
-
शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार ‘बंजारा’

काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र यावरील पडदा आता उठला असून ‘बंजारा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय. चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.
मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे ‘बंजारा’चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की !
याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात ‘बंजारा’चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा ‘बंजारा’ असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच.”
दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ” वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.” -
घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

कलाकारांच्या आदरातिथ्याने रंगला कौटुंबिक सोहळा उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या घरत कुटुंबाच्या सदस्यांनी नुकतीच श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देत यंदा आपल्या घरत कुटुंबाच्या ‘घरत गणपती’ चित्रपटाचा डंका सर्वत्र जोरदार वाजू देत यासाठी मनोभावे प्रार्थना केली. या घरत कुटूंबाची ओळख नुकतीच एका हृद्य स्नेहभेटीच्या सोहळ्यात सर्वांना करून देण्यात आली. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची विधिवत पूजा, आरती, नैवैद्य, सुग्रास जेवणाचा बेत अशा सगळ्या मंगलमय गोष्टीने ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनची सुरुवात झाली. याप्रसंगी या घरत कुटुंबाच्या स्नेहाची त्यांच्या बंधाची छोटीशी झलक दाखविण्यात आली.
यावेळी बोलताना चित्रपटातील कलाकारांनी सांगितलं कि , ‘आपलं प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास असं नातं असतं. गणपतीच्या वेळी केलेली धमाल वेगळीच असते. हीच धमाल दाखवताना गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाला नात्यांचे सूर कसे गवसणार ? हे पहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहताना निखळ आनंद तर मिळेलच पण या चित्रपटाची गोष्ट प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आणि प्रेमळ नात्यांची आठवण करून देईल हा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला. हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या घरातला वाटेल. दिग्गज कलाकारांसोबत उत्तम संहितेवर काम करण्याचा योग घरत गणपतीने जुळवून आणला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केला. चांगल्या कलाकृतींच्या पाठीमागे पॅनोरमा स्टुडिओज नेहमीच उभी राहिली आहे. ‘घरत गणपती’ हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास पॅनोरमा स्टुडिओजचे मुख्य व्यवसाय अधिकारी मुरलीधर छतवानी यांनी व्यक्त केला.
‘कुटुंब’हा तसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातल्या प्रत्येकाशी आपले काही भावनिक अनुबंध असतात. घरत कुटुंबातल्या याच अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. -
‘जगात भारी पंढरीची वारी

आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी तन्मयतेने, निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे. ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय? उदिष्ट्य काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच इतिहास, वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून सोप्या आणि सध्या शब्दात उलगडत अभिनेता संदीप पाठक यांनी ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे. वारीचा आनंदानुभव देणारं हे गाणं गीतकार गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलं आहे. मनीष राजगिरे यांचा आर्त स्वर या गाण्याला लाभला असून विजय गवंडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.
अभिनेता संदीप पाठक गेली काही वर्ष या वारी सोहळ्यात सहभागी होतायेत. याबद्दल बोलताना संदीप पाठक सांगतात कि, ‘हा आनंद जगात कुठेच नाही आणि तो मिळणारही नाही, त्यामुळेच मी या वारीत सहभागी होत असल्याचे संदीप सांगतात. वारीत सहभागी होणार प्रत्येकजण समाधानाची वाट शोधत असतो. इथे प्रत्येक जण वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. मला ही वारी नवी नसली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. ज्यांना वारीचा सोहळा अनुभवायला मिळत नाही अशांपर्यंत वारीचा प्रत्येक क्षण पोहचवणे, घरबसल्या वारीचं दर्शन त्यांना करून देणे आणि नव्या पिढीला या परंपरेची ओळख व्हावी यासाठी ‘जगात भारी पंढरीची वारी’ या कार्यक्रमाच्या व माझ्या चॅनलच्या माध्यमातून वारीच्या अनुभवाचं हेच संचित मनोरंजनाच्या माध्यमातून मी गेली काही वर्ष सातत्याने देत आलो आहे.
आपल्याकडे बऱ्याच गोष्टीचं ‘डॉक्युमन्टेशन’आहे. वारीचं अशाप्रकारचं ‘डॉक्युमन्टेशन’ व्हावं तसेच ‘ऑडिओ व्हिजुअल’ स्वरूपात ते असावं यासाठी ‘जगात भारी पंढरीची वारी’ या गाण्याच्या आणि माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते व्हावं यासाठी मी प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून हे विशेष गाणं मी आपल्या भेटीला आणलं आहे. गाण्याचा ट्रेंड सध्या खूप मोठ्या प्रमाणात रीलच्या माध्यमातून व्हायरल होत असतो. ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे गाणं ही सर्वत्र वाजून हरिनामाचा गजर होऊन त्याच्या भक्तीरसात तल्लीन होण्याचा आनंद ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे गाणं प्रत्येकाला देईल असा विश्वास ही संदीप व्यक्त करतात.

