होईल.’’

  • ‘वर्तुलम’ नृत्याविष्कार २९ ऑगस्ट रोजी, संध्याकाळी ७ वाजता श्री शिवाजी नाटयमंदिर येथे सादर होणार

                                            

    नमस्कार 🙏 सर्वांना सस्नेह आमंत्रण , मी डॉ.किशु पाल संकल्पना,नृत्यदिग्दर्शन आणि प्रस्तुत वर्तुलम एक आंतरिक नृत्याविष्कार: दिनांक : २९ – ८ -२०२४ रोजी ,संध्याकाळी ७ वाजता , स्थळ : श्री शिवाजी नाटयमंदिर , पश्चिम, दादर, तिकीटमूल्य फक्त: १०० /- आहे , येथे या
    नृत्यनाटिकेसाठी आपले मनापासून सस्नेह आमंत्रित करित आहे. थोडेसे या नृत्यशैली बद्दल सांगेन…

    कै. उदय शंकर ज्यांना भारताचे नृत्याचे जनक मानले जाते तसेच त्यांचा १९४७ मध्ये भारताचा पहिला नृत्यावर आधारित  चित्रपट “कल्पना” (ब्लॅक अँड व्हाईट )मध्ये प्रदर्शित झाला होता त्याच
    नृत्यशैलीला अनुसरून “वर्तुलम” सादर करित आहे. उदय शंकर जी नंतर ही शैली त्यांचे शिष्य कै. सचिन शंकर आणि त्या नंतर त्यांचे शिष्य कै.सुबल सरकार यांनी जपली.  सचिन शंकर यांनी महाराष्ट्रात अनेको सुंदर नृत्यनाटिका ज्याला इंडियन बॅले म्हंटले जात असे, सादर केल्या होत्या. इथे माझे बाबा यांनी सांगितलेली एक छोटीशी आठवण सांगते.
    जेव्हा सचिन शंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिल्यांदा बॅले बसवला होता तेव्हा कै. आचार्य अत्रे खास पहिल्या रांगेत बसून कोण तो बंगाली माणूस आमच्या शिवाजी महाराज यांना नाचवतोय,जरा ही काही वेडवाकडं झालं तर याद राखा म्हणून खास आले होते मात्र प्रयोग झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या वर्तमान पत्रात आज खऱ्या अर्थाने आम्हांला आपले महाराज कळले असा ठळक मथळा होता.    

    सचिन शंकर यांचे “कथा ही राम जानकीची” बॅलेही खूप गाजला होता.त्यात बाबूजी कै. सुधीर फडके यांचे गायन होते. माझ्या लहानपणापासुन सचिन शंकर यांच्या कारकिर्दीतले खूप सुंदर सुंदर बॅले पाहण्याचे भाग्य मला लाभले. त्याकाळात  मीडियाचे व्हिडिओ ई. किंवा आजच्या काळात सारखी प्रसार माध्यमे नव्हती. जी काही  नृत्यशैली पाहिली ती माझ्या आठवणीप्रमाणे या बॅलेमधुन सादर करतेय.

    “माणसाचा जन्म ते अंत ” हा एक कालचक्र असतो व आपण सर्वजण आयुष्याचं हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी या  पृथ्वीतलावर आलेले असतो , ही संकल्पना घेऊन हा बॅले सादर करित आहे.आपण अवश्य यावे ही विनंती…                                          

    लेखन – सुचरिता ,संगीत – संदेश हाटे , गायन – पंडित श्री . अजय पोहनकर / पंडित श्री वेणूगोपाल पिल्ले , प्रकाश योजना – कार्तिक पाल , वेशभूषा – स्मिता – शक्ती , निर्मिती  व्यवस्था – शशांक बामनोलकर , प्रसिद्धी प्रमुख – गणेश तळेकर ,सादरकर्ते कलाकार – संतोष जाधव ,नितिन कांबळे ,सोबत
    “नृत्यालिका ” चे २० यशस्वी…! पुनःश्च आभार 🙏