Home

  • अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर

    अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.  “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या अ‍ॅमेझॉन प्राइम वर पाहु शकता.  

    उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत. 

    “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा “८ दोन ७५”: फक्त इच्छाशक्ती हवी नक्की पहा.

  • अमितराज आणि प्रियांका बर्वे ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार  परिक्षकांच्या भूमिकेत

    छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम  लवकरच सुरु होणार आहे. या  कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार.? याची  उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी  प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज या कार्यक्रमात परीक्षकाच्या  भूमिकेत दिसणार आहेत. याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या दोघांच्या गीतसंगीताची मेजवानी रसिकांनी अनुभवली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत. २४ ऑगस्ट ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू झालेले असून, लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

    स्वरांच्या दुनियातील उद्याचा आवाज  सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे.  अमितराज आणि प्रियांका बर्वे आता महाराष्ट्रासाठी हा आवाज शोधणार  रसिकांसाठी ही उत्सुकतेची बाब आहे. या नव्या शो विषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान आणि होतकरू गायक व संगीतकारांसाठी  ‘सुपरस्टार सिंगर’ ने  एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आणि यासाठी परीक्षक म्हणून आमची झालेली निवड खूपच आनंददायी आहे. इतक्या वर्षात संगीत क्षेत्रातील आमचे अनुभव आणि आम्ही जे काही शिकलोय ते मी या नव्या स्पर्धकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही आतुर आहोत.

    विशेष म्हणजे तुमच्या गाण्याच्या प्रतिभेला हवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. ‘सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे.  आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला. २४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता.

    अधिक माहितीसाठी सोनीलिव्ह च्या https://www.sonyliv.com/dplnk?schema=sony://ems/4/141/0 या संकेतस्थळाला भेट द्या.

  • संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ३ जानेवारी २०२५ ला भेटीला

    रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. आई वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. या निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते.  या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली  बहिण भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे प्रसंग दिसतात. प्रत्येक प्रसंगात मुक्ताई आणि तिचे तीनही भाऊ एकमेकांना सांभाळताना, जपताना  दिसतात. उदाहरणार्थ मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित न होता तुच्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीची लाही लाही करून घेऊन मांडे भाजले. गावात होणाऱ्या अपमानामुळे दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा मुक्ताईने दिली. हीच कथा वेळोवेळी मुक्ताई ला अध्यात्मिक बाबतीत महत्त्व देणाऱ्या तिच्या गुरुबंधूंच्या निवृत्तीनाथांच्या बाबतीत पहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताईचे नाते तर कोणत्याही काळाच्या पलीकडचे, लोभसवाणे असलेले दिसते. याच विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या निरागस, निष्पाप आणि पवित्र नात्याचा उलगडा दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी *“संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई* या चित्रपटात होताना आपल्याला दिसणार आहे. माउली ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे आकर्षक पोस्टर रक्षाबंधनाच्या मंगल दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट नववर्षारंभी ३ जानेवारी २०२५ ला आपल्या भेटीला येतोय.

    चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी, निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.  

    या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

    संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.

  • नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

    मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयान वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.

    उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि.  निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत. त्यांच्या कॅफे च्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका  गुंतवणूकदाराच्या शोधत असतात. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी  एक पैलू दडलेला आहे, तो  रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे.  त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे ए. के ? जनक त्याला का शोधतोय? आणि त्यांचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे.

    चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले, आम्ही मराठी माणसांसाठी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस अशा वेळेस हिंदी किंवा अन्य चित्रपट बघत असतात. यंदा आम्ही खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात मराठी चित्रपट घेऊन येत आहोत. मराठी माणसांनी मराठी सण – उत्सवाला मराठी चित्रपट पहावेत असे आवाहनही त्यांनी केले.

    डॉ. पार्थसारथी आणि सौ. प्रेरणा उपासनी यांनी ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटात अभिनेता गौरव उपासनी, अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन, छायांकन, संकलन, पटकथा अशी तिहेरी जबाबदारी अजिंक्य उपासनी यांनी लीलया पेलली आहे. चित्रपटाची कथा गौरव उपासनी यांची असून या चित्रपटासाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे. तर या चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीत  सुमेध मिरजी यांचे लाभले आहे. या चित्रपटाचे वितरण रूपम एंटरटेनमेंट करत आहेत. नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा सस्पेन्स थ्रीलर  ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

  • नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि शिवसेनेतील रॉबिनहूड म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांच्यावर जनता दरबार नावाचा एक माहितीपट निर्माण करण्यात आला.  सुप्रसिद्ध आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांच्या संकलनाने आणि दिग्दर्शनाने हा 45 मिनिटाचा माहितीपट बनवण्यात आला . हर्षल मीडिया अँड एंटरटेनमेंट एल एल पी निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत १८ आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत.  शिवसेना भवन येथे दर बुधवारी भरणारा नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार सर्वश्रुत आहे .