-
‘फिल्ममध्ये ‘सरप्राईज फॅक्टर’ असणं खास आहे!’ : शर्वरी

बॉलीवूडची आकर्षक उगवती तारा शर्वरी हिने या महिन्यात बॉलीवूडच्या ‘सर्वात मोठ्या सरप्राईज फॅक्टर’ म्हणून स्थान मिळवले आहे! केवळ तिला ब्लॉकबस्टर मुंज्या मध्ये एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा मिळाली नाही तर तिच्या तरस मधील नृत्यकौशल्याने देखील लाखो हृदय जिंकली. आता, महाराज ग्लोबल ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होत आहे आणि नंबर वन फिल्म ठरली आहे, शर्वरीला ‘फिल्मचा सर्वात मोठा सरप्राईज’ म्हणून पुन्हा एकदा प्रेम मिळत आहे!
महाराज चित्रपटात शर्वरी कमी लांबीच्या भूमिकेत आहे, परंतु दुसऱ्या अर्ध्यातील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून कौतुका ची थाप मिळत आहे. महाराज मधील तिची ऊर्जा आणि अभिनय एक तेजस्वी प्रकाशासारखे आहे. नेटिझन्सनी शरवरी ला आजच्या उद्योगातील सर्वात आश्वासक अभिनेत्री म्हणून गौरविले आहे.
शर्वरी आता तिच्या पुढील वेदाच्या प्रदर्शनाकडे वाटचाल करत आहे, ज्याचे दिग्दर्शन मॅव्हरिक फिल्म-मेकर निखिल अडवाणी यांनी केले आहे, ज्यामध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. तिला आदित्य चोप्रा यांनी आलिया भट्ट सह बहुप्रतीक्षित वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स चित्रपटात कास्ट केले आहे. शरवरी ला एक अभिनेत्री म्हणून ओळखले जावे अशी इच्छा आहे जी उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असते आणि त्यामुळे ती प्रत्येक चित्रपटात ‘सरप्राईज फॅक्टर’ बनण्याची इच्छा बाळगते !
ती म्हणते, “माझ्या विषयी लोक मला महाराज चा मोठा ‘सरप्राईज फॅक्टर’ म्हणत आहेत हे वाचून मला खूप आनंद होत आहे. एक अभिनेत्री म्हणून, मला प्रत्येक भूमिकेत आणि प्रत्येक चित्रपटात प्रभाव पाडायचा आहे. म्हणून, मी ‘सरप्राईज फॅक्टर’ म्हणून सर्व स्तुती नम्रपणे आणि आनंदाने स्वीकारेन!”
तरुण अभिनेत्री पुढे म्हणते, “याचा अर्थ माझ्या अभिनयाने एक महत्त्वपूर्ण क्षण निर्माण केला. मी नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न करते कारण मी प्रत्येक चित्रपटाला काहीतरी मोठ्या आणि चांगल्या गोष्टीसाठी एक पाऊल समजते.”
शर्वरी पुढे म्हणते, “माझ्यासाठी हा महिना व्यावसायिकदृष्ट्या खूप छान होता. माझ्या कारकिर्दीतील दुसऱ्या चित्रपट मुंज्या मध्ये मला एक मोठा ब्लॉकबस्टर मिळाल्याचा अनुभव खूपच अद्भुत आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, लोकांना पुन्हा वाटले की मी चित्रपटाचा ‘सरप्राईज फॅक्टर’ होते आणि याचा मला खूप आनंद झाला. शिवाय, महाराज साठी मला मिळणारे प्रेम देखील एक अविश्वसनीय अनुभव आहे. कोणत्याही चित्रपटात ‘सरप्राईज फॅक्टर’ म्हणून ओळखले जाणे ही खूप मोठी प्रशंसा आहे.”
प्रशंशा शर्वरी ला प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रेरित करते. ती म्हणते, “मी एक खूपच लोभी अभिनेत्री आहे. मी नेहमी प्रत्येक पात्रासह काहीतरी वेगळे आणण्यासाठी खूप मेहनत करते आणि म्हणून मान्यता मिळणे माझ्यासाठी खूपच फायद्याचे आहे. हे मला अधिक मेहनत करायला आणि प्रत्येक वेळी पडद्यावर चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करते.” -
I have miles to go and lots to improve upon’ : Junaid Khan on winning love from all quarters for his powerful debut in Maharaj