    सर्वसामान्य माणसाला जेव्हा कुठेच न्याय मिळत नाही तेव्हा तो जनता दरबार मध्ये येतो.  पोलीस आणि प्रशासन जिथे हतबल होते तिथे नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार कामी येतो.  अडलेल्यां नडलेल्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी नितीन नांदगावकर कसे काम करतात याची माहिती या 45 मिनिटांच्या माहितीपटात पाहायला मिळते. सर्वसामान्य व्यक्ती आपली समस्या कशी सुटली त्याची माहिती देतात . गेल्या अनेक वर्षांपासून नितीन नांदगावकर ही समाजसेवा करत आहेत . बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा निष्ठावान शिवसैनिक 80% समाजकारण करत आजही कसा कार्यरत आहे हे या माहितीपटात पाहायला मिळते . शैलेश आचरेकर यांचे दिग्दर्शन आणि हर्षल प्रधान यांची निर्मिती असलेला हा माहितीपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म वर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे . जनता दरबार या नावाने तो लवकरच प्रकाशित होईल.

  • ‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

    तेजस्विनी पंडित, झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट यांची सहप्रस्तुती

    चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नावावरूनच ‘येक नंबर’ असणारा हा चित्रपट १० ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केले असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे अजय -अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर संजय मेमाणे ‘येक नंबर’चे छायाचित्रकार आहेत. चित्रपटाबाबतच्या इतर गोष्टी समोर आल्या असल्या तरी यात कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

    नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला एक तरुण दिसत असून त्याच्या जॅकेटवर ‘मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा’ असे लिहिले आहे. खिशात एका मुलीचा फोटो आणि हातात बाटलीही आहे. त्याच्या मनातील धगधगणारी आग यातून व्यक्त होतेय. प्रेमात दंग आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा तरुण नक्की कोण असेल? काय असेल त्याची गोष्ट? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील. तर या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळतील.

    राजेश मापुस्कर दिग्दर्शित हा चित्रपट १० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, ” ‘व्हेंटिलेटर’नंतर ‘येक नंबर’ हा माझा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी माझ्या पहिल्या चित्रपटावर भरभरून प्रेम केले, तसेच किंबहुना दुप्पट प्रेम ‘येक नंबर’वर करतील अशी मला आशा आहे. पोस्टर पाहून सगळ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया खूपच आनंद देणाऱ्या आहेत. आमच्या टीमची इतक्या दिवसांची मेहनत प्रेक्षकांना आता चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे, याची मला फार उत्सुकता आहे.’’

  • Raj Thackeray denounces the fact that our nation neglects artists such as Bhau Sathe.

    Mumbai – Renowned sculptor Bhau Sathe’s autobiography, “Ha Dhyas Jeevanacha,” was launched at the Nehru Centre, Worli, on Thursday. Raj Thackeray was honorary guest who condemned prevailing disregard for great artists like late Sadashiv alias Bhau Sathe. He said, “We grew up admiring Bhau Sathe’s sculptures. If certain painters and sculptors had been born in a different country rather than India, they might have received significant recognition.”  The event was organized by the Sadashiv Sathe Memorial Museum and Granthali. Eminent personalities like senior painter Suhas Bahulkar, film producer and director  Ravi Jadhav, senior journalist Sudhir Jogalekar, graced the occasion with Granthali’s Sudesh Hinglaspurkar and books co-author  Satish Kanhere.

    Sri Satish Kanhere stated that he felt fortunate to have been part of this journey with Bhau Sathe to take deep dive in story of his life to write autobiography of Bhau Sathe. Sudhir Jogalekar appealed to the government to formally acknowledge the contributions of Bhau Sathe, in the upcoming birth centenary next year. Suhas Bahulkar suggested that such books should be used as study material for art students. Ravi Jadhav encouraged all individuals to explore Bhau’s art gallery in dombivali, to understand him more after reading the book.