Netflix and YRF Entertainment’s ‘Maharaj’ has released yesterday and the film, as well as, Junaid Khan’s powerful debut as an actor is winning hearts!
Junaid is humbled by the positive reviews that are pouring his way and is thrilled that people are getting to watch his debut worldwide!
An overwhelmed Junaid says, “I cannot explain in words what I’m feeling right now. Maharaj has been a long and wild journey for me, but all’s well that ends well I guess.”
He adds, “Maharaj was made with a lot of love and respect and passion and I’m glad that the film and my performance is striking a chord with audience at large.”
Junaid further says, “I know I have miles to go and lots to improve upon. I just hope I get a cast and crew as supportive in all my future work.”
The historical drama, Maharaj, is based on one of the greatest legal battles in Indian history: the 1862 Maharaj Libel Case and is directed by Sidharth P Malhotra and produced by YRF Entertainment, the film stars debutante Junaid Khan alongside Jaideep Ahlawat and Shalini Pandey in pivotal roles and features a special appearance by Sharvari.
Based on true incidents that took place in 1862, pre-independence India, Maharaj follows the journey of one of India’s greatest social reformers, Karsandas Mulji.
This David vs. Goliath story showcases one man’s courage to stand against the injustices of his time. Critics and fans alike have lauded the film for its powerful performances.From Junaid being the breath of fresh air to Jaideep’s towering persona, fans are loving it all! -
‘बोलायचं राहून गेलं’ या मराठी चित्रपटाची घोषणा

आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.
जिजा फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती आहेत. निर्मितीसोबतच कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिषेक उत्कर्ष कोळी यांनी सांभाळली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत तंत्रज्ञही उपस्थित होते. या चित्रपटात अभिषेक कोळी एक अनोखी लव्ह स्टोरी सादर करणार असल्याचं ‘बोलायचं राहून गेलं’ या शीर्षकावरून सहज लक्षात येतं. इतर प्रेमकथांपेक्षा हा चित्रपट वेगळ्या वाटेने जाणारा असल्याचे संकेत शीर्षकावरून मिळतात. शीर्षकाला अनुसरून अभिषेक यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून, आजतागायत कधीही समोर न आलेल्या पैलूंचा समावेश केला आहे. दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या साथीने सुमधूर गीत-संगीताची किनार जोडण्यात आल्याने ‘बोलायचं राहून गेलं’च्या रूपात प्रेक्षकांना एक संगीतप्रधान प्रेमकथा पाहायला मिळेल असा विश्वास अभिषेक कोळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, एक फ्रेश कथानक ‘बोलायचं राहून गेलं’ या चित्रपटात आहे. तरुणाईसोबतच सर्व वयोगटांतील रसिकांना नजरेसमोर ठेवून बनवलेला हा एक परिपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे. रोमान्स, कॉमेडी, इमोशन्सचा अद्भूत संगम असलेली अलौकीक प्रेमकथा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ची कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असेही अभिषेक कोळी म्हणाले.
या चित्रपटात अभिजीत आमकर, गणेश यादव, अरुण नलावडे, उमेश राव, अस्मिता सुर्वे आदी कलाकार आहेत. संगीतकार कुणाल-करण या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. निलेश वि. गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून संकेत बारे लाइन प्रोड्युसर आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
-
यशराज फिल्म्सने मानले देशाच्या न्यायव्यवस्थेचे आभार.