    In reply to a request for his influence in obtaining government acknowledgment for Bhau Sathe’s achievements, Raj Thackeray expressed, “Let us unite our efforts to bring this to fruition together. If you seek my support, please empower me, and I will dedicate myself to achieving the best possible outcome.”

    The event was compered by Dhanshree Pradhan-Damle, with Shrirang Sathe and Alpana Lele, son and daughter of Bhau Sathe, respectively, delivering the introductory speech and vote of thanks. An exhibition showcasing Bhau Sathe’s sculptures will be available for public viewing at the Nehru Centre, Worli until August 19 from 11 am to 7 pm.

  • ‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

    मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ १३ सप्टेंबरला येणार भेटीला

    सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. अश्या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारा आहे. ‘पायवाटाची सावली’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या नव्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान लोकांना फार आकर्षित करेल.

    ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत बॉलिवूड मधील महान संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते करत आहेत.

    लेखक – दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “मी या आधी ४ चित्रपटांची निर्मिती केली आहे. एक हिंदी चित्रपट लाखो है यहा दिलवाले व निवडूंग, गाव पुढे आहे, उडत गेला हे ३ मराठी चित्रपट. पायवाटाची सावली हा माझा ५ वा चित्रपट आहे. चमत्कार कसे होतात ? देव आहे की नाही ? हे प्रश्न मला पडायचे यातूनच मला पायवाटाची सावली या चित्रपटाचं कथानक सुचल. हा चित्रपट आशयघन असून एका लेखकाचा प्रवास उलगडणार आहे. एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या आयुष्यात हरतो तेव्हा त्याच्यावर काय परिस्थिती ओढवते पण जेव्हा तो यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याचा प्रवास कसा उलगडतो याच जिवंत उदाहरण यात दर्शविले आहे. आम्ही हा चित्रपट १३ सप्टेंबरला तुमच्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात घेऊन येत आहोत.”

  • बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्धॲड. निलम शिर्के – सामंत

    बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव महाराष्ट्रभर

    मुंबई -बालरंगभूमी परिषद महाराष्ट्रातील बालकांसाठी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे ‌आणि आता लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केला आहे असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत यांनी सांगितले.

    ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २० जिल्ह्याच्या ठिकाणी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. निलम शिर्के- सामंत पुढे म्हणाल्या की, बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न ठेवता पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे यास उदंड असा प्रतिसाद मुलांकडून मिळाला आहे‌‌. ‌दुर्लक्षित होत चाललेल्या किंबहुना लोप पावत चाललेल्या लोककलांविषयी, लोककलेतील तज्ञ मार्गदर्शक लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून करित आहेत.
            तर बालकांच्या प्रत्यक्ष लोककला सादरीकरणाचा महोत्सव साजरा होईल ज्यात लोककलांवर आधारित समूहनृत्य, एकलनृत्य, समूहगीत, एकलगीत व लोकवाद्य असे सादरीकरण होतील. यातून बालकांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत.

    बालरंगभूमी परिषदेच्या आज रोजी महाराष्ट्रात २५ शाखा कार्यरत आहेत. पैकी १९ जिल्ह्यात लोककला महोत्सव साजरा होत आहे. ज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छ्त्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूर, अकोला, नागपूर आदी जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सर्वच भागात  लोककला महोत्सवाचे आयोजन केले आहे. असे महोत्सव प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले.
            लोककला महोत्सवात महाराष्ट्रातील किमान २५ हजार बालके सहभागी होतील. दि. २५ ऑगस्ट पर्यंत सर्व प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण होतील. तर ३० सप्टें. पर्यंत सादरीकरण पूर्ण होईल. पहिला उपक्रम हा लोककला महोत्सवाचा असून दुसरा विशेष मुले अर्थात दिव्यांग मुलांसाठीचा महोत्सव ऑक्टोबर महिन्यात जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील बालकांसाठी कलासंस्कार घडवत नव्या पिढीला नव्या दिशा व नवे मंच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.


          या पत्रकार परिषदेस ॲड. निलम शिर्के – सामंत यांच्या समवेत लोककला महोत्सव समिती प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर, कोषाध्यक्ष दीपक रेगे, असिफ अन्सारी, नागसेन पेंढारकर , अनंत जोशी, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

  • नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.   

    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती
    सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि  सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

    “नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची  उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत.

    त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.