यशराज फिल्म्स आपल्या निवेदनात म्हणतात, आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या समाजसुधारकांपैकी एक करसनदास मुळजी यांचा गौरव करणाऱ्या महाराज या चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी दिल्याबद्दल आम्ही आमच्या न्यायव्यवस्थेचे आभारी आहोत.
करसनदास, एक वीर आणि धर्माभिमानी वैष्णव, धार्मिकतेसाठी उभे राहिले, स्त्रियांचे रक्षण केले आणि आपल्या समुदायाचे आणि विश्वासाचे रक्षण केले. महाराजांना त्यांच्या अदम्य लढवय्या भावनेला आणि इतिहासाच्या उजव्या बाजूला राहण्याचे त्यांचे धैर्य याला आदरांजली आहे.
यशराज फिल्म्सकडे भारताला चॅम्पियन बनवण्याचा ५० वर्षांचा वारसा आहे, त्याच्या कथा, तेथील लोक, संस्कृती चा वारसा आहे. आपल्या देशाच्या किंवा देशवासीयांच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारा चित्रपट आपण कधीच तयार केलेला नाही.
आशा आहे की तुम्ही महाराज पहाल आणि करसंदास यांना वंदन करण्यात आमच्यात सामील व्हाल. -
ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूर पॅरिसकडे रवाना होणार , पॅरिस 2024 मध्ये डिओर हाउते कॉउचर शोमध्ये सहभागी होणारी एकमेव भारतीय!

भारताच्या फॅशनची सर्वोच्च व्यक्ती मानली जाणारी सोनम कपूर पॅरिसमध्ये डिओरच्या हाउते कॉउचर फॉल/विंटर शोमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होत आहे, जो २४ जून रोजी आयोजित केला जाणार आहे. या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी आमंत्रित होणारी सोनम एकमेव भारतीय सेलिब्रिटी आहे, ज्यामध्ये जगभरातील फॅशनचे मोठमोठे नामवंत उपस्थित राहतील.
मीडिया द्वारे ग्लोबल फॅशन आयकॉन आणि पश्चिमेतील भारताची सांस्कृतिक दूत म्हणून ओळखली जाणारी सोनम, सुपर लक्झरी फॅशन हाउस, डिओरचे नवीनतम कॉउचर मास्टरपीसच्या अनावरणाची साक्षीदार होणार आहे.
सोनमने पॅरिस फॅशन वीक, किंग चार्ल्सचा राज्याभिषेक, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आयोजित केलेला भारत-यूके रिसेप्शन आणि कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या स्टायलिश उपस्थितीने जागतिक प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, ज्यात ती फ्रेंच रिव्हेरा मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती.
अलीकडेच, ईव्हनिंग स्टँडर्डने सोनमला गेल्या दशकातील यूकेच्या सर्वोत्तम पोशाख परिधान केलेल्यांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. सोनम प्रतिष्ठित टेट मॉडर्न म्युझियमच्या साऊथ एशिया अक्विझिशन कमिटीवर समाविष्ट होणारी एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.
काही प्रमुख जागतिक फॅशन इव्हेंट्समध्ये, सोनमने भारत आणि भारतीय हस्तकला यांचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने एक्टीने भारतात फॅशनला केंद्रस्थानी आणले आहे. अलीकडील एका जागतिक फॅशन अहवालानुसार, सोनम जेंडाया, काइली जेनर, केंडल जेनर, ब्लॅकपिंक, बीटीएस यांसारख्या हस्तींच्या यादीत सामील झाली ज्यांनी २०२३ मध्ये लक्झरी फॅशन ब्रँड्सवर सर्वाधिक प्रभाव पाडला होता!
कामाच्या आघाडीवर, सोनम दोन प्रमुख प्रकल्पांसाठी सज्ज होत आहे, ज्याचे तपशील येत्या महिन्यांत जाहीर केले जातील. -
‘लैला मजनू’ गाण्याची प्रेक्षकांना पडली भुरळ

आजवर इतिहासात असे अनेकजण आहेत जे जगावेगळे ठरत अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट…प्रेमाची परिभाषा या प्रेमीयुगुलांनी अत्यंत तत्परतेने मांडली. या प्रेमीयुगुलानंतर आता सर्वत्र आणखी एका जोडीची चर्चा सुरू आहे. ‘लैला मजनू’ या रोमँटिक गाण्यातून समोर आलेलं हे प्रेमीयुगुल साऱ्यांना वेड लावत आहे. गाण्याच्या थिरकायला लावणाऱ्या अशा बोलांनी आणि गाण्याच्या हटके चालीने साऱ्यांना भुरळ घातली आहे.
‘बिग हिट मीडिया’ने आजवर अनेक हिट गाणी सिनेरसिकांच्या मनोरंजनासाठी आणली आहेत. या गाण्यांच्या यादीत भर घालत ‘लैला मजनू’ हे नवकोर रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका छोट्याश्या गावातील मुलीला एक संधी देत सिनेविश्वाची झलक दाखवणारा कलाकार आणि त्या दोघांमध्ये हळुवार फुलत जाणार प्रेम या गाण्यातून पाहणं रंजक ठरत आहे. या गाण्यात अभिनेता जगदीश झोरे आणि अभिनेत्री तनु भोसले यांच्यातील बहरणारं आणि नोकझोकवालं प्रेम पाहणं लक्षवेधी ठरत आहे.
‘बिग हिट मीडिया’च्या या नव्याकोऱ्या गाण्याची धुरा हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी सांभाळली आहे. तर संगीतकार म्हणून प्रशांत सातोसे याने बाजू सांभाळली आहे. इतकंच नव्हेतर प्रशांतने हे गाणं गायलं असून सोनाली सोनावणेने तिच्या आवाजाची जोड दिली आहे. तर संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित जाधवने योग्यरीत्या पेलवली आहे. गाणं प्रदर्शित होऊन एक दिवस झाला असून हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं असून अनेकजण या गाण्याला पसंती दर्शविताना दिसत आहेत.

-
मुंज्या’ मधील शर्वरीचे हॉलिवूड कनेक्शन!

शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या चित्रपटातील कामाचे आणि ‘तरस’ या भन्नाट डान्सचे प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूप कौतुक होत आहे आता तिला भारतातील दुसऱ्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून निवडण्यात आले आहे कारण ‘मुंज्या’ एक ब्लॉकबस्टर यशाची कहाणी बनली आहे! हे कुणाला ही माहित नव्हते, पण ‘मुंज्या’ मध्ये शर्वरीचा ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’, ‘जस्टिस लीग’ सारख्या एपिक सुपरहीरो चित्रपटांसोबत एक मोठ कनेक्शन आहे!
‘मुंज्या’ एका महाराष्ट्रीयन लोककथेवर आधारित आहे आणि चित्रपटातील भूत एक अविश्वसनीयरित्या डिझाइन केलेले CGI पात्र आहे ज्याने प्रेक्षकांना पूर्णपणे प्रभावित केले आहे. CGI पात्र ब्रॅड मिनिचच्या अध्यक्षतेखालील जगातील अग्रगण्य हॉलीवुड VFX कंपन्यांपैकी एक DNEG ने तयार केले आहे. त्यांनी यापूर्वी वरील उल्लेखित मोठ्या हॉलीवुड हिट चित्रपटांवर काम केले आहे.
शर्वरीने म्हणाली , “माझे निर्माते दिनेश विजान आणि माझे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा ‘मुंज्या’च्या माध्यमातून एक अनोखा नाट्यमय अनुभव देण्याचा मोठा उद्दिष्ट होत. त्यांना स्पष्ट होते की CGI पात्राने प्रेक्षकांवर प्रभाव टाकावा लागेल आणि दिनेश सरांनी त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्तता करण्यासाठी सर्वोत्कृष्ट VFX कंपनीची निवड केली. जेव्हा मी चित्रपटात CGI पात्र पहिले, तेव्हा मी थक्क झाले आणि प्रेक्षकांनाही तसंच वाटतंय, त्यामुळेच आमचा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.”
ती पुढे सांगते, “चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, आमच्याकडे फक्त याचा संदर्भ होता की CGI पात्र कसे असेल, पण जेव्हा मी अंतिम रूप पाहिले, तेव्हा तो एक अविश्वसनीय अनुभव होता. या पात्राने लोकांच्या हृदयाला स्पर्श केल आहे. ब्रॅड (मिनिच) यांनी एक अपवादात्मक काम केले आहे आणि मला माझ्या करियरच्या या टप्प्यावर त्यांच्या सोबत इतक्या जवळून काम करण्यासाठी खूप भाग्यवान वाटतंय. हा पूर्णतः समृद्ध अनुभव होता.”
शर्वरीने पुढे स्पष्ट केले, “ब्रॅड दररोज सेटवर असायचे आणि ते आदित्य सरांसोबत सविस्तर चर्चा करायचे. त्यांची चर्चा ऐकणे आणि जितके शक्य होईल तितके आत्मसात करणे मला खरोखरच आवडले. यामुळे मला मुंज्या पात्राला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली.”
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे आणि काल (मंगळवार, 18 जुलै’24) पर्यंत 64.75cr कलेक्शन केले आहे.
